मित्रानो ,
काल मायबोलीचा २०१७ चा ववि पार पडला . माझी ३.२ वर्षाची ओवी धरून ( तिचा हा तिसरा ववि) अवघे १७ लोक होते. मुंबईहून ८ अन पुण्याहून ९.
अर्थात या १७ जणानी धमाल केली , नवे जुने मित्र भेटले , ओवीने अगदी दंगा घातलाही.
पण मला पडलेला प्रश्न होता की १७ च का ? संयोजक सोडून तर फक्त ६ लोक ?
१. गेल्यावेळी साधारण १२० लोक होते
२. गेल्या वविला काही मोठे प्रॉब्लेम झाल्याचही आठवत नाही
३. संयोजक अन त्यांचे प्रयत्नही तितकेच .
मग नक्की झाल तरी काय ? काही संयोजकांशी मी चर्चा केली , पण त्यांची उत्तरे फारशी पटली नाहीत .
सगळ्यांचे स्वतःचे व्हॉट्सअॅप ग्रुप असतीलही , ते नेहमी भेटत असतीलही , पण वविचा युएसपी नविन लोकाना भेटणे हा होता , ते वविला कसे रिप्लेस करू शकेल ?
आणि २०११ मधले ७०० अन २०१७ मधले ११०० रू एकच ना ?
अन गेल्या वेळच्या सगळ्या १२० लोकाना असे Unavoidable Issues असतील की Priorities बदलल्या आहेत ? नवीन कुणीच नाही ?
मनात आल तस लिहित गेलोय . कदाचित थोड्या वेळाने वेगळे विचार येतीलही , पण थोड अस्वस्थ वाटल इतकच .
माझा पहिलाच ववि होता, खरचं
माझा पहिलाच ववि होता, खरचं खुप मज्जा आली. एवढे वर्ष ववि ला न आल्यामुळे आपण खुप काही मिस केलयं असंही वाटलं. पुढच्या वर्षी सहकुटुंब येणार.
केदार,
केदार,
तुम्ही प्रश्नार्थक विधान शीर्षकात देऊन धागा काढलाय. होप तुम्हाला जेन्यूईन उत्तरे हवी असतील.
मी मागच्या वविच्या धाग्यावर मुद्देसुद कारणे दिली होती तेव्हा दक्षिणा या आयडीने माझी अत्यंत तीव्र शब्दांत निंदा केली होती. त्या धाग्याची लिंक सापडली तर द्या मला पुन्हा टंकायचा कंटाळा आलाय.
बिपिन , चर्चा किंवा धागा
बिपिन , चर्चा किंवा धागा माझ्या लक्षात नाही , पण असतील कारण तर त्यावर उपाय शोधायचे की नाहीत ?
किमान जे गेल्या वेळी आले होते
किमान जे गेल्या वेळी आले होते , त्यानी तरी प्रतिसाद द्या .
काही चुकत असेल तर ते सुधारता येऊ शकत , पण एवढी उदासिनता अन ती ही अचानक कशी ?
मुलांच्या परिक्षा सुरू असतात
मुलांच्या परिक्षा सुरू असतात अरे केदार त्या दरम्यान . (जुलै शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट पहिला आठवडा हे परिक्षेचे आठवडे आहेत. ) मुलांना वविमधे interest असतो त्यामुळे त्यांना घरी ठेवून यायला बरेचदा नाही जमत
गेल्या वर्षी पर्यंत मधे एखाद आठवडा असायचा लेकीच्या परिक्षेला. यंदा सुरू होत्या परिक्षा.
