Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>त्याचच झोन मधल होत वगैरे
>>त्याचच झोन मधल होत वगैरे सगळ असल तरी छानच गायला तो.
खरे आहे... कट्यार टिकवण्यासाठी (एलिमिनेशन पासून सुरक्षा) मात्र सर्वजण नेहेमी आपल्या ' झोन' मधलेच गाणे गातात. थोडक्यात, ध्यास नवा वगैरे ऊगाच नावाला आहे.. शेवटी विजेता व्हायला मात्र होम पिच वरच सिक्सर मारायचा प्रयत्न असतो सर्वांचा.
>>शरयु गायली चांगलीच पण तिचा आवाज ‘मालवून टाक दीप ‘ सारख्या सेन्शुअल गाण्यासाठी मॅच्युअर्ड नाही वाटला, लहान मुलीसारखा वाटला.
+१००.
खरे तर काही गाणी ही चिरायू आहेत. त्यात ईतर कुठल्याही गायकाने अगदी आत्मा ओतून गायले तरिही काहितरी कमी रहातेच.. तेव्हा शक्यतो अशा गाण्याच्या वाट्यांना जाऊच नये. ऊ.दा. दाखलः
मेरा कुछ सामान
कुणाच्या खांद्यावर
सांज ये गोकुळी
मालवून टाक दीप
आणि ईतरही आहेत..
असो.
का एवढ फालतू इंग्लिश बोलते? >
का एवढ फालतू इंग्लिश बोलते? >>> नानाने सुद्दा तिच्या इंग्लिशची खिल्ली उडवली होती. म्हणत होता, "तुझ बोलण मी स्पर्धकान्ना ट्रान्सलेट करुन सान्गतो.
>>> अहो खरा जोक पुढे होता. शाखो म्हणते हो ट्रान्सलेट करा माझे मराठी सुधरेल.. तर नाना म्हणे - माझे इंग्रजी बिघडेल त्याचे काय ☺️
शाल्मली गोयंकर असा.
शाल्मली गोयंकर असा.
त्यातले त्यात बर मराठी बोलते.
रच्याकने: colors वरील
रच्याकने: colors वरील rising star मध्ये एकाच ब्रिजवासी कुटुंबातील चार भाऊ यांनी जबरी धमाल ऊडवून दिली.. सगळे एकापेक्षा एक सरस गातात.. नक्की बघा. 'लय भारी' प्रकार आहे.
त्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट, एकंदर ऊत्सुकता, मुख्य म्हणजे सूत्रधार.. सगळेच मस्त जमून येते.
सूर नवा ध्यास नवा या
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात दिनांक ०७/०२/२०१८ रोजी सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यानी आर्मी बद्दल सांगितलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि हृद्य आठवणी ...
https://vocaroo.com/i/s1qgSI2gpPDi
>>योग,
>>योग,
वैशाली एक आठवडा रिटायर्ड हर्ट मोड मधे असल्याने गायलीच नव्हती त्यामुळे ती लवकर एलिमिनेट झाली असती तर मान्यं
खरे तर ते सर्वच न पटणारे आहे... स्पर्धा आहे म्हटल्यावर एकतर आत किंवा बाहेर. हे असं 'टाईम प्लीज' म्हणून बाहेर जाऊन पुन्हा आता येणे पोरखेळ झाला. दुखणे गंभीर असणारच. पण मग thats part of life.. its obvious, it is all part of TRP equation.
नशीब दाढीवाले पात्र 'बाहेरच' बसवलय.. नाना समोर त्याला आणायची हिंमत झाली नसावी. तिथं मंचावरच बुकलला असता..
माझी वै. पसंती अनिरुध्द (प्रामाणिक प्रयत्न, मेहेनत ), शरयू( तयारी, गायकी, आवाज, पोटेंशियल), आणि मधुरा (खर्या अर्थाने सूर नवा ध्यास नवा!) या तीघांनाच आहे. बाकी ईतर नुसतेच कट्यार कट्ट्यार खेळतायत.
जाऊदे झालं ..
रच्याकने: महेश व अवधूत च्या प्रतिक्रीया झाल्यानंतर बोलण्यासारखे विशेष काही ऊरलेले नसते.. त्यामुळे शाल्मली काहितरी ऊगाच नविन शोध लावत बसते.. जज च्या खुर्चीवर बसवलय म्हटल्यावर काहितरी वेगळेपणा दाखवायला नको का? अन्यथा ईथे माबोवर तीच्यापेक्षा भारी जज आहेत.
