गाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे?

Submitted by माने गुरुजी on 7 August, 2017 - 16:03

मायबोलीवर इतर काही धाग्यांवर आय आय टी मधे पंचगव्याचे संशोधन चालू होणार यावरून काही मते वाचली. त्यात असेही मत होते की आय आय टी सारख्या संस्थेत हे होणे हे संस्थेची क्रेडिबिलिटी नष्ट होण्यासारखे आहे. मी मुद्दाम "गाईचे शेण" हा शब्द वापरला आहे, पंचगव्य हा नाही. मला केवळ आपल्या पुर्वजांनी किंवा थोर भारतीय संस्कृतीने म्हटले आहे म्हणून हे संशोधन करा असे अपेक्षीत नाही. केवळ सरकारमधल्या कुणीतरी सांगितले म्हणून हे करा हे ही मला अभिप्रेत नाही. कृपया राजकारणाच्या नजरेतून त्या धाग्याकडे पाहू नका.

तर गाय हा एक प्राणी आहे आणि त्याच्या विष्ठेतून काही उपयोगी (औषधे किंवा रसायने) मिळतात का यावर वैज्ञानिक निकष वापरून हे संशोधन केले तर काय चूक आहे असा माझा प्रश्न आहे.

घोडीच्या लघवीपासून केलेले स्त्रीरोगांवरचे अ‍ॅलोपॅथिक औषध फायझर कंपनी तर्फे बाजारात उपलब्ध आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Premarin

एमआयटी मधे माणसाच्या विष्ठेपासून उपयुक्त औषधे मिळतील का यावर संशोधन चालू आहे. इतकेच नाही तर त्यातल्या काही औषधांना अमेरिकेत FDA कडून परवानगीही मिळाली आहे.
http://www.cnn.com/2015/08/26/health/fecal-transplant-poop-medicine/inde...
https://www.theatlantic.com/health/archive/2014/09/when-feces-is-the-bes...

कॅनडात कॅलगरी विद्यापीठातही माणसाच्या विष्ठेपासून तयार केलेल्या औषधांवर संशोधन चालू आहे.
https://idsa.confex.com/idsa/2013/webprogram/Paper41627.html
http://www.foxnews.com/health/2013/10/03/pills-made-from-poop-could-cure...

इंग्लंडमधे न्यूकॅसल विद्यापीठात लामाच्या विष्ठेचा उपयोग पाण्याचे प्रदुषण कमी करण्यासाठी कसा करता येईल यावर संशोधन चालू आहे
http://news.bbc.co.uk/1/hi/england/1793381.stm

ऑस्ट्रेलियात फ्लिंडर्स विद्यापिठात व्हेल माशाच्या विष्ठेबद्दल संशोधन सुरु आहे (हे औषधांसाठी नसून पर्यावरण वृद्धी संदर्भात आहे)
http://rspb.royalsocietypublishing.org/content/277/1699/3527

युके मधे नॉटिंगहॅम विद्यापीठात झुरळांच्या मेंदूपासून तयार केलेल्या औषधांवर संशोधन चालू आहे.
http://healthland.time.com/2010/09/17/new-weird-source-of-antimicrobial-...

जर्मनीत ब्रेमेन विद्यापीठातले पेंग्विन च्या विष्ठेबद्दलचे हे संशोधन (हे औषधांसाठी नसून पेंग्विनला त्या विधीसाठी किती जोर लागत असेल यावर आहे Happy या संशोधनाला यूसलेस रिसर्चसाठी असणारे इगनोबल पारितोषिकही मिळाले. हे गंभीर संशोधन नाही )
https://link.springer.com/article/10.1007/s00300-003-0563-3

सगळ्यात शेवटचे ब्रेमेन विद्यापीठातले सोडले तर हे सगळे गंभीर संशोधन आहे. ब्रेमेन विद्यापीठातलेही यूसलेस असले तरी ते छद्मविज्ञान नाही. या कुठल्याही संशोधनामुळे त्या त्या विद्यापीठाची क्रेडीबिलिटी कमी झाली नाही.

