सरकार म्हणजे भारत सरकार समजून ईथे चर्चा अपेक्षित आहे. ती देखील लोकशाही मार्गाने.
गेले काही काळ जो मसाला डोसा मी ६५ रुपयांना फक्त खात होतो तो मी जीएसटी पश्चात 80 रुपयांना खात आहे.
हेच माझ्या सर्व हॉटेलिंगला लागू. त्यामुळे माझा महिन्याभराचा फक्त खाण्यापुरताचा खर्च बराच वाढला आहे. कारण मी बरेच बाहेरचे खातो. एकूणच ईतरही गोष्टी महाग होत महिन्याअखेरीस सेविंग कमी कमी होऊ लागल्याने अवघड होऊ लागलेय. अश्यात यंदा आमच्या क्षेत्राला रिसेशनचा फटका बसल्याने आमचे ईंक्रीमेण्टच झाले नाही. थोडक्यात दोन वर्षे पगार तेवढाच मात्र वाढत्या महागाईने खर्चाचा कॉलम वाढतच चाललाय. अश्यातच जेव्हा बाहेरचे खाणे कमी करूया म्हणत खर्चाला आवर घालायचा विचार केला तेच घरगुती गॅसही महाग झाल्याची बातमी कानावर आदळली. ते देखील तब्बल पाऊणशे रुपयांनी. खिसा तर आधीच फाटला होता. आता तर कानही फाटला. कधी कांदे महाग, तर कधी टमाटर महाग, तूरडाळने तर सारे विक्रम तोडून झालेत.
व्हॉटसपवर अश्यात आणखी एक पोस्ट कम बातमी कानावर आली. जे येत्या काळातही महागाई आटोक्यात येण्याची आशा हरवून बसलो.
वाचा -
_______________________
तीन वर्षातल्या सगळ्यात जास्त महाग दराने सध्या पेट्रोल मिळायला लागलय.
उकळत्या पाण्यात बसलेल्या बेडकानो, रोज पन्नास पैसे, रुपया करून पेट्रोल चे भाव वाढवून राहिलेत सरकार आणि तेल कंपन्या.
क्रुडऑइलच्या भावाचा न किरकोळ विक्रीच्या पेट्रोलच्या रेटचा काय ताळमेळ आहे का?
महाराष्ट्र सरकारला इंधन अधिभाराचे ,दुष्काळी सेस चे पैसे मिळतात त्याच पुढ काय होतय ?
पेट्रोल डिझेल जीएसटी च्या बाहेर आहे हे लक्षात आहे ना?
______________________
साधारण वर्षभरापूर्वी जेव्हा नोटाबंदी झाली होती तेव्हा सर्वात पहिले काळा पैश्याला बूच लागला म्हणून अत्यानंदाने आरडाओरडा करत ईथे पहिला धागा मीच काढल होता. नंतर चर्चेतून समजले की एवढेही खुश व्हायची गरज नाही, आधी अपेक्षित परीणाम होताहेत का बघूया. पण दहा महिने झाले आणि नोटाबंदी केवळ एक विनोदाचा विषय बनून राहिला आहे. हा लेटेस्ट विनोद ऐका -
मुंबईत जोरदार पाऊस पडला याला जबाबदार कोण?
नोटाबंदी!
ऑं कसे ??
तर पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा...
हसलात,
पण प्रत्यक्षात हसावे की रडावे हे कळत नाहीये.
पैसा नक्की कमावतोय कोण याची कल्पना नाही. पण पैसा मध्यमवर्गीयांच्या खिश्यातून पळतोय एवढे मात्र खरे. कोणावर जळायचे नाहीये की कोणाला दोष द्यायचा नाहीये. पण दोष द्यायचा झाल्यास ईतर कुठल्याही मध्यमवर्गीयाप्रमाणे मायबाप सरकारच्या नावाने चार खडे फोडायचा मोह मात्र टाळू शकत नाही. कारण देणाराही तोच आणि घेणाराही तोच.
