हल्ली एखादी नवीन वादग्रस्त घटना घडली की ती मला तरी पहिले व्हॉटसपवरच समजते. मग तिचा शोध घेतला जातो. शोध घेताना परस्परविरोधी अश्या बरेच बातम्या सापडतात. काही ठिकाणी तर चक्क व्हॉटसपवर फिरणारया खोट्या पोस्टच शहानिशा न करता छापल्या आहेत असे वाटते. आता हा निष्काळजीपणाही असू शकतो किंवा ते कोणाच्यातरी दबावाखाली वा विकले गेल्याने खोटी बातमी देत असावेत.
ताजे उदाहरण देतो.
गोरखपूर ऑक्सिजन कांड - नवाकाळमध्ये बातमी वाचली. घरच्यांना सांगितले. सारेच हळह्ळले. बातमी या दुर्दैवी घटनेच्या मानाने फारच थोडक्यात दिल्याने आणखी डिटेल शोधायला गूगल केले. पहिलीच लिंक आली की काल दिवसभर गोरखपूरला अमुक तमुक झाले अश्या अफवा पसरल्या होत्या. लिंक चेक केली आणि घरच्यांना सांगितले की अरे हळहळ व्यक्त करू नका, असे काहीही झाले नाहीये. या व्हॉटसप फेसबूकच्या अफवा आहेत नुसत्या... घरच्यांना हायसे वाटले, दोनचार शब्द मलाही सुनावले.
अर्ध्या तासाने आणखी सर्च करून मी त्यांना सांगितले की अफवा नसून खरेच लहान मुले दगावलीत
पुढे कन्फर्म झाल्यावर मायबोलीवर धागा काढला. पण दिवसभरात बरेच उलटसुलट कानावर पडत होते. फार कश्याला ईथेही बरेच उलटसुलट बातम्यांच्या लिंक दिल्या गेल्या. फेसबूक व्हॉटसपवर लगेच विश्वास ठेवायचा नाही हे बेसिक मी पाळतो. पण सर्च केल्यावर न्यूज चॅनेलचा मुखवटा धारण केलेल्या कित्येक लिण्का उलटसुलट बातम्याच देतात. एखाद्या चुकीच्या बातमीवर विश्वास ठेवून आपण ईथे धागा काढायचो आणि पुढे ते काहीतरी वेगळेच प्रकरण आहे असे समजायचे. यावरून माझी चुकी नसताना किंवा मी चुकीच्या सोर्सवर विश्वास ठेवला ईतकीच चुकी असताना शिव्या खाऊन झाल्या आहेत. असो, त्या मी मनावर घेत नाही. पण खरी बातमी काय ते समजणे हा प्रत्येकाचा हक्कच आहे.
तर आजच्या या विश्वासार्हता गमावलेल्या भारतीय मिडियाच्या जगात खरी बातमी तुम्ही कुठून मिळवता. तुमचा खरी बातमी मिळवायचा विश्वासार्ह सोर्स काय आहे?
तसेच कोण आहेत ज्यांच्या बातम्या नेहमी एकाच चष्म्यातून असतात? जे एखाद्या पक्षाचा नुसता उदो उदो करतात किंवा नुसता द्वेष करतात? कोण तटस्थ असते, कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर चटकन विश्वास ठेवू नये? तुम्ही एखाद्या बातमीची शहानिशा कुठले सोर्स वापरून करता हे जाणून घ्यायला आवडेल.
Srd येस्स, गोरखपूर दुर्घटना
Srd येस्स, गोरखपूर दुर्घटना ही बातमी आहे.
नंद्या 43 तुम्ही बातमी आणि लोकांची मते यात गल्लत करत आहात.
चला आपण एक उदाहरण घेऊया,
समजायला सोपे म्हणून सर्वांना परीचित असलेल्या आपल्या सुपर्रस्टार शाहरूखचे घेऊया. त्याचा नुकताच हॅरी मेट सेजल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जर मी लोकांना हा चित्रपट कसा आहे हे विचारतो तर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. तसेच वेगवेगळे मत देणारा प्रत्येक जण आपल्या जागी प्रामाणिक असू शकतो.
