200 रुपयांची नवीन नोट बाजारात आली!

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 August, 2017 - 08:51

दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात !

500 आणि दोन हजारानंतर अखेर दोनशे रुपयांची नोटही बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. नव्हे कालपासूनच चलनात आली आहे. आपल्या खिश्यात पोहोचायला जरा वेळ लागेल.

या दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. नऊ महिन्यात चलनात येणारी ही दुसरी नवी नोट असेल. यापूर्वी नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी दोन हजाराची नोट आणण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर आज दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

100 रुपयानंतर थेट 500 आणि त्यानंतर थेट दोन हजाराची नोट, यामुळे या चलनात मोठी तफावत जाणवते. त्यामुळे दोनशे रुपयांची नोट आणली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

200 च्या नोटेची वैशिष्ट्ये:

1) नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो
2) नोटेवर स्वच्छ भारताचा लोगो
3) नोटेचा आकार 66 mm × 146 mm
4) अंधाना नोट ओळखता येणार
5) नोटेवर हिरव्या रंगात ‘RBI’, ‘भारत’, ‘India’ and ‘200’
6) नोटेचा रंग तेजस्वी पिवळा आहे.
7) तुर्तास एटीएममध्ये सुधारणा केल्याखेरीज यात उपलब्ध होणार नाहीत.

याच सोबत 50 रुपयांचीही नवी नोट येणार आहे.
50 रुपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळ्या रंगाची असेल. तसेच सध्या चलनात असलेल्या पन्नासच्या नोटा यापुढेही चलनात राहतील.

एखादी नवीन नोट बाजारात आली कि तिचे रंगरूप काय असेल हा सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय असतो. कोणी काहीही म्हणा, आपल्या मालकी हक्काच्या कोरया करकरीत नोटा बघण्यासारखे नेत्रसुख नाही जगात. मनालाही एक थंडावा मिळतो.
आणि म्हणूनच यानिमित्ताने मनात उमटलेले सामान्य प्रश्न -
एखादी नवीन नोट बाजारात येताना तिची डिजाईन कशी असावी हे कोण ठरवते आणि कश्याच्या आधारावर?
देशाच्या करन्सीवर स्थान पटकावने यासारखा सन्मान जगात दुसरा कुठला नसावा. मग ते व्यक्तीसाठी असो वा वस्तूसाठी वा एखाद्या योजनेसाठी.. व्यक्तींमध्ये हा मान वर्षानुवर्षे महात्मा गांधींनाच मिळतो आहे. यावरून वादही बरेचदा होतो. भारतात दुसरा कोणता महापुरुष त्या योग्यतेचा नाहीच का असा प्रश्न बरेचदा उचलला जातो. पण मला वाटते जर एखाद्या नवीन नोटेवर गांधीजींऐवजी दुसरया कोणाला स्थान दिले तर वाद उद्भवतील आणि ते संभाव्य वाद टाळायलाच दुसरा विचारही केला जात नसावा. अन्यथा एकदा का तसे केले तर आमच्या जाती धर्माचा महापुरुष नोटेवर का नाही याची आंदोलने सुरू होतील. अगदी सुपर्रस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांकडूनही तशी मागणी होऊ शकते किंवा परवाचा तो संत बाबा राम रहीम यांच्या भक्तांकडूनही आंदोलन पेटू शकते. त्यामुळे हा निर्णय पटतोच.

पण याऊपर ज्या चिन्हांना आणि योजनांना त्या नोटेवर स्थान दिले जाते ते कोण आणि कुठल्या निकषांच्या आधारे ठरवते? साधे नोटांचा रंग आणि डिजाईन कोणाच्या कल्पक बुद्धीतून निघतो आणि त्याला मान्यता द्यायचा अधिकार कोणाकडे असतो? कारण त्यात कधी काही मतभेद वा वाद झाल्याचे कानावर आले नाही याचेही एक आश्चर्य वाटते.

असो २०० च्या नोटेचे स्वागत ! खूप गरज होती..

