Submitted by सिंथेटिक जिनियस on 20 August, 2017 - 07:04
डीएसके हे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे मराठी नाव.पण सध्या वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आहे.
डीएसके यांनी त्यांच्या अनेक कंपणीज मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जातोय.मुद्दल तर सोडाच व्याजही परत न केल्याचा आरोप आहे.
हे नक्कि काय प्रकरण आहे?
गुंतवणुकदारांनी गुंतवणुक करताना काय काळजी घ्यावी?
प्रा.लि. कंपणीमध्ये गुंतवणुक करावी का?
एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच .
तरी जाणकारांनी डीएसके प्रकरणावर प्रकाश टाकावा व इतर प्रश्नावर मार्गदर्शन करावे.धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विडिओ वायरल झाला होता तो
विडिओ वायरल झाला होता तो पहिला होता.. नोटबंदी आणि रियल इस्टेट मध्ये आलेली मंडी, यामुळे फ्लेट्स रिकामे पडून आहेत, कॅश फ्लो नाहीय, त्यामुळे हे झालं असावं असं मला वाटते.
रेडिओवर ह्यांचे विविध
रेडिओवर ह्यांचे विविध क्षेत्रातील अनुभव, माहितीचे कार्यक्रम ऐकताना कधी शंकाही आली नव्हती की ही व्यक्ती अशी वागू शकेल. तीन एक महिन्यांपूर्वी व्हा. अॅपवर त्यांच्या ऑफिसमधील आर्थिक वादाचा व्हिडीओ बघितला होता तेव्हा धक्का बसला होता. आता ही बातमी खरी असेल तर काही खरं नाही.
आधीच मराठी माणूस धंद्यात उभा
आधीच मराठी माणूस धंद्यात उभा राहणे मुश्किल त्यात अश्या बातम्या कानी आल्या तर त्याच्यावर आणखी विपरीत परिणाम होणार.
या संकटातून बाहेर पडण्यासाठी डीएसके ना शुभेच्छा आणि त्यांच्या सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळो हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना.
जाजा : मानेबाई या डीएसकेंच्या बोर्डावर आहेत (किंवा होत्या) त्यांच्या कडे गुंतवणूकदारांना दाद मागता येईल काय?
डीएस्के वाल्यांनी अमेरिकेच्या
डीएस्के वाल्यांनी अमेरिकेच्या ट्रम्पचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले असावे. तो असाच वारंवार दिवाळे काढून गुंतवणूक करणार्यांना चुना लावून स्वतः अधिकाधिक श्रीमंत झाला असे गर्वाने सांगतो.
तो असाच वारंवार दिवाळे काढून
तो असाच वारंवार दिवाळे काढून गुंतवणूक करणार्यांना चुना लावून स्वतः अधिकाधिक श्रीमंत झाला असे गर्वाने सांगतो. >>>>
हे इंटरेस्टिंग आहे...
डिएसकेंची एकूण केस वरवर बघता ती सहारा गैरव्यवहार प्रकरणाच्या जातकुळीतली दिसते.
ड्रिम सिटी प्रोजेक्ट्समुळे दोन्ही समुह अडचणित आले असं ऐकलं गेलंय.
पैकी सहारा समुहाच्या गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ति मोठी होती.
डिएसकेंची व्याख्याने ऐकली/पाहिलेली आहेत. त्यांचा त्या त्यावेळी प्रभाव ही पडला होता. एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून त्यांच्याबद्दल आपुलकी अन् आदर वाटायचा/वाटतो.
ते ड्रिम सिटी प्रोजेक्टमुळे अडचणीत आलेत हे जर खरं असेल तर ड्रिम सिटी प्रोजेक्टचा त्यांचा निर्णय लहान तोंडी मोठा घास होता का?
कि बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे/सत्तांतरामुळे हा एक नावाजलेला मराठी ब्रैंड अडचणीत आला/आणला गेला असावा??
DSK बद्दल काही
DSK बद्दल काही
जाई, छान लिंक दिलींत!
जाई, छान लिंक दिलींत!
जाई, छान लिंक दिलींत!.......
