Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वर अवधूतच्या कमेंटबद्दल
वर अवधूतच्या कमेंटबद्दल लिहीलं त्याचा नंतर एक पॉईंट लक्षात आला. हा शो काही लाईव्ह नसतो, मग ही कमेंट एडिट करता आली असती. ज्या अर्थी हे केलं नाही त्याचा अर्थ गाण्यामागची पार्श्वभूमी कोणालाच माहित नसेल??
पुढची रडारड दाखवायची होती ना
पुढची रडारड दाखवायची होती ना त्यांना.
तरी झी वरच्या सारेगमप पेक्षा
तरी झी वरच्या सारेगमप पेक्षा खूप चांगला चाललाय कार्यक्रम.. तिकडे अतिशहना स्वानंद किरकिरे होता.
>>लताचा आवाज १००० वॅटच्या
>>लताचा आवाज १००० वॅटच्या बल्बसारखा लख्ख आणि तापलेला वाटतो त्या गाण्यांत. तो परत कुठून आणणार? असं झालं.
अर्थातच ते शक्य नाही... आणि मी आधी म्हटले तसे काही गाणी ही अजरामर आहेत मग त्यात तुम्ही कितीही ऊसने चंद्र सूर्य आणलेत तरिही त्याचे पूर्वतेज वा सौंदर्य परत येत नाही.
त्यातही 'वेडात मराठे' हे वीरगीत एकूणात (शब्द, चाल, वाद्यमेळ, गायन) ईतके रोमांचक अनुभवकारी आहे की ते ऐकताना सर्व प्रसंग व थरार डोळ्यापुढे ऊभा रहातो. त्यातील शेवटचे कडवे तर निव्वळ कळस आहे..
घालून आग वर आग आगा बाजूंनी..
'समशेर ऊसळली सह्स्त्र कृर ईमानी'
यातील लता (दिदींच्या) च्या आवजातील धार, आर्तता, तेज सर्वच एक शब्दातीत अनुभव देते..
त्याच मागून 'खग सात जळाले अभिमानी वणव्यात'... यातील काँट्रा सुरावटीने ते तेज व तो पराक्रम आणि विफल शौर्य अधिक गडग होते.
हे एव्हडं सगळं या (अशा) गाण्यांशी चिकटलेले आहे. तिथे कुणालाही ऊभे केले तरी तो अनुभव मिळणे अशक्य आहे. श्रिनिधी ने सुरात गायले असे वाटले पण तेव्हडेच बाकी काही नाही...!
बाकी ईतरांबद्दल विशेष लिहीण्यासारखे पुन्हा काहीच नाही...
'कट्यार कट्यार' खेळ मात्र चालू आहे.
>>विश्वजीतने वाट लावली . सुखविंदर ने काय गायलेले आहे हे गाणे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सुखी is in different league...! we can't even begin to compare.
रच्याकने: अजूनही ईतक्या दशकांनंतर या नेहेमीच्या ४ गाण्यांपलिकडे मराठीत शौर्य व वीर गीते झालीच नाहीत का असा प्रश्ण मनात येतो.
>>वर अवधूतच्या कमेंटबद्दल
>>वर अवधूतच्या कमेंटबद्दल लिहीलं त्याचा नंतर एक पॉईंट लक्षात आला. हा शो काही लाईव्ह नसतो, मग ही कमेंट एडिट करता आली असती. ज्या अर्थी हे केलं नाही त्याचा अर्थ गाण्यामागची पार्श्वभूमी कोणालाच माहित नसेल??
खरे तर रिहर्सल मध्ये गायक ऊद्या काय गाणार आहे हे सर्वांना माहित असते, त्यात परिक्षकही सॉरी मेंटॉर
हेहि आलेच. त्यामूळे अवधूत महाराजांनी
(त्याचा वाढदिवस शिवजयंतीचा) बहुतेक गृहपाठ केला नसावा.. अन्यथा ईतकी अक्षम्य चूक अपेक्षित नाही.. पण अवधूत किशोर भक्त असल्याने त्याला सर्व गुन्हे माफ आहेत! ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
घालून आग वर आग आगा बाजूंनी..
घालून आग वर आग आगा बाजूंनी..
>>>> घालून की खालून?
अवधूत भावनेच्या भरात काहीच्या
अवधूत भावनेच्या भरात काहीच्या काही बोलला !