मास् आणि क्लास असे दोन
मास् आणि क्लास असे दोन प्रकार असतात. जगातल्या सगळ्या सोशल साईट्स आधी एका विशिष्ट क्लाससाठी सुरु झालेले. त्या नंतर हळू हळू त्या क्लासमधून बाहेर पडत या सगळ्या साईट्सनी मास कडे प्रवास सुरु केला. अगदी फेबूसुद्दा याला अपवाद नाही. त्यासाठी त्यांनी आपलं धोरण एका क्लासच्या पलिकडे नेत समावेशक असेल याची काळजी घेतली. पब्लीक फोरमवर वयक्तिक अभिरुचीची मोजपट्टी वापरणे कटाक्षाणे टाळले. मास च्या नियमाचं भान ठेवत साईटवर वावरणारी माणसं आपल्या व्यक्तिगत अभिरुची, धार्मिक व सामाजीक, बाबींशी मेळ खाणारी नसणार आणि तरी सुध्दा अशा लोकांना साईटवर असण्याचा अधिकार आहे हे मान्य करण्याचा मोठेपणा जोपासला गेला/जातो. थोडक्यात माझ्या वयक्तिक आवडिनिवडीपेक्षा भिन्न माताची माणसं असू शकतात आणि त्याना जगात असण्याचा जसा अधिकार आहे अगदी तसाच अधिकार मी निर्मीत सोशल साईटवर असण्याचाही आहे हे मान्य करण्याचा मोठेपणा सोशल साईटचा मालक/व्यवस्थापक(एडमीन) म्हणून स्वतःमध्ये असणे गरजेचे असते. माबो नेमकं ईथेच मार खाते.
माबोचं एकून धोरण हे एका विशिष्ट क्लासच्या बाजुने झुकतं माप देणारं राहिलं आहे. त्यामुळे माबोचा प्रवास क्लास ते मास असा होण्यापेक्षा क्लास ते क्लास असा होत गेला. मागच्या २० वर्षात अनेक लोकं माबोवर हा अनुभव घेत आहेत. वविच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातून येणारी बस गच्च भरलेली असायची. तीच गोष्ट मुंबईचीही असे. पण हळूहळू माबोमालकांच्या क्लास धोरणाचा वास येत गेला आणि लोकांनी माबोला टाळणे सुरु केले. हा अलार्म कोणालाच ऐकू आला नाही असे नाही. उलट ईथला तो 'क्लास' असं पिटाळून लावण्यात धन्यता मानू लागला. जोडीला माबो मालक/व्यवस्थापक या क्लासच्या पाठीशी कायम उभा राहात गेला.
आज जो काही ववीचा बो-या वाजला तो इतर कोणामुळेही नसून माबो मालकांच्या धोरणामुळे आहे. माबो वाढवायची असल्यास क्लास धोरण सोडून क्लास ते मास असं धोरण आखून घ्यावं लागेल. त्यासाठी माबोला व्यापक व लवचिक व्हावे लागेल. जास्त काय बोलू.... समजदार को ईशारा काफी!!!
केदारा, सर्वप्रथम तुला आणि
केदारा, सर्वप्रथम तुला आणि इतर वविकरांना धन्यवाद.
मला फरक पडत नाही १७ आले की ७०. हा वविही मला आधीच्या वविंइतकाच आवडला. ज्यांना जमलं ते आले, जांना नाही जमलं ते नाही आलें.
म्हणून माझ्याकडून तुझ्या प्रश्नाला इग्नोरास्त्र
मला फरक पडत नाही १७ आले की ७०
मला फरक पडत नाही १७ आले की ७०.>> हा हा हा. यापलिकडे तुम्ही काहीच म्हणू/करु शकत नाही. आणि हो, फरक पडतो... जरूर पडतो... आणि खूप मोठा फरक पडतो. आगे आगे देखो होता है क्या.
ववि २०१७ चा म्हणून १७ लोकं ..
ववि २०१७ चा म्हणून १७ लोकं .. ( स्मित )
ऑन अ सिरीयस नोट .. एकंदरच माबो चा करिष्मा कमी होतोय का ?
गणेशोत्सवाच्या धाग्यावर फक्त एक प्रतिसाद आहे .
मुलांच्या परिक्षा सुरू असतात
मुलांच्या परिक्षा सुरू असतात अरे केदार त्या दरम्यान . (जुलै शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट पहिला आठवडा हे परिक्षेचे आठवडे आहेत. ) मुलांना वविमधे interest असतो त्यामुळे त्यांना घरी ठेवून यायला बरेचदा नाही जमत
गेल्या वर्षी पर्यंत मधे एखाद आठवडा असायचा लेकीच्या परिक्षेला. यंदा सुरू होत्या परिक्षा.
>> धन्यवाद कविन , हे एक Valid कारण आहे , कदाचित ववि सुरू झाले तेव्हा परिक्षा या वेळेत होत नसतील. कधी करायचा यावर कदाचित विचार करता येऊ शकेल का ?