पण जर मी त्या चित्रपटाने किती कोटींचा धंदा केला असे विचारले. आणि वेगवेगळी उत्तरे आली. तर ती सारीच खरी नसणार. त्यातले एकच खरे असणार. कारण तो एक आकडा आहे. किंबहुना ते एक एफएकेटी फॅक्ट आहे. कोणाचे वैयक्तिक मत काय आहे यावर ते अवलंबून नाही.
ईथे एक प्रश्न पडला आहे -
ईथे एक प्रश्न पडला आहे -
न्यूज चॅनेलनी आपल्याला एक ग्राहक म्हणून खरी बातमी देणे बंधनकारक आहे का?
म्हणजे मी एखाद्या न्यूज चॅनेलला पैसे मोजून बघत असेल आणि ते मला खोट्या बातम्या पुरवत असेल तर मी त्यांच्यावर केस करू शकतो का? नुकसान भरपाईचा दावा ठोकू शकतो का?
हो हो नक्की करू शकतोस, रादर
हो हो नक्की करू शकतोस, रादर तू करच.
एकदा तरी धडा शिकवला पाहिजे त्यांना.
तुला पूर्ण पाठिंबा
http://www.thelallantop.com
http://www.thelallantop.com/jhamajham/bjp-corporator-hansmukh-patel-from...
या बातमीचा सोर्स खरा की खोटा?
खोट्या बातम्या पुरवत असेल तर
खोट्या बातम्या पुरवत असेल तर मी त्यांच्यावर केस करू शकतो का? नुकसान भरपाईचा दावा ठोकू शकतो का?
नक्कीच ठोक छी न्युजवाल्यावर तर आधी ठोक २००० च्या नोटे मधे चीप आहे म्हणून सांगितले होते
<<<कोणाचे वैयक्तिक मत काय आहे
<<<कोणाचे वैयक्तिक मत काय आहे यावर ते अवलंबून नाही.>>>
मतच. कुठून काय माहिती मिळाली त्यावर त्यांना जे काही वाटले ते त्यांनी सांगितले. ते तुम्ही ऐकले. तसेच दहा लोकांनी सांगितले. त्यांच्या मते त्यांचेच म्हणणे खरे.
<<<हो हो नक्की करू शकतोस, रादर तू करच. एकदा तरी धडा शिकवला पाहिजे त्यांना. तुला पूर्ण पाठिंबा>>>
तुमची बाजू कोर्टात बळकट करायला तुम्हाला जितकी जास्त उदाहरणे सापडतील तितकी गोळा करा, पुष्कळदा चॅनेल सांगतात की "हाती आलेल्या सूत्रानुसार" , असे म्हंटल्यावर कायदा या बाबतीत काय म्हणतो?
<<<कोणाचे वैयक्तिक मत काय आहे
<<<कोणाचे वैयक्तिक मत काय आहे यावर ते अवलंबून नाही.>>>
मतच. कुठून काय माहिती मिळाली त्यावर त्यांना जे काही वाटले ते त्यांनी सांगितले. ते तुम्ही ऐकले. तसेच दहा लोकांनी सांगितले. त्यांच्या मते त्यांचेच म्हणणे खरे.
>>>>
नक्की काय म्हणायचे आहे काहीच समजले नाही...
माझे हॅरी मेट सेजलच्या उदाहरणात हे टाकून समजवाल का?
पुष्कळदा चॅनेल सांगतात की
पुष्कळदा चॅनेल सांगतात की "हाती आलेल्या सूत्रानुसार" , असे म्हंटल्यावर कायदा या बाबतीत काय म्हणतो?
>>>
एक्झॅक्टली... याच पळवाटा असण्याची शक्यता आहेत. म्हणूनच...
खोटी बातमी देत नसतील परंतू
खोटी बातमी देत नसतील परंतू त्यांना न आवडणारी,कमी महत्त्वाची बातमी गाळतात. पेपरवाले/चानेलचे मालक हे कोणत्यातरी गटाचे ,भागाचे असतातच.