जाई, छान लिंक दिलींत!.......+१.
घराला बेघर करणारी माणसं...
घराला बेघर करणारी माणसं...
मी थोडी वाट पाहील पुढील काळात
मी थोडी वाट पाहील पुढील काळात काय काय घटना घडतात आणी कसे संदर्भ येतात.
संदर्भात दिलेल्या 'लिंका' वाचल्यावर असे दिसते की त्या 'माहीती अधिकार' च्या वळणावरच्या आहेत. त्या बरोबर असतीलही.
ह्या 'माहीती अधिकार' चा वापर सगळेच चांगल्या उद्देशाने करतातच असे नाही; असे मला वाटते. काही काही तर ह्याचा दुरुपयोग ही करतात.
त्यामुळे काही काळ गेल्यानंतर कळेल थोडेफार!
कारण 'कंपन्यांच्या' संदर्भात 'सत्य' हे एक 'मिथक' आहे जे की असतं आणी नसतही.
फक्त गुंतवणुकदारांचे कुठेलेही नुकसान होउ नये ही प्रार्थना! बाकी 'गुंतवणूक' म्हटले की 'जोखिम' अपेक्षित आहे. कुणिही नुसत्या विश्वासावर 'दुसर्याला' पैसे देत नसावा. त्यात ज्याचा त्याच्या स्वार्थ असतोच.
बाकी 'गुंतवणूक' म्हटले की
बाकी 'गुंतवणूक' म्हटले की 'जोखिम' अपेक्षित आहे. कुणिही नुसत्या विश्वासावर 'दुसर्याला' पैसे देत नसावा. त्यात ज्याचा त्याच्या स्वार्थ असतोच.
>>>> सुरुवातीला 19% रेट आणि नंतर 14% पर्यंत यफ डी चे रेट्स दिले गेलेत, लोकांना शंका येत नव्हती का असले रेट्स मिळतायत, झोल असेल म्हणून?
>>
>>
डीएस्के वाल्यांनी अमेरिकेच्या ट्रम्पचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले असावे. तो असाच वारंवार दिवाळे काढून गुंतवणूक करणार्यांना चुना लावून स्वतः अधिकाधिक श्रीमंत झाला असे गर्वाने सांगतो.
<<
येनकेनप्रकारेण ट्रंपला दोष देणे हे काही लोकांचे इतिकर्तव्य बनलेले दिसते आहे. संताजी धनाजी मुगल सैन्याला सळो की पळो करुन सोडत होते तेव्हा घोडे पाणी पित नसेल तेव्हा पाण्यात संताजी धनाजी दिसतो आहे का असे मुगल सैन्याला विचारत असत.
ट्रंपला कायम पाण्यात पहाणार्यांना डी एस के च्या बनवाबनवीमागेही ट्रंप दिसतो आहे ह्यात आश्चर्य नाही.
काही दिवसापूर्वी उत्तर भारतात रेल्वे अपघात होऊन अनेक लोक मेले आणि अनेक जखमी झाले. त्याचाही दोष ट्रंपला देता आला तर पहा. झालेच तर नोटबंदी आणि गोरक्षकांच्या उच्छादालाही ट्रंपच कसा जबाबदार आहे हे ट्रंपद्वेष्टे दाखवू शकले तर दुधात साखर!
असो. डी एस के च्या उद्योगामुळे अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत. त्याबद्दल मला सहानुभूती आहे. कायदा व्यवस्था (ग्राहक न्यायालये इ.) दोषी मंडळींना पकडून नुकसान भरपाई द्यायला भाग पाडेल अशी आशा करु.
जाई यांनी दिलेल दुवा वाचून
जाई यांनी दिलेल दुवा वाचून कळते की ह्या कुळकर्णी महाशयांनी, जनतेच्या पैशाची प्रचंड अफरातफार करुन स्वत: व स्वत:च्या कुटूंबियांच्या तुंबड्या भरल्या आहेत व अधिक पैश्याच्या हव्यासापोटी आज त्यांच्यावर हि वेळ आली आहे. सहारा समुहाच्या सुब्रोतो राय यांनी गुंतवणुकदारांना जसा चूना लावला हा प्रकार देखील तसाच दिसतो.
