झुकिनी/स्क्वॉश- नूडल्सकरता १,२ किंवा जशी क्वांटिटी हवी तशा,
सॉसकरता- रंगीत भोपळी मिरच्या- लाल, पिवळ्या, केशरी- चौकोनी तुकडे करुन,
झुकिनी/स्क्वॉश- चौकोनी तुकडे करुन,
ताजे टोमॅटो- जरा मऊसर, रस निघतील असे, १,२
लसणीच्या पाकळ्या- ३,४ स्लाईस करुन,
ताजी मिरपूड, पास्ता सिझनिंग, ताजी बेसिल पानं आणि हवं ते चीज वरुन घ्यायला, चवीपुरतं मीठ, ऑलिव ऑईल- नूडल्सकरता आणि सॉसकरता
हल्ली बाजारात स्पायरलायझर मिळायला लागलंय ते वापरुन झुकिनीचा शेंडा उडवून अर्ध्यात कापून तुकडा करुन घ्यावा. फ्लॅट भाग स्पायरलाझरवर अॅडजस्ट करुन उजव्या बाजूला गोल गोल फिरवत नूडल्स करुन घ्याव्यात.
आधी तेलावर लसणीच्या पाकळ्या घालून मग त्यात भोपळी मिरच्या आणि झुकिनी परतून घेऊन मीठ, मिरपूड, पास्ता सिझनिंग घालून शिजत ठेवावं. एकीकडे नूडल्सकरता पाणी उकळत ठेवावं. (ह्या नूडल्स अगदी दोनच मिनिटं शिजवायच्या असल्याने आधी सॉस करुन घ्यावा). भोपळी मिरच्या, झुकिनी जरा शिजल्यासारखी वाटली त्यात टोमॅटॉच्या फोडी घालून रस सुटू द्यावा.
नूडल्सकरता पाणी उकळायला लागलं असल्यास त्यात ऑऑ घालून नूडल्स घालाव्यात. दोनेक मिनिटांनी तोडून बघाव्यात. शिजलेल्या आणि किंचीत कच्चट ह्या मध ला रिझल्ट अपेक्षित आहे. नूडल्स शिजलेल्या वाटल्या की चाळणीत ओतून गार पाण्याखाली धुवाव्यात आणि सॉसमध्ये मिक्स करुन एक दोन मिनिटं शिजवाव्यात.
वाढताना वरुन हवं असेल ते चीज, बेसिलची पानं घालून सर्व्ह करावं.
स्पायरलाझर-
अख्ख्या भाज्या खायला आवडत नसतील तर भाज्या शिजल्यावर मिक्सरमध्ये फिरवूनही चालेल.
व्वा मस्त आहे हे... आवडेश
व्वा मस्त आहे हे... आवडेश एकदम
फायनल डिश तोंपासू
फायनल डिश तोंपासू
ह्यात थोड्या नुडल्स टाकल्यात
ह्यात थोड्या नुडल्स टाकल्यात तरछोट्या मंडळींना काही वेगळ काही आहे हे कळतही नाही. फोटो मस्त!
कसले सुरेख दिसते आहे ते
कसले सुरेख दिसते आहे ते झुडल्स यम्मी वाटते आहे.
मस्तच
मस्तच
छान
छान
वेगळाच पदार्थ. टेस्टी असावं
वेगळाच पदार्थ. टेस्टी असावं असं फोटो बघुन वाटतंय.
झुकीनीचे म्हणुन झुडल्स.
तर मग न्युडल्स मधल्या न्यु चा काय अर्थ आहे?
न्युडल्स मधल्या न्यु चा काय
न्युडल्स मधल्या न्यु चा काय अर्थ आहे?>> त्या न्युडल्स नसतात हो. नुडल्स असतात. आता लावा अर्थ.
बरोबर केपी.
बरोबर केपी.
सस्मि त, न्यु नाही, नू. आता नु चा काय अर्थ ते काही माहित नाही.
कसले सुरेख आहेत नुडल्स! मस्त
कसले सुरेख आहेत नुडल्स! मस्त रेस्पी
भारी आहे रेसिपी!
भारी आहे रेसिपी!
मला झुकिनी तिच्या स्वरूपात
मला झुकिनी तिच्या स्वरूपात फारशी आवडत नाही, पण पाकृ वाचून आणि छायाचित्र पाहून खावेसे वाटते आहे.
बर्याच जणांकडून झुकिनी आवडत
बर्याच जणांकडून झुकिनी आवडत नसल्याचं ऐकलंय. वंडर व्हाय!!
झुकिनीची भजी एकदम घोसाळ्यासारखी लागतात मला चवीला.
मला झुकिनी तिच्या स्वरूपात
मला झुकिनी तिच्या स्वरूपात फारशी आवडत नाही, पण पाकृ वाचून आणि छायाचित्र पाहून खावेसे वाटते आहे.>>+1
यात असेच गाजरही मिक्स करुन केलेली रेसिपी पाहिली आहे. हे स्पायरलाईझर घेतलेच पाहीजे.
रेसिपी चं नाव आवडलं.
रेसिपी चं नाव आवडलं.
>> मला झुकिनी तिच्या स्वरूपात फारशी आवडत नाही
+१
"उगीच नखरे करू नये, सगळ्या भाज्या खाव्या" ह्या संस्कारामुळे खाते झुकिनी.
