नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही कृष्णाची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.
जय देव जय देव जय गोपाळा कृष्णा
तव गीतामृत पाने निवते भव तृष्णा || धृ ||
नीती न्याय दयादिक गुण जनी लोपोनि
अधर्म अन्यायाही त्रासली जब अवनी
दुष्टा निर्दालाया तव जगी अवतरुनि
सुष्टा रक्षियले त्वा सत्पक्षा धरुनी || १ ||
वेदोक्ता चरणी रत झाले जन सारे
उपनिषदांचे ज्ञानही वेगे विस्तारे
परी निज कर्तव्याते जन विसरुनी गेले
सकाम कर्मे करिता धर्मा अंतरले || २ ||
नाना पंथ मते हि नाना उद्भवली
कर्माकर्म विचारी मती मोहित झाली
अवतरलासी तेव्हा धर्माचा वाली
वाजविली मधुरध्वनी त्वा गीता मुरली || ३ ||
लाभली पुण्ये गीता तव दर्शन घडले
भ्रामक मोहाचेहि पाश पुरे तुटले
आत्मस्वरूप उमगुनि मन निश्चल झाले
ब्रह्मानंदी शिरता देहा विस्मरले || ४ ||
नरहर गोविंद मायदेव
७-१०-१९२६
१९२६ मधे???
१९२६ मधे???
छान आहे हि पण आरती.............
धन्यवाद मेघा .. हो १९२६ मधेच
धन्यवाद मेघा .. हो १९२६ मधेच लिहिली आहे