जेन्टस रुमाल घ्यायचा आहे .. (ब्रांडेड)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2014 - 14:26

यंदा दिवाळीचा बोनस सर्व काही करून सवरून शिल्लक राहिल्याने आता जरा स्वत:च्या छोट्यामोठ्या हौसमौजेवर खर्चा करायचे ठरवले आहे. सुरुवात माझ्यासाठी मूलभूत गरजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या रुमालानेच करूया म्हटले. आजवर रस्त्यावरच सस्त्या मध्ये रुमाल घेत आलो, पण यापुढे चांगल्याचुंगल्या ब्रांडचाच वापरायचे ठरवल्याने हा धागा.

सुरुवातीला थोडाफार माझा रुमालाचा वापर सांगतो - मला सर्दीचा तूफान त्रास असल्याने मी कुठेही जाताना खिश्यात दोन रुमाल ठेवतो. अर्थात, दोन्ही वेगवेगळ्या खिशात. एक नेहमीचा हात-तोंड पुसायला, तर दुसरा गळणारे नाक साफ करायला. संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर दोन्ही रुमाल एकत्रच वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकतो. त्यामुळे पुढच्या वेळी तोंड पुसायच्या रुमालाने सर्दीचा समाचार घेणे आणि व्हायसे वर्सा होण्याची शक्यता असल्याने, दोन्ही रुमाल भेदभाव न करता एकाच क्वालिटीचे वापरतो. तसे पाहता नाक गळायचा त्रास माझा लहानपणापासूनचा आहे. तेव्हा टेलरच्या दुकानातील चिंध्या गोळा करून त्या धुवुन सुकवून स्वच्छ करून वापरायचो. पण आता एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागल्याने ते बरोबर दिसत नाही.

मी इथे धागा काढायच्या आधी माझ्या वतीने ईंटरनेटवर शोध घेतला होता. मला किरकोळ वस्तू खरेदी संदर्भात "जॉकी" नामक एकच ब्रांड माहीत असल्याने तिथेच शोधले. पण तिथे रुमाल वगळता इतर सर्व सटरफटर वस्तू सापडल्या. (त्यातही रुमालाला ईंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहीत नसल्याने तो शोध त्रासदायकच झाला)

असो, माझ्या इच्छा आणि अपेक्षा खालीलप्रमाणे,

१) बजेट - १७५ रुपये अर्धा डझन किंवा २७५ रुपये पुर्ण डझन.

२) रंग - प्रत्येकाचा ठसठशीतपणे वेगळा. तसेच त्यात पांढर्‍या भागाचे प्रमाण कमीत कमी जेणेकरून त्याची मळखाऊ वृत्ती वाढीस लागेल.

३) कापड - पाणी शोषून घ्यायची क्षमता जास्त असणारे आणि लवकरात लवकर सुकणारे. (मुसळधार सर्दीच्या वेळी हा गुणधर्म उपयोगी पडतो.)

४) साईज - उन्हापावसापासून संरक्षण करायची वेळ आल्यास डोक्याला गुंडाळून पाठीमागे व्यवस्थित गाठ मारता आली पाहिजे ईतपत मोठा.
तसेच त्याचवेळी मोबाईल पावसापासून वाचावायला त्यालाही दुसर्‍या रुमालामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवता आले पाहिजे. (माझा मोबाईल - सॅमसंग गॅलक्सी ग्रॅंड आहे)

५) छापाकाटा नको - दोन्ही बाजूंनी एकसारखाच हवा. घाईगडबडीत कुठल्याही बाजूने घडी घातली तरी चालून जावे.

६) भडक रंगांना जास्त प्राधान्य - रोजच्या ट्रेनप्रवासात खिडकीतून रुमाल टाकत जागा पकडताना त्याच प्रयत्नात असलेल्या इतर सहप्रवाश्यांना उठून दिसायला हवा. नाहीतर मागाहून लफडे होतात.

तर, आपण कुठल्या ब्रांडचे रुमाल वापरतात आणि आपले अनुभव काय आहेत हे जाणून घेणेही माझ्यासाठी उपयुक्त ठरेल.

थॅन्क्स इन्ह अ‍ॅडव्हान्स,
आपलाच ऋ ... (माल)

या धाग्यावर आधारीत हा धागाही नक्की वाचाल,
http://www.maayboli.com/node/51604
Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता अभिदादा बोल्लाच आहेस तर दुसराही वाच. खरे तर या धाग्याचे सार तेच आहे. >>> Uhoh
'अभिदादा' बोलण्याचा न् दुसरा भाग वाचण्याचा काय संबंध बरं ?? मैं कुछ समझा नहीं! पण असो तो धागाही मस्त आहे. (फक्त अजून पुर्ण वाचला नाही... फक्त शिर्षक वाचलंय.. Lol )

Pages