सरकार म्हणजे भारत सरकार समजून ईथे चर्चा अपेक्षित आहे. ती देखील लोकशाही मार्गाने.
गेले काही काळ जो मसाला डोसा मी ६५ रुपयांना फक्त खात होतो तो मी जीएसटी पश्चात 80 रुपयांना खात आहे.
हेच माझ्या सर्व हॉटेलिंगला लागू. त्यामुळे माझा महिन्याभराचा फक्त खाण्यापुरताचा खर्च बराच वाढला आहे. कारण मी बरेच बाहेरचे खातो. एकूणच ईतरही गोष्टी महाग होत महिन्याअखेरीस सेविंग कमी कमी होऊ लागल्याने अवघड होऊ लागलेय. अश्यात यंदा आमच्या क्षेत्राला रिसेशनचा फटका बसल्याने आमचे ईंक्रीमेण्टच झाले नाही. थोडक्यात दोन वर्षे पगार तेवढाच मात्र वाढत्या महागाईने खर्चाचा कॉलम वाढतच चाललाय. अश्यातच जेव्हा बाहेरचे खाणे कमी करूया म्हणत खर्चाला आवर घालायचा विचार केला तेच घरगुती गॅसही महाग झाल्याची बातमी कानावर आदळली. ते देखील तब्बल पाऊणशे रुपयांनी. खिसा तर आधीच फाटला होता. आता तर कानही फाटला. कधी कांदे महाग, तर कधी टमाटर महाग, तूरडाळने तर सारे विक्रम तोडून झालेत.
व्हॉटसपवर अश्यात आणखी एक पोस्ट कम बातमी कानावर आली. जे येत्या काळातही महागाई आटोक्यात येण्याची आशा हरवून बसलो.
वाचा -
_______________________
तीन वर्षातल्या सगळ्यात जास्त महाग दराने सध्या पेट्रोल मिळायला लागलय.
उकळत्या पाण्यात बसलेल्या बेडकानो, रोज पन्नास पैसे, रुपया करून पेट्रोल चे भाव वाढवून राहिलेत सरकार आणि तेल कंपन्या.
क्रुडऑइलच्या भावाचा न किरकोळ विक्रीच्या पेट्रोलच्या रेटचा काय ताळमेळ आहे का?
महाराष्ट्र सरकारला इंधन अधिभाराचे ,दुष्काळी सेस चे पैसे मिळतात त्याच पुढ काय होतय ?
पेट्रोल डिझेल जीएसटी च्या बाहेर आहे हे लक्षात आहे ना?
______________________
साधारण वर्षभरापूर्वी जेव्हा नोटाबंदी झाली होती तेव्हा सर्वात पहिले काळा पैश्याला बूच लागला म्हणून अत्यानंदाने आरडाओरडा करत ईथे पहिला धागा मीच काढल होता. नंतर चर्चेतून समजले की एवढेही खुश व्हायची गरज नाही, आधी अपेक्षित परीणाम होताहेत का बघूया. पण दहा महिने झाले आणि नोटाबंदी केवळ एक विनोदाचा विषय बनून राहिला आहे. हा लेटेस्ट विनोद ऐका -
मुंबईत जोरदार पाऊस पडला याला जबाबदार कोण?
नोटाबंदी!
ऑं कसे ??
तर पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा...
हसलात,
पण प्रत्यक्षात हसावे की रडावे हे कळत नाहीये.
पैसा नक्की कमावतोय कोण याची कल्पना नाही. पण पैसा मध्यमवर्गीयांच्या खिश्यातून पळतोय एवढे मात्र खरे. कोणावर जळायचे नाहीये की कोणाला दोष द्यायचा नाहीये. पण दोष द्यायचा झाल्यास ईतर कुठल्याही मध्यमवर्गीयाप्रमाणे मायबाप सरकारच्या नावाने चार खडे फोडायचा मोह मात्र टाळू शकत नाही. कारण देणाराही तोच आणि घेणाराही तोच.
मायबोलीवरची बहुतांश जनता राहणीमान आणि विचारसरणीवरून उच्व मध्यमवर्गीय वाटते. परदेशातील माबोकर तर यात मोजलेच नाहीत. पण एकूणच मध्यमवर्गीय आणि त्याखाली अशी जनता जेमतेमच असावी. त्यामुळे बरेच जणांना हा कांगावा वाटू शकतो.