मला वाटत यंदा ववीच्या
मला वाटत यंदा ववीच्या ठिकाणाची निवड चुकली
रिसॉर्टचे फोटो पाहून मला तरी एवढे पैसे आणि वेळ घालवून यावं असं वाटलं नाही
रानपाखरूंचे विवेचन चांगले आहे
रानपाखरूंचे विवेचन चांगले आहे. अर्थात खखो तेच जाणो. मला 'माबो मालक' कोण वगैरे माहिती नाही.
वविला न येण्याची कारणे मी पूर्वी दिली होती. तरी पुन्हा एकदा:
१. मला भिजणे जमणार नाही. त्यामुळे पावसाळा सोडून जर कधी सहल निघाली तर विचार करता येइल.
२. कुठेतरी मनात अजूनही वाटते की इथल्या आभासी जगातील माणसांना आभासी जगातच राहू द्यावे. खर्या जगातील अनेक आप्त्/मित्रांबरोबर आपण सहली करत असतोच. त्यांच्याशीही आपले मतभेद असू शकतात पण, आपण एक मर्यादा पाळून कटूता येउ देत नाही. थोड क्यात आपण तेथे एक्मेकाला सांभाळून जगत असतो.
... या संस्थळांचे मात्र बिल्कूल तसे नाही असे खेदाने म्हणतो. इथे दडून गोळ्या मारायची सोय ठेवलेली आहे आणि तिथेच खरी गोची आहे. इथे ५-१० वर्षे वावरलेल्या अनेकांनी अनेकांना कायमचे दुखवून ठेवले आहे. दडून तोफांचा भडि मार जर वारंवार झाला तर मग दिलजमाईची बात दूरच. तेव्हा एखाद्याला अशी एखादी अप्रिय व्यक्ती वास्तव जगात, आणि तेही पैसे मोजून जायच्या सहलीला बघणे बहुदा आवडणार नाही.
तरीही जे नियमित ववि आयोजित करतात वा त्याला जातात त्यांचे मी कौतुक करतो.
कधी १७, कधी ७०, हे तर
कधी १७, कधी ७०, हे तर चालायचंच.
पण तरी
मला वाटत यंदा ववीच्या ठिकाणाची निवड चुकली. रिसॉर्टचे फोटो पाहून मला यावंसं वाटलं नाही
याला +१
वविचा धागा आल्या आल्या मी उघडला होता. पण फोटो पाहून विचार सोडून दिला.
(शिवाय, यंदा टी-शर्ट योजना नव्हती त्यामुळेही ववि-स्पिरिट कमी तयार झालं असावं का? )
तेव्हा एखाद्याला अशी एखादी
तेव्हा एखाद्याला अशी एखादी अप्रिय व्यक्ती वास्तव जगात, आणि तेही पैसे मोजून जायच्या सहलीला बघणे बहुदा आवडणार नाही.
>>> कुमार१, उलट, आभासी जगातल्या अप्रिय वाटणार्या व्यक्तींबद्दलची मनातली जळमटं दूर करण्यासाठी वविसारखी दुसरी जागा नाही!
रानपाखरु आणि कुमार१ यांच्या
रानपाखरु आणि कुमार१ यांच्या प्रतिसादांशी सहमत.
बिपिन , रानपाखरू अन कुमार ,
बिपिन , रानपाखरू अन कुमार , धन्यवाद .तुमच्या मताचा आदर आहेच.
पण असा विचार करणारे बहुधा फारसे कुठल्याच वविला आले नसतील , त्यामुळे १०० १२० चे १७ होण्याच कारण ते नसावेत.
माझा प्रश्न मुख्यतः अशाना आहे की जे आधी यायचे , पण आता आले नाहीत
त्याची ३ कारणे वर दिसली . आणखीही काही असू शकतात का ? आणि यावर वविआधी चर्चा होऊ शकली असती का ?
१. मुलांच्या परिक्षा त्याच वेळी असण
२. रिसॉर्ट ची निवड
३. टी शर्ट नसणे
माझ्यापुर्त याचं खरं उत्तर
माझ्यापुर्त याचं खरं उत्तर देते ....मला अचानक महत्वाचं काम आलं होतं ते कदाचित १% मी पुढे ढकलू शकले असते पण तसं करावं वाटलं नाही याची ही कारणं :
१) मी पहिल्यांदा वविला आले तेंव्हाच्या आणि आत्ताच्या माबो वातावरणात झालेले अमुलाग्र बदल
२) पुण्यातल्या लोकांना भेटण्यासाठी गटग करता येतात, ववि मी प्रामुख्याने मुंबईतल्या लोकांना भेटता यावं म्हणून अटेंड करते, या वेळेला ज्यांना भेटायचं आहे त्यातली ७८% लोकं नव्हती. अगदी पुण्यातल्याही ज्या लोकांसोबत आवर्जुन दंगा करावासा वाटतो असेही अनेक जण नव्हते.
