तेनाली रामा.. सब टीवी वरील मालिका

Submitted by बी.एस. on 7 August, 2017 - 11:21

सब टीवी वर नुकतीच तेनाली रामा ही मालिका सुरू झाली आहे..रोज रात्री 8.00 वाजता..
त्यातील तेनाली रामा खूपच आवडलायं.. त्याचा हसरा चेहरा, मान हलवणं, अभिनय.. एकदम मस्त..!
त्याची मौनव्रत घेतलेली आई, पत्नी शारदा.. यांचा पण अभिनय मस्त.. विनोदी असणारी ही मालिका सर्व लहान थोरांनी एकत्र बसुन बघण्यासारखी आहे.. तर मित्रहो, ही मालिका नक्की पहा.. Happy Happy Happy
ह्या आवडलेल्या मालिके वर चर्चा करायला हा धागा..
images.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो, तुम्ही पण ही मालिका नक्की पहा.. खरचं विरंगुळा आहे..
एक जाणवतयं की, जे काही मालिकेत दाखवणार आहेत ते प्रोमो मध्ये दाखवतात आणि प्रत्यक्ष मालिका बघताना कमी दाखवतात.. ब्रेक च जास्त.. सब टीवी एच. डी. वर तर ब्रेक मध्ये नवीन मालिकांच्या अॅड बघून बघून वैताग येतो.

हा धागा मराठी वाहिनी ह्या ग्रुप वर उघडला गेला चुकून. >> याकरता वेमांना विपूतून कळवा. ते हलवतील धागा योग्य गृपमध्ये.

हो मिटलं...
रामाने आपल्या वडिलांची अपूर्ण इच्छा पुर्ण करायची आहे अस सांगून पंडितजी ना वठनीवर आणलं.
शेवटी आचार्य बोलले की राजमाताने स्वप्नात पुन्हा येऊन सांगितले की त्यांचा पुत्र आदर्श वगैरे आहे.त्याने सुवर्ण आंबे सोडून आता गरिबांसाठी काही करावे.
नंतर आचार्य ने सर्व सोन्याचे आंबे जमा केले आणि ते राजकोषात पाठवले गेले.

व्वा कऊ मस्त फोटो.!
हो चैताली.. मला पण ही सासू सुनेची जोडी खूपच आवडली आहे.

१९९० मध्ये दूरदर्शनवर ' तेनाली रामा ' ही मालिका येऊन गेली आहे. त्यात विजय कश्यपने रामाची भूमिका केली होती. उत्तम होती ती सिरियल.हा विजय कश्यप फिल्मी चक्कर मध्ये सतीश शहाचा दाक्षिणात्य शेजारी असतो आणि सुलभा आर्य त्याची बायको असते.

तेनाली रामा हा विजयनगरच्या कृष्ण देवराया च्या काळातला हास्य कवी होता. त्याला विकटकवी म्हणत. बिरबलासारख्या त्याच्या विनोदी गमती प्रसिद्ध आहेत

१९९० मध्ये दूरदर्शनवर ' तेनाली रामा ' ही मालिका येऊन गेली आहे. त्यात विजय कश्यपने रामाची भूमिका केली होती. उत्तम होती ती सिरियल. >>> हो आम्ही enjoy करायचो तेव्हा ही. आता फार आठवत नाही पण तेनाली रामा आणि विजय कश्यप हे समीकरण झालं होतं तेव्हा.

नवीन तेनालीरामा मला नीट बघताच येत नाही, आठ वाजता कामाची वेळ.

हा विजय कश्यप फिल्मी चक्कर मध्ये सतीश शहाचा दाक्षिणात्य शेजारी असतो आणि सुलभा आर्य त्याची बायको असते.
>>>>जुनी आठवण ताजी केलीत... नंतर प्रशांत दामले होत फिल्मी चक्कर मध... मस्त मजा होती.

तेनाली रामा जुनी मालिका पाहिलेले आहेत का कुणी? खरचं तथाचार्य नावाचे गुरु होते का दरबारी? सध्या भुतांच दाखवतात ती कथा होती की ..ही पण टिपीकल मालिकांच्या वळणावर चाललीये..?

मी पाहिलीये जुनी मालिका. पण हि रेग्युलरली नाही पाहिली जाते. सो काही कल्पना नाही सध्या काय चालुये. >>> सेम हियर. ती वेळ कामाची असते.