खोटी बातमी देत नसतील परंतू
खोटी बातमी देत नसतील परंतू त्यांना न आवडणारी,कमी महत्त्वाची बातमी गाळतात. पेपरवाले/चानेलचे मालक हे कोणत्यातरी गटाचे ,भागाचे असतातच.
<<<माझे हॅरी मेट सेजलच्या
<<<माझे हॅरी मेट सेजलच्या उदाहरणात हे टाकून समजवाल का?>>>
Ohhh myyy gAwD!
कोण हॅरी, कोण सेजल, ते काय गोरखपूर मधे भेटले का? (आय मीन मेट का?) मला याबद्दल काहीहि माहिती नाही. करून घेण्याची इच्छाहि नाही.
मत शब्द आवडत नसेल तर "हाती आलेल्या सूत्रानुसार" "माझ्या अंदाजाप्रमाणे" "१०० -२००तरी असतीलच" "२०० च्या वर नक्की नाही"
असे म्हणतील लोक, असे समजा.
एकूण काय खर्याची दुनिया राह्यली नाय.
कोण हॅरी, कोण सेजल, ते काय
कोण हॅरी, कोण सेजल, ते काय गोरखपूर मधे भेटले का? (आय मीन मेट का?) मला याबद्दल काहीहि माहिती नाही. करून घेण्याची इच्छाहि नाही.
>>>>
ते एक उदाहरण आहे. तुम्ही आपल्या आवडीच्या कलाकारांची आणि चित्रपटाचे नाव टाकून समजवू शकता. जर बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झाले हा एक आकडा असेल तर तो लोकांच्या मतानुसार बदलणार कसा? ती काहीतरी एकच फिगर असणार ना?
काहीतरी काढून ओढून ताणून शाखा
काहीतरी काढून ओढून ताणून शाखा आणायचा किती तो अट्टाहास. तुला बॉक्स ऑफिस ची इतकीच काळजी असेल तर थेट शाखा ला ट्विट कर, तो देईल तुला खरा आकडा.
आशूचॅम्प, तुम्ही द्वारकानाथ
आशूचॅम्प, तुम्ही द्वारकानाथ संझगिरी यांचे किकेट सोडून ईतर विषयांवरचे लेख वाचले आहेत का? त्यात एखादी गोष्ट समजावताना क्रिकेटची उदाहरणे सर्रास असतात. कारण क्रिकेट ही त्यांची आवड असल्याकारणाने त्यांना समर्पक उदाहरणे पटकन सुचतात. शाहरूख ही माझी आवड असल्याने मला त्या संबंधित समर्पक उदाहरणे पटकन सुचतात ईतकेच.
असो,
तर तुम्हाला असे म्हणायचे आहे की एखाद्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड जाणून घ्यायचा विश्वासार्ह सोर्स त्यात काम करणारा मुख्य कलाकार किंवा निर्माता हाच थेट आहे.
मुख्य कलाकार नव्हे, निर्माता.
मुख्य कलाकार नव्हे, निर्माता.
त्याला माहिती असायलाच हवी नाही का, की त्याचा धंदा किती झालाय ते.
एक्झॅक्टली, ज्याच्याशी बातमी
एक्झॅक्टली, ज्याच्याशी बातमी घडते त्याला माहीती असतेच. पण त्याच्यकडे सारे विचारायला जात नाही. ईथेच तर बातमीदार दुव्याचे काम करतात... तोच विश्वासार्ह दुवा कोणता याबद्दल विचारणा आहे.
आणि ते कशावरून ठरवणार?
आणि ते कशावरून ठरवणार?
उद्या मी म्हणलं की शाखा ची विश्वासार्ह माहिती ऋ देईल. किंवा तसा तू क्लेम केलंस तर चालेल का?
बाकीचे काय म्हणणार त्याच काय ऐकत बसलाय, एक नंबरचा पुड्या सोडतो तो, आधी काय बोललाय तेही लक्षात नसतं, नुसते आपला फालतू पणा. तर याला काय करणार तू?
मी काय म्हणतो इथे उगा वेळ
मी काय म्हणतो इथे उगा वेळ घालवण्यापेक्षा केस का नाही करत चॅनेल वर
छान ५- १० वर्षाची बेगमी. तुझी आणि त्यांची पण
जर मी एखाद्याची माहिती दुसर्
जर मी एखाद्याची माहिती दुसर्याला अधिकृतरीत्या देत असेल तर ........