३) मी शेवटचा ववि अटेंड केला त्या वर्षी पासून ववितली मज्जा कमी झाल्याचं अनेकांकडुन ऐकलं आणि काही अंशी मलाही पटलं ( मी एकुण ३ ववि अटेंड केलेत आणि मजा उतरत्या क्रमाने आहे
४) माबोने माझ्या आयुष्यात अनेक बदल केलेत, खोटं नाही सांगत पण 'घडवलंय' , कित्येक माबोकर माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. मायबोली माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे तरी आजकाल माबोवर यावंस वाटत नाही ते इथल्या सध्याच्या वातावरणामुळे.... हे सगळं लिहायचं कारण म्हणजे ववि आहे/ होऊन गेला वगैरे अनेकांना माहीत सुद्धा नव्हतं
{{{ म्हणजे ववि आहे/ होऊन
{{{ म्हणजे ववि आहे/ होऊन गेला वगैरे अनेकांना माहीत सुद्धा नव्हतं }}}
पब्लिसिटी तर जोरदार झालेली होती. राशिभविष्याच्या निमित्ताने कुठलेही पान उघडले तर उजव्या कोपर्यात हमखास वविची जाहिरात / घोषणा दिसत होती.
बायदवे केदार,
इथे हा गेल्या वर्षीचा धागा आणि त्यावरील माझा प्रतिसाद वाचायला मिळेल.
https://www.maayboli.com/node/59237?page=6
तुम्ही मांडलेल्या " आणि २०११ मधले ७०० अन २०१७ मधले ११०० रू एकच ना ?" ह्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या परीनं असं देईल की मुद्दा रकमेचा नसून प्रायॉरिटीज आणि चॉईसचा आहे. एखाद्याला कॉकटेल पार्टीवर १००० रुपये खर्च करायला आवडतील; दुसर्याला आवडणार नाही. तसंच मडबाथ, पाण्यात डुंबणे याकरिताचा खर्च मला अनावश्यक वाटते. त्यापेक्षा राजमाचीवर एखादे गटग केले तर अनेक जण येतील स्वतःला आवडणार्या गोष्टींवर स्वतंत्रपणे खर्च करतील. जुलै महिना आहे तेव्हा पावसाच्या नैसर्गिक पाण्यात भिजतील. वॉटर पार्कच्या पाण्यात स्पेशल कॉश्चूम (शब्द तपासून घ्यायला हवाच का स्पेशलिस्ट ताईं कडून) मध्ये डुंबायचं असेल तर पावसाळा कशाला हवा आणि त्याला वर्षा विहार तरी का म्हणा? हा उद्योग तर मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात केलेला जास्त सोयीस्कर.
असो. राजमाचीवर किंवा कुठल्याही इतर सोयीच्या ओपन प्लेसला ठेवलं तर मी नक्की येईन.
मायबोली माझ्यासाठी फार
मायबोली माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे तरी आजकाल माबोवर यावंस वाटत नाही ते इथल्या सध्याच्या वातावरणामुळे....
>>> हे नेमके कधीपासून झाले असावे? म्हणजे मला आताशा दिड वर्ष झाले आहे माबोवर, सक्रिय म्हणून गेले तीन चार महिने लिहित आहे. एकूण जालावर लिहायला लागल्यापासूनच म्हणजे तीनेक वर्षापासून आता जसे वातावरण आहे तसेच बघितले आहे सगळीकडे .
जुण्याजाणत्यांनीही सतत असेच सांगितले आहे की जालावर सगळ्या प्रकारचे लोक येतात वगैरे... तरी वातावरण बदलले हे जे ऐकायला येते ते काय आहे अशी उत्सुकता माझ्यासारख्या नवख्याला लागून राहते. माबोला वीस वर्शे झालीत, अनेक उन्हाळे पाव्साळे पाहिलेल्या लोकांनी सांगायला पाहिजे.