महेशनेही निहिराला का ही ही !! कमेंट्स दिल्या. म्हणे पहिल्यांदाच आतून गायलीस वगैरे. निहिराने ह्या आधी कितीतरी सुंदर, फ्लॉलेस गाणी म्हटली आहेत, ह्या पर्वात. बहुतेक म्हणूनच तिला रडायला आलं असावं.
कालच्या भागात हुकमाचे एक्के राजे (गाणी आणि गायक दोन्ही) सुरुवातीला सर करून घेतले. वैशालीचं गाणं खूप भारी झालं. खरतर तिलाही दोन्ही जिनियस मिळायला हवे होते. घटाटे बाईंचं गाणं आत्तापर्यंतच सगळ्यात चांगलं होतं. विश्वजित ठिकच. त्याला बळच जास्त मार्क्स दिले.
अवधूतच्या टिपीकल बडबडीचा पण
अवधूतच्या टिपीकल बडबडीचा पण कंटाळा आलाय आता.
पग्या, अगदी बरोबर. काल निहिराचं ते लिहायचं राहिलंच. तिची आत्तापर्यंतची सगळी गाणी मस्त झालीयेत आणि काय उगाच आतून गायलीस वगैरे.
उद्या जयदीप, विश्वजीत यांना एकत्रच बाहेरचा रस्ता दाखवा. मधुराने पण त्यांना कंपनी दिली तर चालेल.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
घालून आग वर आग आगा बाजूंनी..
घालून आग वर आग आगा बाजूंनी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'समशेर ऊसळली सह्स्त्र कृर ईमानी'
यातील लता (दिदींच्या) च्या आवजातील धार, आर्तता, तेज सर्वच एक शब्दातीत अनुभव देते..>>>>>>> +१
श्रीनीधीने "कोसळल्या उल्का जळत सात दरयात असं गायलं जे खटकत होतं. पुन्हा लताच्या आवाजातलं गाण ऐकल. लतादिदीने कोसळल्या उल्का जळत सात दर्यात असं गायलंय.
वैशालीचं गाणं खूप भारी झालं.
वैशालीचं गाणं खूप भारी झालं. खरतर तिलाही दोन्ही जिनियस मिळायला हवे होते. घटाटे बाईंचं गाणं आत्तापर्यंतच सगळ्यात चांगलं होतं. विश्वजित ठिकच. त्याला बळच जास्त मार्क्स दिले.>>>>>>+१००००
>>वैशालीचं गाणं खूप भारी झालं
>>वैशालीचं गाणं खूप भारी झालं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैशालीचा प्रवास 'अजूनही' ईतर निकृष्ट गोतावळ्यात तीचे गाणे चांगले झाले म्हणण्याच्या स्टेशन वरच थांबला आहे, हे नक्की चांगले का वाईट ही शंका आहे
आडो,
आडो,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इन्स्टाग्रॅम वर कोणीतरी लिहिलय त्याला टॅग करून, फेसबुक पेज वर नक्की लिही.
बाकी परागच्या पूर्ण पोस्टला अनुमोदन.
महेशची कॉमेंट नीट ऐकली नव्हती, निहिरा फुटेज साठी रडण्यातली अजिबात नाही, काहीतरी भलतच कारण असेल असं वाटलं होतं, हे पटतय !
योग,
शिवकल्याण राजा बद्दल +१
वैशालीबद्दल,
चांगले /वाईट बद्दल आपण काय बोलणार, शेवटी तिला या शो मधे स्पर्धेत इतरांसारखी काँटेस्टंट म्हणून आहे, इतरांसारखच जज करायला हवं.
करिअर मधे काही चालल्लं असलं तरी बाकी स्पर्धकांपेक्षा गायली, तयारी, कॉन्फिडन्स इ. ला शो मधे आहे तोवर महत्त्व आहेच.