स्पॅघेटि स्क्वॉश ही वापरता येईल. मला त्या स्क्वॉश चा स्पॅघेटि रूपी गर बघून गम्मत वाटते.
>> वंडर व्हाय!!
माझ्या मताप्रमाणे त्याला स्वतःचं असं काहिच कॅरॅक्टरिस्टीक नाही. ना चवीत ना टेक्स्चर मध्ये.
मस्तच
मस्तच
आजकाल भारतातही स्पायरलायझर्स
आजकाल भारतातही स्पायरलायझर्स मिळू लागली आहेत. दुधीच्या नूडल्स अप्रतिम होतात त्यात. पाण्यातून काढण्याऐवजी डायरेक्ट तेल/ लोण्यावर सॉटे करुनही खूप मस्त लागतात ! दुधीसारखी बोअर भाजी एकदम इंटरेस्टिंग बनवणारं हे यंत्र एकदम गुणी आहे
अरे वा छान दिसतय .
अरे वा छान दिसतय . स्पायरलाझर- घ्यायला पाहिजे.
कुठे मिळतं हे? खरंच मस्त
कुठे मिळतं हे? खरंच मस्त दिसते आहे दुधी ची भाजी
इथे काही स्पायरलाझर्स आहेत...
इथे काही स्पायरलाझर्स आहेत...
दुधीसारखी बोअर भाजी एकदम
दुधीसारखी बोअर भाजी एकदम इंटरेस्टिंग बनवणारं हे यंत्र
<< खरच ईंटरेस्टिग दिसतेय दुधी, नुडल्स बनवल्यावर करुन बघणार अशी भाजी ..
फोटो अतिशय सुरेख आलेत. तयार
फोटो अतिशय सुरेख आलेत. तयार झुडलचा फोटो एकदम मास्टरशेफ कॅटेगरीतील.
झुक्कीनी कशी लागेल कल्पना नाही, मला उगीचच घोसाळ्याची आठवण येते तिला बघितले की. इथे मिळते झुक्कीनी पण तिचा बाहेरून पिवळा रंग खूप उग्र वाटतो म्हणून मी कधी घेतली नाही.
अगो, दुधी घालून ह्याच कृतीने दुधल्स केल्या का?
खरंच मस्त दिसते आहे झुडल्स.
खरंच मस्त दिसते आहे झुडल्स. Thanks to Sayo. After reading this receipe i came to know about Spirilizer and within no time i ordered from Flip Kart. These are available cheaper on flipkart than Amazon. Those who want to buy Spirilizer please check the rates of Amazon and Flipkart. Thanks
अगो, तुझ्या Spirilizer चा
अगो, तुझ्या Spirilizer चा फोटो टाक
साधना, ह्यावेळी फक्त थेंबभर
साधना, ह्यावेळी फक्त थेंबभर लोण्यावर दुडल्स सॉटे केल्या. मीठ-मिरपूड-लसूण-इटॅलियन सिझनिंग घालून.
शूम्पी, सायोचं आहे तेच आहे माझ्याकडे. तिच्याकडून चांगला रिव्ह्यू मिळाल्याने तेच सांगितलं बहिणीला आणायला. एकदम पटापट नूडल्स पडल्या आणि धुवायलाही सोपं आहे.
प्रकरण मस्त दिसतंय.
प्रकरण मस्त दिसतंय.
याचं नाव बदलता येणार नाही का?शीर्षकावरून चीनी पदार्थ भारतीय रूप घेऊन अवतरलाय असं वाटत राहतं.
वरच्या चित्रातील स्पायरलायझर
वरच्या चित्रातील स्पायरलायझर कुठल्या कंपनीचे आहे?
अमेझॉनवर आहे का?
वरच्या चित्रातील स्पायरलायझर
वरच्या चित्रातील स्पायरलायझर कुठल्या कंपनीचे आहे?
अमेझॉनवर आहे का?Snyter World Cuisine 2-Blade Handheld Turning Vegetable Slicer / Spiralizer, includes 2 Different Stainless Steel Blades In Assorted
Snyter World Cuisine 2-Blade…
450.00 Amazon Prime
>>याचं नाव बदलता येणार नाही
>>याचं नाव बदलता येणार नाही का?शीर्षकावरून चीनी पदार्थ भारतीय रूप घेऊन अवतरलाय असं वाटत राहतं.>> ह्याच नावाने इथे मिळतात म्हणून तेच नाव ठेवलंय.
अगो, छान दिसतायत. मी अजून झुकिनी सोडून कुठल्याही भाज्यांच्या करुन बघितलेल्या नाहीत. गाजराच्या करुन बघते. इथे ग्रोसरी स्टोअरला बिटाच्याही पाहिलेल्या आहेत.
सायो! मी पण आणला स्पायरालायझर
सायो! मी पण आणला स्पायरालायझर , छान छोटुसा क्युट आहे , मस्त होतात झुडल्स! मी झुकिनी,गाजर आणी परशियन काकडि असे करुन बघितले, गाजर सोडुन बाकी मस्त होतात, गाजराचे अर्ध चन्द्राक्रुती झाले.
हक्का नुडल्स करतो तसे केले होते मी, भारी लागतात.
Pages