काय बीटकॉइन कोसळेल?

Submitted by कूटस्थ on 10 December, 2017 - 12:53

काय बीटकॉइन कोसळेल?
वित्तीय जगतातील सध्याचा बनलेला कळीचा प्रश्न. एका वर्षात $९०० पासून $१७००० पर्यंत मजल मारलेल्या बिटकॉइन च्या किमतीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली व हा फुगा आहे व तो केंव्हाही फुटू शकतो असे म्हणले गेले. भविष्यात काय होईल हे कोणालाच ठाऊक नाही. हा फुगा असला तरी तो अजून किती फुगणार आहे याबद्दलही सांगणे कठीण आहे. परंतु सदन्ह्या चाललेल्या घडामोडी पाहता नजीकच्या काळात काय होईल याचा अंदाज लावण्याचा हा प्रयत्न.

काही दिवसांपर्यंत बिटकॉइन चे मार्केट हे unregulated होते. liquidity चा बराच अभाव त्यामध्ये होता. त्यामुळे किमतीमध्ये बरेच चढ उतार व्हायचे. परंतु काही दिवसांपूर्वी एक बातमी आली कि Cboe Futures Exchange, आणि CME Group या दोन अमेरिकेमधील बलाढ्य Futures Trading Exchanges नी बिटकॉइन फ्युचर ट्रेडिंग ला मान्यता दिली आणि १ महिन्याच्या आत बिटकॉइन ची किंमत दुप्पटीने वाढली. Cboe Futures Exchange वर ट्रेडिंग आजपासून म्हणजे १० डिसेंबर पासून सुरु होणार आहे आणि एका आठवड्याने ते CME वर सुरु होईल. यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे Institutional Investors (Mutual Fund, Pension Fund) यांचा पैसा येणार आहे. अमेरिकेत याची उलाढाल प्रचंड मोठी आहे. यामध्ये कोणत्याची ऍसेट ची किंमत manipulate करायची ताकत आहे. अशामध्ये काय परिणाम असतील त्याचे बिटकॉइन च्या किमतीवर याचा विचार करणे महत्वाचे ठरेल.
बिटकॉइन फ्युचर बद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिन्याच्या शेवटी त्याची सेटलमेंट हि कॅश मध्ये असणार आहे. एक उदाहरण म्हणून पाहुयात - समजा आज बिटकॉइन ची किंमत $१५००० आहे. आता अ ला वाटते कि महिन्याच्या शेवटी बिटकॉईन ची किंमत १५००० पेक्षा कमी होईल (उदा १४०००) त्यामुळे आज आपण एक बिटकॉइन चा कॉन्ट्रॅक्ट १५००० ला विकूयात आणि किंमत १४००० झाली कि तो पुन्हा घेऊ (transaction सेटलमेंट) म्हणजे मधला १००० चा नफा. त्याचवेळी 'ब' ला वाटते कि महिना अखेरीस बिटकॉइन ची किंमत १५००० पेक्षा जास्त असेल (उदा १६०००) त्यामुळे तो आज आपण बिटकॉइन चा कॉन्ट्रॅक्ट १५००० ला विकत घेऊ आणि किंमत १६००० झाली कि विकूयात (transaction सेटलमेंट) म्हणजे १००० चा नफा होईल. आता महिना अखेरीस समजा बिटकॉइन ची किंमत १६००० झाली तर ब ला १००० चा नफा होईल आणि अ ला १००० चा तोटा. परंतु हा नफा किंवा तोटा कॅश मध्ये दिला जाईल. म्हणजे खरे तर कोणीच बिटकॉइन खरेखुरे खरेदी करायची गरज नाही अथवा विकायची गरज नाही. हा केवळ सट्टा झाला. मग त्यामुळे खऱ्या बिटकॉइन मध्ये कुठे पैसा आला ज्यामुळे त्याच्या कीमतीवर फरक पडेल असा प्रश्न पडणे साहजिक आहे.