नोटबंदीमुळे खड्ड्यात गेलेल्या
नोटबंदीमुळे खड्ड्यात गेलेल्या अनेक व्यावसायिकांपैकी हे एक आहेत.
हे एकटे नाही डुबणार, किंबहुना यांना काहीच तोषीस लागणार नाही, पण तुमच्यासारख्या सामान्यांना ज्यांनी यांच्याकडे पैसे गुंतवलेत त्यांना मात्र हे डुबवणार.
मल्यासारख्यांनी डबघाईला आणलेल्या, अन नोटबंदीने अधिक डुबवलेल्या बँकांपायी आपण निरनिराळे एक्स्ट्रा चार्जेस भरून बँकांची भरपाई करतोय की नाही? तसेच.
पण हे नोटबंदीमुळे झाले हे पब्लिकला कळले तर लोचा होईल, म्हणून भक्तगणंगांकडून डीएसके मुळातच कसे चोर होते, व डुबले तेच बरे झाले, अशा प्रकारचे वारे सोशल मेडियात तयार करण्यात येत आहे.
हा धागाच नोटबंदीचे फायदे सदरात हलवा म्हणजे बरोबर होईल
'डीएसके विश्व' सारख्या
'डीएसके विश्व' सारख्या कंपनींचा सर्व आर्थिक व्यवहार जर पारदर्शक असेल तर अशी कंपनी 'नोटबंदी' मुळे खड्ड्यात गेली, असे कोणाताही शुद्धीवर असणारा माणुस म्हणणार नाही. मग ह्या न्यायाने आज अनेक पब्लिक लिमिटेड कंपन्या खड्ड्यात जायला हव्या होत्या.
उलट वरिल लेखात म्हटल्याप्रमाणे DSK गोत्यात यायचे खरे कारण हेच आहे.
---
डीएसके स्वत: आणि इतर बरेचजण त्यांच्या अवस्थेचा दोष नोटबंदी, त्यांचा अपघात आणि त्यांचा अतीमहत्वाकांक्षी प्रकल्प ‘ डीएसके ड्रीम सीटी’ या प्रकल्पाला देतात. परंतू ते धादांत चूकीचे आहे!
डीसकेंवर ही वेळ आली ती त्यांनी त्यांच्या मूख्य व्यवसायातील पैसा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर बेकायदा वळवल्यामूळे, त्यांच्या कुटूंबाच्या विलासी वागणुकीमुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे ! पुढे जाण्यापूर्वी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. मूळ कंपनी डी. एस कुलकर्णी डेवलपर्स लिमिटेड ( डीएसकेडीएल) ही सेबीकडे नोंदणीकृत पब्लिक लिमिटेड कंपनी आहे.
या कंपनी व्यतिरिक्त डीएसकेच्या कुटुंबातील व्यक्तींनी इतर जवळपास ३० कंपन्या स्थापन केल्या.त्यातील काही कंपन्या या प्रायव्हेट लिमिटेड किंवा भागीदारी संस्था होत्या. या कंपन्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी नव्हती.
तरीही त्या स्विकारल्या आणि बुडवल्याही !
--
वर जाई यांनी दिलेल्या
वर जाई यांनी दिलेल्या लिंकमधील बातमी विश्वासार्ह मानली तर व्यवसाय करायला उत्सुक मराठी पोरांना द्यायला हे उदाहरण छान आहे.
आजवर मेहता, मल्ल्या, सुब्रतो वगैरे अमराठीच नावे ऐकत होतो. या पंक्तीत आपला एक कुलकर्णी सुद्धा बसू शकतो. पैसा कमवायला कालागांडी करणे हि गुजराती मारवाड्यांचीच मक्तेदारी नसून मराठी मुलांनी ठरवले तर ते देखील पैसा कमावू शकतात. आपण मराठी आहोत तर मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी यानेच धंदा केला पाहिजे, मराठी माणसाची अस्मिता टिकवली पाहिजे हे दडपण पोरांच्या खांद्यावरून उतरण्यास मदत होईल.
