शहरात नवे तर गावात सुद्धा आता लोक इंग्लिश माध्यमात जात आहेत , आणि मराठी माध्यमाचे commercial benefits तसे काही फार नाहीत . जिकडे अतीव स्पर्धा आहे तिकडे मराठी माध्यमाची मुले - ते पण गेल्या -१०-१२ वर्षात आहेत का ? या विषयावरून माझा वाद झाला तेव्हा मी काही प्रश्न विचारले होते -
बाय दि वे गेल्या १५ वर्षात मराठी माध्यमातून किती मुले IIT / IIM ला गेली ? यावर एकदा दुसरीकडे वाद झाल्याने मी हि माहिती मागितली होती . तसेच मी recruitment मध्ये काही काल होतो , त्यामुळे अनेक bio data बघायला लागायचे त्यावरून हा निष्कर्ष काढला आहे . २००० सालापूर्वी मराठी medium दर्जा खूप चांगला होता पण आता तो घसरला आहे . मागे काही कारणासाठी मी भारतातील top १०० startups बघत होतो , त्यात मराठी नावे खूप कमी होती आणि त्यांच्य्ही profiles linkedin वर बघितल्या तर मराठी शाळांचे असावे असे वाटले नाही .
तरुण मुलांबाबत प्रश्न
१) गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून IIT/IIM सारख्या संस्था मध्ये किती जण गेले ? ( पूर्वी काही जण होते , पण त्यावेळी शाळेचा दर्जा हि चांगला होता
२) मेडिकल बद्दल खरेच माहिती नाही पण गेल्या १२ वर्षात मराठी माध्यमातून किती जण चांगल्या मेडिकल कॉलेज ला गेले ?
३) भारतात ३५ शी च्या आसपास आणि १ करोड पर्यंत पगार घेणारी मराठी माध्यमाची किती मुले असावीत ?
४) IAS / UPSC मध्ये मराठी माध्यमातील मुलांची स्थिती काय आहे ? हि चांगली असावी असा अंदाज आहे .
कोठल्याही वयातील मराठी माध्यमाच्या मुलांबद्दल
१) मराठी माध्यमातील किती जण आजच्या टॉप चे पगार असलेल्या नोकरीत आहेत ?
२) मराठी माध्यमातीलअनेक जण IT त आहेत पण त्यापेक्षा हि अधिक पगार देणारी consulting , इन्व्हेस्टमेंट बँकिंग , private बँकिंग मध्य किती आहेत ? (
४) टॉप ५ कन्सल्टन्सी चा सर्व्हे मी केला होता , त्यात काही मराठी लोक आहेत पण प्रोफाईल्स बघता मराठी माध्यमाचा कोणी आढळला नाही .
५) तीच गोष्ट अमेरिकेतील भारतीय वंशांच्या CEO ची . त्यातील जवळपास सर्व मराठी नावांची प्रोफाईल्स मी बघितली होती त्यात मराठी माध्यमातील कोणी आढळला नाही ( कोणी असेल तर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा).
२-३ वर्षांपूर्वी आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेची अधोगती का होत आहे आणि यावर काय करता येईल याची एक समिती बसली होती . त्या वेळी मी मराठी माध्यमाच्या शाळेतील चमकल्या विद्यार्थ्यांवर संशोधन केले . तसेच मी त्या वेळी recruitment मध्ये काम करीत असल्याने अनेक वरिष्ठ प्रोफाईल्स रोज बघत होतो आणि अनेक प्रोफाईल्स खास करून इंजिनीरिंग आणि management च्या पालथ्या घातल्या . ४० च्या वर काही मराठी मुले चमकत आहेत . पण ४० च्या खाली परिस्थिती वाईट आहे .
