समोसा-पावचा शोध!

Submitted by नानाकळा on 9 August, 2017 - 07:37

मुंबैत वडापावचा शोध अशोक वैद्य यांनी १९६६मध्ये लावला.

तर.. मुंबैतच २००३ साली 'समोसापाव'चा शोध मी लावलाय.... म्हणजे दावा तपासून पहा बॉ मीच लावला का ते!

काय की समोसापाव मागितला की लोक 'हॅण्ड ग्रेनेड' मागतोय असं काहीसं बघायचे.

त्याआधी कधी समोसा पावात टाकून खातांना पाहिलं नाय का मुंबैकरांनी? मला खरंच माहिती नाही म्हणून विचारतोय.

स्टोरी लिहून ठेवतो. पुढे सापडायची नाही, शोधायला गेलात तर....

तर आम्ही जेजे होस्टेलवाले, शिववडापावची व्याघ्रगर्जना करणार्‍या उधोजींच्या शेजारी राहायचो. तेव्हा बाळासाहेब होते.

सगळी होटेलं, टपर्‍या एक दीड किमी च्या बाहेर होत्या. तर होस्टेल गेटच्या बाहेरच, साहित्यसहवासच्या समोर (म्हणजे जिथे सचिन राहायचा, हां, वपु वगैरेही राहायचे म्हणा) एक मद्रासी अण्णाची डेली नीड्स व एसटीडीची (एसटीडी म्हणजे एका शहरातून दुसर्‍या शहरात फोन लावण्यासाठी असलेली सुविधा, - ओन्ली नायन्टी'ज किड्स विल नो इत्यादी इत्यादी.) पानटपरी असायची, अजून असेल, आता तिथले मालक म्हणून किमान तीसेक अण्णा बदलून गेले असतील. तिथे दुपारी ५ वाजता ताजे गरम समोसे यायचे. फक्त समोसे. बाकी काही नाही. बाकी त्याच्याकडे आसपासच्या रहिवासी लोकांना रोज लागणारे चुटूर पुटुर सामान, सिगरेट, इत्यादी.

आम्हा पोरांना संध्याकाळच्या भुका लागायच्या. मग आम्ही समोसे खायला जायचो, बाजुच्या चहावाल्याकडे एक चहा घ्यायचो. एक किंवा दोन समोसे नुसते खाऊन माझे पोट भरत नसे. मग मी शक्कल लढवली. दोन समोसे घ्यायचे. एक स्वीट बनपाव घ्यायचा. त्यात दोन पाव छोटेसे यायचे, लुसलुशीत छान. मग पाव उघडायचा, त्यात समोसा कोंबायचा, सॉस ची किनार लावली की झकास!. तो समोसा आणि तो पाव अगदी 'मेड फॉर इच अदर' होते. आकार आणि चव दोन्हीच्या बाबतीत एकमेकांना तबला आणि सारंगीसारखी दाद देणारे.

तेव्हा ते दोन समोसे ५ रुपयाचे आणि बनपाव ४ रुपयाचा. एक रुपयाची सॉसची सॅशे..... असे १० रुपयात दणदणीत पोट भरत असे. त्यावर दोन रुपयाची कटींग मारली की काम तमाम!

हा प्रकार हॉस्टेलातल्या पोरांना जाम आवडला. मग पैसे नसले कुणाकडे तरी दहा रुपयात दोघांचेही जमून जात असे.

असेही, वडापाव खायला म्हणून तीन किमी पायपीट करुन फायदा काहीच नव्हता...

आळशी माणसांना क्रीएटीव आयडीया सुचतात म्हणे..... त्यात अस्मादिक दोन्हीही.... .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबैतच २००३ साली 'समोसापाव'चा शोध मी लावलाय.... !!!! काहीही!!!!
१९९९, २००० च्या सुमारास माझ्या शाळेसमोरील (विद्या विकास मंडळ, अंधेरी प.) गुप्ता वडापाव सेंटरमध्ये ३ रुपयात वडापाव, ३.५० रुपयात समोसापाव व १ रुपयात चटणीपाव मिळायचा!

मी खाल्ल्या आहे late 90s मध्ये त्यापूर्वी पण असणार पण मी तेव्हा घराबाहेर पडले नव्हते अथवा कमावती नव्हते.
ठाणा स्टेशन तेव्हाचा 5 नंबर प्लॅटफॉर्म डाऊन साईडला पहिला लेडीज जवळ. >>> राजसी तिथै अजुनही खुप छान समोसा मिळतो
बरेचजण ऊतरुन पार्सल घेतात

स्वप्नील जोशी
साई ताम्हणकार
शाहरुख खाण
गिर्लफ्रेंड.

