सूर नवा ध्यास नवा- कलर्स मराठी

Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02

कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.

Group content visibility: 
Use group defaults

वैशालीने एम फील, पीएचडी करतेय असंही सागितलं.
पब्लिक व्होटिंग? अरेरे. कट्यारीचा फैसला पाहून टुव्ही बंद केला मी. त्यामुळे हे कळलं नव्हतं.

पण असं मधेच सोडून जाता येत असेल. अ‍ॅग्रीमेंट वगैरे करत असतील ना चॅनेलवाले. मी फक्त शिवजयंतीला बघितला कधी नव्हे तो आख्खा एपिसोड.

हा तसं असेल तर चुक तिची नाहीच अर्थात. तिला करीयरसाठी शुभेच्छा. इथे अडकण्यापेक्षा एखादा चांगला प्रोजेक्ट करत असेल तर जास्तच चांगलं म्हणा.

>>What happened? Vaishali left SNDN ?
Yog cha feedback vachla vatta Happy
हा हा... काश!
मला तरी अनिरुध्द व शरयू हे दोनच दावेदार दिसतात.. पण पब्लिक वोटींग वगैरे म्हणजे काही सांगता येत नाही.. RTI द्वारे वोटींग डीटेल्स मागवले तर काय परिस्थिती असेल ही शंकाच आहे... Happy
असो. कार्यक्रमाचे शेड्युल वाढल्याने वैशाली ने सोडून दिले असेल तर अवधूत व महेश कडे दुसरे विशेष काम्/कमिट्मेंट नाही असे म्हणायचे आहे का? Wink बापरे...!
शाल्मली चे एकवेळ समजू शकतो..
but it was quite obvious from everyones facial and body expressions that it was' no ball' call! but if she was allowed to go offline for surgery and come back... then this should not be a surprise either.
ईथल्या कुणाला चॅलेंजर एंट्री म्हणून जायचे आहे का? मला सांगा.. प्रयत्न करून बघतो.. अवधूत एव्ह्डी नाही पण थोडीशी वट आहे . Happy

>>शाल्मली US टूर ला येतेय या महिन्यात प्रीतम बरोबर.
अरे देवा! Sad ऊसगाव वाल्यांना शुभेच्छा!
>>मला वाटते ती पण सोडेल कार्यक्रम.
I think there will be only last two things standing! Tejashree and Katyar.. everyone else will get back to their day to day lives.. Happy

.."शाल्मली US टूर ला येतेय या महिन्यात प्रीतम बरोबर."
चला तर कॅप्ट्नस ना विचारू या यावर त्यांचं काय मत आहे?
अवधूतः वा वा वा शाल्मली, शाले, शालू, तेरी तो निकल पडी! इथून एक्सीट तो डायरेक्ट अमेरीकेला आणि ते ही प्रीतम बरोबर.. टांगा, घोडा नाहि तर डायरेक्ट 'बुंग' हा.. (जमलच तर मला पण बोलवा काय?)
महेशः कसं आहे ना कधी कधी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटींग सुध्धा मिलीयन डॉलर चा भाव घेऊन जातं.. म्हणजे खरं तर आपण स्वताशीच विचार करत असतो की या वाटेल तशा मारलेल्या फराट्यातून आणि विसंगत मांडणीतून चित्रकाराला नेमकं काय सांगाय्चं आहे. का ऊगाच टाईमपास केलाय आणि भाऊ आपण आपल्या डोक्याचा भुगा करून घेतोय.. मला आठवतय आमच्या शालेय शिक्षणात, चित्रकलेच्या विषयात अ‍ॅब्स्ट्रॅक्ट ड्रॉईंग कुणी काढलं की पोरं त्याची जाम खिल्ली ऊड्वायचे.. कारण स्थिर चित्रातलं मडकं निदान आपल्याशी बोलतं तरी (!), किंवा एखाद्या 'देखाव्या' चित्रातून आकाशात दाखवलेल्या एखादा कावळा सदृष्य आकार, त्यातून लेगच काव काव कानी येती बघ, किंवा चुकून खाली ब्रश चा हिरवा फराटा मारल्या गेल्याने गवताचा होणारा भास आपल्याला डोलायला लावतो, किंवा एखादे वाकलेले नारळाचे झाड दाखवले असेल तर त्यातून एक जीवंतपणा अनुभवास येतो आणि आपणही त्या चित्रापुढे वाकतो. . चित्रकारच्या भावनांशी एक मस्त संवाद सुरू होतो.. पण अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चं असं आहे की ज्याची ईंद्रीये जशी संवेदनाशील व रंध्रे जितकी ऊघडी तितकं त्याला त्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट चित्राचं आकलन होतं.. म्हणजे मग एखाद्याला त्या वेड्या वाकड्या राफाट्यातून आयुष्याची दिशा दिसते, एखाद्याला त्या वाट्टेल तशा ओघळलेल्या पातळ रंगातून करूणेचा पाझर दिसतो... एखाद्याला तर ऊरलेला रिकामा कॅन्व्हास च द्वैतं अद्वैताचं मीलन वाटतं (अवधूत- आहाहा क्या बात है!) तर मला वाटतय की शाल्मली चं गाणं व अनाकलनीय परिक्षणे ऐकून प्रीतम चं ही तसच झालं असाव.. त्यामुळे दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!

