![badamache pedhe](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/09/27/badamache%20pedhe.jpg)
१ कप बदाम
१ कप साखर (भारतात करत असाल तर पाऊण कपही पुरावी - इथली पुळण तुलनेत थोडीशी अगोड असते)
अर्धा कप दूध
केशर
चमचाभर तूप
बाकी सजावटीसाठी आवडीनुसार सुकामेवा / केशरकाड्या इ.
मी बदाम कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवले होते, इथल्या गार हवेत खराब होत नाहीत.
जर उष्ण हवामानात करत असाल तर अगदी कडकडीत पाण्यात तासभर भिजवून घ्या.
दूध गरम करून त्यात केशर खलून घ्या.
चांगले भिजले की बदाम काहीसे फुगून मऊ होतात आणि सालंही सहज निघून येतात.
मग सोललेले बदाम, साखर आणि दूध एकत्र करून ब्लेन्डरमधून छान बारीक वाटून घ्या. वाटताना लागल्यास चमचा-दोन चमचे दूध आणखी घालू शकता.
जाड बुडाच्या कढईत मंद ते मध्यम आचेवर अगदी चमचाभरच तूप घालून त्यावर बदामाचं मिश्रण घाला.
सतत ढवळत रहा.
आपण दूध फार घातलेलंच नसल्यामुळे मिश्रण आळायला लगेच सुरुवात होते.
मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरड्या व्हायला लागल्या की विस्तवावरून उतरवा आणि हाताला झेपेल इतपत गार होऊ द्या.
पेढ्यांऐवजी वड्या/कतली करायची असेल तर विस्तवावरून उतरवल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटली किंवा ट्रेमध्ये थापा आणि थंड झाल्यावर वड्या पाडा.
पेढ्यांसाठी थोडं गार झालं की मिश्रण चांगलं घोटून घ्या. मग हाताला पुसट तूप लावून घेऊन पेढे वळा.
पेढे वळताना वरून सुकामेवा/केशरकाड्या वगैरे लावा.
साखर चवीनुसार कमीजास्त करू शकता.
कुठल्याही वड्या करताना सुरुवातीला थोडी कमीच साखर घालावी आणि मिश्रण विस्तवावून उतरवल्यावरही किंचित ओलसर वाटलं तर पिठीसाखर मिसळून घोटावं, म्हणजे छान वड्या पडतात.
बदाम भिजवण्याचा वेळ ३० मिनिटांत अर्थातच धरलेला नाही.
मस्त व सोपी पाककृती!
मस्त व सोपी पाककृती! वड्यांसाठीची टीप एकदम सही . मी पिठीसाखर किंवा मिल्क पावडर घालून घोटते.
पेढे एकदम कातिल दिसत आहेत.
पेढे एकदम कातिल दिसत आहेत. सोपी आहे पद्धत, करेन लवकरच.
केशर खलून घातल्यानी पेढे
केशर खलून घातल्यानी पेढे सुरेख रंगावर आहेत. एकदम भारी!
असच पिस्त्यांच होईल का?
कातील दिसताहेत, पेढे!! यात
कातील दिसताहेत, पेढे!! यात साखरेऐवजी आगावे वगैरे वापरून स्पर्धेत सादर करायचं होतं ना!!
पेढे यम्मी दिसत आहेत. सोप्पी
पेढे यम्मी दिसत आहेत. सोप्पी पद्धत आहे .
ट्राय करून बघेन स्वाती .
ट्राय करून बघेन स्वाती . रेसिपी सोपी वाटत आहे.
सालासकट बदाम वापरून केली तर चालेल का ?
मस्त पेढे. आत्ता गणपतीत इकडे
मस्त पेढे. आत्ता गणपतीत इकडे तिकडे न्यायला बरे पडतील.
भन्नाट दिसताहेत. ताबडतोब
भन्नाट दिसताहेत. ताबडतोब बनवण्यात येतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आणि करायला सोपं. नककी
मस्त आणि करायला सोपं. नककी करून बघणार.
Mast!
Mast!