झाले, भाव चार पैश्याने वाढले की लगेच याची खायची ददात सुरू झाली का.....
पण खरेच, आजच्या तारखेला पटकन माझा जॉब गेला तर ती वेळही दूर नाही.. या वयात आईवडीलांना सांभाळायचे सोडून त्यांच्यासमोरच हात पसरण्यात कसलाही स्वाभिमान नाही. मेहनत करायची तयारी आहे पण चार पैसे कमवून सुखासमाधानाने जगेन याची शाश्वती नाही. थोडा विचार केला तर ही टांगती तलवार तुमच्याही डोक्यावर असू शकते. आज नसेल तर उद्या येऊ शकते. त्या आधी ते बहुचर्चित अच्छे दिन येणे फार गरजेचे आहे.
हो, आम्ही या देशाच्या विकासासाठी या सरकारला मत दिले, स्वस्ताई येण्यासाठी नाही. पण त्याबदल्यात महागाई सुद्धा नकोय __/\__
बस हुई महंगाई की मार अब की
बस हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार
सरकार काय महागाई रोखण्याकरता
सरकार काय महागाई रोखण्याकरता आहे का?
तुम्ही पोरं पैदा करायची अन सरकारने त्यांच्या भल्याबुर्याची जबाबदारी स्वीकारायची?? किस खुशी मे? तुमच्या पोराबाळांना पोसायची, राखायची, शिकवायची अन एमेन्सीत नोकरीला लावायची किंवा अमेरिकेत पाठवायची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. (जी गेली ६० वर्षे "आम्ही" कोणत्याही काँग्रेजी सरकारच्या मदती/infrastructure/प्रयत्नांविना स्वतःच्या "लायकीवर" विदाऊट रिझर्वेशन निभावली आहे. )
इथे सरकार फक्त गायी, "भगव्या" वेषातले "साधू", प्रच्छन्न लाच खाणारे नवभाजपेयी गत काँग्रेस गावपुढारी, अडानी अंबानी, यांच्यासारख्यांच्या वेल्फेअर करता, अन मुसलमान, ख्रिश्चनांना दाबून मारण्यासाठी आहे.
तुम्हा टिनपॉट भारतीय नागरिकांची जर अशी इच्छा असेल की तुमच्यासाठी सरकारने काही करावं, तर तुम्ही मूर्ख आहात. तुमचा उपयोग फक्त टॅक्स देण्यासाठी, अन मार खाण्यासाठी आहे.
असले देशद्रोही धागे काढत जाऊ नका.
कुठले सरकार यशस्वी ठरलेय?
कुठले सरकार यशस्वी ठरलेय?
महागाई हे फक्त एक उदाहरण झाले
महागाई हे फक्त एक उदाहरण झाले. सरकार सगळ्याच बाबतीत.अपयशी ठरत आहे. गाय, गोठ्यातुन व काहि बाह्या संघ टनांच्या प्रभावातुन जोपर्यत सरकार बाहेर येत नाही. तो पर्यत देश हा पुराण काळातच जाणार.
उत्तर अर्थातच काँग्रेस आहे.
कोणते सरकार यशस्वी?
उत्तर अर्थातच काँग्रेस आहे.
इंग्रज गेले तेव्हा तुमच्या पुण्यामुंबईतल्या घरात तरी इलेक्ट्रिकचा दिवा २४ तास पेटत होता का? प्यायचं निर्जंतुक पाणी? रेशन? अणुतंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी, परम काँप्युटर्स होते का? सरकारी सब्सिडाइज्ड शाळा होत्या का? गावातल्या रस्त्यांवर डांबर होतं का? लसिकरण? दवाखाने? महाविद्यालये? आयायट्या? आयायेम्स? एम्स? भाक्रा नांगल? कोयनानगर? भारत हेवी इलेक्ट्रिकल्स? माझगांव डॉक्स? अँटार्क्टिक एक्स्पिडिशन? मंगळ यान? थोरियम प्रकल्प?
बोटं थकतील टाईप करून. पण भगवे डोळे उघडणार नाहीत.