ट्रंम्पच्या नावाची इतकी
ट्रंम्पच्या नावाची मिर्ची झोंबली?
पैसे कमावण्यासाठी दिवाळखोरी जाहीर करणे हा मार्ग बर्याच जणांनी स्विकारला आहे.
इथे पण आपआपले अजेंडे घेऊन आले
इथे पण आपआपले अजेंडे घेऊन आले लोकं. चांगलं आहे.
मी ती लिंक वाचली .धागा विषयाला अनुरूप वाटली म्हणून दिली.त्यातलंच खरं माना असा काही आग्रह धरला नाही. त्यामुळे मला भक्त वगैरे संबोधण्याऱ्या लोकांना वाढदिवसाच्या आणि मोठे होण्याच्या शुभेच्छा .
https://vijaykumbhar-marathi
https://vijaykumbhar-marathi.blogspot.in/2017/08/Madhuri-Dixit-Conspirac...
--
https://drive.google.com/file/d/0BxcUeItRbeqLckxia3pPNFZvb2s/view
--
https://vijaykumbhar.blogspot.in/2017/08/DSKDL-Criminal-Enterprise-Inves...
--
मी DSK विश्व मध्ये flat बुक
मी DSK विश्व मध्ये flat बुक केला आहे,
प्रत्येक slab प्रमाणे पैसे हफ्त्या हफ्त्या ने घेतले जात होते.
शेवटचे पैसे मी ऑक्ट २०१६ ला दिले आहेत. (याचा अर्थ तो पर्यंत कामअपेक्षित गतीने चालू होते)
नोवेंबर मध्ये नोतबंदी जाहीर झाली आणी DSK चे काम थांबले, त्यांनी पुढे पैसे मागितले नाहीत.
हा फक्त योगायोग असेल असे निश्चीतच मानता येणार नाही,
ड्रीम सिटी, राजेशाही राहणी यामुळे DSK आधीच गाळात असतील, कदाचित २-३ वर्षात त्यांचे दिवाळे निघणार असेल,पण ते प्रोब्लेम अजून ब्लो अप करून हे दिवाळे वाजायची वेळ १ वर्षावर आणून ठेवण्यात notebandi ने हातभार लावला हे हि खरे आहे
दोष कोणाचा हे ठरवता येत
दोष कोणाचा हे ठरवता येत नाहीये.डी एस के सारख्या नावाबद्दल असे कधी न ऐकल्याने असेल.
डि एस के लवकर यातुन बाहेर यावे व गुंतवणूकदार सेफ रहावे ही शुभेच्छा.
बांधकाम व्यव्यसायाला निशलीकरण
बांधकाम व्यव्यसायाला निशलीकरण, रेरा आणि जिएस्टी या तिघांमुळे फटका बसला आहे
पुन्हा एकदा,
पुन्हा एकदा,
>>
पण हे नोटबंदीमुळे झाले हे पब्लिकला कळले तर लोचा होईल, म्हणून भक्तगणंगांकडून डीएसके मुळातच कसे चोर होते, व डुबले तेच बरे झाले, अशा प्रकारचे वारे सोशल मेडियात तयार करण्यात येत आहे.
<<
धन्यवाद!
मध्यंतरी कुठल्या तरी न्युझ
मध्यंतरी कुठल्या तरी न्युझ चॅनेलवर यांची मुलाखात लागली होती ..असं काही दिवाळखोरी ई. झालचं नाहिये लोकं अफवा पसरवतात ई. सांगत होते .. खरखोट माहित नाही.. लिंक सापडली तर टाकेन
{{{ नोटबंदीमुळे खड्ड्यात
{{{ नोटबंदीमुळे खड्ड्यात गेलेल्या अनेक व्यावसायिकांपैकी हे एक आहेत. }}}
नोटबंदीमुळे दोन नंबरचा धंदाच गोत्यात येईलना? जो एक नंबरने फायनल प्रॉडक्ट्सची विक्री आणि रॉ मटेरिअल्सची खरेदी देखील करतोय त्याला नोटबंदीमुळे नुकसान होण्याचे कारणच काय?