मग आय आयटी किंवा इतर कुठल्याही संस्थेने गायीच्या शेणाचा वैज्ञानिक निकषांवर अभ्यास केला तर काय हरकत आहे?

कुठ्ल्याही अतर्क्य वाटणार्‍या संकल्पनेला , खुल्या मनाने पाहणे आणि त्या वैज्ञानिक निकषांवर उतरतात का नाही ते पाहणे प्रत्येक वैज्ञानिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्या आधिच आपण त्या कल्पनांना राजकारण्यांच्या कलुषीत द्रूष्टीतून पाहतो आहोत का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"पंचगव्यात काहीही तथ्य नाही " पासून "पंचगव्य हा एक अमूल्य ठेवा आहे" पर्यंत काहीही निकाल आले तर ते स्वीकारण्याची सरकारची आणि लोकांची तयारी आहे का?

>> अगदी मुळावरच घाव घातलाय.... पंचगव्य अमूल्य ठेवा आहे असा निकाल आला तर मी माझे प्रोडक्ट काढून विकायला सुरुवात देखील करेल... आय प्रॉमिस.

मी काय म्हणतो ,फक्त गायीचेच शेण का तपासायचे.?कुत्रा ,मांजर,उंदीर ,हत्ती,आर्माडिल्लो,मुंगी,झुरळ,डास ,गाढव सगळ्यांच्या विष्ठा भाजपप्रणित मोदी सरकारने तपासाव्यात.कशात तरी काहीतरी सापडेलच की. वाटल्यास वेगळे "विष्ठा संसाधन मंत्रालय "स्थापण करावे.हाकानाका.

मी काय म्हणतो ते नागपुरचे मुख्यालय शेणाने बनवले असेल का?
इतकी दुरदृष्टी असायला हवी नाही का?
नसेल तर बनवून टाका आणि जगासमोर उदाहरण द्या कसे

मुळात आय आय टी चा आणी पंचगव्याचा संबंध काय ? हे सी सी एम बी किंवा ए आय आय एम एस सारख्या ठिकाणी करणे जास्त योग्य आहे. पण मग आय आय टी चे लेबल नसते मिळाले.

मागे एकदा आय आय टी मुंबईच्या लोकांना होमियोपॅथी शास्त्र्शुद्ध आहे असा रिसर्च पेपर एका आडवळणी जर्नल मध्ये प्रसिद्ध केला होता. त्या पेपर मधे निष्कर्ष खरेच असते तर ते त्यांनी पीर रिव्ह्यूड केमिस्ट्री जर्नल मध्ये प्रसिद्ध केले असते व त्यांना अवश्य नोबेल मिळाले असते. तो पेपर प्रसिद्ध होताच होमियोपॅथी भक्तांना आनंदाच्या उकळ्या आल्या पण आय आय टी बी चे हसें झाले. इथेही आय आय टी डी कडून दुसरे काही अपेक्षित नाही.

बरं मी काय म्हणतो, गायीचे शेणच का तपासायचे? देशी गायीचे मांस खाल्ल्याने कित्येक रोग बरे होत असतील! यावर का संशोधन होत नाही?

कारण देशी गायीचे मांस खाल्ल्याने कित्येक रोग होत असतील यावर निष्कर्ष काढून आम्ही केव्हाच मोकळे झालो आहोत... शुद्ध शाकाहारी हिंदूंच्या व्हॉट्सप पोस्टी आपण वाचत नाही बहुतेक.. Wink

कोणत्या तरी एका नेत्याने सांगितलेले काही दिवसा पूर्वी वाचले होते कि गोमाता सगळे विष शरीरात ठेवते आणी दूध, मूत्र, आणी शेणातून औषधी द्रव्य मानवास देते. गोमास विषारी असते. खाऊ नये.