तरी माझा data सर्वसमावेशक आहे असे म्हणत नाही . तर वरील विचारलेले काही उदाहरणे असतील तर सांगा . म्हणजे नाव , काय शिकलाय , आणि आता काय करतोय
मराठी लेखनाची स्थिती तर अतिशय वाईट आहे . मराठीतून लिहून तर कोणालाही पोट भरणे शक्य नाही , तेच तिकडे आमिष त्रिवेदी आणि चेतन भागात सारखा लेखक कॉर्पोरेट मधली मोठी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक बनतात !
आजही मराठी आणि इंग्लिश पत्रकारांच्या पगारात बरीच तफावत आहे . काही वेळा तर ती प्रचंड आहे . मराठीत नियतकालिक चालवणे आत्बात्त्याचे झाले आहे . मराठीमध्ये Fashion or Lifestyle साठी कोणतीही नियतकालिके नाहीत . अशाच एका नियतकालिका च्या ग्रुप मध्ये २ नियतकालीकांचा संपादक असलेल्या माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीस ४० लाखाच्या आस पास पगार आहे आणि तो Mercedes C Class मधून फिरतो . मराठीत एवढा पगार सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्र संपादकास हि मिळत नसावा . ( हे माहितीतील उदाहरण आहे म्हणून दिले आहे )
तसेच आता साईट चालवत असल्याने अतिशय उत्तम इंग्लिश येण्याचे फायदे रोज दिसतात - माझ्या साईट साठी तर ते काम माझा पार्टनर च बघतो . Content लिहिणे हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे , मी यातल्या अनेक लोकांना भेटलो आहे , मला तर मराठी माध्यमाचे कोणी भेटले नाही !
मला सर्वात आधी फक्त मराठी माध्यमातून शिकलेली आणि गेल्या १०- १२ वर्षात Top Institutes ( IIT / IIM / INSEAD / Harverd / Stanferd / Cambridge / Oxford / London School of Economics / Sloan etc) गेलेली मुलांची नावे पाहिजे आहेत .
इंग्रजी ज्ञानभाषा वगैरे ठाम
इंग्रजी ज्ञानभाषा वगैरे ठाम समज करुन मराठीला ते शक्यच नाही असे समजणार्यांसाठी माझा एक अनुभव.
डिजाइन थिंकिंग ह्या विषयावर मी इथे दोन लेख लिहिले आहेत. डिजाइन थिंकिंग ही मूळ संकल्पना आणि त्यावरचे काम हे मुख्यत्वे परदेशात इंग्रजी भाषेत झालेले आहे. उपयोजित कला सोडल्या तर इतर क्षेत्रांमधून ह्या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु व्हायला फार नाही चार पाच वर्षेच झाली आहेत. भारतातही ही संकल्पना तशी नवीच आहे. त्यामुळे त्याबद्दलचे सगळे संदर्भ हे इंग्रजीतून उपलब्ध आहेत. म्हणजेच हे ज्ञान इंग्रजीतूनच उपलब्ध आहे.
आता बघा, गेल्या पंधरा दिवसात मी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ह्या संकल्पनेवर आधारित तीन कार्यशाळा घेतल्यात. ह्या संपूर्ण मराठीतून होत्या. मुळात ही संकल्पना माहितच नाही, त्यात ती इंग्रजीतून सांगितली तरी समजणार नाही. मग आपल्या नेहमीच्या भाषेत हे ज्ञान वाटले. समजून घेतांना कोणालाही काही अडचण आलेली नाही. तेव्हा संकल्पना आणि ज्ञान-माहिती हे कोण्या भाषेचे मांडलिक नसतात. समजून घेता येत नसेल किंवा समजावून सांगता येत नसेल तर त्याचे कारण वेगळे असते.
इतर भाषांतले ज्ञान आपल्या भाषेत आणून ते वाटायची तळमळ हवी असते. आणि आपल्या भाषेत आणणे म्हणजे शब्दार्थ, अनुवाद करणे नव्हे. मॅग्नेटिक ला चुंबकिय, अॅटम ला अणू म्हणायचं का असे खिल्लीबाजी करणारे लोक असतील तर त्यांना ज्ञान म्हणजे काय हे तरी कितपत कळते ह्याची शंका आहे.