बॉलिवुड करिअर, काम मिळणे न मिळणे , या लेव्हलला येऊन स्पर्धेत भाग घ्यावा कि नाही इ. चर्चा करायला सोपय पण कलाकारांनाही घर चालवायचं असतं शेवटी
>>कलाकारांनाही घर चालवायचं
>>कलाकारांनाही घर चालवायचं असतं शेवटी Happy![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@DJ
हिमेश भाय च्या फेमस एपिसोड ची आठवण झाली... मुझे तेरे घर मे रोटी चाहिये..
http://www.dailymotion.com/video/x2tdsyl
असो. भावन्या मान्य आहेत पण सूनध्यान मध्ये भाग घेऊन तीचं घर कसं काय चालेल ते नाही कळलं? I don't think singers on this show are paid by the channel to participate. Rather chances are some singers are paying the channel to 'keep' them on the show..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किंबहुना वैशाली ला अजूनही एक्स्पोजर ची गरज भासत असेल तर सर्वच गायक कलाकारांची परिस्थिती फार 'बिकट' आहे असे म्हणावे लागेल. असो. अधिक चर्चा नको या विषयावर... सूनध्यान वाले हा बाफ वाचतात आणि नेमके मुद्दे पकडून पुन्हा काही तरी भलतेच आपल्या माथी मारतात.
>> काय तर म्हणे लोकगीतांची थिम आधी झाली अहे पण ते असे एकाच एपिसोड मध्ये संपणारी गोष्ट नाही म्हणून परत ती थिम ... ईती फेमस अँकर. हे ईथे कुणितरी लिहीले होते की किती पाणि घालून वाढवत आहेत कार्यक्रम.. याचे ऊत्तर असावे. आता बोला!
तेव्हा ईथले सर्व तिथे वाचले जाते यात शंका नाही... फक्तं ते आपलं ऐकत नाहीत ईतकच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरीच. मागच्या आठवड्यातले भाग
जबरी चर्चा! मागच्या आठवड्यातले भाग बघितले नाहीत, ते स्कीप करून कालचा भाग बघावा म्हणते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>विश्वजीत....घालवा यार आता
>>विश्वजीत....घालवा यार आता याला...कंटाळा आला त्याचे हावभाव, पाय वाकडा करण्याची पद्दत आणी चोरटा आवाज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Vishvajeet's 'footwork' is apt for koligeete pitch... on all other pitches he is LBW
हो तो स्ट्रगल नही रोटी चाहिए
असो. भावन्या मान्य आहेत पण सूनध्यान मध्ये भाग घेऊन तीचं घर कसं काय चालेल ते नाही कळलं? I don't think singers on this show are paid by the channel to participate. Rather chances are some singers are paying the channel to 'keep' them on the show..![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
किंबहुना वैशाली ला अजूनही एक्स्पोजर ची गरज भासत असेल तर सर्वच गायक कलाकारांची परिस्थिती फार 'बिकट' आहे असे म्हणावे लागेल.
<<<<
हो तो स्ट्रगल नही रोटी चाहिए फार फेमस किस्सा आहे
आय होप मुस्सर्रत अब्बास् कडे काम असेल !
पैसे मिळण्याबाबत प्रत्येक शो/चॅनलचं वेगवेगळे धोरण असु शकते.
सु.न.ध्या.न. बद्दल माहित नाही पण हिंदी सारेगमप नंतर एका कलाकाराची मुलाखत वाचली होती, त्यामधे त्यानी यावर उत्तर दिलं होतं.
जनरली स्पर्धकाला पहिल्या म्युझिकल /डान्स रिअॅलिटी शो मधे पहिल्यांदा भाग घेताना पैसे मिळत नाहीत, त्या नंतर तुमच्या एक्स्पिरिअन्स ,पॉप्युलॅरिटीवर पर एपिसोड पेमेन्ट मिळतं, त्यात आधीच्या शोजचे विनर असतील तर त्यांना जास्तं पेमेन्ट मिळु शकतं.
स्टेज शोज मधूनही बर्यापैकी पैसे मिळतात.
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमुळे अशा बर्याच कलाकारांना लोकप्रियता आणि बरेचदा चांगला रोजगार मिळतो, त्यामुळे जर इतर क्षेत्रात नसेल काम तर कोण सोडेल अशी संधी ?
परिस्थिती बिकट आहे कि काँपिटिशन टफ आहे माहित नाही पण बरेच चांगले गाणारे तितके गाताना दिसत नाहीत, खुद्द सोनु निगमने काम नसल्याची हळ्हळ व्यक्तं केली होती .
गायिकांच्या बाबतीत केतकी माटेगावकर व्यावसायिक दृष्टिने विनर नसली तरी वेगळ्या लेव्हलला आहे, आर्या सुध्दा बिझी असावी.
बाकी रिअॅलिटी शो मधल्या इतर गायक गायिका किती प्लेबॅक देतात काय माहित !