-- कोणी तरी नोटेचा फोटो टाकल्यास आवडेल. मी आठवडाभर ताण्त्रिक कारणाने तसे करू शकत नाहीये.
धन्यवाद,

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेऽऽष, तुला कुठलाही विषय पुरतो का धागा काढायला?? >>> हो तर ,
आता चालु घडामोडी हा टॉपिक असतो त्यांच्या धाग्यांचा Lol

पण या धाग्यामुळेच कळलं मला या २०० च्या नोट बद्दल..लगेच फोटोपण पाहिला.. Happy

विक्षिप्त मुलग्या, मायबोलीवर गणपतीनिमित्त स्पर्धा-उपक्रमांच्या धाग्यांची रेलचेल झाल्याने नवीन लेख लिखाण कविता प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी होते. पण एखाद्या संकेतस्थळाच्या रक्तवाहिन्या आणि श्वासनलिका म्हणून जे ओळखले जाते त्या चालू घडामोडींबद्दल चर्चा घडणे कधीच थांबले नाही पाहिजे. तिथे गणपती झाल्यावर बघू असे आपण म्हणू शकत नाही.

असो, धाग्यावर विषयाला अनुसरून प्रत्येकाने आपली मते आणि विचार मांडल्यास आवडेल. काही नाही तर लोकांना माहिती तरी नक्की मिळेल. त्यासाठी लोकांनी नुसते व्हॉटसपवरच अवलंबून राहावे असे मला वाटत नाही.

मेघा फोटोबद्दल धन्यवाद!

..लगेच फोटोपण पाहिला.. >>>>
मेघा, तो फोटोतरी टाक येथे! ताण्तरीक कारणाने ऋने टाकला नाही... Lol

गांधींचा फोटो असण्याबद्दल काही हरकत नाही, ज्यांना गांधींबद्दल हरकत आहे त्यांनी नोटा वापरू नये, कॅशलेस व्यवहार करावेत!

नोटांचे डिजाईन आणि तंत्र कोण करतं, कुठे होतं हे सुरक्षेच्या कारणास्तव गुपित राहत असावं... कारण मला तरी कोणी 'हे आपल्या नोटांचे डिझाइनर' असे ओळख असलेले भेटलेले नाहीत.

बाकी नोटांची छपाई, नाशिक प्रेस ला होते, पासपोर्ट आणि पॅन कार्ड देखील इकडेच छापले जायचे, गेल्या काही महिन्यांत पॅनकार्ड छापणे दुसरीकडे गेलंय अशी माहिती आहे.

ताण्तरीक >>> Lol
तु वरच्या पोश्टी आधी पहा कि राहुल बाळा.. Happy

मला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली नोट, बाजारात आलेली पाहायची आहे किंव्हा श्री मोदी यांचा फोटो असलेली नोट बाजारात येत आहे अशी निदान बातमी तरी यायला हवी मग या बातमीवर देशातील पुरोगामी, उदारमतवादी, विचारवंत व निधर्मांध यांच्या प्रतिक्रिया काय असतील हे पाहायची फार इच्छा आहे.

तु वरच्या पोश्टी आधी पहा कि राहुल बाळा.. >>>
तु फोटो टाकत असताना मी ते टायपत होतो.. Sad Angry Lol

बायदवे, धाग्यात दारुगोळा कसा भरायचा याचे क्लास घ्याल का ऋ?? Lol

@ र।हुल, तू अजून शाळेत जातोस ना रे? (मागे तूच तुझ्या वि.पु. मध्ये तसे लिहिले होतेस). मग आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्यांना नावाने काय संबोधतोस? मेघाताई, ऋन्मेऽऽषदादा असे म्हटले पाहिजेस!

@ ऋन्मेऽऽष, मी तुला मस्करीत विचारले होते रे. असो. लेखातील शेवटच्या वाक्यातील 'ताण्त्रिक' हा शब्द चुकला असून तो 'तांत्रिक' असा पाहिजे. तेवढा एक बदल लगेच कर. रच्याक, एवढी कसली 'ताण्त्रिक' अडचण आहे? गणपतीसाठी गावी गेला आहेस का? (जिथे नेटचा वेग कमी असू शकतो)

साध्य काय होईल हे आत्ताच सांगणे कठिण आहे.
मात्र अश्या एकाद्या बातमीने अंगाची लाही-लाही होऊन, न्युज चॅनेलच्या डिबेट मध्ये, श्री मोदींच्या नावाने वचावचा बरळणारे पुरोगामी, उदारमतवादी, विचारवंत व निधर्मांध यांना पाहून फारच मनोरंजन होते.

