१ सिमला मिरची मोठे तुकडे चिरून
१ मोठा कांदा जाड चिरून
६ मोठे टोमॅटो चिरून / ३ कॅन diced टोमॅटोचे कॅन
३ वाट्या राजमा रात्रभर भिजवून वाफवून / २ कॅन Dark Red Beans
१ छोटा कॅन Bush चिली स्टार्टर बीन / १ पाकिट चिली McCormick मसाला
४ लवंगा
४ तमालपत्रे
२ पॅटी Boca burger / 2 slabs Tofu
दालचिनी तुकडा चवीपुरता
वरून घालायला
किसलेले चीज
सावर क्रीम/लोणी
कॅन राजमा वापरणार असल्यास चिली आयत्यावेळेसही करता येते. एका मोठ्या भांड्यात थोडे तेल घालून जरासे तापले की लवंगा, तमालपत्र आणि दालचिनी परतून घ्यावे. कांदा फोडी टाकून परतून मग सिमला मिरचीचे तुकडे टाकावे व २-३ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून वाफवावे.
चिरलेले टोमेटो घालून आच वाढवावी. जरा खदखदायला लागल्यावर बोका बर्गर वा टोफू घालावे व झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. चिली स्टार्टर व राजमाचे दाणे घालून आच कमी करून १०-१५ मिनिटे शिजवावे.
खायला घेताना किसलेले चीज व सावर क्रीम वरून आवडीप्रमाणे पेरावे. चिलीबरोबर टॉर्टिया चिप्स खातात, किंवा नुसते सूपसारखेही खायची पद्धत आहे.
चिली स्टार्टर मधे Mild/Medium/Hot मसाले मिळतात. आपापल्या कुवतीप्रमाणे तिखट वापरावे. माझी मुले बर्यापैकी तिखट खात असल्याने मी Medilum वापरते. मुले डब्यातही चिली न्यायला तयार असतात (थंड झाली तरी). मी नेहमीच वरील प्रमाणात बनवून उरलेली फ्रीज करते. त्याने ती जास्त मुरते. जितकी जास्त मुरते, तितकी अधिक चांगली लागते. Superbowl पार्टीच्या वेळेस ही हमखास लागतेच.
मांसाहारी करायची असल्यास बोका बर्गर वा टोफूच्या ऐवजी बीफ वा तत्सम काही घालतात.
बरं, मी ऑलरेडी राजमा भिजवलाय.
बरं, मी ऑलरेडी राजमा भिजवलाय. चिली स्टार्टरला काही ऑप्शन? हे नाहिये, आणावं लागेल.
लाल तिखट आणि ह्यात काय फरक असेल? म्हणजे तिखट टाकलं तर काही जास्तीचं घालावं लागेल काय?
McCormick चिली seasoning
McCormick चिली seasoning ingredients मधे कांदा, लसूण, मीठ, मिरची, कणिक असे लिहिलेले असते.
स्वाती, मस्त रेसीपी आहे. मी
स्वाती, मस्त रेसीपी आहे. मी कधी चिली खाल्लेली नाही पण ही रेसीपी वाचुन ईच्छा झाली म्हणून खालील प्रश्न --
Bush चिली स्टार्टर बीन , चिली McCormick मसाला वेज आहे का?
Boca burger / 2 slabs Tofu जरुरी आहे का? त्याला काही पर्याय आहे का?
बुशच्या कॅनवरचे ingredients
बुशच्या कॅनवरचे ingredients घरी गेल्यावर पाहून लिहिते. McCormick मसाला ingredients वर दिले आहेत. मी एकदा Tofu/Boca Burger घरात नसताना मश्रुम घातले होते, ते लागतात चांगले, पण चिली दाट होत नाही. मला Tofu पेक्षा Boca Burger जास्त पसंत पडले.
वरील कृती Trial & Error ने मी बर्याचदा करून adjust केलेली आहे. आपण आणखी trial करून जरूर इथे कळवा.:-)
धन्यवाद स्वाती. रेसिपी बघून
धन्यवाद स्वाती. रेसिपी बघून केलीच आज चिली. घरात जे होते ते वापरुन. ही ब्लॅक बीन-सॉसेज चिली.
कॅन्ड ब्लॅक बीन्स, कान्दा, टोमॅटो, रेड बेल पेपर, लसूण, बेसिल, मीठ, तिखट, चिकन सॉसेज, थोडी भाजलेली कणीक.
केली केली मी आज. मस्त लागते.
केली केली मी आज. मस्त लागते. राजमा, कांदा, टॉमेटो, हिरवी सिमला मिर्चि, अगदि थोडं आलं-लसुण, तिखट, मिठ, पनीर आणि भाजलेली कणिक. थँक्यू स्वाती, लालु (फोटु आणि ingredients बद्दल. बरं, ते वरती सजावट काय आहे? (डोकावुन पहाणारी बाहुली)...गाजराचा कीस की शेव? मस्त दिसतंय!)
shredded cheese वाटतय.
shredded cheese वाटतय.