महाराष्ट्र त मॅडम, मित्र
महाराष्ट्र त मॅडम, मित्र-मैत्रिणी हिंदीत >>> इथे गुरगावात पण इग्रजी वापरतात आणि महाराष्ट्रात हिन्दी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुड सँपल साईझ सर्वे. >>>>> मी
गुड सँपल साईझ सर्वे. >>>>> मी सॅम्पल साइज काढला हा शोध (?) लावला त्याबद्दल अभिनंदन .
बाकी चालू देत .
नाना, तुमचे लेख मी वाचले होते
नाना, तुमचे लेख मी वाचले होते .
सोप्या मराठीत असल्याने ते समजलेही होते .
संकल्पना समजणे हे कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही हे मान्य आहे .पण तरीही "जगाच्या साथीने "चालायचं असेल तर इंग्रजीला पर्याय नाही असे करंट मत आहे
करंट म्हणन्याचे कारण मत बदलुही शकते.
परत एकदा इंग्रजी माध्यमाचा चॉईस हे माझं वैयक्तिक मत आहे .ते मानाच अशी जबरदस्ती नाही . इथे माबोवर हल्ली सगळंच उलगडून सांगावे लागतेय
जाई. तुमचे मत आहे, त्याचा आदर
जाई. तुमचे मत आहे, त्याचा आदर आहेच.
पण मी जेव्हा लिहितो तेव्हा माझ्यासमोर माझ्या मेट्रो शहरातल्या सोसायटीतले ९०% काय करतात ह्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातले ९०% काय करतात हे असते. आणि गेल्या ३० वर्षात इंग्रजीच्या जबरदस्तीने ९०% लायक मुलांची कत्तल केली आहे, त्यांना गरज नसलेल्या अनावश्यक दबावाने संधींपासून वंचित केले गेले आहे हे दिसले आहे, दिसत आहे. त्यांना उत्तम इंग्रजी शिकवणारे शिक्षक नाहीत, इंग्रजीची भीती घालवणारे वातावरण नाही. इंग्रजी येत असेल तरच तुम्ही हुशार आहात ह्या समजातून बाहेर काढणारे कोणी भेटत नाही. हे सर्व उलगडून सांगावं लागतंय कारण बर्याच लोकांना ती बाजूच माहिती नाही असे दिसते आहे.
आणि कृपया माझ्या मतांमुळे
आणि कृपया माझ्या मतांमुळे कोणी ऑफेन्ड होऊ नका.... ही नम्र विनंती. मी कधीही कुणाही इंग्रजीप्रेमी व्यक्तीची खिल्ली उडवत नाही.
आपण भाषेचा वापर फक्त वैयक्तीक
आपण भाषेचा वापर फक्त वैयक्तीक उन्नतीसाठी करावा या मताचा मी आहे .मग ती इंग्रजी असेल तर काही बिघडत नाही.
मातृभाषेला अस्मितेची गळवं बनवून ठसठसत ठेवण्यात काही अर्थ नाही.
पण मी जेव्हा लिहितो तेव्हा
पण मी जेव्हा लिहितो तेव्हा माझ्यासमोर माझ्या मेट्रो शहरातल्या सोसायटीतले ९०% काय करतात ह्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातले ९०% काय करतात हे असते >>नाना , यू टू ??? मी फक्त सोसायटीतील मुलांचा उल्लेख केला त्यात एवढे उपहासपूर्ण बोलायचे काय आहे ? खरेच समजत नाही . एक जस्ट उदाहरण दिल . काय ते आपलं सॅम्पल साइज , % वगैरेच झाड पकडलं आहे ? वैताग आहे खरेच । तुम्हाला नाही पटत / नाही खरं वाटत तर सोडून द्या .
