स्वीट अ‍ॅन्ड सावर ब्रसेल्स स्प्राउट्स

Submitted by तृप्ती आवटी on 16 February, 2018 - 17:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ब्रसेल्स स्प्राउट्सचं एक पाकिट, पातीच्या कांद्याची एक जुडी, २-३ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ टेबल स्पून तीळ, सॉय सॉस, चिली सॉस, स्वीट चिली सॉस, ऑलिव्ह ऑइल प्रत्येकी, २-३ चमचे फोडणीचं तेल, अर्धा साखरेचा चमचा साखर, मीठ.

क्रमवार पाककृती: 

ब्रसेल्स स्प्राउट्स धुवून देठं काढून एकाचे दोन भाग असे चिरून घ्यावेत. लसूण, आलं दोन्हीच्या बारीक चौकोनी फोडी कराव्यात. दोन्ही वेगवेगळे ठेवावे. पातीच्या कांद्याची पात फक्त चिरून घ्यावी. कढईत तेल कडकडीत तापवून त्यात लसूण घालावा. लसूण जरा पारदर्शी झाला की ब्रसेल्स स्प्राउट्सच्या फोडी घालून साखर घालावी.

फोडी परतत असताना सॉस तयार करायला घ्यावा. एका वाटीत ऑलिव्ह ऑइल, तीळ, सोया सॉस, चिली सॉस, स्वीट चिली सॉस, आलं सगळं एकत्र करून नीट हलवून घ्यावं.

ब्रसेल्स स्प्राउट्सच्या फोडी चांगल्या सोनेरी झाल्या की तयार केलेला सॉस घालावा. पातीचा कांदा, मीठ घालून नीट हलवून घ्यावं. हे सगळं मिश्रण खदखदायला लागलं की गॅस बंद करून झाकण घालून जरा मुरू द्यावं. स्वीट अ‍ॅन्ड सावर ब्रसेल्स स्प्राउट तयार आहेत. गरम-गरम भाताबरोबर खावेत.

IMG_7919.JPG

वाढणी/प्रमाण: 
इतर काही पदार्थ नसल्यास २ जणांसाठी पुरेसा होतो
अधिक टिपा: 

साखरेऐवजी मध घातला तरी चालेल.
इथे पातीच्या कांद्याची जुडी मिळते त्याची साधारण वाटीभर पात होते.
स्वीट चिली सॉस नव्हता म्हणून मी मध+चिली फ्लेक्स घातले.
पनीर चिलीत घालतात तशा हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतील असं वाटतंय.

माहितीचा स्रोत: 
डिज्जे + इन्टरनेटवरील पनीर चिलीच्या कृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद. ब्र.स्पा महाप्रचंड फेवरिट आहेत. मधे डीजेने लिहीलेले सेव्ह करून ठेवले होतेच. ही सेम रेसिपी आहे का माहीत नाही. बहुधा थोडी वेगळी असावी. इं.पॉ ची आहे ती बहुधा.

साखर/मध काहीच न घातले तर काही फरक पडेल का? म्हणजे कमी गोड लागेल च्या व्यतिरिक्त. टेक्स्चर बिक्स्चर मधे.

साखर /मध स्प्राउट्स कुरकुरीत होण्यासाठी घालायचे असं डिज्जेनं लिहिलं होतं. तिची थोडी वेगळी आहे रेसिपी.

चिन्नु, हो कच्चेच तीळ घातले मी तरी. सोनाली, हो मी पण थोडे भातासोबत आणि बरेचसे तसेच खाल्ले Happy

धन्यवाद सर्वांना Happy

मस्त आहे रेसिपी !
भारताबाहेर असताना माझं फार काही प्रेम नव्हतं ब्रसेल्स स्प्राऊट्सवर ( अशी इंटरेस्टिंग रेसिपी पण नाही मिळाली तेव्हा..). अवनमध्ये रोस्ट करुन खाल्ले आहेत पण ही रेसिपी वाचल्यावर अगदी फारच आली आठवण Wink पुण्यात मंडईत बाळकोबी मिळतात अशी माहिती मला काही दिवसांपूर्वी मिळाली. ते म्हणजे हेच का माहीत नाही... मिळाले तर नक्की करणार !

तोंपासू रेस्पि.
आता इथे खान्देशात ब्रसेल स्प्राऊटची लागवड करणे आले.
उगवले की कुकून झब्बू देतो.
(पाणकोंबडि.. आप्लं आय्मीन पानकोबी चालते का ब्रस्पा ऐवजी?)

सही! करून खाणार!

आरारा, पानकोबीचे मोठाले तुकडे करून करता येईल.

वत्सला, तू २०१८ च्या फेब्रुवारीतच करून खाणार होतीस ना ? त्याचं काय झालं ? Proud

अर्रे, कसली मस्त आहे पाककृती. अशी कशी सुटली नजरेतुन? नक्की करुन पहाणार.

(ता.क. घाईघाईत वर जाऊन पाहिलं, वत्सला सारखं दोनदा 'करुन पहाणार' असं तर नाही ना लिहिलें?) Happy

ब्रसल्स स्प्राऊट्सना असणारी ती पंजंट/ कडसर चव कोबीत नाही येणार (धिस इज अ फ्लॉ विथ कोबी Wink Proud ) . कोबीचे तुकडे केले तर अगदी शिजुन जातील आणि भाजी होईल असं वाटलं.
करुन बघितलंत तर फोटो टाका.
माझा पण ता.क.... वरती लिहिलं नसलं तरी ही रेसिपी अनेकवेळा केल्येय आणि घरात एकदम हिट आहे.

अमितव, कोबीची भाजी असं लिहील्याने...... सगळाच रसभंग झाला....!
तसं ही कोबीचे मोठाले तुकडे करुन टाकले की ती पानं सुटी सुटी होणारच...आणि याचे रुपांतर भाजीत होणारच!
पुण्यात कुठे मिळतात ब्रु स्पा?

गेल्या आठवड्यात साधारण या पद्धतीनं केलेल्या सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्या. फारच मस्त लागतात. गुगलवर बर्‍याच रेसिपी दिसताहेत त्यावरून कॉमन प्रकार असावा असं वाटतंय.

ब्रसेल्स स्प्राउट्स मेपल सिरप आणि बेकन सोबत शिजवलेले ट्राय करा जमल्यास. इथे स्टेकहाउसमध्ये (कॅपिटल ग्रिल, मॉर्टन्स तत्सम) रेग्युलर मेनु किंवा बॉस्टन मार्केट सिझनल मेनुमध्ये असतात, अ‍ॅज ए साइड. युविल थँक मी, गॅरंटिड... Wink

Back to top