आता सर्च सॉफ्टवेर मध्ये येतील की वर्ड्स

आमच्या ऑफिसच्या बाजुचा समोसा पण.ऐ१.
ऐकदा ठाण्यात आलोकमध्ये नाष्ट्याला पंजाबी समोसा मागवला तर पोहे होते त्यात तसाच.सोडला अन कुंजचा.वडापाव खाल्ला

एखादवेळी १९८४ - ८५ मध्ये हे खाल्ला असावा .. पण मला त्यावेळी माहीत नव्हते कि हि एक ऐतिहासिक घटना आहे .. त्यामुळे नक्की सांगता येत नाही ,
मी दादर चा श्रीकृष्ण चा वडा मात्र १९८८ मध्ये खाल्ला .
डाळ फ्राय आणि बटर बन किंवा स्वीट बन आम्लेट खाल्ले आहे का?

मलाही वडापावपेक्षा समोसापाव जास्त आवडतो. पोट जास्त भरते. गरीबांचा पदार्थ आहे. पण चटकमटक चटण्या हव्यात. आणि तळलेली मिरची मस्ट! सोबत कटींग चहा हवा. तो सुद्धा काचेच्या ग्लासातून. उजव्या हातात समोसापाव, आणि डाव्या हातात चहा. किंवा व्हायसे वर्सा. एक चावा समोसापावचा, एक घोट चहाचा. त्यातही काही महाभाग बोटांच्या फटीत सिगारेट अडकवून एक झुरका सिगारेटचाही करायचे. ही मजा वडापाव देऊ शकत नाही. किंबहुना वडापाव म्हणजे सो टिपिकल एण्ड मिडलक्लास वाटते. वडापाव खात स्टाईल मारणे ही कल्पनाही कशीचीच वाटते. त्याऊलट समोसापावमध्ये समोसा मस्त मोठाला पावाच्या बाहेर त्याची त्रिकोणी कडा येणारा असेल तर खाताना बर्गर वगैरेचा फील येतो. वडापावची चवही प्रत्येक घासाला एकसारखीच लागते. समोसापावबाबत पोटातल्या भाजीचा चावा घेताना वेगळी आणि कडेच्या कुरकुरीत वेष्टनाचा चावा घेताना वेगळी अशी डबल मजा असते. वड्यामध्ये फक्त बटाटाभाजीच भरता येते. समोश्यावर प्रयोग करता येतात. काही लोकं तर पोहेही टाकतात, तो चायनीज समोसा हा प्रकार देखील चांगला लागतो. तो पावाच्या स्लाईसला सॉस लावून त्यासोबत खायलाही मला आवडतो.

अवांतर - समोसाचे शोध लावायचे वाक्य आवडले. नोंद करून ठेवतो Wink

'समोसा पाव 'हा माझा आवडता प्रकार आहे. शाळेत कॅन्टीन मधे सगळे वडापाव किंवा नुसताच समोसा घ्यायचे मी मात्र समोसा पाव खायचे. बहूदा हा शोध पुण्यात मी ९०च्या दशकात लावला. कारण त्या वेळी माझ्या शिवाय समोसा पाव खाणार कोणी दिसल नाही.
हे खाण्याची माझी वेगळी पद्धत आहे. मी तो पोळी भाजी प्रमाणे खाते. म्हणजे एकदम बर्गर सारख तोंडात तोबरा न भरता हळू हळू एक एक घास घेत आस्वाद घेत खाते.

@Nira,
येस्स आणि आपला भाग्यश्री बटाटावडा तर जगात भारी आहे Lol

पुण्यात गरवारे समोर एका दुकानात समोसा - पाव खुप छान मिळायचा,़खुप गार्दी असायची (अजुनही मिळत असेल).

छान लिहिलंय नानाकळा.
मी इयत्ता आठवीत असताना, सन १९९५, शाळेसमोर दीड रुपयाला समोसापाव आणि सव्वा रुपयाला वडापाव मिळायचा. पण मी कधीच समोसा पावाचा शोध लावला नाही. Happy वडापावच खायचो आम्ही मधल्या सुट्टीत. समोसा पाव कधीच आवड्ला नाही. आवडत नाही.

या वाक्याच्या पुढेही बरंच काही लिहिलेलं आहे ते बहुतेक लोक वाचतील अशी अपेक्षा होती.. पण काय मजबुरी असेल देव जाणे! >>> Lol

पुण्यात गरवारे समोर एका दुकानात समोसा - पाव खुप छान मिळायचा, खुप गार्दी असायची (अजुनही मिळत असेल).
हो अजूनही मिळतो. चव तिच आहे पण आकार लहान केलाय सामोसाच्या.' तापडीया' असे नाव आहे दुकानाचे. तुम्ही म्हणता तो हाच असेल.

समोसा पाव कधीच आवड्ला नाही. आवडत नाही.>>>>>>हो मलाही नाही आवडत, दोन वेळा तेलातून तळला जातो, शिवाय मैद्याच्या पिठाचे आवरण.

समोसा न आवडणाय्रा लोकांनी खरा चांगला समोसा ( पंजाबी) खाल्ला नसेल.
वरचं मैद्याचं आवरण अजिबात लिबलिबित,कच्च नसून खुसखुसखुशित असतं.