ऑफेंड होऊ नका >>> ऑफेन्ड नाही झाले नाना , पण साध्या विधानाचा देखील विपर्यास केला जातोय हल्ली मायबोलीवर .
आय अॅम रिअली सॉरी.
आय अॅम रिअली सॉरी. व्यक्तिगतरित्या तुमच्या विधानाचा उपहास केलेला नाहीये. विपर्यासही नाही. तुम्ही कुठे राहता किंवा काय हे मला ठावूक नाही, पण साधारण मेट्रो आणि मोठ्या शहरात राहणार्या आणि आईवडील दोघेही उच्चशिक्षित नोकरी वगैरे करत असलेल्या वातावरणातून आलेल्या लोकांचे विचार असेच असतात हे बघितले आहे. तुमच्यासारखे निरिक्षण असणारे एकूण असे विचार घाऊक प्रमाणात सातत्याने दिसत आहेतच. त्याबद्दल मी बोलत आहे. त्यात तुम्ही पर्सनली काही घेऊ नका. तुमचा उपहास केल्याने माझा मुद्दा जिंकेल वगैरे असे मी काहीही समजत नाही. माझ्याकडे पूर्णपणे मूलभूत मुद्दे आणि त्याअनुषंगाने लागणारी माहिती प्रचंड प्रमाणात आहे. ते बाजूला ठेवून असे क्षुद्र काही करायची मला आवश्यकता खचितच नाही.
ओके नाना !
ओके नाना !
आपण भाषेचा वापर फक्त वैयक्तीक
आपण भाषेचा वापर फक्त वैयक्तीक उन्नतीसाठी करावा , मातृभाषेला अस्मितेची गळवं बनवून ठसठसत ठेवण्यात काही अर्थ नाही.----हे अगदीच पटलं.
त्यांना उत्तम इंग्रजी
त्यांना उत्तम इंग्रजी शिकवणारे शिक्षक नाहीत, इंग्रजीची भीती घालवणारे वातावरण नाही. इंग्रजी येत असेल तरच तुम्ही हुशार आहात ह्या समजातून बाहेर काढणारे कोणी भेटत नाही. हे सर्व उलगडून सांगावं लागतंय कारण बर्याच लोकांना ती बाजूच माहिती नाही असे दिसते आहे.
Submitted by नानाकळा on 5 December, 2017 - 17:26>>>>>>नाना तुमच्याशी या बाबतीत लाख टक्के सहमत.
नाना, ऑन अदर हॅन्ड
नाना, ऑन अदर हॅन्ड
तुम्ही /तुमच्या ओळखीतले शिक्षक मराठी माध्यमातील मुलांच्या इंग्रजीसाठी काही उपक्रम करत असाल तर इथे जरूर लिहा .
सर्वांनाच फायदा होईल .
नक्कीच, बरेच आहेत.
नक्कीच, बरेच आहेत.
माझी मुलं ज्या मराठी शाळेत जातात, तिथले शिक्षक पहिलीपासून मुलांची इंग्रजी ची तयारी योग्य त्या पद्धतीने करून घेतात, पूर्ण मराठी माध्यमाची शाळा असून इथल्या मुलांचं इंग्रजी उत्तम आहे, सातवी आठवीतली मुलं वार्षिक स्नेहसंमेलनात अस्खलित इंग्रजीतून नाटक सादर करतात, कविता लिहितात, कथा लिहितात.
या शाळेत इंग्रजीची भीती दाखवली जात नाही तर इतर अनेक विषयांप्रमाणे हाही एक विषय असे समजून प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
आणि हो, माझ्या मुलांच्या शाळेत अतिशय गरिब पासून अतिशय श्रीमंत पर्यंत सगळ्या वर्गांतली मुले शिकतात. उच्चशिक्षित, मोठ्या पदांवर काम करणार्यांचीही मुले इथे इंग्रजी शाळांतून काढून हट्टाने घातली आहेत.