माझ्या मते...
माझ्या मते...
१> शाळेत जाणार्या मुलांच्या आलेल्या 'परीक्षा' (तिमाही/चाचणी) इ.
२> दरवर्षी दरांमध्ये होत जाणारी (अपरीहार्य) 'दरवाढ'...
... या दोन महत्वाच्या मुद्य्यांमुळे, वविला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प झाला.
पहिल्या मुद्द्याबाबत यापुढे ववि आयोजीत करताना संबंधीत 'संयोजकां'नी जरुर विचार करावा.
दुसर्या मुद्द्यावर कुणाचेच नियंत्रण नाही, हे मी स्वानुभवा वरुन सांगतोय...
टी शर्ट नसणे...>>>... दोन वर्षांपूर्वी माबो प्रशासकांनी 'एक वर्ष आड टी-शर्ट' जाहीर केलेत. त्यामुळे या वर्षी टी-शर्ट नव्हते. दोन वर्षांपूर्वी देखिल नव्हते (२०१५ - U K Resort ववि), पण त्यावेळी या मुद्द्यावरुन, वविला मिळणारा प्रतिसाद कमी झालेला नव्हता,,,
रिसॉर्ट ची निवड...>>>... या गोष्टीची निवड करताना, एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला जातो, तो म्हणजे मुंबई आणि पुण्यातून सहभागी होणार्यांना (शक्य तेवढे) मध्यवर्ती ठिकाण पडावे, जेणे करुन प्रवासात जास्त वेळ (येता-जाता) खर्च होऊ नये. आणि त्यामुळेच 'लोणावळा' आणि आजुबाजुच्या परीसरातील रिसॉर्ट शोधली जातात. माझ्यामते या वर्षी निवडलेलं रिसॉर्ट (United 21) हे रिपीट झालेलं नव्हतं. तरी देखिल अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही, हे देखिल नाकारता येत नाही.
तरी देखिल 'बागुलबुवा' प्रमाणेच या वर्षी सहभागी झालेल्या सगळ्यांसोबत मी देखिल यंदाचा ववि मस्त एन्जॉय केला...
थोडक्यात माझ्या वयक्तिक
थोडक्यात माझ्या वयक्तिक आवडिनिवडीपेक्षा भिन्न माताची माणसं असू शकतात आणि त्याना जगात असण्याचा जसा अधिकार आहे अगदी तसाच अधिकार मी निर्मीत सोशल साईटवर असण्याचाही आहे हे मान्य करण्याचा मोठेपणा सोशल साईटचा मालक/व्यवस्थापक(एडमीन) म्हणून स्वतःमध्ये असणे गरजेचे असते. माबो नेमकं ईथेच मार खाते. >>> काफी गहरी चोट खायी लगते हो.
मला वाटत यंदा ववीच्या
मला वाटत यंदा ववीच्या ठिकाणाची निवड चुकली
रिसॉर्टचे फोटो पाहून मला तरी एवढे पैसे आणि वेळ घालवून यावं असं वाटलं नाही >> या प्रश्नाचं उत्तर एक संयोजक म्हणून द्यायचा प्रयत्न करते.
दरवर्षी संयोजक म्हणून वविचे ठिकाण ठरवणे हे मोठे चॅलेंज असते. ठिकाण दोन्ही बाजूने येणार्या लोकांना सोयीचे असावे, आर्थिक रित्या परवडणारे असावे, या शिवाय घेणार्या वर्गणीतून (सांस्कृतिक कार्यक्रम्/बसखर्च/टोल्/ पार्किंग इ) अनेक गोष्टी साधायच्या असतात. आणि वविचे ठिकाण नाविन्यपुर्ण असावे हे तर आलेच. दर वर्षी फक्त तितक्याच एका पट्ट्यात रिसॉर्ट शोधणे आणि ते पण नविन, हे काम जिकिरिचे असते.