हे लोक फुलटाइम त्या कार्यक्रमात नाहीत.
तिन्ही भागांचं शूट एकाच दिवशी. एक दिवस रिहर्सल..सुरुवातीला तर मेंटॉरिंग पण फोनवर केल्याचे उल्लेख होते.
मागे लिहिलं तसं, विश्वजीत आमच्या कोकणातल्या लहानशा गावात गाऊन गेला ४ फेब्रुवारीला..(तो सारखा वर्ल्ड टूर करतो म्हणून विश्वजीत, जमिनीपेक्षा विमानात जास्त वेळ असतो, असलं काय काय सांगितलेलं तेजश्रीने त्याच्या इंट्रोला)

वैशालीने एम फील, पीएचडी करतेय असंही सागितलं
《《
Really ? That's great !

हा हा... काश!
मला तरी अनिरुध्द व शरयू हे दोनच दावेदार दिसतात
<<
Lol , Sharayu has 12th exams lined up , I guess she has good reason to leave the show next ?
Aniruddha looks judges fav so far but audience can surprise them , ek pay var karun Vishwajeet can ride his tanga palti ghode faraar with public voting Lol

>>वैशालीने एम फील, पीएचडी करतेय असंही सागितलं
《《
>>Really ? That's great !
हो पण कुठला विषय ते नाही सांगितलं... Happy
तू त्या एम फील मधल्या कुणाला पण विचार ते तुला हेच सांगतील की त्यापेक्षा तू ईथे (सूनध्यान मध्ये) जास्ती वेळ दिलास तर तुझा फायदा होईल..! असे वर तीला अवधूत महाराजांनी ऐकविले.
शाल्मली म्हणली, it feels like bad break up..!
महेश बरच काही बोलला , पण लक्षात ठेवण्या एव्हडं एकच होतं- "खूप खूप शुभेच्छा"! Happy

सध्या गाजत असलेल्या आम्ही दोघी मधलं “कोणते नाते “ गाणं वैशालीने गायलय, आवडलं गाणं , खूप छान गायलय.
, मेकिंग चा व्हिडीओ पॉप आला युट्युब वर.
https://youtu.be/YwkRUHOqbf4

शनिवारी रायझिंग स्टार बघितला. ड्युएट एपिसोड होता.. मस्त होता भाग. सोलो सिंगर्स ड्युएट करु शकतात सहज पण ग्रुप च्या ड्युएट मध्ये पण चांगला प्रयत्न होता..

Rising star खरंच खूप चांगला शो आहे,त्या स्पर्धकांची तुलना सूर न ध्या न बरोबर नाही होऊ शकत...मराठी री.शो माझ्याकडून नाही पाहिले जाऊ शकत.

रायझिंग स्टार कुठल्या चॅनल वर लागते ? बऱ्याच वर्षांत हिंदी गाण्याचा कार्यक्रम पाहिलेला नाही. सगळे म्हणतात तर बघू.
सोनू निगम च्या सारेगम नन्तर काहीच पाहिलं नाही बहुतेक. Sad

रायजिंग स्टार्स कलर्स वर आहे. शनि- रविवार रात्री ९ ईस्टर्न टाइम बहुतेक. त्याचा होस्ट छान आहे Happy जजेसपैकी मला शंकर महादेवन सोडून बाकी दोघे वेडे वाटतात पण. गेस्ट्स चांगले असतात. सुखविंदर चा एपिसोड चांगला झाला. ब्रजवासी बर्दर्स पैकी मला आता त्यांचे २-३ भाग पाहिल्यावर फक्त हेमंत ब्रिजवासी पावरफुल वाटला आणि थोडाफार तो होशियार.

निहिरा खूप मनापासून गाते, भिजून गेला वारा मस्त झाले . तिला कट्यार मिळणार असे दिसते .
बहुतेक गानहिरा निहिरा जिंकणार असे वाटते .
प्रसेनजीत चे पण छान झाले पण काल च्या परीक्षकांच्या कमेंट्स मुळे आज मूड मध्ये न्हवता .

तेजश्री.. पुन्हा एकदा स्वतः ला अजिबात न शोभणारा ड्रेस. Sad
जयदीपचं गाणं पडलं अगदी. प्रसेनजीतचं बरं झालं त्या मानानी.
मधुरा छान. निहिरा उत्तम. गोड गळा आहे अगदी.
सुकु चा नाच.. नो कमेंट्स..
महेश चा मूड नव्हता वाटतं काल. २-३ वाक्यात कमेंट्स सगळ्या.

Pages