महेश व अवधूत च्या प्रतिक्रीया
महेश व अवधूत च्या प्रतिक्रीया झाल्यानंतर बोलण्यासारखे विशेष काही ऊरलेले नसते.. त्यामुळे शाल्मली काहितरी ऊगाच नविन शोध लावत बसते.. जज च्या खुर्चीवर बसवलय म्हटल्यावर काहितरी वेगळेपणा दाखवायला नको का? >>> +१
>>महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या
>>महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
मला ह्याबद्दल शंका आहे. हे दोघंही फार भारी लिहितात. पण ह्या कार्यक्रमात ह्यांनी केलेलं लिखाण कुठे वापरलं जातं? स्पर्धक असं काही फार बोलत नाहीत. जज होपफुली त्यांना गाण्याबद्दल जे काय वाटलं ते उत्स्फुर्तपणे बोलत असावेत. तेजश्री तर "आत येत आहे... पिंगा गर्ल, गान हिरा..", "गुणांकडे वळुया?", "महेशचं मेरिट म्हणजे जिनीयसच" हेच बोलत असते सारखी. मग परत ह्या कार्यक्रमात ह्यांनी केलेलं लिखाण कुठे वापरलं जातं?
तेजश्री शो ची प्रस्तावना करते
तेजश्री शो ची प्रस्तावना करते , शो च्या थीमची /स्पेशल गेस्टची / संगीतकार/ गायक / वादक इ. परिचय लरून देते, कधी गाण्याबद्दल माहिती देते तो भाग लिहिला जात असावा.
परवाचा भाग आज पाहिला. होठ
परवाचा भाग आज पाहिला. होठ रसीले किती वाईट म्हटले त्या श्रीनिधीने! आवाज कापत होता. नानाने ती "खरं नव्हे" कविता काय मस्त म्हटली. आणि थोडासा रुमानी मधल्या बारीशकर चं स्वगत पण! बगळ्यांची माळ मस्त झालं गाणं.
Makes sense DJ!
Makes sense DJ!
प्रत्येक वेळी पिंगा गर्ल,
प्रत्येक वेळी पिंगा गर्ल, दुबईचा शेख . कायच्याकाय. एकदा पिंगा गर्ल म्हटलं नाही, तर मला वाटलं, सुधारले. या आठवड्यात परत म्हटलं.
नानानी किमान एक कविता वाचून दाखवली, असा संशय आहे. म्हणजे अगदी वाचून नव्हे, पण कागद होते तिथे. पुढची ओळ शोधायला एकदा जास्तच वेळ लागला. पन तरीही आवडला मला तो भाग.
नाना आता वयामुळे भावुक होत
नाना आता वयामुळे भावुक होत चाललाय का? खुप बोलतो .खुपदा तेच तेच पण( अशोक सराफचा किस्सा त्याने चहयेद्या वर पण सान्गितला होता ) पण तरी त्याच बोलण छान होत अनुभवसपन्न होत.काही काही किस्से खरच नविन होते.
इरावती हर्शे कन्टाळल्यासारखी बसली होती , सुमित राघवन मस्त गायला,बोलला.
colors वरील rising star मध्ये
colors वरील rising star मध्ये एकाच ब्रिजवासी कुटुंबातील चार भाऊ यांनी जबरी धमाल ऊडवून दिली.. सगळे एकापेक्षा एक सरस गातात.. नक्की बघा. 'लय भारी' प्रकार आहे.
त्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट, एकंदर ऊत्सुकता, मुख्य म्हणजे सूत्रधार.. सगळेच मस्त जमून येते.
Submitted by योग on 9 February, 2018 - 15:
मी पण पहाते rising star ...भारी शो आहे, त्यातले स्पर्धक पण खूप छान गातात....
तेजश्री तर "आत येत आहे...
तेजश्री तर "आत येत आहे... पिंगा गर्ल, गान हिरा..", "गुणांकडे वळुया?", "महेशचं मेरिट म्हणजे जिनीयसच" हेच बोलत असते सारखी. >>> 'मज्जा आली' , ' या गाण्याची काहीतरी आठवण सांगा ना' हे पण बोलते की..
रच्याकने: colors वरील rising
रच्याकने: colors वरील rising star मध्ये एकाच ब्रिजवासी कुटुंबातील चार भाऊ यांनी जबरी धमाल ऊडवून दिली.. सगळे एकापेक्षा एक सरस गातात.. नक्की बघा. 'लय भारी' प्रकार आहे.
त्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट, एकंदर ऊत्सुकता, मुख्य म्हणजे सूत्रधार.. सगळेच मस्त जमून येते. >>>> याला पण +१११
त्या ब्रजवासी ब्रदर्स नी कसली धमाल आणली!! त्यातला हेमंत ब्रजवासी पूर्वी सारेगम मधे होता , लहान होता तेव्हा. आता काय पावरफुल झाला आहे त्याचा आवाज! सुपर्ब झाले त्याचे गाणे. आणि हो तो अँकर रवी पण मला फार आवडतो बर आता बास करते , बाफ सू नध्यान चा आहे.
>> शाल्मली गोयंकर असा.>>>
>> शाल्मली गोयंकर असा.>>> झंपी जी.... पंडित जीतेंद्र अभिषेकी जी अन बाकीबाब बोरकर पण गोयंकर असा....त्शाल्मलीचे संगीतावरील गूगलीज सुध्द्दा चीड आणणार्या असतात.... चेह र्यावर विद्रूप अविर्भाव पण काय करते.... अत्यंत भिकार
अरेवा, हेमंत ब्रिजवासी का ?