अनिरुद्ध, प्लस सेव्हन एटी सिक्स. त्यातही ती नोट पाच हजाराची असेल तर आणखी मजा येईल. पाचशे प्रतिसाद कुठे जात नाहीत. तो धागाही मीच काढेल. पण या धाग्यात मोदी नको. यापुढे त्यांनी माझा एकही धागा हायजॅक केल्यास मी 2019 ला त्यांना मत देणार नाही Happy

@ र।हुल, तू अजून शाळेत जातोस ना रे? (मागे तूच तुझ्या वि.पु. मध्ये तसे लिहिले होतेस).
@विक्षिप्त मुलगा, आपण विपू व्यवस्थित वाचलेली नसावी. हरकत नाही, असो. माझा पुर्णविराम. Happy

विक्षिप्त मुलगा हो, आपली मस्करी समजलेली. पण धागाकर्ता या नात्याने मी प्रत्येक प्रतिसादाला प्रामाणिक उत्तर देणे माझे कर्तव्य समजतो ईतकेच.
बाकी आपला स्लो नेटचा अंदाज बरोबर. तेच तांत्रिक कारण आहे. हॅनग होणारा जुनाट मोबाईल आणि टू जी नेटवर्क. यावर मात करत मी ईथे धागे काढतो, आणि येणारया प्रतिसादांना जमेल तितकी उत्तरे देतो याबद्दल माझे कौतुक करू शकता Happy

या धाग्यात मोदी नको.यापुढे त्यांनी माझा एकही धागा हायजॅक केल्यास मी 2019 ला त्यांना मत देणार नाही >>>>> अय्या, मोदीपण माबोकर आहेत? Wink

मोदीने स्वतःचे कर्तृत्व सिध्द केले की येईल हो नोटेवर जशोदाचा पण लावू बोनस म्हणून

सध्या गाय गोबर गोमुत्रा यामुद्द्या तून बाहेरत काढा त्याला

Lol

ऋन्मेऽऽष, तुला कुठलाही विषय पुरतो का धागा काढायला??? >>>>

@ विक्षिप्त _मुलगा : तुम्ही माबो वर नवीन आहात काय ? Proud Proud

तुम्ही माबो वर नवीन आहात काय ?... इति भाग्यश्री१२३. उत्तर: हो. पूर्वी ७-८ वर्षांपूर्वी कधीतरी मायबोलीवर आलो होतो आणि कोणत्यातरी धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठी खाते उघडले होते. (कोणत्या ते आता आठवत नाही.) नंतर मायबोली पूर्णपणे विस्मृतीत गेली. (त्याबद्दल आता पश्चात्ताप होतो आहे, की इतकी वर्षे ही सगळी मजा 'miss' केली.) आता गेल्या १-२ महिन्यात परत सक्रीय झालो आहे!

@ र।हुल, sorry. तू माझ्या वि.पु. ला उत्तर दिलेले मी पहिलेच नव्हते. सध्यातरी मायबोली वर नवीनच आहे.

बायदवे,वि.मुला राहुलदादापेक्षा मी लहान है बघा...
अवांतराबद्दल क्षमस्व ऋ..

बायदवे,वि.मुला राहुलदादापेक्षा मी लहान है बघा... हा हा हा!!!
अवांतराबद्दल क्षमस्व ऋ.... तो इतरांच्या धाग्याला फाटे फोडतच असतो (असा काही मायबोलीकरांचा आरोप आहे, मी अजूनतरी अनुभव घेतला नाही) त्यामुळे आपण थोडेफार अवांतर केले तर हरकत नसावी. उलट तो जास्त खुश होत असेल त्याचा धागा सतत वर येत असल्याने!!!

गांधीछाप नोट नको असलेल्यानी पाकिस्तानात , नेपाळात जावे.....
मी जायला तयार आहे, फक्त एका अटीवर.
वरील विधान करणार्‍यांनी वा त्यांच्या समर्थकांनी स्वकमाईचे 55 कोटी (55 रुपये नव्हे) राष्ट्राला अर्पण करावेत!

Pages