माझी एक ओळखीतली फॅमिली इथे भारतात परतत आहे, त्यातील स्त्रीला बरच सामान कमीच करायचे आहे.
तर त्यात आधी खालील वस्तु आहेत,
खरे तर तिला कोणा अतिशय गरजूला गेले तर बरे असे वाटतय , त्यातही भारतीय गरजूला ... कारण वस्तु त्यांनाच बहुधा उप्योगी पडतील..
ज्या गोष्टी भारतीय प्रकाराच्या नाहियेत, त्या ती अमेरीकेतच सालवेशनला देइल.
तसेही भारतात येवून तिला , मिनिमलिस्ट जगायचे आहे.
हे वस्तुचे खालील प्रकार आहेत. सर्व उत्तम अवस्थेत आहेत. काही ज्वेलरी आणि कपडे कधीच वापरले नाही पासून क्वचित वापरले असे आहेत. पण मिनिमलिस्ट जगण्याचा विचार असल्याने काढून टाकायचे आहेत. इथे भारतात येताना एवढे सामान नाही आणायचेय.
भारतीय पद्ध्तीचे चुणीदार. सलवार, दुपट्टे ( साईजः घेर ३२- ४२ इंच) सिल्क कॉटन,सिल्क वगैरे.
लाँग आणि शॉर्ट स्कट्सः कॉटन , सिल्क वगैरे
उत्तम फॅशनचे ब्लॉजेस क्वचित वापरलेले तर काही नाहीच( साईज : ३२-३८)
साड्या: कॉटन, सिल्क, जरी वगैरे
ईमीटेशन ज्वेलरीत सेट्स, कानतले, बांगड्या, पर्फ्युम्स , इतर स्त्रीयांची आभुषणं ( भारतीय जडणीची) वगैरे
विंटर स्वेटर्स , शाली ती अमेरीकेतच देवू शकते पण तिला भारतात गरजूंना द्यायला आवडतील.
तर प्रश्ण असा आहे की, अमीरेकेत अशी गरजू मुलींची संस्था जी भारतीय गरजूं करता काम करते आणि असे वरील सर्व सामान (जवळपास भारतीय प्रकाराचे) घेइल किंवा भारतीय संस्थेशी जोडलेली , गरजू मुलींची /स्त्रीयांची मेंबर्स आहे का, की ती हे सामान घेते?
तर मग मैत्रीण तिथेच अमीरेकेत देवु शकते? खास करून कॅलिफोर्नियात वगैरे?
किंवा दुसरा काय मार्ग आहे, हे सामान गरजू भारतीय मुलींना/स्त्रीयांना पोचवण्याचा? इतकं तर बॅगेत टाकून भारतात आणू शकतच नाही. ती ऑक्टोबरला निघेल अमेरीकेतून.
शेवटचा उपाय, मग ते सामान जमेल तितके आणि तसे मुंबईत आणोइन, मुंबईत कुठल्या संस्था आहेत ज्या मदत करतील सामान गरजूंना पोहिचवण्याचे?
इथे मदत करा.
इथे मदत करा.
जर गरजूला मदत करणे हाच एकमेव
जर गरजूला मदत करणे हाच एकमेव ऊद्देश असेल तर अमेरिकेत गराज सेल लाऊन आलेल्या पैशातून भारतातल्या गरजूंना मदत करता येईल.
गुडविल डोनेशन करून त्या मालाच्या अंदाजे किंमतीवर वाचलेल्या टॅक्स अमाऊंटचे भारतीय चलनात कन्वर्जन करून गरजूंना मदत करता येईल.
आहे ती कमॉडिटी देऊनच गरजूंना मदत करायची असल्यास अशा क्वालिटी मालाचीच स्पेसिफिक गरज असलेले गरजू अमेरिकेत सापडणे अवघड आहे.
माझ्यामते ती कमॉडिटी करंसी मध्ये कन्वर्ट करून खर्या आणि जास्तीत जास्तं गरजूंपर्यंत पोहोचता येईल.
साल्वेशन आर्मीला सर्व देउन
साल्वेशन आर्मीला सर्व देउन टाका. चांगले धडके कपडे कोणी ही घालेल. ज्वे लरी वगैरे इ बेवर विका .
सिरीअन रेफ्युजीलोकांना मदत करणार्या संस्था आहेत तिथे द्या ते इंडिअय्न स्टफ वापरतात. आपले चुडीदार वगैरे. तसेच
हे बघा.
https://www.ourbazaar.net/donate-item/
http://maitri.org
http://maitri.org
इथे भारतीय कपडे डोनेट करता येतील.