Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>निहिरा???? Uhoh
>>निहिरा???? Uhoh आत्तापर्यंतची सगळी गाणी छान म्हटली आहेत निहिराने. ती का जाईल बाहेर?
सून मध्ये निव्वळ चांगले गाणे एव्हडेच अपेक्षित नसावे.. वेगवेगळ्या ढंगाची व ठेवणीची गाणी तेही स्वतःच्या कंफर्ट 'झोन' च्या बाहेर असलेली गाणे हे बहुदा अपेक्षित असावे.. अन्यथा जुनीच गाणी, जुनाच फॉर्मॅट , फक्त कट्यार नवी, गडी नवा असे होईल.
शांत संथ व मध्य लयीतील गाणी निहीरा छान गाते... पण डोला रे, किंवा ड्युएट्स, किंवा ईतर कुठलिही दिली की तिची फारच तारांबळ ऊडते.. सूर, गायन सर्वच विखुरलेले. वैशाली देखिल फक्त काही ठराविक थाटाची गाणी गाते.. 'तिची स्पर्धा फक्त तीच्याशी' असे असेल तर ती तिथे काय करते आहे?
असो.. निव्वळ तय्यारी व गायन व 'आवाज' यावर निवड करायची असेल तर माझी पसंती शरयू ला असेल. पण नविन ध्यास व अष्टपैलू कामगिरी अपेक्षित असेल तर मला वाटते जुईली व मधुरा या दोघींनी सर्व प्रकार अतीशय ऊत्तमपणे सादर केले आहेत.. एखाद दिवशी एखाद्या गायकाचा गळा चालतो का नाही हा नशीबाचा भाग झाला पण मेहेनत, जिद्द, नविन शिकण्याचा ध्यास, कंफर्ट झोन मधून बाहेर पडून वेगळे प्रकार हाताळण्याची हिंमत व तयारी , आणि एकंदरीत सादरीकरणामागील दृष्टिकोन (महेश राव यावर वरेच व्याख्यान देत असतात!) हे सर्व ध्यानात घायचे असल्यास या दोघी व काही प्रमाणात अनिरुध्द हे अधिक योग्य वाटतात.. त्यातही एकूण फॉर्मॅट हा प्लेबॅक गायनाचा असल्याने अर्थातच पेश केल्या गेलेल्या गाण्यातून गायकाने त्या गाण्याला कितपत न्याय दिला यावरच बरेच काही ठरते.
असो. कार्यक्रमापेक्षा पोस्ट मोठी होत आहे, तेव्हा थांबतो.
जुईली, मधुरा आणि शरयू >> योग
जुईली, मधुरा आणि शरयू >> योग शी सहमत आहे.
वैशाली आणि निहिरा बद्दल पण माझे सिमिलर मत आहे.
वैशाली - तिचे एकही गाणे या सीझन ला तिच्या पूर्वीच्या पर्फॉमन्सेस ला मॅच करणारे झालेले नाही. या स्पर्धेत भाग घेणे ही एक काहीतरी मजबुरी असल्यासारखे गाणे वाटतेय, समरसून नाही गात.
निहिरा- गाते छान टेक्निकली पण तरीही तिच्या पोटेन्शियल इतके नाही. ती पूर्वीची इन्टेन्सिटी नाही. आता गाणे हे आयुष्यात तिचा पहिला प्रेफरन्स नाही असे काहीतरी फीलिंग येते तिच्याकडे पाहून. एकूणात आधी कुठे ना कुठे यश मिळवलेले सर्व स्पर्धक हे मोटिवेशन मधे कमी आणि त्यांच्या करियर च्या पीक वरून उतरणीला लागलेलेल वाटतायत मोस्टली, प्रसेनजीत चा अपवाद.
जुईली, मधुरा, शरयू या मला जेन्युइन स्पर्धक वाटतात.
मला पण जुइली आवडायला लागलीये,
मला पण जुइली आवडायला लागलीये, काल मी रात टाकली वर जजेसच्या कॉमेंट्स नाही पटल्या.
कोरसही फार मस्तं गातात चारही मुलं .
मधुराची काही गाणी फार छान झाली आहेत पण काही इतकी फसलीयेत कि एलिमिनेट कशी नाही झाली वाटलं.
योग,
वैशाली एक आठवडा रिटायर्ड हर्ट मोड मधे असल्याने गायलीच नव्हती त्यामुळे ती लवकर एलिमिनेट झाली असती तर मान्यं पण निहिराचा मुद्दा नाही पटला, अष्टपैलु नाही हे खरय पण बेसूर नाही गात, तिची गाणी टोटली फसली असं नाही होत.
