सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

६ महिने जुन्या प्रोग्रॅम ची सुरवात " नव्या कोर्‍या करकरित फ्रेश मैफीलित" हे फार ऑड वाटत एकायला, तेजश्री तिच्या द्रुष्टिने बरच चान्गल करायचा प्रयत्न करतेय फक्त तिने ते तोड फाडुन क्रुत्रिम हसण कमी कराव.

" नव्या कोर्‍या करकरित फ्रेश मैफीलित" >>> हे सारखंच ऐकून कंटाळा आला. बाकी निहीराच कट्यारीकरीता गायलेल माई माई........... आहाहा. खुप सुंदर Happy

निहिरा सुंदर गायली, शरयु सुध्दा चांगली गायली.
बाकी कोणी खास नाही, आजही एलिमिनेशन नाही फक्त बॉटम २ अनाउन्स केले आणि नेक्स्ट वीकवर ढकललं. Uhoh

निहिरा आवडलीच या आठवड्यात.
कपडे पुन्हा एकदा भयाण!! तेजश्री चा ड्रेस तिला अजिबात शोभत नव्हता. ड्रेसही तुळशीबागेतून स्वस्तात आणलाय अशा चीप क्वालिटीचा दिसत होता. शरयू चा पण ड्रेस , प्रसेन्जीत चे भयंकर जॅकेट , सगळेच तुळशीबागेत रस्त्यावर शॉपिंग केल्यासारखे. लो बजेट म्हणजे किती लो असावं!!

निहिराने गायलेल्या तिच्याच गाण्यात मीटर/चाल यात काहीतरी गडबड असल्याने वारा, धारा हे वरा, धरा असं काहीतरी ऐकू येत होतं. अर्थात तिचं गाणं आवडलं.

तेजू(!)ला अवघड वाटू नये म्हणून तिघा जजेसनाही तसेच चित्रविवित्र कपडे देतात की घालायला. वैशालीचे कपडेही अनेकदा भयंकर वाटायचे. नववारी साडी विचित्र पद्धतीने नेसवलेली असायची.

मराठी सारेगममध्ये पल्लवीच्या कपड्यांबाबतही अशीच चर्चा मायबोलीवर व्हायची हे आठवतंय. तिचा कपडेपट कोणी 'पगली' सांभाळायची.

पूनम छत्रे आणि वैभव जोशी या कार्यक्रमात नक्की कसलं लिखाण करतात?? जजेसच्या कमेंट्स आणि स्पर्धंकाचे मनोगत त्यांचे स्वत:चे असेल. मग तेप्र ला दिलेले संवाद आणि पुचिचा आचरटपणा??

काल गाणी छान झाली. जयदीप आऊट.

त्याला निरोप देताना त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवली. तेव्हाचं तेजश्रीचं वाक्यं :
तुझा आजवरचा स्वतःला बेटर आणि बेटर करण्याचा जर्नी आपण विटनेस करुया.
अरेरे... काय हे वाक्य.. कोलगेट ची जाहिरात बघतोय असं वाटलं. टीवी वरच्या जाहीरातींमधे अशी आंग्रजाळलेली वाक्यं असतात. भाषा दारिद्र्यच.. Sad

सगळी हवाच गेली आहे प्रोग्रॅम मधली, वैशाली योग्यं वेळी बाहेर पडली !
अति स्ट्रेच झालाय प्रोग्रॅम आणि सगळेच स्पर्धक कंटाळल्यासारखे गातायेत अता.
प्रसन्नजीत पुन्हा बॉटम २ मधे !
शरयुही ओकेच गायली, नथिंग एक्स्ट्री ऑर्डीनरी.
निहिरा मुलीच्या अ‍ॅडमिशनला जर्मनीला गेली गाणं रेकॉर्ड करून.
अनिरुद्धनी अनेक रिअ‍ॅलिटी शोज मधून अनेक गायकांनी वर्षानुवर्षे गायलेलं ‘आके सीधी लगी‘ किशोरदांच्या आवाजतल गाणं गायलं, हा टेक्निकली गातो ठिक पण नाहीच आवडत समहाउ.
श्रीनिधी कधी कनेक्ट नाहीच झाली.
विश्वजीतला पुन्हा चढवलं जजेसनी Uhoh
मधुराच्या परफॉर्मन्स बद्दल न बोललेलच बरं, फार जास्तं टिकली शो मधे, कायम आवाजाचा इश्यु.. जुईली चांगली होती मग.
असो, कंटाळा आला आता ओव्हरऑल कार्यक्रमाचा !

संपली तर बरं होईल, उरलेल्यांपैकी निहिरा सोडून कोणाच्या गाण्यात इंटरेस्ट राहिला नाही.
प्रसन्नजीत चांगला गायचा पण त्याचही बिनसलेलं दिसतय काहीतरी.

आके सीधी लगे हा चॉइस ठार चुकीचा होता. असल्या गाण्यांना हात न लावणे बरे असे वाटले. आशा, लताची काही गाणी घटाटे वगैरे च्या आवाजात ऐकली की बास ! थांबवा ! असं ओरडावंसं वाटतं.
त्यावरून आठवलं, रायजिंग स्टार मधे अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती येऊन गेल्या , तेव्हा त्यांच्या आवाजांची इतक्यातच झालेली हालत ऐकली आणि मंगेशकर भगिनींचं महात्म्य अजून जास्त अधिरेखित झालं.

