Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 01:32
बाप्पा तुला आमच्यावर भरोसा नाय काय
बाप्प्पाला आवडती लाडू
वळायला तयार मंडळातले भिडू
लाडवांचा आकार कसा गोल गोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल
बाप्पाला आवडती एकवीस मोदक
साच्यातले दिसती भारी सुबक
मोदकांचे ताट कसे गोल गोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल
बाप्पाला आसन चंदनाचा पाट
आवडत्या नैवेद्याने भरून गेलंय ताट
मध्यावर आहे बासुंदीचा बोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल
तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.
नैवेद्याची प्रकाशचित्रं आणि खास आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
img src="http://drive.google
बाप्पा मोरया!!!
(No subject)
वा , प्रसाद आणि मोदक तयार
वा , प्रसाद आणि मोदक तयार झाले पण इतक्या लवकर !
मोदक आणि प्रसादाच ताट दोन्ही सुंदर !
ह्यावर्षीच नैवेद्या आला पण?
ह्यावर्षीच नैवेद्या आला पण? अरे वा!
मोदक आणि ताट दोन्ही मस्त
मोदक आणि ताट दोन्ही मस्त
सयोजकांची कविता पण मस्त.
बाकीचे नीट म्हणून काढलेले
बाकीचे नीट म्हणून काढलेले फोटो अपलोडच नाही झाले.
२१ मोदकांत १ सिद्धलाडू आहे. सिद्धलाडू म्हणजे गणपतीचं शुभासन मानतात. म्हणजे गणपतीच्या मांडीच्या पद्धतीचा घडवतात तो त्यामुळे २१ मोदक केले की एक तरी सिद्धलाडू आणि करंजी करतातच. सिद्धलाडू फक्त उकडीचा असतो. उकडीची नुसती वळकटी घ्यायची कडबोळ्यासाठी घेतात तशी, तळहातावर मोठी करून, आणि गाठ मारल्यासारखा पण मांडी वाटेल असा वळायचा.
प्रज्ञा मस्त केले आहेस मोदक.
प्रज्ञा मस्त केले आहेस मोदक. सिद्ध लाडू बद्दल प्रथमच वाचलं. करंजी करतात ते माहितेय.
आमच्याकडे बाप्पांच्या
आमच्याकडे बाप्पांच्या स्वागताला पुरणपोळ्या असतात.
प्र९ अग तुला शब्दखेळासठी
प्र९ अग तुला शब्दखेळासठी परफेक्ट शब्द होता सिद्धलाडू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मै मी बाकीचं काही वाचलंच
मै मी बाकीचं काही वाचलंच नाहिये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता वेळ मिळाला की एकेक वाचून मग खेळणार!
घाबरत घाबरत आले इथे, आणि
घाबरत घाबरत आले इथे, आणि व्हायचं तेच झालं! तोंपासू!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिद्धलाडूंबद्दल मला सासरी आल्यावर कळलं - त्यामुळे मला वाटायचं देशावरची पद्धत आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोदकांना बहीण म्हणून एकतरी करंजी (आणि उलटही) हे मात्र दोन्ही घरी करतात.
नैवैद्य बघून तोंपासू .मोदक
नैवैद्य बघून तोंपासू .मोदक एकदम टेम्टिंग .
संयोजक , सोनूची कविता भारी ! आशूडी असणार .
मनीमोहोर, धन्यवाद.
मनीमोहोर, धन्यवाद.
सिद्धलाडू कोकणातही सगळीकडे करत नाहीत. किंबहुना कोकणातल्याच अनेकांना सिद्धलाडू माहिती नाही हेही मी बघितलंय त्यामुळे हा प्रकार नक्की देशावरचा की कोकणातला काय ते नक्की समजायला मार्ग नाही! शिवाय सासर देशावरचं पण त्यांनाही सि ला माहिती नाही.
मोदक-करंजी बहीण भाऊ ही मात्र दोन्ही खरं आणि केलंही जातंच!
(No subject)
मस्तच देविका
मस्तच देविका
सुरेख सर्वांचा प्रसाद. बाप्पा
सुरेख सर्वांचा प्रसाद. बाप्पा मोरया.
सिध्दलाडूबद्द्ल पहील्यांदाच समजलं.
मोदक आणि निवगर्या.
मोदक आणि निवगर्या.
![modak.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u186/modak.JPG)
![nivagaRyaa.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u186/nivagaRyaa.JPG)
घरच्या छोट्या मास्टर शेफने
घरच्या छोट्या मास्टर शेफने केलेले उकडीचे गणेशमुख आणि चॉकोदकः
![chocodak.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u186/chocodak.jpg)
बदामाचे पेढे
बदामाचे पेढे
![badam_pedha.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u186/badam_pedha.jpg)
इच्छुकांसाठी रेसिपी इथे दिली आहे.
आज निवर्या( नेवरी) केल्या,
आज निवर्या( नेवरी) केल्या, आमच्या गोयंकरास आवडीच्या. काही पुरणाच्या तर काही सुका मेवाच्या
![IMG_1128.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4837/IMG_1128.JPG)
स्वाती मोदक पेढे मस्त दिसतायत
स्वाती मोदक पेढे मस्त दिसतायत .
मास्टर शेफ ची कलाकारी सुंदर.
देवीका मुरड काय दिसतेय !
IMG-20170827-WA0065.jpg (122
(No subject)
मातोश्रींच्या हातचे उकडीचे
मातोश्रींच्या हातचे उकडीचे मोदक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Modak_1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u221/Modak_1.jpg)
धन्यवाद मनीमोहोर.
धन्यवाद मनीमोहोर.
मंडळी, मायबोली गणेशोत्सव
मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१७ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!