यावर्षी तर खेळवाडीच्या (प्लेग्रुप) च्या प्रवेशासाठी सकाळी चार वाजल्यापासून पालक रांग लावून बसलेले. हे चित्र साधारण इंग्रजी शाळांत दिसतं. पण अनेक पालक इंग्रजी शाळांच्या दर्जाबद्दल समाधानी नाहीत. ते इथे प्रवेश घेण्यासाठी आटापिटा करत आहेत.
अनेक गावांतल्या जिल्हापरिषद शाळांत इंग्रजी शाळेपेक्षा दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने हजारो पालक दरवर्षी आपली मुले इंग्रजीतून काढून झेडपीत टाकत आहेत. आता ह्या सर्वांना कदाचित वेड लागलं असावं.
आणखी एक. मराठीचा किंवा
आणखी एक. मराठीचा किंवा मातृभाषेचा-परिसरभाषेचा आग्रह धरणारे अस्मितांची गळवं सांभाळण्यासाठी ही उठाठेव करत नाहीयेत. शिक्षण आणि अभ्यासक्रम अधिकाधिक विद्यार्थीकेंद्रित व्हावा यासाठीचे हे प्रयत्न आहेत.
साधं उदाहरण द्यायचं तर सात वर्षाच्या मुलाचे पुढचे दात पडलेत. त्याला भुट्टा खाता येत नाही की ऊस सोलता येत नाहीये. पण त्याने ते खाल्ले पाहिजे अशी गरज आहे. तेव्हा भुट्ट्याचे दाणे सुटे करुन देणे किंवा ऊसाचा रस काढून देणे हे महत्त्वाचे असते. त्याच्याऐवजी "हे मोठ्या माणसांसारखंच खायचं असतं, तुला जमत नाही म्हणजे तुझ्यात जन्मतःच दोष आहे आणि तो कायम राहणार आहे" हे त्याच्या मनावर बिंबवत राहणे कोणत्याही प्रकारे उपयोगी नाही.
इंग्रजी महत्त्वाची नाही हे कोणीही म्हणत नाहीये. विरोध फक्त अनावश्यक बागुलबुवाला आहे, गरज नसलेल्या जबरदस्तीला आहे, अशी जबरदस्ती जिच्याने कोणतेही ध्येय साध्य होत नाहीये. इंग्रजी ही एक चाळणी आहे. किंवा कोणतीही परकी भाषा तशीच असते. उद्यापासून इंग्रजीऐवजी तमिळ शिकायला लावली तर जे वाटेल तेच महाराष्ट्रातल्या ९०% मुलांना वाटत असते. त्यांच्या आयुष्याचे ध्येय जणू इंग्रजी शिकणे होऊन बसतं, मूळ शिक्षण बाजूलाच राहतं. आणि अशा तर्हेने नवीन प्रकारचा भेदभाव जन्माला येतो. जगातल्या कोणत्याही शास्त्राचे मूळ ज्ञान भाषेमुळे तयार होत नसते. तर जो ते तयार करतो तो आपल्या भाषेत त्याला मांडतो.
जगभरातल्या युद्धतज्ञांसाठी, सैनिकांसाठी महत्त्वाचे असलेले द आर्ट ऑफ वार हे चीनी पुस्तक पाचव्या शतकात लिहिले गेले. त्याचे भाषांतर अठराव्या शतकात फ्रेंचांनी केले, नंतर ते इंग्रजीत आले. आज ते जगभरातल्या सैनिकी प्रशिक्षणाचा भाग आहे. अशी हजारो उदाहरणे आहेत. पण त्यासाठी पूर्वग्रह सोडावा लागतो. झापडबंद पद्धतीने जगण्याची सवय फार काळ यश देत नाही हे वर्षाला ७० टक्के उपयोगहीन अभियंते देणारी शिक्षणव्यवस्था सिद्ध करत आहे. हे सगळे अभियंते इंग्रजीतून शिकलेले आहेत पण नोकरी करण्यालायक नाहीत. कारण यांच्या मूळ संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात. फक्त ढकलगाडी आणि रट्टा मारुन शिकतात.