शरयूला बारावीची परिक्षा द्यायची नाही का ? चालू झाली ना परिक्षा.

महेशचं बोलणं जड असेल तरी मराठी मधे तरी असतं.

मधुराला (बाहेरचा) रस्ता दाखवण्यासाठी हातभार लावला आहेच.

युंही चला चल सारख्या इतक्या मस्त गाण्याची विश्वजीतने त्याच्या स्टाईलने वाट लावलीच. :रागः

>>तरी राजगायक विश्वजीतच Uhoh
हे म्हणजे जखमेवर मीठ..! Sad

असो. सर्वात वाईट्ट प्रकार म्हणजे 'मेरा रंग दे बसंती चोला' हे गाणे त्याने अक्षरशः भांगडा व ईतर सर्व अ‍ॅक्रोबेटीक्स सकट सादर केले.. अरे काय? गाण्याची पार्श्वभूमी काय, शब्द काय, त्याची ट्रीटमेंट काय.... सोनू निगम ने कसे गायले आहे... आणि हा चक्क आनंदाने भांगडा सादर करत होता. वेताचे फटके मारायला हवे होते... आणि एकाही परिक्षकाने याबद्दल काहीच सांगितले नाही.
क म्मा ल...
टी आर पी, पैसे, यापूढे सर्वच गहाण पडलय की काय? quite disappointed...! wasn't expecting this from Avadhut and Mahesh.

>>आके सीधी लगे हा चॉइस ठार चुकीचा होता. असल्या गाण्यांना हात न लावणे बरे असे वाटले
काही गाणी ही फक्त पडद्यावर बघून आनंद घ्यायचा असतो.. स्पर्धेत सादर करायची नसतात... ईतका मिनिमम कॉमन सेंस देखिल या गायकांना नाही हे पाहून आश्चर्य वाटते. को आहे त्याचा मेंटर?

बाकी ईतरांबद्दल काय लिहायचे? आजवरचा सर्वात वाईट्ट, अतीशय टूकार, अत्यंत खालावलेला दर्जा कुठल्या संगीत कार्यक्रमाने गाठला असेल तर तो हा कार्यक्रम असेल.
एस टी परिवहन मंडळाकडे अनाऊंसर्स ची कमतरता असेल तर तेजश्री प्रधान ला घायला हरकत नाही! एक्दम फीट आहे..
" पुढील गाडी पुणे ते ठाणे ssssssssssss"
प्रवाशंनी फलाट क्र. १ वर जावेssssssssss

एक कट्यार सोडल्यास सगळच लो बजेट! या अशा कार्यक्रमासाठी स्क्रिप्ट (?) लिहायला (really?) गुणी लेखकांची प्रतिभा खर्ची पडत असेल तर वाचवा मराठी ला!

तुझा आजवरचा स्वतःला बेटर आणि बेटर करण्याचा जर्नी आपण विटनेस करुया. >>> गुणी लेखकांची प्रतिभा खर्ची पडत असेल तर वाचवा मराठी ला! >>> हे असं गुणी लेखक वगैरे वगैरे लिहित असतील, तर वाचवाच मराठीला. Uhoh

>>हे असं गुणी लेखक वगैरे वगैरे लिहित असतील,
गुणी लेखक फक्त कार्यक्रम सुरू होतानाचे प्रास्ताविक, थिम, गीत, संगीत याबद्दलची अनुशंगाने आलेली माहिती, पाहुण्यांची ओळख एव्हडेच लिहीत असावेत. बाकी सर्व ईतरांचे वैयक्तीक असावे.
पण तरिही प्रतिभा या अशा कार्यक्रमांसाठी खर्च होत असेल तर वाईटच आहे परिस्थिती...!
btw: public seems to be expecting too much from Tejashree Pradhan.. काहीही हा पब्लिक! Happy

>>झा आजवरचा स्वतःला बेटर आणि बेटर करण्याचा जर्नी आपण विटनेस करुया.

बाकी आजकाल हा सार्वत्रिक 'आजार' आहे Happy ना धड मराठी, ना धड ईंग्लीश, ना धड हिंदी... आणि हा कार्यक्रम तर त्याचे चपखल प्रकटीकरण आहे..
ऊजवीकडे मिसळगाव; डावीकडे ऊसळगाव; मधे भेसळगाव, आणि मंचावर वॉव गाव.
Happy

Lol

ह्या वेळी कोण आहे बॉटम २ मधे ?

डबल पोस्ट.

काल स्पर्धकांच्या निवडीची गाणी होती आणि एकजात सर्वांनी हिंदी गाणी म्हटली. मराठीत स्पर्धेसाठी म्हणण्यासारख्या गाण्यांची एवढी वानवा आहे वाटतं.

काल स्पर्धकांच्या निवडीची गाणी होती आणि एकजात सर्वांनी हिंदी गाणी म्हटली. मराठीत स्पर्धेसाठी म्हणण्यासारख्या गाण्यांची एवढी वानवा आहे वाटतं. >>> विश्वजीत ने काल कोणत गाण गायल?

Pages