अधिकृतरित्या दिली जाणारी
अधिकृतरित्या दिली जाणारी माहीती ही खरीच असली पाहिजे असा नियम आहे, तो काटेकोरपणे पाळला गेला तर कित्येक सरकारे, सरकारी कार्यालये, अधिकारी, राजकारणी देशोधडीला लागतील.
आकडेवारीचाच तुला प्रश्न पडेल म्हणून त्याचेही उत्तर आधीच देऊन ठेवतो. कित्येक अपघातात, दुर्घटननेत सरकारी अधिकृत आकडा आणि प्रत्यक्षातला आकडा यात खूप तफावत असते, त्यामुळे त्यातला कुठला खरा मानायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
“There Is No Truth. There Is Only Perception.”
वरील वाक्य मनी धरावे, चित्ती असो द्यावे समाधान.
ऋन्मेषभाऊ सिनेमांच्या कमाईची
ऋन्मेषभाऊ सिनेमांच्या कमाईची १०० टक्के खरी आकडेवारी (अगदी शेवटच्या रुपयापर्यंत) फक्तं आणि फक्तं कराची का कुठेसे बसलेले, ज्यांचा गॉगल लावलेला फोटो कधी मधी पेपर मध्ये दिसतो ते एक 'भाऊ'च देऊ शकतात, दुसरे कोणीच नाही असे काही विश्वासार्ह सोर्सकडून बरेचदा ऐकले आहे. ( विश्वासार्ह सोर्स कोण ते विचारू नका सांगितले तरी तुमचा विश्वास बसणार नाही. )
तुम्हाला खरोखर तुमच्या देवाच्या कमाईचे खरेखरे आकडे जाणून घ्यायचे असतील बघा भाऊंना फोन फिरवून... खडसावून विचारले तर भाऊंचा नंबर मिळवणेही अवघड नसावे.
होना, प्रत्यक्ष त्याच्या
होना, प्रत्यक्ष त्याच्या देवाला पण खरे आकडे जाहीर करताना अडचणी असणार आहेत. टॅक्सवाल्यांचा बांबू बसला तर काय घ्या. त्यामुळे प्रत्यक्षात जरी गरम असलं तरी नानाविध करामती करून नरम-गरम दाखवणार.
हायझेनबर्ग - इतके कुठे कष्ट घ्यायला सांगताय त्याला. त्याचे असे आहे की घरबसल्या आयती फुकट माहीती मिळाली पाहिजे आणि ती पण अधिकृत खरी खुरी.
<<<पण अधिकृत खरी खुरी.>>>
<<<पण अधिकृत खरी खुरी.>>>
पण त्यांची अडचण अशी की विश्वासार्ह कोणता?
अनेक निरनिराळ्या शब्दात लोकांनी सांगितले की विश्वासार्ह सोर्स सांगता येत नाही. प्रत्येक बातमीत खरे काय नि खोटे काय हे सांगणारे अनेक सोर्सेस असतात. ते सोर्स धंदा म्हणून बातम्या देतात - मग त्यांना हवे तशी कलाटणी ते त्या बातमीला देतात.
समजा सरकारी विधाने धंद्यासाठी करत नाहीत, पण त्यावरहि लोकांचा संशय! प्रत्येक गोष्ट कोर्तात नेऊन सिद्ध करायची तर साक्षीदार, न्यायाधिश तरी नक्की खरे बोलतात का?
आता तुम्ही म्हणाल 'सकाळ' किंवा टाईम्स ऑफ इंडिया. पण ऋन्मेSSष जर खरेच विश्वासार्ह सोर्सच्या शोधात असतील तर त्यांनी हे सगळे पाहिलेच असणार! तरी ते विचारतात.
बहुधा त्यांचा स्वतःवरच विश्वास नसावा. किंवा ते आपली परीक्षा घेत असतील. १००० पोस्ट झाल्या की ते उत्तर देतील.
मग मलाहि प्रश्न - हे तरी विश्वासार्ह कशावरून.