असो.
तरीही निहिरा विनर मटेरिअल नाही वाटत मला, २००५ मधे जो प्रॉब्लेम होता तोच अजुन आहे, कॉनिफिडन्स लेव्हल मधे, परफॉर्मान्स मधे मार खाते.
स्पर्धा आधी मुलींनी डॉमिनेट करणं सुरु होतं आता मात्रं पूर्ण सिरिज आठवली तर त्यातली मेमोरेबल गाणी, गाण्यांची अचूक निवड बघता प्रसन्नजीत विनर म्हणून योग्यं वाटतोय मला
निहिरा- गाते छान टेक्निकली पण
निहिरा- गाते छान टेक्निकली पण तरीही तिच्या पोटेन्शियल इतके नाही. ती पूर्वीची इन्टेन्सिटी नाही. आता गाणे हे आयुष्यात तिचा पहिला प्रेफरन्स नाही असे काहीतरी फीलिंग येते तिच्याकडे पाहून.>> अगदी अगदी! निहिरा माझी २००५ च्या सारेगमप ची लाडकी गायिका, सुस्प्श्ट उच्चार आणी सुराची अगदी उत्तम जाण यामूळे मी खुप उत्सुक होत पण इतक्या वर्शात तिच्या गाण्यात , अॅपीयरन्स मधे काहिच बदल नाही, तिच्यात विनिन्ग स्ट्राइव्ह तेव्हाही दिसला नाही आणी दुर्दवाने आजही दिसत नाही, झोकुन देवुन गाण तिला जमत नाही, स्टेजवर गाण तिला जमत नाही , सगळेच कलाकार तस करु शकतिल अस नाही पण बाकिचे निदान प्रयत्न तरी करतात ...
वैशाली मात्र अगदी बळजबरिने तिथे असल्यासारखी आहे , तिच एकही गाण आतुन आलय , भिडलय अस वाटल नाही, टेक्निकली पर्फेक्ट अस्ले पण मनापासुन नाही.
उशक्कल होता होता श्रीनिधी चे
उशक्कल होता होता श्रीनिधी चे नाही तर त्या कोरस चे गाणे होते, मधून मधून श्रीनिधी गात होती.. मूळ परफॉर्मन्स कोरस चाच होता.
दिपंजली शी सहमत.. प्रसेनजीत
दिपंजली शी सहमत.. प्रसेनजीत विनर वाटतो.
जयदीप खूप कंसिस्टंट आहे. कंसिस्टंटली मिडीयम लेवल गातो.. टिकेल तो .. राजगायक नाही होणार कधी.
दर आठवड्याला कोणाचा ना कोणाचा आवाज बसलेला असणार आणि जयदीप वाचणार.
निहिरा बद्दल डिजे व
निहिरा बद्दल डिजे व प्राजक्ताला +१.
मला आधी वाटलं होतं तीच जिंकणार. पण तिच्यात ती विनिंग डिझायरच दिसत नाही.
मला जुईली अजुनही आवडत नाही.
वैशालीचे चांगले झाले गाणे.
शरयू मस्त गायली! एकदम नो नॉन्सेन्स परफॉर्मन्स! मजा आली. (शाल्मलीने किती बळंच रडवले तिला! )
प्रसेनजीतचे वॉव! तो खरंच मस्त गातो.
मधुरा खूप टॅलेंटेड आहे. पण ते पुढे येतंच नाहीये असं कहीतरी वाट्तय.
जुईली गेली ते बरं झालं. भयानक
जुईली गेली ते बरं झालं. भयानक ॲटीट्यूडने गात होती. वैशालीचाही नंबर लवकर लागावा. पाठोपाठ विश्वजीत आणि दुबईच्या शेखचा.
विजेता म्हणून शरयू आणि प्रसेनजीतमधे टफ फाईट आणि अनिरुद्ध, निहिरासुद्धा.
जौद्या! कोण जिंकणार हे ठरलेलं असेलच त्यामुळे आपण फक्त गाणी ऐकावीत.
पण ह्या कार्यक्रमामुळे कलर्स मराठीचं टिआरपीचं गणित सुटलं आहे एवढं खरं.