मायबोलीवरची बहुतांश जनता राहणीमान आणि विचारसरणीवरून उच्व मध्यमवर्गीय वाटते. परदेशातील माबोकर तर यात मोजलेच नाहीत. पण एकूणच मध्यमवर्गीय आणि त्याखाली अशी जनता जेमतेमच असावी. त्यामुळे बरेच जणांना हा कांगावा वाटू शकतो.
झाले, भाव चार पैश्याने वाढले की लगेच याची खायची ददात सुरू झाली का.....
पण खरेच, आजच्या तारखेला पटकन माझा जॉब गेला तर ती वेळही दूर नाही.. या वयात आईवडीलांना सांभाळायचे सोडून त्यांच्यासमोरच हात पसरण्यात कसलाही स्वाभिमान नाही. मेहनत करायची तयारी आहे पण चार पैसे कमवून सुखासमाधानाने जगेन याची शाश्वती नाही. थोडा विचार केला तर ही टांगती तलवार तुमच्याही डोक्यावर असू शकते. आज नसेल तर उद्या येऊ शकते. त्या आधी ते बहुचर्चित अच्छे दिन येणे फार गरजेचे आहे.
हो, आम्ही या देशाच्या विकासासाठी या सरकारला मत दिले, स्वस्ताई येण्यासाठी नाही. पण त्याबदल्यात महागाई सुद्धा नकोय __/\__
कोण? कुठे? काय?काधी? का?
कोण? कुठे? काय? कधी? का?
गाचच सरकाराना मध्ये आणले आधी
गाचच सरकाराना मध्ये आणले आधी आणि बीजेपी आणि काँग्रेस भक्तांमध्ये जुंपली
>>>>>>
1) मी कितीही असे बोललो तरी महागाईचा म काढताच विषय राजकारणाकडे जाणारच होता.
2) हा धागा काढल्यावर मला कोणीतरी महागाईवर प्रश्न विचारला तेव्हा मला समजले की ती कश्याने वाढते हेच मला ठाऊक नाही.
3) महागाई वाढल्याचा दोष नेहमी सरकारलाच जातो हे लहानपणापासून बघत ऐकत आलोय. मग सरकार कोणाचेही असो.
4) जर मी चारपाच वर्षांपूर्वी माबोवर असतो आणि तेव्हा धागे काढले असते तर ते सारे तेव्हाच्या काँग्रेस सरकारविरोधात झाले असते आणि भाजप लोकांनी मला झोडपले असते. प्रत्यक्षात मला त्याच्याशी घेणेदेणे नाही. या चर्चेतून नव्या गोष्टी समजतील एवढीच अपेक्षा. कारण अपवाद वगळता जी लोकं एखाद्या राजकीय पक्षाचे समर्थक म्हणून सोशलसाईटवर बागडत असतात त्यांच्याकडे ज्ञानाचा आणि माहितीचा साठा प्रचंड असतो.
<< प्रत्यक्षात मला त्याच्याशी
<< प्रत्यक्षात मला त्याच्याशी घेणेदेणे नाही. >> मलाही नाही ! उगाचच काँग्रेस भक्त मला बीजेपी भक्त समजून राह्य्लेत मज्जा येते मग !
अर्थात वाचा. उत्तरे मिळतील. टोपी संभालो दिनकर राव!
मी आप ला वोट देणार आहे..
मी आप ला वोट देणार आहे.. मफलरवाला फॉर पी यम... कोण कोण देनार वोट?
मायबोलीवर बरेच खरेखुरे
मायबोलीवर बरेच खरेखुरे अर्थतज्ञ आहेत, ते या प्रश्नाचे उत्तर देतीलच.
पण काही सर्वेअर आहेत, ते USK मधे सर्वे करुन 'महागाई वाढ' हा निव्वळ काँग्रेजी लोकांनी केलेला कांगावा आहे, प्रत्यक्षात सगळे आलबेल आहे असा रीपोर्ट देखिल देतील. खरेखोटे जाणुन घेण्यात थोड वेळ जाईल, तोपर्यंत कळ काढा ऋन्मेषराव!
Pages