पण घाबरू नका मी इथे धागा काढून तो प्रश्न विचारणार नाही.
मी काय म्हणतो इथे उगा वेळ
मी काय म्हणतो इथे उगा वेळ घालवण्यापेक्षा केस का नाही करत चॅनेल वर
छान ५- १० वर्षाची बेगमी. तुझी आणि त्यांची पण
Submitted by आशुचँप on 18 August, 2017 - 23:47
》》
आणि आपली आणि माबोची सुटका. वा काय छान उपाय
त्याचे असे आहे की घरबसल्या
त्याचे असे आहे की घरबसल्या आयती फुकट माहीती मिळाली पाहिजे
>>>>>
नाही, हा गैरसमज आहे. मी पैसे मोजायला तयार आहे.
बाकी राहिला प्रश्न घरबसल्या तर प्रत्येक कामे प्रत्येक जण स्वत: नाही करत. उदाहारणार्थ तुम्ही तुम्हाला जीवनावश्यक असे अन्नही स्वत: पिकवत नाही. ते देखील कुठेतरी दूर गावात शेतकरी पिकवतो. व्यापारी शहरात आणतो आणि हॉटेलवाला शिजवून तुम्हाला घरबसल्या होम डिलीव्हरी देतो.
तर हे बातमी हवीय तर स्वत: उठा आणि जिथे घडलेय तिथे शोधायला जा हे म्हणजे अन्न हवेय तर नांगर हातात घ्या म्हटल्यासारखे आहे.
काही जण सिनेमाचेच उदाहरण घेऊन
काही जण सिनेमाचेच उदाहरण घेऊन विश्वासार्हतेचे सरसकटीकरण करत आहेत.
म्हणजे हॅर्री मेट सेजलचा किती धंदा.. सॉरी.. तुमच्या आवडीच्या कलाकाराच्या चित्रपटाचा किती धंदा झाला हे तुम्हाला एकशे तेवीस कोटी ब्याण्णव लाख अष्ट्यात्तर हजार सातशे एकोणवीस रुपये ईतक्या अचूकतेने हवे नसणार. तर ५०-६० कोटी, १००-१२५ कोटी, साधारण २०० कोटी अश्या स्वरुपात समजले तरी चालते. थोडक्यात एक रेंज हवी असते. तर त्यासाठी खरेच लगेच दुबईचा भाई गाठायची गरज आहे का?
तसेच एखाद्या बातमीत खरे खोटे काय आहे, हे की ते, ईतकेच दोन पर्यायांपैकी एक जाणून घ्यायचे असते.
आणि लाख प्रश्नांचा एक प्रश्न
आणि लाख प्रश्नांचा एक प्रश्न - सत्याचा शोध जर तुमच्या आमच्या ईथल्या सर्वांच्या आवाक्याबाहेरचा असेल तर ईथल्या राजकीय चर्चा नेमके कुठल्या आधारावर तावातावाने चालतात? जर तुम्ही कोणी त्यात भाग घेत असाल तर एखादी बाजू नक्की कुठल्या आधारावर घेता?
That's why I told in the very
That's why I told in the very beginning to process the information.
Truth is nothing but logical understanding of things . If you can connect the dots, you will arrive at the truth.
जसे की दुबई मध्ये दाऊद च्या 1500 कोटीच्या संपत्तीची जप्ती वाली बातमी, सगळ्या आघाडीच्या मिडियावल्यानी दिली, तिचा खोटेपणा दोन तासात उघडा पडला.. असेच अनेक बातम्यांचे असते.
राजकीय चर्चांचा ताव विचारसरणी मुळे असतो, बातम्यांवर अवलंबून नाही, तसे नसेल तर अशा चर्चेत केवळ ऐकीव बातम्यांच्या जीवावर भाग घेणारे स्वतः चे तार्किक विश्लेषण नसेल तर फार काळ टिकू शकत नाही, याची उदाहरणे माबो वर बरीच मिळतील...
आशूभाऊ
आशूभाऊ
सायकल घ्या अन् एक दौरा काढा.
ऋन्म्या ऐकेल?
Pages