अगदी अगदी! निहिरा माझी २००५
अगदी अगदी! निहिरा माझी २००५ च्या सारेगमप ची लाडकी गायिका, सुस्प्श्ट उच्चार आणी सुराची अगदी उत्तम जाण यामूळे मी खुप उत्सुक होत पण इतक्या वर्शात तिच्या गाण्यात , अॅपीयरन्स मधे काहिच बदल नाही, तिच्यात विनिन्ग स्ट्राइव्ह तेव्हाही दिसला नाही आणी दुर्दवाने आजही दिसत नाही, झोकुन देवुन गाण तिला जमत नाही, स्टेजवर गाण तिला जमत नाही , सगळेच कलाकार तस करु शकतिल अस नाही पण बाकिचे निदान प्रयत्न तरी करतात ... >>>> + १ अगदी अगदी
जुइली आणी विश्वजीत काल बौटम मध्ये होते. दोघांनाहि काढले असते तरी काहि फरक पडला नसता.
नाना नेहमीप्रमाणेच. फार सौम्य झालाय पण आता. जुन्या आठवणी चांगल्या सागीतल्या.
जुईली जायला नको होती... ती
जुईली जायला नको होती... ती एकच होती जिच्यासाठी कार्यक्रम बघावा वाटायचा.
मंजुडी तुमची इचछा कधीच पूर्ण न होवो. वैशाली चांगली जातेय ती शेवटपर्यंत राहावी..
जुईली जायला नको होती... +१
जुईली जायला नको होती... +१ विश्वजीत ला एक संधी मिळाली परत. अशीच संधी बहुतेक जयदीप ला मिळाली होती, ज्या नंतर त्याचा परफॉर्मन्स चांगला सुधारला. आता विश्वजीत कसा गातो बघायला हवं (अजिबातच आवडत नसला तरीही)
वैशाली पहिल्यापासूनच हातचं राखून गात आहे असं वाटतंय !
सुमीतचं 'धडकन जरा रुक गयी है' मस्त झालं. ते मंगेश कुलकर्णी चं गीत आहे हे अजिबातच माहित नव्हतं. परत एक बसच्या तिकीटावर लिहिलेलं !
रच्याकने, जान्हवी काल अक्षरक्षः लहान मुलांसारखी बागडत, खिदळत, उड्या मारत होती.. आवरा झालं एकदम
जुईली काल जायला नको होती. ती
जुईली काल जायला नको होती. ती तशी बरी गायली होती.
मैत्रेयीच्या एक सोडून आधीच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन. वैशाली फार पाट्या टाकते. तिला बहुतेक इंटरेस्ट नसावा किंवा असलेला संपला असावा. सांज ये गोकूळी फारसं आवडलं नाही. निहिराची सगळी गाणी नेहमी एका लेवलच्या वर असतात.
काल सुमित राघवन काय भारी गायला !! एल्पी एपिसोडमध्ये हे गाणं कोणी का नाही निवडलं ? जान्हवी काल सुटली होती एकदम !
सुमीतची दोन्ही गाणी क्लास
सुमीतची दोन्ही गाणी क्लास होती. झीने त्याला डावलून कोणाला विनर केलेलं?
मला त्याच्या फिटनेसचंही भयंकर(भीषोण) कौतुक वाटतंय.
जुईली मला खटकत नसे.परीक्षक सूर हलले बिलले म्हणतात, तितकं मला कळत नाही. पण इथे कोणीतरी म्हटलंय तसं निहिराची गाणी विशिष्ट प्रकारची असतात, तशी जुईलीचीही असतात. ती गाताना तोंडं जरा जास्त वेडीवाकडे करते असं वाटतं.
तिच्यापेक्षा विश्वजीततचा अॅटिट्यूड फार भयंकर आहे. एंट्रीपासून.
कोणतेच स्पर्धक जीव तोडून गात नाहीत असंही वाटतं. बनचुकेपणा, या स्पर्धेत जिंकण्यासारखं काही नाही, करियर आता इथून किती वर जाणार, इ.इ,
जुइली जायला नको होती,
जुइली जायला नको होती, विश्वजीतला घालवायला हवा होता.
आज ड्युएट्स झालीच नाहीत नानाच्या गप्पांमुळे, ती नवी गायिका काहीतरीच गाते , होठ रसीले अजिबात जमलं नाही तिला.
शरयु गायली चांगलीच पण तिचा आवाज ‘मालवून टाक दीप ‘ सारख्या सेन्शुअल गाण्यासाठी मॅच्युअर्ड नाही वाटला, लहान मुलीसारखा वाटला.