हे सगळं बदलायचं असेल तर आजपासून प्रयत्न करावे लागतील. लिहिण्यासारखं बरंच आहे. जमेल तसं लिहिन.
माझी मुलं ज्या मराठी शाळेत
माझी मुलं ज्या मराठी शाळेत जातात, तिथले शिक्षक पहिलीपासून मुलांची इंग्रजी ची तयारी योग्य त्या पद्धतीने करून घेतात, पूर्ण मराठी माध्यमाची शाळा असून इथल्या मुलांचं इंग्रजी उत्तम आहे, सातवी आठवीतली मुलं वार्षिक स्नेहसंमेलनात अस्खलित इंग्रजीतून नाटक सादर करतात, कविता लिहितात, कथा लिहितात.
>>> अप्रत्यक्ष पणे लेखकाचा मुद्दा बरोबर होतोय मग. असल्या मराठी शाळा मला वाटत नाही सगळीकडे आहेत. पाहिलीपासूनच इंग्रजी तयारी करून घेतायत म्हणजे खरच कौतुकास्पद आहे. पण बाकी ठिकाणच्या मराठी शाळा आणि त्यातले शिक्षक, दर्जा राहिला आहे का.
च्रप्स, लेखकाचा काय मुद्दा
च्रप्स, लेखकाचा काय मुद्दा आहे? दर्जाचा की माध्यमाचा? माझ्या निरिक्षणानुसार इंग्रजी शाळांचाही दर्जा सुमार आहे.
माध्यमाचाच असेल तर इंग्रजीतून अभियांत्रिकी शिकणारे ७० टक्के नोकरी करण्यालायक का नसतात याचेही उत्तर मिळायला हवे, जसे लेखक महोदय मराठी माध्यमवाल्या सीईओंची, हायअर्नर्सची नावे शोधतायत, तसेच इंग्रजीतून बालवाडीपासून शिकलेल्या आणि सीईओ-हायअर्नर बनू न शकलेल्यांचीही यादी शोधली पाहिजे, त्यामागची कारणेही.
माझा मुद्दा स्पष्ट करतो.
१. माध्यम मातृभाषा किंवा परिसरभाषा असावी आणि दर्जा सर्वोत्तम असावा.
२. केवळ माध्यम उपयोगाचे नाही किंवा केवळ दर्जाही उपयोगाचा नाही.
३. घरात किंवा संपर्कात असणारे जी भाषा प्रामुख्याने बोलतात, बोलू शकतात त्यातून प्राथमिक शालेय शिक्षण व्हावे.
४. उच्चशिक्षणासाठी मातृभाषाच असावी अशी कोणतीही मागणी नाही.
आणि कृपया माझ्या मतांमुळे
आणि कृपया माझ्या मतांमुळे कोणी ऑफेन्ड होऊ नका.... ही नम्र विनंती.
<<
ओ नाना,
ते ऑफेंड माझ्यामुळे व्हायला झालं होतं त्यांना.
एस्सेसी बोर्ड कसं टिकवावं हा प्रश्नच सरकारला पडलाय, कारण सोसायटीतली ९०% मुलं सीबीएस्सी अन आयसीएसी मधे जातात असे त्यांचे विधान होते. सोबतच मराठी डाऊनमारकेट होत चाल्लीय की काही तरी.
आता हा निष्कर्ष काढताना समोर सोसायटीतली ९०% मुलं अन मग डायरेक्ट महाराष्ट्र सरकार होतं, म्हणून मी सँपल साईजबद्दल बोल्लो. त्याचं त्यांना वाईट वाटलं.