मला वाटतं बर्‍याच प्रतिक्रिया ह्या 'गाईच्या शेणाचे प्रामाणिक संशोधन करण्यात काय गैर आहे?' ह्या पेक्षा 'गाईच्या शेणाच्या संशोधनासाठी निधी का दिला जात आहे?' ह्याबद्दल आहेत. त्याचा संबंध संशोधकांशी नाही, तर राजकारण्यांशी आहे. एक संशोधक म्हणून कुठ्लाच विषय गैर नाही. आय आय टी असली तरी त्यात मूलभूत विज्ञान, गणित, ग्रामीण तंत्रज्ञान अश्या शाखा आहेत, त्यांना हे विषय अजिबात वर्ज्य नाहीत. शिवाय कुठ्ल्याही ज्ञानशाखेचा कुठेही उपयोग होऊ शकतो हे इंटरडीसिप्लिनरी संशोधन करणार्‍यांना माहीत आहे. मग फंडिंग असेल आणि संशोधकाला त्या संशोधनात काही इंटरेस्ट असेल, लिटरेचरमध्ये गॅप्स असतील, तर नक्कीच त्यात संशोधन करावे. 'ह्यात संशोधन करण्यात अर्थ आहे/काहीच अर्थ नाही' ह्यापैकी काहीही लिटरेचर सर्व्हे केल्याशिवाय ठरवू नये.

Zero Budget Natural Farming चे प्रणेते श्री सुभाष पाळेकरांनी गोमुत्र व शेणावर संशोधन करुन भारतीय शेती करण्याच्या पद्धतीत क्रांती केलेली आहे !! रासायनीक शेती रोगांना बळी पडत असल्याने भारतातला शेतकरी हवालदील होऊन आत्महत्त्या करत असताना पाळेकर गुरुजींनी त्यांच्या शुन्य बजेट शेती पद्धतीमधुन यशस्वी शेती करुन दाखवलेली आहे !!
कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ कुटुंबाच्या मदतीने गेली कित्येक वर्षे संशोधन चालुच ठेवले ! संशोधन यशस्वी झाल्यावर त्याचा फायदा समस्त शेतकरी समाजाला कोणताही मोबदला न घेता करुन दिला !!

गोमुत्र व शेणात बरेच शेतीलायक गुणधर्म आहेत हे सिद्ध झालेल आहे त्यामुळे त्यावर संशोधन होण हे राष्ट्रासाठी हिताच आहे !

जाधव,

सोनखतातही खूप शेतीयोग्य गुणधर्म आहेत. तुम्ही कधी संशोधन सुरु करताय त्यावर?

मिलिंद,
लोकोपयोगी संशोधन खरंच स्वागतार्ह आहे. त्याचा मोठा इम्पॅक्ट तेव्हा होईल जेव्हा संशोधनासाठी आवश्यक सर्व बाजूंची पूर्तता केली जाईल. संशोधन म्हणजे केवळ प्रयोग्/निष्कर्ष नसून ते काम पियर-रिव्ह्यू करून घेणे आणि पब्लिश करणे महत्त्वाचे आहे. ते जर मान्यताप्राप्त जर्नलमध्ये पब्लिश झाले, तर त्याची दखल आंतर्राष्ट्रीय स्तरावर घेतली जाईल आणि एक 'मान्यताप्राप्त संशोधन' ह्या दृष्टीने ते अमलात आणले जाईल. (अगदी असे होईलच असे नाही, पण अजिबात पब्लिश न करण्यापेक्षा पब्लिश केल्यास ह्या शक्यता निर्माण होतात). हे सर्व होणे हा देखिल 'संशोधन प्रोसेस'चाच एक भाग असतो. डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी खेड्यात संशोधन करून लॅन्सेट सारख्या जर्नलमध्ये पेपर पब्लिश केला तेव्हा त्याची दखल उच्चस्तरावर घेतली गेली आणि त्यांनी शोधलेला विंचुदंशावरचा उतारा सगळीकडे वापरला जाऊ लागला (जिथे जिथे तश्या एका प्रकारचे विंचू होते).

गोमाता आता राष्ट्रीय प्राणी होणार Happy
खालच्या धाग्यावर ही आनंदाची बातमी द्यायची होती पण तो कुलूपबंद झाला आहे नेहमीप्रमाणे विनाकारण Proud
https://www.maayboli.com/node/52961?page=14

Pages