हिंदीत नेहा कक्कर, शाल्मली सारख्या उडत्या चालीची गाणी गाणार्या गायिका लकी ठरल्या आहेत खर्या.
पण श्रेया घोषाल सारखी सॉलिड सारखी गायिका असताना त्या लिगची गाणी हिंदीत सोडा, मराठीत सुध्दा अशी खास गाणी श्रेयालाच मिळतात, कोणी रिस्क घेत नसावे.
<< गायिकांच्या बाबतीत केतकी
<< गायिकांच्या बाबतीत केतकी माटेगावकर व्यावसायिक दृष्टिने विनर नसली तरी वेगळ्या लेव्हलला आहे, आर्या सुध्दा बिझी असावी.
आर्याला मी फॉलो करतेय, गेले काही वर्षे. तिचा रियाझ उत्तम आहेच पण विविध संगीत महोत्सवात आणि छोट्या- मोठ्या मैफिलीत तिचे गाणे ऐकायला मिळते. तिचे काही नॉन फिल्मी अल्बम्स सुद्धा गेल्या वर्षांत निघाले आहेत. I feel she is on good path.
>>I feel she is on good path.
>>I feel she is on good path.
Yes.. we had invited her along with Hrishi (Ranade) and Nandesh Umap to perform in 1st Global Marathi Sammelan in London last year, June 2017. She is still in her growth journey and with some good social skills mentoring could make it to the respected league inthe future. But most importantly she is 'not' taking part in any reality shows... which is good for her, as I believe otherwise lowers the brand value of (established) singer as you are still seen as 'struggler'..
But I would like to see her perform in Bollywood more than in Marathi.. to get that global commercial label to her name.
Re. Hrishi I can't understand why such extremely talented and versatile singer hasn't still made inroads into Bollywood. He accompanies Shreya on her programs and again can be a very successful Bollywood singer.
On the ther hand, Nandesh clearly has undesrtood the art of commercial management and knows where and how to self project.
We had good time on the London Cruise..
In future, if all works out, there are plans to collaborate with these artsis and hoping to colloaborate with Anirudh and Sharayu as well.
>>मराठीत सुध्दा अशी खास गाणी श्रेयालाच मिळतात, कोणी रिस्क घेत नसावे.
Likes of Sonu, Shreya, Sukhi are Brands. People look at them as investments not just singers... and they deliver almost every time. जसे पूर्वी लता, आशा, रफी, किशोरदा यांसोबत व्हायचे तसेच यांचेही आहे.. फक्त आजकाल संगीतकार स्वताची गाणी गातो हा ट्रेंड आहे. यात निर्माते व गायक्/संगीतकार या दोघांचाही कमरशियल फायदा होतोच खेरीज तुम्हाला 'टि़कून' रहाण्याची संधी देखिल मिळते. नुसताच गायक असेल तर तो निर्माता, संगीतकार, ईतर मंडळी यांचा मर्जीचा मोहताज असतो आणि नेमके ईथेच अनेक व्यावसायिक समीकरणे जुळतात किंवा बिघडतात.
कूल! वाचून मस्त वाटलं योग
कूल! वाचून मस्त वाटलं योग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Investment पेक्षा एक इचछा
Investment पेक्षा एक इचछा असते की श्रेया कडून आपण कंपोस केलेले गाणे गाऊन घ्यायचे
कूल! वाचून मस्त वाटलं योग>>>>
कूल! वाचून मस्त वाटलं योग>>>>>+१००००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋषिकेश रानडे छान गातो पण
ऋषिकेश रानडे छान गातो पण अगेन तोच प्रॉब्लेम, युनिक आवाज नाहीये.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रिअॅलिटी शो मधून आलेले राहुल वैद्य, अनिक, विनित सगळे सॉफ्ट व्हॉइस वाले गायक कुठून उठून दिसणार जिथे खुद्द सोनु निगमच त्याच्याकडे फार काम नाही म्हणतो.
अन्वेशा, वैशाली, निहिरा यांच्या बाबतीत तेच वाटतं, श्रेया असताना त्यांचा स्ट्रगल टफ आहे.
Btw, सारेगमप ओझरतं पाहिलं त्यातही तो विनर जो होता नचिकेत, गायला चांगला पण टिपिकल सॉफ्ट व्हॉइस, आवाजात वेगळेपणा नसलेला.