ते वाटणारच, कारण इतिहास कुणाला चुकत नाही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आरारा , तुम्हाला स्वतःबद्दल
आरारा , तुम्हाला स्वतःबद्दल किती गैरसमज आहेत . कठीण आहे तुमच .
कॅरी ऑन
नाना, पोस्ट चांगल्या आहेत .
नाना, पोस्ट चांगल्या आहेत .
विचार करतेय त्यावर .
गुड सँपल साईझ सर्वे. >>>>> मी
गुड सँपल साईझ सर्वे. >>>>> मी सॅम्पल साइज काढला हा शोध (?) लावला त्याबद्दल अभिनंदन .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकी चालू देत .
<<
अॅडमिन कृपेने हे अनएडिटेबल झालेलं आहे. तेव्हा समज गैरसमज काय ते सूज्ञ वाचक ठरवतीलच.
तेव्हा, इंग्रजीत कॅरी ऑन, अन मराठीत चालू देतो.
(No subject)
नाना तुमची लेटेस्ट पोस्ट
नाना तुमची लेटेस्ट पोस्ट वाचून पटली..
अनुमोदन आहे तुमच्या मुद्द्यांना !
च्रप्र्स, आभारी आहे.
च्रप्र्स, आभारी आहे.
नानाकळा ... >> नाशिकची
नानाकळा ... >> नाशिकची असेल तर कृपया शाळेचं नाव, पत्ता कळेल का ?
माझ्या मुलीसाठी मी अशी शाळा शोधतोय
नाशिकचीच. आनंदनिकेतन शाळा,
नाशिकचीच. आनंदनिकेतन शाळा, नाईस वजनकाट्याजवळ, कामगार नगर, सातपूर, नाशिक.
http://www.anandniketan.ac.in/
खूप आभारी आहे लवकरच भेट देतो
खूप आभारी आहे
लवकरच भेट देतो ह्या शाळेला
https://www.facebook.com
https://www.facebook.com/chandrashekhar.gokhale.7/posts/1763940920309017
ओह, हा धागा आज दिसला आणि
ओह, हा धागा आज दिसला आणि एकटाकी वाचून टाकला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>इतर भाषांतले ज्ञान आपल्या भाषेत आणून ते वाटायची तळमळ हवी असते. आणि आपल्या भाषेत आणणे म्हणजे शब्दार्थ, अनुवाद करणे नव्हे. मॅग्नेटिक ला चुंबकिय, अॅटम ला अणू म्हणायचं का असे खिल्लीबाजी करणारे लोक असतील तर त्यांना ज्ञान म्हणजे काय हे तरी कितपत कळते ह्याची शंका आहे.
वर बोल्ड केलेले वाक्य अतिशयच महत्वाचे आहे. जपानसारख्या देशात कोणतेही महत्वाचे ज्ञान त्यांच्या भाषेत जास्तीत जास्त उपलब्ध केले जाते. मी संगणक क्षेत्रात अशी अनेक पुस्तके पाहिली आहेत, नविन तंत्रज्ञान आले की पुढील काही दिवसांत त्याची जपानी पुस्तके बाजारात आलेली असतात.
नानाकळा यांच्याशी कोटीशः सहमत, लोकांना मुद्दाच कळत नाही. इंग्रजी ही इतर भाषांसारखी एक भाषा आहे, शिकून घेऊन नोकरी धंद्यासाठी उपयोग करणे ठीक आहे, पण माध्यम म्हणुन डोक्यावर बसवून घेऊन, आपल्या भाषा, साहित्य आणि संस्कारांची वाट का लावायची ?
लेखाशी पूर्णपणे सहमत
लेखाशी पूर्णपणे सहमत
>>लेखाशी पूर्णपणे सहमत
>>लेखाशी पूर्णपणे सहमत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कोणत्या ? मुळ लेखाशी सहमत ? बापरे
Pages