इंडस्ट्रियल पीएच.डी.बद्दल (Industrial Ph.D.) माहिती हवी आहे.

Submitted by ललिता-प्रीति on 12 January, 2018 - 01:56

माझ्या मुलाच्या विनंतीवरून हा धागा सुरू करत आहे.

माझा मुलगा सध्या मुंबईत T.I.F.R.च्या Biological Sciences Dept मध्ये M.Sc.(by research) करतो आहे. Cell Biology + Bio-Physics हे त्याचे विषय आहेत. त्याचं M.Sc. पूर्ण व्हायला आणखी दीड वर्ष शिल्लक आहे. त्यानंतरच्या पीएच.डी.च्या विविध पर्यायांवर/शक्यतांवर सध्या तो विचार करतो आहे. पैकी Industrial Ph.D.बद्दलच्या माहिती संकलनासाठी हा धागा.

नेटवर शोधाशोध केली असता I-Ph.D. म्हणजे काय त्याची माहिती, तसंच त्यासाठीच्या grants ची माहिती मिळते. पण I-Ph.D. च्या enrollment ची पद्धत काय असते हे त्याला समजलेलं नाही.
तर,

१) I-Ph.D. साठी अर्ज करताना युनिव्हर्सिटी आणि संबंधित इंडस्ट्री यापैकी आधी काय विचारात घ्यावं? (चांगली युनिव्हर्सिटी आणि त्यामार्फत जी मिळेल ती इंडस्ट्री? की चांगली इंडस्ट्री, मग ती ज्या युनि.शी जोडलेली असेल ती स्वीकारायची?)

२) अर्जाचा सर्वमान्य मार्ग कोणता?
अ) I-Ph.D. उमेदवारांना सामावून घेणार्‍या इंडस्ट्रीला आधी अप्रोच व्हायचं आणि ती इंडस्ट्री ज्या युनि.शी जोडलेली असेल तिथे आपसूक आपला प्रवेश होतो?
ब) I-Ph.D. देऊ करणार्‍या युनिव्हर्सिटीला अर्ज करायचा, आणि मग सर्व पात्रता निकष पार करून ती युनि. ज्या
इंडस्ट्रीशी जोडलेली असेल त्यात शिरायचं?

३) I-Ph.D. चे चांगले पर्याय प्रामुख्याने युरोपमधल्या काही देशांमध्ये उपलब्ध आहेत. (फिनलंड, नॉर्वे, नेदरलंड्स, डेन्मार्क). युरोपव्यतिरिक्त अन्यत्र किंवा भारतात कुठे तसे आहेत का?

४) I-Ph.D. बद्दलचे इतरही काही अनुभव/माहिती/links शेअर करावे.

(इथे आलेले प्रतिसाद, प्रश्न मुलाला दाखवून, त्यावरची त्याची उत्तरं मिळवून मीच इथे पोस्ट करेन. या सगळ्यात उत्तरं द्यायला थोडा उशीर होऊ शकतो.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता-प्रिती,
इन्डस्ट्रियल पीएच्डी तुम्ही म्हंटल्याप्रमाणे युरोपिय देशात ऊपलब्ध पर्याय आहे. (अमेरिकेत नाही). माझ्या माहितिप्रमाणे भारतात मोजक्या ठिकाणी तो उपलब्ध आहे.
http://www.ncl-india.org/PhDAdmission/Phd_admission_webpage.htm
ह्या व्यतिरिक्त बंगलोर विद्यापिठाच्या प्रोग्राम बद्दल मी ऐकल होत पण खात्री नाही. इंडस्ट्रियल पीएच्डी चा मुख्य उद्देश इंडस्ट्रीला फायदा होइल असा शोध्/प्रक्रिया निर्माण करण हा असल्याने बहुतांश ठिकाणि उमेदवाराने कंपनी मध्ये काहि काळ अनुभव घेउन इंडस्ट्रीतील मार्गदर्शकांच्या मदतीने विद्यापीठाकडे संशोधन प्रकल्प सादर करणे हा पॅटर्न असतो. मी मध्यंतरी सदर्न डेन्मार्क विद्यापीठाचा इंडस्ट्रियल पीएचडी ह्या पर्यायाचा तपास केला होता एका इचछुकासाठी. तो मला आवडला होता. तुमच्या मुलाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

त्याला कुठला विषय हवा आहे पण? सेल बायॉलॉजि आनि बायो-फिजिक्स हे दोन्हिहि खुप ब्रॉड टॉपिक्स आहेत. अजुन दीड वर्ष म्हणजे तसा वेळ आहे. पण पीएच्डी चा टॉपिक आधी सेट करायला सांग म्हणजे त्यानुसार पीएच्डी बघता येईल. शिवाय असं स्वतःला restrict करु नको म्हणाव कारण मग बेसिक आणि academic research ला स्कोप मिळणार नाही कारण Industrial PhD ही मोस्टली application बेस्ड असते.

कुलु, प्रतिसादाबद्दल आभार.

रिस्ट्रिक्ट न करण्याचा मुद्दा योग्यच. तसं त्याने अजून केलेलंही नाही.
त्याच्या म्हणण्यानुसार, अकॅडेमिक पीएच.डी.ची माहिती, रिसोर्सेस, थिंग्ज टू डू (आणि नॉट टू डू) वगैरेबद्दल माहिती मिळवणे सोपं आहे. तुलनेने इंडस्ट्रियल पी.एच.डी.बद्दलची माहिती आपल्याकडे सहजी उपलब्ध नाही.

टॉपिक आधी सेट करण्याचा तुझा मुद्दा त्याच्यापर्यंत पोचवते.

आमच्या कंपनीत PhD करता येते. पण तुमच्या मुलाचे विषय आमच्या क्षेत्राशी संबंधीत नाहीत. तुम्हाला अधिक माहिती Council of Scientific & Industrial Research (CSIR) च्या वेबपेज वर मिळेल.