अरेवा, हेमंत ब्रिजवासी का ? चांगला आठवतोय, कुंकवाचा टिळा लाऊन यायचा, क्लासिकल बेस्ड गाणी गायचा.
माझ्याकडे हिंदी चॅनल्स नाहीत पण शोधायला हवा युट्युब वर.
>>अरेवा, हेमंत ब्रिजवासी का ?
>>अरेवा, हेमंत ब्रिजवासी का ? चांगला आठवतोय, कुंकवाचा टिळा लाऊन यायचा, क्लासिकल बेस्ड गाणी गायचा.
करेक्ट ..! तोच..!
ए फॉर अनिरुद्धकडे कट्यार होती
ए फॉर अनिरुद्धकडे कट्यार होती ना? मग तो कसा गायला? त्याला गुण पण दिले. टीमला सिलेक्टिव्ह मेमरी लॉस झाला की माझ्याकडून काही सुटलंय?
कालचा भाग कोल्हापूरमधल्या
कालचा भाग कोल्हापूरमधल्या कार्यक्रमाचा होता, त्यामुळे कदाचित कट्यार कुलुपात बंद ठेवली असेल. असेही कोल्हापूरात कट्यारी बाळगणारे भरपूर असतीलच..
बोअर होता एपिसोड !
बोअर होता एपिसोड !
अगदी ! अत्यंत बोर भाग !!
अगदी ! अत्यंत बोर भाग !!
काल तेजश्रीने काय तो तंबू
काल तेजश्रीने काय तो तंबू घातला होता असे विनोदी कपडे का देतात!
काल ओपन एअर प्रोग्राम होता म्हणून की काय ते माहित नाही पण आवाजाच्या मर्यादा हायलाइट होत होत्या लोकांच्या. अनिरुद्ध तर रश्के कमर गाताना कोकलत होता अक्षरशः. आणि विश्वजीत पडेल.
>>असे विनोदी कपडे का देतात
>>असे विनोदी कपडे का देतात
लोल! येस! अवधुतचे कपडेपण फार विनोदी असतात.
अनिरुद्ध तर रश्के कमर गाताना
अनिरुद्ध तर रश्के कमर गाताना कोकलत होता अक्षरशः >>> + ११ पुढे बघितलाच नाही मग
मधुरा आणि निहिराची गाणी
मधुरा आणि निहिराची गाणी चांगली झाली. शाल्मलीच्याही आवाजाच्या मर्यादा कळत होत्या. ती घटाटे अनुल्लेखनीय आहे टोटली.
अवधूत ने टिपी केला. तो आणि तो आचरट दाढीवाला मुद्दाम वेगळ्या टोन मधे बोलत होते का, कोल्हापूर शी कनेक्ट होण्यासाठी? की तोच त्यांचा ओरिजिनल डायलेक्ट आहे?
प्रसेनजीतचेही चांगले झाले गाणे. त्याच्या बाय्कोला उगीच एंबरॅस करत होते शाल्मलीवरून चिडवून वगैरे. ते बळंच वाटत होतं.
>>काल ओपन एअर प्रोग्राम होता
>>काल ओपन एअर प्रोग्राम होता म्हणून की काय ते माहित नाही पण आवाजाच्या मर्यादा हायलाइट होत होत्या लोकांच्या
That is common with most of the so called singers today... This gets 'covered' up in studio and in closed acoustics theater settings. But the bottomline is singing in sur/besur is not subjected to the settings. It is is inherent fault with the singer.
(I am fortunate to have listened to the Greats singing live.. they sound same quality an class any place any time.. Sukhwindar, Sonu, Hariharan, Shreya, to name few.)
I thought all singers did okay.. if you compare to Shalmali's singing..! Even our 10 yr old switched off instantly hearing Shalmali sing.. she asked is she the same singer who sung those 'hit' songs?
असो.
हा कार्यक्रम ईतके दिवस सुरू आहे हेच आश्चर्य आहे.
त्यापेक्षा राइसिंग स्टार बघा(च)... निदान फॉर्मॅट, स्पर्धक, परिक्षक, पाहुणे, खूपच वैविध्य मिळेल.. the whole 'x' factor is missing in sunadhyan.
शाल्मली विद्रूप आणि अत्यंत
शाल्मली विद्रूप आणि अत्यंत बीभत्स गात होती.... तिला गाण्याचा काहीही हक्क नाही. एवढेच नाही तर आय्टम साँग्ज गाण्याच्या देखील काही मर्यादा असतात.... अत्यंत भिकार...
अगदी अगदी ! शाल्मली किति
अगदी अगदी ! शाल्मली किति बेकार गात होती, मधे मधे तर गातेय की गाण वाचतेय काहीही कळात नव्हत , तिचा आवाज अजिबात चढत नाही त्यामूले परेशा गाण अति वाइट गायल तिने....
त्यापेक्षा राइसिंग स्टार बघा(च)...>>> कशावर लागतो कार्यक्रम?
Pages