७-८ छोटी कोवळी वांगी, एक जुडी कोथिंबीर, २ पेर आलं, ७-८ हिरव्या मिरच्या, तेल, जिरं, मीठ.
वांगी स्वच्छ धुवून-पुसून घ्यावीत आणि देठं काढून टाकावीत. सगळ्या वांग्यांना देठाच्या बाजूनं उभी-आडवी खाप करावी. कढईत तेल गरम करून त्यात (फक्त) जिर्याची फोडणी करावी. तेल जरा सढळ हातानं घालावं. वांगी परतत असताना कोथिंबीर, आलं, मिरच्यांचं चांगलं बारीक वाटण करून घ्यावं. गरज पडल्यास वाटताना जरासंच पाणी घालावं. वांगी अर्धी-कच्ची शिजली की त्यात वाटण आणि चवीनुसार मीठ घालून नीट हलवून घ्यावं. झाकण घालून वाफेवर भाजी शिजवावी. तांदळाच्या किंवा ज्वारीच्या पातळ भाकरीसोबत फार मस्त लागते.
आंध्रप्रदेशात ही अशी भाजी करतात. झटपट पण चमचमित चविष्ठ प्रकार आहे. हिरव्या वाटणातल्या भाजीला जरा ग्लॅमरस वाटावं म्हणून 'बैंगन हरभरा' नाव दिलं आहे.
वांगी हिरवी असली तर उत्तम.
सध्या पाककृती शोध सुविधा चालत नसल्यानं कुणी आधीच ही रेसिपी लिहिली आहे की कसं शोधता आलं नाही.
मस्त आहे रेसिपी. आपल्या त्या
मस्त आहे रेसिपी. आपल्या त्या ह्यात अगदी दहा मिनिटात होईल आणि शिजेपर्यंत पार्लरलाही जाऊन येता येईल.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान आहे रेसिपी, फोटु हवा !
छान आहे रेसिपी, फोटु हवा !
कृती खरच सोपी आणी छान आहे.
कृती खरच सोपी आणी छान आहे. करेनच. पण नाव वाचुन वाटले की बाकी भाज्यात कसे आपण मटार घालतो, तसे यात हरभर्याचे दाणे घालायचे की काय. कारण आधी मी चुकून हरभरा वाचले. आणी तसेही थंडीमुळे भारतात भरपूर हरबरा आलाय.
छान पाककृती.
छान पाककृती.
वांगी - हरभरा अशी भाजी आमच्याकडे करतात.
छान आहे ! जरा फोटु हवा होता!
छान आहे ! जरा फोटु हवा होता!
हरभर्याचे दाणे घालायचे की काय.>>>
हो ना मलाही तसेव वाटले आधी आपल्या भोगीच्या भाजीत हरबरा घालतो तसे!
सोपी रेसिपी. नक्कीच ट्राय
सोपी रेसिपी. नक्कीच ट्राय करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वांगी हरभरा अशी एक रेसिपी सिंडरेला नेच पुर्वी टाकली होती (ना?)
सोपी रेसिपी. नक्कीच ट्राय
सोपी रेसिपी. नक्कीच ट्राय करेन >>> +१११
फोटो टाका जमल्यास, म्हणजे अजुन अंदाज येईल अन छान वाटेल.
एक शंका, >>> सगळ्या वांग्यांना देठाच्या बाजूनं उभी-आडवी खाप करावी. <<<< म्हणजे वांग्याचे चार भाग करायचे कि न चिरता फक्त भेगा द्यायच्या
वांगी हरभरा अशी एक रेसिपी
वांगी हरभरा अशी एक रेसिपी सिंडरेला नेच पुर्वी टाकली होती (ना?)>>>>हो. वांगं सोलाणा भाजी. आमच्या घरी हिट आहे ती भाजी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टेस्टी दिसतेय, करायला हवी
टेस्टी दिसतेय, करायला हवी थंडीत.
सोपी व छान आहे.
सोपी व छान आहे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/21385 ही भाजी पण जाम आवडली. ही पण करणार. तृप्ती, तुमच्या पाककृती खरच सोप्या आणी चवदार असतात.
आजच करून बघतो.
आजच करून बघतो.
सोपी वाटतेय. फक्त आम्ही तिखट अधिक टाकणार.
मस्त वाटते आहे.