पट्टी समोसाचं वरचं आवरण,पट्टीचे पापुद्रे कुरकुरीत असले पाहिजेत आणि आत कांद्याची पात असते. हे बहुतेक मुसलमानी एअरिआत मिळतात. आतमध्ये भिजवलेले पोहे हिरवी मिरची घातलेले सारण हा प्रकार मंगळुरी लोकांनी प्रचलित केला.
पकोडापाव प्रकारही कुर्ला वेस्टमध्ये कित्येक वर्षे आहे.

Srd यांच्याशी सहमत. खरा पंजाबी समोसा त्याची लज्जत काही वेगळीच.... माझा तर मोस्ट फेवरीट आहे समोसा... कारण ऋन्मेष ने दिले तसेच. प्रत्येक घासाला डिफरंट!!

नव्वदच्या दशकाच्या सुरूवातीला आम्ही खायचो सामोसा-पाव रोजच पुण्यात. चिंचेची चटणी असायची पावात. फारच भारी लागायचा, वडापाव पेक्षाही! सव्वा रुपायाला सामोसा/वडा-पाव, सव्वा रुपायाला चहा असा अडीच रुपयात भक्कम खाणं व्हायचं. रोज. पोळी-भाजीचा डबा अधिक हा 'अल्पोपहार' असं आम्ही रो ज खायचो! कोणालाही काहीही कधीही बाधलं नाही Lol पैसे इतके कमी असायचो, की पैजा लावताना सामोसा-पावची ट्रीटच असायची. पाच रुपायात चैनच चैन.
आता रोज सामोसा खायचा या कल्पनेनंच पोटात ढवळतं माझ्या, खाणं ही बातच दूर! Happy

सामोसा फक्त अन फक्त कँपातल्या नाझ चा.
तो ही नॉनव्हेज. (एसार्डींनी वरणम केलाय तसाच असणारा ) व्हेज सामोसा वाईट नसायचा, पण नॉनव्हेज खिमावाला सामोसा म्हणजे उम्म्म्म्म्! आहाहा!!

आजकाल नाझ बंद झाल्याचे ऐकून आहे...

<<<ठाणा स्टेशन तेव्हाचा 5 नंबर प्लॅटफॉर्म डाऊन साईडला पहिला लेडीज जवळ.>>>

हो तिथला समोसा पाव मस्तच असायचा..
हल्ली बर्‍याच वर्षात जाणे झाले नाही...

<<<< आमच्याइथे एक भन्नाट प्रकार मिळायचा तो म्हणजे पावपकोडा!! पावात बटाटेवड्याची भाजी घालुन मग तो पाव बेसनात बुचकळुन तळायचा. अहाहा!!! तसा प्रकार नंतर कुठेच खाल्ला नाही >>>

<<<< पण ब्रेड पकोडा खाल्लाय, अजुनही खाते.
बटाटेवड्याची भाजी ब्रेड मध्ये भरली की झाला ब्रेडपकोडा.
ठाण्यात गजानन मधला खाल्ला होता बर्याच वर्षा पुर्वी. आता मिळतो का माहीत नाही >>>

ठाणा काॅलेजच्या कँटीनला हा ब्रेड पकोडा मस्त मिळायचा....

<<<< ऐकदा ठाण्यात आलोकमध्ये नाष्ट्याला पंजाबी समोसा मागवला तर पोहे होते त्यात तसाच.सोडला अन कुंजचा.वडापाव खाल्ला >>>>

येस्स... कुंजविहारी चा वडा तर बेस्टच..
उद्याच जायला हवे...

समोसा पाव हा अगदीच यडपट प्रकार आहे असे माझे वै मत. वडा कसा मऊ लुसलुशीत पावाशी तदात्म्य पावतो आणि त्यात चिंचेची चटणी सोबत दाताने तोडून खायला तळलेले मिरचीचे तुकडे असले तर अजून बहार.
तसा समोसा कुटकुटीत असल्याने आणि पवातून विचित्र पद्धतीने बाहेर डोकावत असल्याने खावा वाटत नाही.

समोसा हा नेहमी स्वतंत्रच खावा, त्याच्या पोटात फाडून त्यावर लाल हिरवी चटणी चा एक लेप देऊन, किंचित शेव टाकून, सोबत कांदा असेल तर अजून भारी.

भक्कम पंजाबी समोसा असेल तर त्याला चिली सॉस मध्ये बुडवून खावा.

नाझ, महानाझ कडे मिळणार खमंग बारका समोसा तर पावात घालण्याचे पाप कधीच करू नये. सोबतीला दोन चार मित्र घ्यावेत, चहा वर चहा मागवावेत आणि एकापाठोपाठ एक ती प्लेट फस्त करावी.

चिकन समोसा ही असा सुंदर लागतो तिथला.

नका असले काही समोसा पाव सारखे धेडगुजरी काही खाऊ.

पट्टी समोसाचं वरचं आवरण,पट्टीचे पापुद्रे कुरकुरीत असले पाहिजेत आणि आत कांद्याची पात असते. हे बहुतेक मुसलमानी एअरिआत मिळतात.
>>>>>

हो.. आमच्याईथे..
मटण समोसे.. लय भारी

Pages