<< उत्तर अर्थातच काँग्रेस आहे
<< उत्तर अर्थातच काँग्रेस आहे. >>
हे हे हे!
हेहेहे म्हंजे? तुम्हाला
हेहेहे म्हंजे? तुम्हाला संघसरकार वाटते की काय?
७३ रुपये तर वाढले उगाच का
७३ रुपये तर वाढले उगाच का ओरडत आहेत?
तिथे सियाचिनवर -७३ तापमानात जवान उभे राहतात आणि तुम्हाला ७३ रुपये वाढले की त्रास होतोय?
<< हेहेहे म्हंजे? तुम्हाला
<< हेहेहे म्हंजे? तुम्हाला संघसरकार वाटते की काय? >>
संघसरकार असते तरी ही हेहेहे च!
What's up forward
What's up forward
*पूर्वी लोक म्हणयाचे*
*भोगा कर्माची फळ*
*आता म्हणतात...*
*भोगा 'कमळा'ची फळ*
इंग्रज गेले तेव्हा तुमच्या
इंग्रज गेले तेव्हा तुमच्या पुण्यामुंबईतल्या घरात तरी इलेक्ट्रिकचा दिवा २४ तास पेटत होता का? प्यायचं निर्जंतुक पाणी? रेशन? अणुतंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी, परम काँप्युटर्स होते का? सरकारी सब्सिडाइज्ड शाळा होत्या का? गावातल्या रस्त्यांवर डांबर होतं का? लसिकरण? दवाखाने? महाविद्यालये? आयायट्या? आयायेम्स? एम्स? भाक्रा नांगल? कोयनानगर? भारत हेवी इलेक्ट्रिकल्स? माझगांव डॉक्स? अँटार्क्टिक एक्स्पिडिशन? मंगळ यान? थोरियम प्रकल्प?
बोटं थकतील टाईप करून. पण भगवे डोळे उघडणार नाहीत. >>>>
देशाची उभारणी करत असताना हे सगळं होणं अपेक्षितच होतं. बर्यापैकी ते प्रत्यक्षात उतरलंही असावं पण मग 'हे' सगळे कॉंग्रेसचे उपकार(??) समजून येणार्या पिढ्यांनी कॉंग्रेसलाच निवडून द्यावं असा काही रूल तर लोकशाहीत नाहीये ना!
दिर्घ काळ सत्ता भोगून कॉंग्रेसीजनांचे घरंदारं, सत्तास्थानं, बगलबच्चे वाढले जे सर्वसामान्य,गोर-गरीब जनतेला डोईजड वाटू लागले. खदखदणार्या असंतोषाचा उद्रेक चौदाला दिसला. मोदींचा आधार वाटला. ज्यांना मोदींची अडचण झालीय त्यांची तळपायाची आग मस्तकात जातेय, याला 'लोकशाही' काही करू शकत नाही.
<< ज्यांना मोदींची अडचण झालीय
<< ज्यांना मोदींची अडचण झालीय त्यांची तळपायाची आग मस्तकात जातेय, याला 'लोकशाही' काही करू शकत नाही.>
काँग्रेसी भक्तानी असाच प्रचार चालू ठेवला तर २०१९ मध्ये बीजेपी नक्की!
२००४ ला पण असाच उद्रेक होऊन
२००४ ला पण असाच उद्रेक होऊन भाजप्यांना हकलून लावलेले. ते ही अवघ्या ५ वर्षात हे विसरू नका राहूल.
तळपायाची आग मस्तकात जातेय,
तळपायाची आग मस्तकात जातेय, याला 'लोकशाही' काही करू शकत नाही.>
काँग्रेसी भक्तानी असाच प्रचार चालू ठेवला तर २०१९ मध्ये बीजेपी नक्की! )))))))
म्हणजे शेवटी देशाचच नुकसान.
इथे भांडणं वाचायला जाम मजा
इथे भांडणं वाचायला जाम मजा येते.
<< म्हणजे शेवटी देशाचच नुकसान
<< म्हणजे शेवटी देशाचच नुकसान.>>
काँग्रेस आली तरी नुकसानच!