मस्त वाटते आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
(आणा एकदा एवेएठिला.
आज केली ही भाजी. आम्हाला
आज केली ही भाजी. आम्हाला वांग्याच्या भाजीत तो हा पण घालणे मस्ट असते त्यामुळे तोही घातला. मस्त झाली होती. सोपीही आहे. फोटु काढायचा राहिला माझा पण![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तो हा म्हणजे?
तो हा म्हणजे?
ब्याड वर्ड गं ब***
ब्याड वर्ड गं
ब*** ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्र्र हो का?
अर्र्र हो का?
छान.
छान.
मैत्रेयी .... कशाला लागतो
मैत्रेयी
.... कशाला लागतो गं तो ज्यात त्यात?
म्हणजे वांग्याचे चार भाग
म्हणजे वांग्याचे चार भाग करायचे कि न चिरता फक्त भेगा द्यायच्या >>> चीर द्यायची फक्त. वांगी आख्खीच राहिली पाहिजेत.
रश्मी, मला फार अवघड / वेळखाऊ रेसिपीज अजिबात झेपत नाहीत म्हणून सोपेच पदार्थ बनवते आणि इथे लिहिते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मै, ज्या मैत्रिणीनं रेसिपी दिली तिला सांगते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वांगी हिरवी असली तर उत्तम.<<<
वांगी हिरवी असली तर उत्तम.<<< माझी शिजल्यावरही हिरवीच राहिली....
....
..
करून बघतो. हल्ली भाकरी खातो त्यामुळे सोबत.
फोटो काढायला विसरू नका
फोटो काढायला विसरू नका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायोला हाणा. पार्लरला जाते
सायोला हाणा. पार्लरला जाते म्हणे. पण त्या इंपॉ ने खरच ती सोय होते खरी.
तो हा अम्हणजे बटाटा का?
मला सीमाने लिहिलेलं डांगर शोधायचं होत< पण शोधायचं कसं? खूप दिवसांनी आले तर सगळं बदललय. शोधायचं कस?
शूम्पी, हे घे https://www
शूम्पी, हे घे https://www.maayboli.com/node/34849
मायबोलीचा सर्च काम करत नाहीये पण सीमाला शोधून तिच्या लेखनातून मिळालं.
अरे मी पण तेच केलं .आत्त्ताच
अरे मी पण तेच केलं .आत्त्ताच सापडलं. पण थँक्यू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> मायबोलीचा सर्च काम करत
>> मायबोलीचा सर्च काम करत नाहीये
आता करतो आहे. फक्त मायबोली एडिटर वर लिहून ते स्ट्रिंग (देवनागरी) कॉपी पेस्ट केलं मायबोली च्या सर्च फिल्ड मध्ये तर काम होतं असा माझा अनुभव आहे. अजूनही जास्त चांगले पर्याय असतील पण मला माहित नाहीत.
किंवा मग रेग्युलर गुगल मध्येही सर्च करता येतं आधी किंवा नंतर "site: maayboli.com" की तत्सम स्पेसिफिकेशन देऊन. ह्याबद्दल अधिक माहितीसाठी भास्कराचार्य किंवा अजून कोणी एक्स्पर्ट्स ना संपर्क साधावा.
मस्त. सोपी आहे.
मस्त. सोपी आहे.
मै +१ ब्याडवर्ड घातल्याशिवाय करणे शक्य नाही.
पुढच्या वेळी ट्राय करेन सशल.
पुढच्या वेळी ट्राय करेन सशल. आता आवटी बाई केरसुणी घेऊन आपल्याला बाहेर ढकलायला यायच्या आत आपणच कटावं.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पार्लरला जाते म्हणे >>> बघ की
पार्लरला जाते म्हणे >>> बघ की, फिरनी होइल अशानं त्या भाजीची
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
ब्याडवर्ड घातल्याशिवाय करणे शक्य नाही. >>> अमित, छोटे बटाटे आख्खेच उकडून छान खरपूस परतून घेतले तर मस्त लागेल ही भाजी.
आवटीबाईंनी सांगायच्या आत मीच सांगते, विषयाला धरून बोला
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हे घ्या प्रकाशचित्र.. आजच
हे घ्या प्रकाशचित्र.. आजच करून खाल्ली.. . (मिरच्या कमी केल्या)..
https://photos.app.goo.gl/6bZBDOe8sL4cmU332