योगेश रणमले, उज्ज्वल यांचे आवाज वेगळे वाटले पण परवा त्यांनी गायलेल्या गाण्यांचा ओरिजनल गायक आदर्श शिंदेला पाहिलं, चांगलाच यंग आहे आणि प्रस्थापित आहे, म्हणजे वेगळा आवाज वाल्यांनाही मार्ग काही सोपा नाही :).
सध्या उदित नारायण, सुखविन्दर , अभिजीत सारखे युनिक आवाज असणारे गायकही कमीच गातात का ? सगळि नवी गाणी अर्जित, आतिफ, राहत पब्लिक गातं .
असो, तर बॅक टु सुनध्यान ,
मधुरा किंवा जयदीप एलिमिनेट व्हावेत, शरयुलाही काल बॅड स्कोअर दिला, बारावीच्या परीक्षेआधी घालवणार का तिलाही ?
प्रसन्नजीत वैशालीचं ड्युएट आवडलं !
मधुरा ने एक्दम बेकार गायल,
मधुरा ने एक्दम बेकार गायल, तिचे परफॉर्मन्स अॅव्हरेजच वाटलेत मला अजुनतरी, शरयु खरतर चान्गली गायली पण तिला उगाच लो मार्क आणी कमेन्ट्स दिल्या.
Has Vishwajeet redeemed
Has Vishwajeet redeemed himself?
वैशालीने लांबलेल्या शेड्युलचे कारण देऊन निवृत्ती घेतलीय.
टीआरपी बघून मालिकांत पाणी घालतात, तोच प्रकार रियलिटी शोजमध्ये चालू केला कलर्सने.
तीन की चार एपिसोड्समध्ये एलिमिनेशन नाही. दोन वाइल्ड कार्ड एंट्रिज.
या कार्यक्रमाचे आपणच सबकुछ असल्याच्या थाटात (ते खरं असेलही) अवधूतचं वैशालीला ओपन इन्व्हिटेशन.
अवधूत प्रत्येक कार्यक्रमात किमान एकदा तरी कलर्सचे आवर्जून आभार मानतो. अमकं गाणं ऐकायला मिळालं, असली काय काय कारणं देऊन.
विश्वजीतचं तंगडं वर करणं पाहून पद्मजा फेणाणी आणि पीनाज मसानी खांदे उंचावतात ते आठवलं.
विश्वजीतचं तंगडं वर करणं
विश्वजीतचं तंगडं वर करणं पाहून पद्मजा फेणाणी आणि पीनाज मसानी खांदे उंचावतात ते आठवलं.>>>>>>
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एलिमिनेशन न करण्याचे बहाणे
एलिमिनेशन न करण्याचे बहाणे शोधत असतात असं वाटायला लागलंय मला एकंदरित. सगळाच फालतूपणा चालवलाय.
What happened? Vaishali left
What happened? Vaishali left SNDN ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Yog cha feedback vachla vatta
She posted pic recording at Yasghraj studio 3 days back.
काल वैशाली सोडुन गेली
काल वैशाली सोडुन गेली सुनध्यान....तिने सुनध्यान चं लांबलेलं शेड्युल आणि तिच्या पर्सनल कमिटमेंट्स अशी कारणं दिली.
असो. हे सगळं ठीक आहे...
पण काल विश्वजीत ला कट्यार ??? का ? का ? का ?...
त्याच्या मुलीचा वाढदिवस, जगातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट अशा सगळ्या स्टोरीज बळंचं घुसडल्या..
काय गरज आहे या लोकाना हा सगळा टीपी करायची. चांगले गायक आहेत ना त्यामुळे लोकं बघतायत ना कार्यक्रम , मग त्याच्याशीच प्रामाणीक रहा ना...पण नाही....त्यात आणि पुढच्या आठवड्यापासुन पब्लीक वोटींग सुरु आहे म्हणे...सगळा आनंदी आनंदच आहे.
हो, वैशाली स्वेच्छेने बाहेर
हो, वैशाली स्वेच्छेने बाहेर पडलीये काल. म्हणून नेहमीचं एलिमिनेशन नाही मग.
Oh ok, for me she still was
Oh ok, for me she still was the best contestant of SNDN!
But good for her if she's busy with work , anyways lost my interest, hope Prasannajeet /Nihira wins !
Pages