हिच पोस्ट मी माझ्या
हिच पोस्ट मी माझ्या व्हॉटसपग्रूपवर पोस्ट केली असता एकाने मला विचारले,
महागाई का वाढते?
मी या विषयात अल्पबुद्धी. तरी तोडक्यामोडक्या भाषेत उत्तर दिले
"
उत्पादन क्षमतेचा अभाव हे एक कारण असू शकेल.
सरकारच्या गण्डलेल्या योजना हे कारण असू शकेल
बोकाळलेला भ्रष्टाचार हे कारण असू शकेल
राजा व्यापारी आणि प्रजा भिकारी हे एक कारण असू शकेल
आपले ज्ञान यात सामान्यच आहे.
"
बस्स, सगळे या उत्तरावर, म्हणजे माझ्यावर हसायला लागले.
नक्की काय उत्तर बरोबर आहे. ईथे कोणी जाणकार सोप्यात सोप्या भाषेत सांगेल का? महागाई का वाढते? नेमकी कश्याने वाढते?
<< नक्की काय उत्तर बरोबर आहे.
<< नक्की काय उत्तर बरोबर आहे. ईथे कोणी जाणकार सोप्यात सोप्या भाषेत सांगेल का? महागाई का वाढते? नेमकी कश्याने वाढते?>>
हां ! आत्ता बरोबर प्रश्न विचारला. उगाचच सरकाराना मध्ये आणले आधी आणि बीजेपी आणि काँग्रेस भक्तांमध्ये जुंपली
बिजेपी आणि देशभक्तांमध्ये.
बिजेपी आणि देशभक्तांमध्ये.
अच्युत गोडबोले लिखित 'अर्थात
अच्युत गोडबोले लिखित 'अर्थात' नावाचे पुस्तक वाचल्यास सर्व शंकांचे निरसन होईल.
<< बिजेपी आणि देशभक्तांमध्ये.
<< बिजेपी आणि देशभक्तांमध्ये.>>
हेहेहे!
भाजपाला देशभक्त म्हणने अपमान
भाजपाला देशभक्त म्हणने अपमान ठरेल.
नक्की काय उत्तर बरोबर आहे.
नक्की काय उत्तर बरोबर आहे. ईथे कोणी जाणकार सोप्यात सोप्या भाषेत सांगेल का? महागाई का वाढते? नेमकी कश्याने वाढते? >>+१११
हे जाणून घेण्यास उत्सुक
@sulu +१, हे बाकीय वाचायचं.
कोण हे गोडबोले? मोदींसारख
कोण हे गोडबोले? मोदींसारख गोड बोलुन धुंदीत तर नेत नाही ना?
<< कोण हे गोडबोले? मोदींसारख
<< कोण हे गोडबोले? मोदींसारख गोड बोलुन धुंदीत तर नेत नाही ना? >>
घोर अज्ञान! बीजेपी २०१९ ला नक्की येणार!
२००४ लक्षात ठेवा
२००४
लक्षात ठेवा
कोण हे गोडबोले? मोदींसारख गोड
कोण हे गोडबोले? मोदींसारख गोड बोलुन धुंदीत तर नेत नाही ना? >>
घोर अज्ञान! बीजेपी २०१९ ला नक्की येणार!))))) म्हणजे देशाचच नुकसान.
लूप
लूप
{
पगारे - बीजेपी आली म्हणजे देशाचेच नुकसान!
सुलु - काँग्रेस आली तरी देशाचेच नुकसान!
}
नवीन Submitted by sulu on 2
नवीन Submitted by sulu on 2 September, 2017 - 00:23
<< कोण हे गोडबोले? मोदींसारख गोड बोलुन धुंदीत तर नेत नाही ना? >>
घोर अज्ञान! बीजेपी २०१९ ला नक्की येणार! >>>
या धाग्याचं काही खरं नाही!
ऋ, 'अर्थात्' विकत आणा आणि समजून घ्या. अच्युत गोडबोलेंनी कुठलाही अवघड विषय खुप सोप्या शब्दांत समजावून सांगितलेला असतो.
कसे?
लूप
{
पगारे - बीजेपी आली म्हणजे देशाचेच नुकसान!
सुलु - काँग्रेस आली तरी देशाचेच नुकसान!))))))))
कसे?
Pages