या वर्षी आम्ही एक अतिशय सुंदर रिसॉर्ट शोधला होता त्यांनी आम्हाला रेट्स ही चांगले दिले होते शिवाय ते ठिकाण अतिशय सुंदर आणि तिथे करण्याजोग्या खूप गोष्टी होत्या. सर्व घोळ घातला तो जी एस टी ने. तो नक्की किती आकरणार यावर ठाम बातमी न मिळाल्याने आम्ही तो जास्तीत जास्त म्हणजे २८% आकारला तर? या गणिताने हिशोब काढला तर तो दरडोई खूप जास्त होत होता. त्यामुळे युनायटेड हा दुय्यम ऑप्शन होता आणि तिथे आम्हाला जी एस टी बद्दल नक्की आकडा मिळाला त्यामुळे शेवटचे ऑप्शन म्हणून तो फायनल केला. कारण पहिल्यांदा जो रिसॉर्ट फायनल केला होता त्यांना अनेकदा फॉलो करूनही त्यांनी आम्हाला ताटकळत ठेवले मग आमच्याकडे काहीही पर्याय उरला नाही. इतर अनेक रिसॉर्ट बजेट च्या अतिशय बाहेर होते.
एकदा ठरवलेली वर्गणी पुन्हा पुन्हा बदलता येत नाही, दरडोई किती पैसे आकारायचे याचे पर्म्युटेशन कॉम्बिनेशन करावे लागते, १७-२० आले तर किती? ३०-३२ आले तर किती? कारण लोक कमी झाले तर बस चे पैसे वाढतात. पुरेपुर प्रतिसाद मिळाला तर बस चे पैसे योग्य पद्धतीने विभागले जाऊ शकतात. पण समजा ४२ लोकांनी बुकिंग केले तरी ५० सिटर बस बुक करावी लागते आणि उरलेल्या ७ सिट्स चे पैसे (वाढिव) पुन्हा सर्वात विभागून आकारावे लागतात. असो. संयोजनाचे काम बर्यापैकी डिमांडिंग असते, त्यातून सर्वांची मने आणि आवडी निवडी सांभाळणे जमतेच असे नाही. वविचा पायलट सुद्धा सर्व संयोजक आपापल्या खर्चाने करतात (जाणे येणे, खाणे इ.)
या वर्षी बर्याच अडचणी आल्या त्या लिहिण्याची किंवा चर्चा करण्याची ही जागा नव्हे.
त्यामुळे थांबते.
120 चा 17 आकडा. ही खरेच फार
120 चा 17 आकडा. ही खरेच फार मोठी तफावत आहे. नक्कीच व्हॉटसपग्रूप्सवर तू आहेस का रे यंदा, तू नाहीस का, मग मी सुद्धा नाही, मग जाऊ दे आम्हीही नाही.. असे काही घडून मोठाले ग्रूप कटाप झाले असावेत.
मला वाटते अश्या ग्रूप्सना शोधून पहिला त्यांच्या आवडीने आणि सोयीने वविच्या तारखा ठिकाण वगैरे सेट करावे ..
मी वविला येत नाही, येणारही नाही. पण प्रामाणिकपणे जो प्रॅक्टीकल विचार सुचला तो मांडला.
वर लिहिणार्या संयोजकांशी १००
वर लिहिणार्या संयोजकांशी १०० % सहमत (मी संयोजकही नाही अन ववि वगळता त्यांच्या फारसा संपर्कात ही नाही).
खर तर संयोजकांसाठी सर्वात जास्त वाईट वाटत , आपण एवढे प्रयत्न करूनही प्रतिसाद नाही मिळाला तर खूप वाईट वाटत असेल नक्कीच.
मी मागच्या वविच्या धाग्यावर
मी मागच्या वविच्या धाग्यावर मुद्देसुद कारणे दिली होती तेव्हा दक्षिणा या आयडीने माझी अत्यंत तीव्र शब्दांत निंदा केली होती. >> माफ करा बिपिन पण मी निंदा करण्याच्या हेतूने कोणतेही शब्द वापरले नव्हते. पैकी तुम्हीच रिसॉर्ट वाल्याला साकडे घाला, किंवा तुम्ही व्यवहारी आहात तुम्हाला ते कळेल की नाही याची शंका वाटते या काही शब्दप्रयोगांना तुम्ही निंदा म्हणून घेत असाल तर मी अजून काय बोलू? तुमचे लॉजिक तेव्हा ही पटले नव्हते आणि आता ही पटले नाही. तेव्हा सुद्धा यायचा बेत नसूनही तुम्ही निव्वळ एक मुद्दा काढून चर्चा घडवून आणलीत.