परंतु अश्या सट्ट्यामध्ये असणारी रिस्क कमी करता येते. समजा अ ला जरी वाटते कि बिटकॉइन ची किंमत कमी होईल तरी ती वाढल्यास होणारा तोटा कमी करण्यासाठी तो बिटकॉइन exchange वरून बिटकॉइन खरेदी करू शकतो. समजा त्याने ७५०० चे बिटकॉइन exchange वरून bitcoin केले. आता किंमत १६००० गेल्यास फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये जरी त्याला १००० चा तोटा झाला तरी खरे बिटकॉइन त्याने जे खरेदी केले होते त्याची किंमत ७५०० वरून ८००० गेली जे विकून तो ५०० चा फायदा मिळेल त्यामुळे त्याचा तोटा हा १००० वरून फक्त ५०० च होईल. अगदी असेच विरुद्ध बाजूने ब देखील करू शकेल. ह्या प्रकाराला हेजिंग असे म्हणले जाते. ह्या हेजिंग प्रकारामुळे खऱ्या बिटकॉइन उलाढालीमध्ये पैसा येईल
आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हेजिंग करण्यासाठी खरेखुरे बिटकॉइन बाळगण्याची गरज आहे जेणेकरून बिटकॉइन exchange वर ते विकता येतील किंवा विकत घेता येतील. परंतु हेजिंग करण्यासाठी लागणारे बिटकॉइन दोन्ही पार्टी (फ्युचर कॉन्ट्रॅक्ट विकत घेणारी आणि विकणारी पार्टी)कडे असणे आवश्यक आहे जे बिटकॉइन फ्युचर हे आत्ताच आले असल्यामुळे त्यांच्याकडे नसतील. त्यासाठी त्यांना बिटकॉइन exchange वरून ते खरेदी करावे लागतील. त्यामुळे नजीकच्या काळात तरी बिटकॉइन ची किंमत अजून वर जाऊ शकते. परंतु एकदा काही काळ गेला कि बिटकॉइन किंमतीमधले चढ उतार थोडे नियमित होतील कारण त्यात बरीच liquidity आलेली असेल.

बघुयात पुढे काय होते.. तुम्हाला काय वाटते?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बिटकॉइन सारखीच प्रचलित असणारी लाइटकॉइन करन्सीचा निर्माता Charlie Lee हा ७ डिसेंबर च्या एका ट्विट मध्ये बिटकॉइनबद्दल म्हणतो - "$16500 now. I'm expecting a correction anytime now. But then again, I have been expecting a correction since $5000. What do I know?"

लिक्विडिटीचा मुद्दा बरोबर आहे. फ्युचर मार्केट इज ए झिरो-सम गेम; तेंव्हा लिक्विडिटी व्हायला थोडा वेळ लागेल.

अजुन एक चिंता करण्याची बाब म्हणजे सीएफइ(Cboe Futures Exchange) ज्या प्लॅट्फॉर्म्वरुन प्राइस ठरवणार आहे ती (जेमिनाय एक्स्चेंज) विंकल्वास बंधु (हो तेच, फेबुचे अर्ली इन्वेस्टर्स अँड वन ऑफ दि लार्जेस्ट बिटकॉइन होल्डर) यांच्या मालकिची आहे. डु यु सी एनी इशु इन धिस?

राजजी लॉन्ग टर्म मध्ये तसा काही issue वाटत नाही कारण exchange वर price manipulation करणे तेवढे सोप्पे नाही मुख्यत्वे जेंव्हा अनेक जण बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. परंतु विंकल्वास बंधु स्वत: (जे one of the largest Bitcoin holder आणि बिटकॉइन Billionaire आहेत) जेंव्हा त्यांच्याकडील सर्व/बरेच बिटकॉइन विकून इन्व्हेस्टमेंट काढून घेतील तेंव्हा मात्र CBOE फ्युचर मार्केट पडेल. नजीकच्या काळात तशी शक्यता कमी वाटते कारण ते स्वतः बिटकॉइन च्या भविष्याबाबत बरेच +ve आहेत.
त्याचप्रमाणे CBOE चा rival CME मात्र ३-४ वेगवेगळ्या exchange वरून डेटा घेऊन प्राइस अवरेज करणार आहे. जेंव्हा फ्युचर मार्केटस थोडे stabilize होतील तेंव्हा या २ (किंवा ३ जेंव्हा Nasdaq पण यात २०१८ मध्ये उतरेल) ठिकाणी price variation जास्त राहणार नाही. तसे झाल्यास अनेक ट्रेडर्स arbitrage ट्रेडिंग करून नफा कमावतील आणि सरतेशेवटी सर्व ठिकाणी किंमत हि बऱ्यापैकी सारखी येईल (आपल्या BSE or NSE वर असते त्याप्रमाणे)

त्यामुळे नजीकच्या काळात तरी बिटकॉइन ची किंमत अजून वर जाऊ शकते. परंतु एकदा काही काळ गेला कि बिटकॉइन किंमतीमधले चढ उतार थोडे नियमित होतील कारण त्यात बरीच liquidity आलेली असेल.