मस्तच दिसतायत
मस्तच दिसतायत
मस्त दिसताहेत.
मस्त दिसताहेत.
सोपी दिसत आहे रेसिपी आणि फोटो
सोपी दिसत आहे रेसिपी आणि फोटो मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्राय करून बघते. वर सुचवल्याप्रमाणे पिस्तेही चांगली आयडिया आहे.
धन्यवाद. पिस्ते / काजू किंवा
धन्यवाद. पिस्ते / काजू किंवा मिक्स मेव्याचेही याच रेसिपीने कतली/पेढे करता यायला हवेत.
)
एकावर एक थर देऊन तिरंगी/सॅन्डविच कतलीही करता येईल.
(करा आणि QAसाठी मला पाठवा.
क्रिशा, सालं ठेवली तरी बारीक वाटली गेली तर चालावीत, पण त्यांचा एक प्रकारचा वास येतो तो मला आवडत नाही. तुम्ही ट्राय करून सांगा कसे झाले ते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुपर्ब!!
सुपर्ब!!
खतरनाक दिसतायत पेढे! रेसिपी
खतरनाक दिसतायत पेढे! रेसिपी वाचायला सोपीच वाटतेय. करून पाहिल्यवर कळेल खरंच सोपी आहे की कसे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख दिसत आहेत पेढे. आता
सुरेख दिसत आहेत पेढे. आता प्रश्न![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याकडे कॉस्टकोचं आमंड मील आहे भरपूर. ते वापरून पण होइल ना? भिजवण्याचे स्टेप वगळता येइल आणि डायरेक्ट दुधसाखरेबरोबर ब्लेंडर वरून काढून गॅसवर असच मॉडिफाय करावं लागेल ना?
शूम्पी, पण वेळ लागेल ना बराच?
शूम्पी, पण वेळ लागेल ना बराच? आणि मग दुधाची गरज असेल का? तुझ्या कतल्या/पेढे डेअरी फ्री होतील![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दूध नाही घातलं तर मिश्रन ओलं
दूध नाही घातलं तर मिश्रन ओलं कसं होणार सशल?
ऊप्स! अति घाई ... मी मील च्या
ऊप्स! अति घाई ... मी मील च्या ऐवजी मिल्क वाचलं.
करून पहा आणि आम्हालाही सांगा.
करून पहा आणि आम्हालाही सांगा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जोक्स अपार्ट, तरीही मील थोडावेळ दुधात घालून ठेवावं असं वाटतंय मला - मऊ होऊन चांगलं मिळून येईल.
बदामाचं दूध आटवून त्याचे पेढे
बदामाचं दूध आटवून त्याचे पेढे? शूम्पीच्या धा वार्या होतील सलॉनला तेवढ्या वेळेत
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मस्तच. पेढा उचलून खावासा
मस्तच. पेढा उचलून खावासा वाटतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सशलने बहुतेक आमंड मिल्क असं वाचलंय, मील नाही.
सिंडरेला, स्वैपाकघरात नसते
सिंडरेला, स्वैपाकघरात नसते तेव्हा शूम्पी सलॉन मध्ये असते असं सुचवते आहेस का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नाही, ती स्वयंपाकघर आणि सलॉन
नाही, ती स्वयंपाकघर आणि सलॉन दोन्ही ठिकाणी एकदमच असते. अधिक माहितीसाठी म.ब. चाळा.
मस्त.
मस्त.
बदामाचं दूध आटवून त्याचे पेढे
बदामाचं दूध आटवून त्याचे पेढे? शूम्पीच्या धा वार्या होतील सलॉनला तेवढ्या वेळेत >>> LOL
अधिक माहितीसाठी म.ब. चाळा.
अधिक माहितीसाठी म.ब. चाळा.
>> नाही नाही, फिरनी वर जा. सिंडी चुकीचा पत्ता देते आहे.
हो हो फिरनी #म.ब
हो हो फिरनी
#म.ब.च्याप्रेमातआंधळी
सही दिसतायत आणि सोप्यापण.
सही दिसतायत आणि सोपे पण.
Pages