हा अत्यंत लॉजिकल प्रश्न आहे. आपणास हे असेच आहे याची खात्री असल्यास सोदाहरण स्पष्टीकरण द्यावे अन्यथा आपल्या या विधानास 'आपले वैयक्तिक मत' इतपतच महत्त्व देता येईल.
लोकहो,
लोकहो,
जे खरे आहे ते लिहित आहे कारण जवळच्या लोकांकडून कळलेले आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईहून येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व चालक मेला. डी एस के वाचले. ही बातमी सगळ्यांना कळल्यावर गुंतवणूकदारांमध्ये चिंता पसरली. डी एस के ह्यांना थेट वारसदार नाही. जावई वेगळा व्यवसाय केव्हाच करू लागले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने त्यांचे काही झाले तर पैश्यांचे काय होणार अशी सेंटिमेन्ट झाली व लोकांनी पैसे काढून घ्यायला सुरुवात केली. आतली बातमी आधीच लागल्यामुळे आम्ही आमचे पैसे अगदीच सुरुवातीला काढून घेतलेले होते. तेव्हाही आम्हाला एक महिना थांबायला लागले. आता अधिक थांबावे लागत आहे व भरवसाही नाही.
नोटबंदी वगैरेमुळे झाल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठलाही विषय कुठे न्यायचा हे ठरवलेल्यांचे प्रतिसाद फिल्टर करून बाकी वाचावे.
फडणीसही नोटबंदीमुळे गाळात
फडणीसही नोटबंदीमुळे गाळात गेले असंच मानायचं का? तरीही जकातदार आणि आगाशेंचे काय? आणि यापूर्वीही अनेक उद्योगपतींनी आपल्या गुंतवणूकदारांना चूना लावला आहेच. तेव्हा कुठे नोटाबंदी झाली होती?
नोवेंबर मध्ये नोतबंदी जाहीर
नोवेंबर मध्ये नोतबंदी जाहीर झाली आणी DSK चे काम थांबले, त्यांनी पुढे पैसे मागितले नाहीत.
हा फक्त योगायोग असेल असे निश्चीतच मानता येणार नाही,
Submitted by सिम्बा on 21 August, 2017 - 10:46
--
काही पण लॉजीक आहे.
म्हणजे डिएसके त्यांचे सर्व प्रोजेक्ट काळ्या पैशातून उभे करत होते, असे तुम्हाला सुचवायचे आहे काय ?
फ्लॅट विकत घेणार्यांचे पैसे
फ्लॅट विकत घेणार्यांचे/इन्व्हेस्ट करणार्यांचे पैसे ब्लॅकचे असले, तर खरी गडबड होते. खूप लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेतात.
अर्थात "आतल्या बातम्या" ठाउक असणार्यांनी पैसे आधीच काढले, हे बरोबरच आहे. नोटबंदीच्यावेळीही "आतल्या बातम्या" माहिती असणारे होतेच
बाकी मी खरी अंदरकी बात सांगितल्यावर फुल्ल फोर्समधे डॅमेज कंट्रोलसाठी भक्तगणंग हजर झालेले पाहून संतोष जाहला.
म्हणजे डिएसके त्यांचे सर्व
म्हणजे डिएसके त्यांचे सर्व प्रोजेक्ट काळ्या पैशातून उभे करत होते, असे तुम्हाला सुचवायचे आहे काय ?<<<<
प्रसाद, जाऊदेत. त्यांना काहीही माहीत नाही पण काय म्हणायचे आहे ते ठरवून ठेवलेले असल्यामुळे ते गोत्यात येतायत. सोडून द्या.
=======
>>>>फडणीसही नोटबंदीमुळे गाळात गेले असंच मानायचं का?<<<<
फडणीसही आम्हाला तितकेच जवळचे आहेत.! अल्पावधीत अनेक भरार्या घेतल्या व राजकीय लोकांचा हस्तक्षेप होऊ दिला त्यामुळे ही परिस्थिती ओढवली. अतिशय धडाडीचे उद्योगपती आणि सर्व स्तरांवर उत्तम संपर्क, पण वाईट पाहणार्यांनी वाईट केले.
Pages