मर्यादित बिटकॉईन संख्येमुळे लवकरच मार्केट वाइड पोझिशनमुळे व्यवहार ठप्प होण्याचे प्रकार बघायला मिळतील.

मार्मिकजी , व्यवहार ठप्प व्हायचे असते तर आत्तापर्यंत झाले असते कारण दिवसेंदिवस बिटकॉइन ची संख्या थोडी का होईना वाढत आहे. आत्तापर्यंत साधारण १६ मिलियन बिटकॉइन circulation मध्ये आहेतआणि २१४० पर्यंत अजून ५ मिलियन येतील. व्यवहार सुरु राहण्यास तेवढे बिटकॉइन पुरेसे आहेत. तुम्ही फ्युचर मार्केट चे म्हणाल तर मी लेखात लिहिल्याप्रमाणे सर्व व्यवहार कॅश settled आहेत त्यामुळे पोसिशन घेण्यासाठी तुमच्याकडे खरे बिटकॉइन असण्याची गरज नाही किंवा व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्हाला बिटकॉइन मिळणार नाहीत तर व्यवहारातील फायदा नुकसानी प्रमाणे पैसे मिळतील/कमी होतील.

मी फ्युचर बद्दलच म्हणतोय. किती टक्के मार्केट वाइड पोझिशन आहे हे मला माहीत नाही. आतातर नुकतीच सुरुवात आहे. भविष्यात सट्टा व्यवहार वाढण्याची शक्यता जास्त असल्याने मी ही भीती व्यक्त केली.

A boy asked his bitcoin-investing dad for 1 bitcoin for his birthday.
Dad: What? $15,554??? $14,354 is a lot of money! What do you need $16,782 for anyway?

मस्त.

<काय बीटकॉइन कोसळेल?>

क्या बिटकॉइन लुढकेगा -> काय बिटकॉइन कोसळेल? (हिंराठी)

बिटकॉइन कोसळेल का? (मराठी)

will bitcoin crash ->क्या बिटकॉइन लुढकेगा -> काय बिटकॉइन कोसळेल?

काय कोसळली?

जास्त गवगवा झाल्याने इन्क्म टॅक्स व इतर रेग्युलेटरी एजन्सीज च्या डोळ्यातही हे बिट कॉइन भरले आहे. त्यामुळे नोशनल प्रॉफिट कमी होईल. डार्क नेट की चीजें उधरही छोड देनी चाहिये. मला काय प्रश्न पडतो की ही जर जास्त कोसळली तर लोकांचा पैसा जाईल व तो भरून काढायला ते शेअर्स विकती ल परि णामी शेअर मार्केट कोसळेल का? अशी शंका आहे. सध्यातरी बुल रन जोरात चालू आहे. पण...... करेक्षन कधीही होउ शकते. ( काळ्जी ग्रस्त वयस्क जाडी बाहुली)

http://www.moneycontrol.com/news/business/cryptocurrency/economist-who-c...

Nouriel Roubini, professor of economics at New York University, said Bitcoin was “the mother of all bubbles” favoured by “charlatans and swindlers” as the currency dropped to a level below USD 8,000 on Friday in certain exchanges.

In the last seven days, the currency has dropped by 26 percent. On January 29, Bitcoin was trading at USD 11,300 level which is now at USD 8,200 level.

कूटस्थ, लेख आवडला.बराच अभ्यास दिसतोय तुमचा यात.बिटकॉइन कोसळण्याचा तुमचा अंदाज थोडाफार बरोबर होता. बरीच खाली गेल्यावर मध्ये काही काळ किंमत थोडीफार स्टेबल झाली होती. परंत आता परत बिटकॉइन उसळी खात आहे. काय अंदाज आहे तुमचा?