बोका बर्गर काय असते? त्याला
बोका बर्गर काय असते? त्याला भारतीय पर्याय आहे का?
मामी, बोका बर्गर म्हणजे सोय
मामी, बोका बर्गर म्हणजे सोय प्रोटीन वापरुन केलेले बर्गर्स ... अमेरिकेत मिळतात ! त्याच्या जागी आपल्याकडे न्युट्रीला वगैरे कंपनीचे सोय ग्रॅन्यूल्स मिळतात ते वापरु शकतो. ते ग्रॅन्यूल्स भरपूर पाणी आणि चवीला मीठ घालून उकळायचे आणि मग पाणी पिळून घ्यायचे ( सोय प्रोटीनमधले हे पाणी काढून टाकणे आरोग्याच्या दॄष्टीनेही आवश्यक असते ) अमेरिकेतल्या इंडियन ग्रोसरीतही हे सहज मिळते. मी नेहेमी सोय ग्रॅन्यूल्स वापरुनच चिली करते. ग्रॅन्यूल्स नसल्यास भारतात बिर्याणीत घालायचे जे सोय चंक्स मिळतात ते ही अशाच प्रकारे पाण्यात उकळून, पिळून मग मिक्सरमधून काढून वापरु शकतो.
मस्त रेसीपी. करुन पहाणार. मला
मस्त रेसीपी. करुन पहाणार. मला शाकाहारी चिली क्वचितच विकत मिळाली आहे.
इथे dallas च्या जवळ एक ठिकाण आहे . तिथे लोक स्वतः शिकार करुन, नंतर ती शिकार वापरुन चिली विस्तवावर शिजवुन खातात.(अस ऐकलय:) )
लालु मस्त फोटो. ते भांड कुठुन मिळालय तुला? क्लास आहे एकदम .:)
करेक्ट. मग ड्ब्यात नुसती चिली
करेक्ट. मग ड्ब्यात नुसती चिली द्यायची का बरोबर पराठा/ बन/ असे काही? रविवारी बनवून ठेवता येइल.
मिती, झेलम ते चीजच आहे. आणि
मिती, झेलम ते चीजच आहे. आणि सावर क्रीम.
सीमा ते भांडं लोणच्याच्या सटासारखं आणि तेवढ्याच आकाराचं आहे, त्याला हँडल आहे मात्र. असा ४ चा सेट मला आउटलेटमधल्या एका दुकानात soup bowls म्हणून मिळाला होता.
मामी, इथे चिलीसोबत कॉर्नब्रेड खातात (जो नेहमीच्या पावासारखा नसतो). पण बन, पराठा चालेल किंवा नुसतीही चालेल.
माझी मुले नुसतीच डब्यात
माझी मुले नुसतीच डब्यात नेतात, सूपसारखी खातात. एका बोलमधे पोट भरते. त्यांचे भारतीय, अमेरिकन मित्रमंडळही आवडीने खाते. फक्त टोफूबद्दल नाव काढायचे नाही. बनवायला फार भांड्यांचा पसारा नाही, खायला नाही. खाणारा खूष, बनवणारा खूष. कालच पुन्हा बनवली. अर्धी फ्रीज केली. लालू, अचानक टपकलीस तर तुला हीच देईन
बुश चिली स्टार्टरमधले साहित्यः कांदा, लसूण, टोमॅटो, पिंटो बीन्स, कणिक, कॉर्न, तेल. शिवाय डब्यावर लिहिलेले असते, "Just add meat and tomato". यावरून शाकाहारी आहे असे वाटते.
लालू, तू त्या दुकानाची आणि
लालू, तू त्या दुकानाची आणि त्यांच्या भांड्यांची जाहिरात करते आहेस का ? तसे असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे
हे चिली स्टार्टर अमेरिका
हे चिली स्टार्टर अमेरिका स्पेशल आहे वाटतं... मग त्याला इतर देशांत पर्याय काय ?
आणि ते वरचं त्यातल्या घटकांचं पोस्ट वाचलं.. ते घटक घेऊन काय करू ? काहीतरी नीट लिहा पाहू.
अरे वा! मस्त आणी सोपी रेसिपी,
अरे वा! मस्त आणी सोपी रेसिपी, ते बोका बर्गर कुठेशी मिळतात? बोका हे brand च नाव आहे कि बर्गरचा प्रकार?
