१ वाटी उडीद डाळ
२ वाट्या किन्वा
२ वाट्या ओट्स
१/२ वाटी मसूर डाळ
१/२ वाटी छिलके वाली मूग डाळ
१/२ वाटी हरभरा डाळ
१ छोटा चमचा मेथी दाणे
कृती:
१) वरील सर्व साहित्य स्वच्छ धुवून भिजत टाकावे. (मी किन्वा नेहमी वेगळा ३-४ वेळा तरी धुवून घेते. किन्वा चा जो एक विशिष्ट वास असतो तो जातो मग )
२) ४/५ तास भिजवले तरी चालेल.
३) सर्व जिन्नस ग्राइंडर /मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणे.
४) वाटलेले पीठ एक ते दोन तास तसेच ठेवून देणे. (ह्या पिठाला फरमेंटेशन ची गरज नाही. वेळ असेल आणि हवामान जरा थंड असेल तर रात्रभर बाहेर ठेवले तरी चालेल पण गरज नाही)
५) गरजेप्रमाणे मीठ घालणे.
६) नॉनस्टिक तव्यावर नेहमीसारखे डोसे घालणे. कडेने तेल/साजूक तूप/ बटर सोडणे. सांबार,चटणी , बटाटा भाजी बरोबर खायला देणे.
६) मस्त चवीचे , हेल्दी डोसे तयार.
१) ह्या डोश्यांमध्ये कोणताच तांदूळ वापरला नाहीये.
२) डोसा खाताना ह्या मध्ये एवढा किन्वा , ओट्स आहेत ते जाणवत पण नाही.
३) फरमेंटेशन ची पण गरज नाही त्यामुळे पटकन होतात.
४) हे पीठ वापरून उत्तपे पण करता येतात. तव्यावर घातल्यावर डोशासारखे न पसरवता वरून कांदा , टोमॅटो, मिरची, कोथिंबीर , चाट मसाला आवडीप्रमाणे घालून उत्तपे करू शकता.
(No subject)
धन्यवाद... एकदम हेलथी आयटम
धन्यवाद... एकदम हेलथी आयटम आहे.. नक्कीच ट्राय करनार...
एकदम हेल्थी आणि पोट भरीचा
एकदम हेल्थी आणि पोट भरीचा प्रकार दिसतो आहे. वीकेंड ब्रेकफास्टला मस्त.
च्रप्स , मेधा : नक्की करून
च्रप्स , मेधा : नक्की करून बघा आणि कळवा.
मी ह्या विकेंड ला केले होते परत.
दिसताहेत एकदम मस्त!
दिसताहेत एकदम मस्त!
हे किन्वा कुठे मिळेल?
हे किन्वा कुठे मिळेल?
कृष्णाजी, सुपरमार्केट मधे
कृष्णाजी, सुपरमार्केट मधे मिळातंय की?
मस्तच दिसताहेत. रंग काय
मस्तच दिसताहेत. रंग काय सुंदर आलाय.
कृष्णा: "गोदरेज नेचर्स
कृष्णा: "गोदरेज नेचर्स बास्केट" मध्ये किन्वा मिळतो असं ऐकलंय पण नक्की माहित नाही मला.
किन्वा नाही मिळाला तर ब्राउन राईस वापरून बघा. नाहीतर मग व्हाईट राईस आहेच. (ब्राउन राईस असेल तर तो अगदी बारीक वाटला जाणारा मिक्सर/ग्राइंडर पाहिजे)
मस्त डोसे होतात या रेसिपीने.
मस्त डोसे होतात या रेसिपीने. आधी मी डोसा बॅटर करताना ब्राऊन राईस वापरायचे, पण आता या प्रकारे किन्वा वापरून करते.
दिलेल्या प्रमाणात पर्फेक्ट डोसे झाले, डोशाची चव पण छान आवडली
अरे वा. मस्तच दिसत आहेत डोसे
अरे वा. मस्तच दिसत आहे डोसा .