सुमीत राघवन फ्लॉलेस , किती मल्टीटॅलेंटेड व्यक्तीमत्त्व !
परीक्षितचा >>>> परिक्षित कोण
परीक्षितचा >>>> परिक्षित कोण ?
सुमीतची दोन्ही गाणी क्लास
सुमीतची दोन्ही गाणी क्लास होती. झीने त्याला डावलून कोणाला विनर केलेलं?
<<
मी पाहिले नाही ते पर्व पण बहुदा प्रसाद ओक जिंकला होता.
भरत, तुम्हाला विश्वजीत
भरत, तुम्हाला विश्वजीत म्हणायचे आहे का?
काल सुमित राघवन काय भारी
काल सुमित राघवन काय भारी गायला !! >>> सुमीत छानच गायला. पहिले कडवे चालु होताना , " चेहरोंके मेल मे " ला त्याचा आवाज एकदम ओरिजिनल प्रमाणे लागला होता. ओतुन गायला शिकले पाहिजे त्याच्याकडुन सगळ्याच स्पर्धकांनी.
अनिरुध्द बद्दल कोणीच काही
अनिरुध्द बद्दल कोणीच काही बोलत नाहीये. काल त्याच बगळ्यांची माळ ही सुंदर झाल. त्याचच झोन मधल होत वगैरे सगळ असल तरी छानच गायला तो.
काल तेजश्री पहिल्यांदा
काल तेजश्री पहिल्यांदा (सुनध्यान मध्ये) चांगली दिसत होती (जरी तिने जास्तच खिदळा खिदळी केली)
शाल्मली अत्यंत पोरकट आहे,,,,,
शाल्मली अत्यंत पोरकट आहे,,,,,,, का एवढ फालतू इंग्लिश बोलते?
सुमीतची दोन्ही गाणी क्लास
सुमीतची दोन्ही गाणी क्लास होती. झीने त्याला डावलून कोणाला विनर केलेलं?,>>>प्रसाद ओक....सुमीत राघवन खूप जास्त बरा होता त्यापेक्षा तेव्हासुद्धा
जान्हवी कित्ती बालिशपणा करत
जान्हवी कित्ती बालिशपणा करत होती.. उड्या काय न खीखी खूखू काय.. चांगली सूत्रसंचालिका/चांगला सूत्रसंचालक नाही का मिळाला
ह्यांना..
बरीचशी गाणि छान झाली ह्या आठवड्यात.
नानांचं बोलणं पण एंटरटेनिंग.
परीक्षित नाही, विश्वजीत.
परीक्षित नाही, विश्वजीत.
यह मेरे साथ क्या हो रहा है?
तिन्ही दिवस मजा आली, नानाला
तिन्ही दिवस मजा आली, नानाला जरा जास्तच प्रेमाने बोलताना बघून छान वाटलं, सुमीतचा स्टेज प्रेसेन्स फार मस्त आहे, गातो तर सुंदरच!
शाल्मली नवीन पिढीमधली आहे, कित्येक मराठी मुलं मुली हल्ली असंच बोलतात, ती सिन्सिअरली परिक्षण करते हेही नसे थोडके.
तेजश्रीच्या उड्या मजेशीर होत्या
काल कोल्हापूरला या
काल कोल्हापूरला या कार्यक्रमाचा live show झाला .खूपच छान झाला
तेजश्री फटाका दिसत होती..
तेजश्री फटाका दिसत होती.. सुपर क्युट !
परिन्दा मध्ये नाना Jacky
परिन्दा मध्ये नाना Jacky Shroff चा रोल करणार होता. नसिरुद्दिन शहा अण्णाची भुमिका करणार होता हि नवीनच माहिती मिळाली नानाकडून .
प्रसाद ओक....सुमीत राघवन खूप जास्त बरा होता त्यापेक्षा तेव्हासुद्धा +१११११
का एवढ फालतू इंग्लिश बोलते? >
का एवढ फालतू इंग्लिश बोलते? >>> नानाने सुद्दा तिच्या इंग्लिशची खिल्ली उडवली होती. म्हणत होता, "तुझ बोलण मी स्पर्धकान्ना ट्रान्सलेट करुन सान्गतो."
कालचा एपिसोड आत्ता बघतोय.
कालचा एपिसोड आत्ता बघतोय. नानाला माझी आवडती आरती प्रभुंची कविता तोंडपाठ आहे, हे पाहून खूप छान वाटतंय. त्यासाठी इतर हजार शब्द त्याला माफ.
Pages