मिलिन्दा, माझ्याकडे नव्हते
मिलिन्दा, माझ्याकडे नव्हते चिली स्टार्टर. स्वातीची रेसिपी वापरुन बाकीचे घटक वेगळे घातले तरी चालतात. मी कणीक भाजून घातली दाटपणा येण्यासाठी.
(जाहिरात नाही. दुकानाचे नाव कुठे लिहिले? ते आठवत नाही ही गोष्ट वेगळी... )
प्राजक्ता, बोका ब्रॅन्ड आहे. Boca.
बरं.. मग केव्हा घातली कणीक ?
बरं.. मग केव्हा घातली कणीक ? सर्वात शेवटी ? म्हणजे डीश ऑलमोस्ट तयार झाल्यावर दाटपणा येण्यासाठी ?
हो. थोड्या पाण्यात मिसळून
हो. थोड्या पाण्यात मिसळून घातली आणि थोडी उकळी येऊ दिली.
भरपूर लसूण बारीक चिरुन,
भरपूर लसूण बारीक चिरुन, धनाजिरा पावडर, गरम मसाला असे मसाले घालूनही छान होते चिली. थोडा राजमा मॅश करुन टाकला तर आपोआपच दाटपणा येतो. पण लालू, कणकेची आयडीया पण मस्त आहे. पुढच्या वेळी नक्की वापरणार ! वरुन थोडं किसलेलं चीज, सावर क्रीम ( भारतात घरचं पाढरं लोणी मस्त लागेल. ) आणि थोडी बारीक चिरलेली कांद्याची पात हवीच मामी, पावभाजीचा बन मस्त लागेल चिलीबरोबर !
अमेरिकेत रहणार्या
अमेरिकेत रहणार्या मैत्रिणींनो
बोका बर्गर च्या ऐवजी vegetarian crumbles वापरून बघा. Morningstar Farms चे मिल स्टार्टर म्हणून हिरव्या रंगाच पाकिट मिळत. Frozen section मधे जिथे इतर सोया बर्गर्स मिळतात तिथे. Ground meat च ultimate exture येत. सांगितल नाही तर कळत सुद्धा नाही कि हि व्हेजिटेरीयन चिली आहे म्हणून.
ऑफिस मधे चिली स्पर्धा होती तेव्हा सहा व्हेजिटेरीयन entries मधून मला पहिल बक्षिस मिळाल होत. मी या चिली वर cheddar cheese (किसून), बारीक कांदा, कोथिंबीर, टॉमेटो चिरून टाकते. Sour creame चे ठिपके. मस्त रंगेबीरंगी दिसते! गोल गोल Tortilla Chips बाजूला ठेवल्या की झाल डिनर!
मी या vegetarian crumbles चा मोड आलेल्या मेथी घालून खिमा करते. मुल चाटून- पुसून फस्त करतात.
कल्पू, या खिम्याची पण रेसिपी
कल्पू, या खिम्याची पण रेसिपी टाक ना. मोड आणले की मेथी कडू लागत नाही ना ?
अश्विनी, रेसिपी टाकली आहे.
अश्विनी,
रेसिपी टाकली आहे. आवडल्यास करून बघ.
एक सुधारणा vegetarian
एक सुधारणा vegetarian crumbles हे mornigstar farms या कंपनीचे आहेत. चुकीबद्द्ल क्ष्मस्व. मी माझी पोस्ट संपादते.
हे आपण बेक्ड बीन्स करतो तसेच
हे आपण बेक्ड बीन्स करतो तसेच आहे ना? भारतात कुठ्ले मसाले मिळतील?
हे कराय्ला मस्त वाटतय पण
हे कराय्ला मस्त वाटतय पण कुणीतरी प्लीज "भारतात मिळणारे व्हेज घटक" सांगून की पाककृती मला सांगेल का??
खास करून चिली स्टार्टर साठी??
लिहीलेत की वर घटक स्वाती आणि
लिहीलेत की वर घटक स्वाती आणि लालू ने. लालू ने तर ते न वापरता केलं अस लिहीलंय ना...
अमेरिकेत कॉस्टकोमध्ये हे
अमेरिकेत कॉस्टकोमध्ये हे मद्रास लेन्टिल्स मिळत आहेत-
http://www.amazon.com/Tasty-Bite-Entree-Lentils-10-Ounce/dp/B0007R9L4M/r...
कॉस्टकोमध्ये ४ चे पॅक मिळते ६.९५ ला.
यात मीट घालून चिली करायची म्हणे. मी चव पाहिली, चांगली आहे. उगाच भाराभार घटक पदार्थ आणि preservatives नाहीत.
preservatives नाहीत.>> सोडियम
preservatives नाहीत.>>
सोडियम contents पाहिले का त्यात?
असेल १५-२० टक्के हे नाही तर
असेल १५-२० टक्के
हे नाही तर ते असणारच!
Pages