१ वाटी मूग डाळ,
१/२ कप खवा,
३/४ कप गरम दूध,
३/४ - १ कप गरम पाणी,
३/४ वाटी साजूक तूप,
३/४ वाटी साखर,
१/२ टिस्पून वेलची पूड,
५-६ बदाम,
१) मूग डाळ मंद आचेवर गुलाबी-लालसर रंग येईपर्यंत भाजावी. डाळ एकसारखी भाजली गेली पाहिजे.
२) डाळ कोमट झाली की मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी.
३) खवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
४)आता कढईत तूप गरम करून भरडलेली मुगडाळ त्यात परतून घ्यावी. केशरी रंग येईपर्यंत परतावे.
५)नंतर गरम दूध थोडे थोडे घालून परतावे व मंद आचेवर वाफ काढावी.
६) नंतर गरम पाण्याचा हबका मारून परतत राहावे. डाळीचा रवा पूर्ण शिजेपर्यंत वाफ काढावी.
७) डाळीचा राव फुलून आला की त्यात खवा, साखर आणि वेलचीपूड घालावी.सर्व नीट मिक्स करून एक वाफ काढावी
८) गरमागरम हलवा बदामाचे काप किंवा किस घालून सर्व्ह करा.
आपल्या आवडीप्रमाणे शिरा बनवतानाच काजू,बदाम,मनुके इत्यादी घालू शकता.
मस्त. नक्की करुन बघेन.
मस्त. नक्की करुन बघेन.
एक प्रश्न डाळ धुऊन भाजायची की
एक प्रश्न डाळ धुऊन भाजायची की कोरडीच
कोरडीच भाजायची डाळ. धुवायची
कोरडीच भाजायची डाळ. धुवायची गरज नाही.
मुगाचा हलवा आवडतो. करून
मुगाचा हलवा आवडतो. करून बघायला पाहिजे.
मस्त दिसतोय हलवा . रेसिपी
मस्त दिसतोय हलवा . रेसिपी साठी धन्यवाद !
मस्तच! फोटोही सुरेख( फक्त ओल
मस्तच! फोटोही सुरेख( फक्त ओल खोबर सजावटित वापरल ते नाही आवडल)
ओलं खोबर नाही ते, बदाम खिसून
ओलं खोबर नाही ते, बदाम खिसून वापरला आहे.☺️
बर बर !
बर बर !
मस्तच.
मस्तच.
रंग खूप छान आलाय, रेसिपी फार
रंग खूप छान आलाय, रेसिपी फार गुंतागुंतीची वाटत नाहीये, नक्की करून बघेन. पेशल धन्यवाद फोटो साठी.
मस्त रेसिपी सोपी वाटतेय. एकदा
मस्त रेसिपी सोपी वाटतेय. एकदा एका मैत्रीणीने केला होता आणि म्हटली हात खूप दुखतोय एक तास परतत होते मिश्रण. तुम्हाला किती वेळ लागला?
अंजली_१२, तुमच्या मैत्रिणीनं
अंजली_१२, तुमच्या मैत्रिणीनं डाळ भिजवून, वाटून त्याचा हलवा केला असणार. वाटलेली ओलीगिच्च डाळ छान कोरडी खमंग होइपर्यंत परतावी लागते त्या पद्धतीनं केला तर. हात भरून येतोच.
मला पाऊण तास लागला. डाळ
मला पाऊण तास लागला. डाळ भिजवून हलवा केला तर जास्त वेळ लागतो.
ओके. थॅ़क्स
ओके. थॅ़क्स
छान दिसतोय.
छान दिसतोय.
माझ्याच्याने हा जास्त खाल्ला जात नाही, पण चमचाभर प्रसादासारखा हातावर घेऊन खायला आवडतो
छान दिसतोय.
छान दिसतोय.
माझ्याच्याने हा जास्त खाल्ला जात नाही, पण चमचाभर प्रसादासारखा हातावर घेऊन खायला आवडतो >>> सेम हिअर
मस्तं आहे फोटो !
मस्तं आहे फोटो !
माझ्याच्याने हा जास्त खाल्ला
माझ्याच्याने हा जास्त खाल्ला जात नाही, पण चमचाभर प्रसादासारखा हातावर घेऊन खायला आवडतो>>.+१
मस्त आहे रेसीपी. फार आवडतो.
मस्त आहे रेसीपी. फार आवडतो.
मस्त! मीपण डाळ भिजवूनच करते.
मस्त! मीपण डाळ भिजवूनच करते. लागतो छान, पण हात भरून येतात. असा आता करून बघते.
मस्त आहे रेसिपी. तोंपासु .
मस्त आहे रेसिपी. तोंपासु .
डाळ भिजवून आणि ह्या पध्धतीने
डाळ भिजवून आणि ह्या पध्धतीने
सारखीच चव लागते का? डाळ भिजवून केला की तूप बरेच घालावे लागते... ह्या मध्ये तूप कमी लागते का? माझी मामी डाळ कूकर च्या डब्या मध्ये उकडून घे ऊ न करते , पण मला आठवत नाही चव कशी होते ते आता..
वाह, सुरेख.
वाह, सुरेख.
खवा आणावा लागेल. नाही टाकला
खवा आणावा लागेल. नाही टाकला तर....?
आणुन टाकायचाच असेल तर आणायचाच
आणुन टाकायचाच असेल तर आणायचाच का??
मस्तच।।।मी खूप दिवस शोधत ही
मस्तच।।।मी खूप दिवस शोधत ही पा कृ।।।
धन्यवाद।।।
वा! माझा फार आवडता पदार्थ आहे
वा! माझा फार आवडता पदार्थ आहे. मी निमित्तच शोधत असतो हा हलवा करण्यासाठी. पण फार हेवी आहे हा पदार्थ.
राग नसावा, पण 'मिक्स' ह्या
राग नसावा, पण 'मिक्स' ह्या शब्दा ऐवजी 'मिसळणे' हा शब्द वापरता येइल!!
मिक्स करा किंवा मिसळा पण
मिक्स करा किंवा मिसळा पण काहीही वापरलं तरीही शेवटी हलवाच होणार ना।।।
छान आहे रेसिपी. पण खवा नाही
छान आहे रेसिपी. पण खवा नाही घातला तर चालेल का किंवा कसा होईल?
Pages