ओपन प्लेस ऐवजी रिसॉर्ट ला ववि करण्याची अनेक कारणे असतात. सर्व वयोगटातले लोक असल्याने लहान मुलांपासून म्हातार्यांपर्यंत सर्वांना आणि आजारी लोक (असतील किम्वा अचानक पडले तर) उपाय हाताशी सापडावे (दवाखान/वाहनाची सोय इ.) इतक्या सर्वांना घेउन समजा राजमाची वर गेलो तिथे लहान मुलांना आणि इतरांना काय खाऊ घालणार आणि कसे? खूप चालणे, वरती चढणे इ. अॅक्टिव्हीटिज सर्वच जण करू शकतील असे नाही.
त्यातूनही >> जुलै महिना आहे तेव्हा पावसाच्या नैसर्गिक पाण्यात भिजतील. वॉटर पार्कच्या पाण्यात स्पेशल कॉश्चूम (शब्द तपासून घ्यायला हवाच का स्पेशलिस्ट ताईं कडून) मध्ये डुंबायचं असेल तर पावसाळा कशाला हवा आणि त्याला वर्षा विहार तरी का म्हणा? हा उद्योग तर मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात केलेला जास्त सोयीस्कर. >> या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्वानुमते ववि चा महिना/ तारिख बदलता येईल.
या वर्षीच्या ववीच्या जाहिराती
या वर्षीच्या ववीच्या जाहिराती फार कल्पक आणि छान होत्या. मला वाटले के भरपूर प्रतिसाद मिळेल.
बाकी तो वरचा क्लास वि मास प्रतिसाद इथे फारच अस्थानी आहे. वविला जाणारे बहुसंख्य लोक माबोच्या सो कॉल्ड क्लासमधले नसतातच. हा बहुतेक एक सर्वात जास्त समावेशक माबो उपक्रम आहे.
पब्लिसिटी तर जोरदार झालेली
पब्लिसिटी तर जोरदार झालेली होती. राशिभविष्याच्या निमित्ताने कुठलेही पान उघडले तर उजव्या कोपर्यात हमखास वविची जाहिरात / घोषणा दिसत होती.
>>>
पुर्वी माबो वर येणारे आणि आता न येणारे नेमाके किती आहेत ते माहीत आहे का?
रिया तु मागच्या वर्षी नव्हतीस
रिया तु मागच्या वर्षी नव्हतीस वविला. पण मागचा ववि खरोखरी ग्रँड झाला होता. तुफ्फान प्रतिसाद, सुंदर जागा, स्मूथ आणि स्विफ्ट एकदम.
दक्षिणा ! तुझी मुद्देसुद
दक्षिणा ! तुझी मुद्देसुद उत्तर आवडली, सन्योजक म्हणून काहीही अॅरेन्ज केल आणि हवा तसा प्रतिसाद आला नाही की वाईट वाटतच ...
माबोचे यश्स्वी उपक्रम चालु राहावेत अस नेहमीच वाटत.
मी कधी आलो नाहीये. पण एक
मी कधी आलो नाहीये. पण एक स्पेक्युलेशन म्हणून ही कारणे असतील का?
१. माबोचा वाचकवर्ग वयाने वाढला. जास्त व्यवधाने आली पण वविच्या स्वरूपात काही फरक पडला नाही. आता वयाने वाढलेल्या व्यक्तिना दरवर्षी त्याच त्याच प्रकारे संपन्न होणाऱ्या सोहोळ्यात रिलेट व्हायला जमत नाही.
२. नवीन/ तरुण पिढी माबोवर फिरकत नाहीये. थोडक्यात माबोचं सरासरी वय वाढतंच चाललंय. माबो तरुण कशी करायची/ ती जास्त काळ रीलेवंट ठेवायची आहे का नाही हा प्रशासकांचा प्रश्न. पण सध्याच्या वाढलेल्या वयाला साजेसा उपक्रम केला तर जास्त प्रतिसाद मिळेल का?
३. वर संयोजकांनी प्लेस सिलेक्शन मध्ये त्यांची लिमिटेशन सांगितली की मुंबई/ पुणे मध्यवर्ती, पूल हवा इ. इ. त्यात काही कंडीशन शिथिल होऊ शकतात का?
४. वर अनेक लोक ७० का १७ काही फरक पडत नाही, आम्हाला मज्जाच आली असं लिहित आहेत. संख्येने संयोजकांना फरक पडला पाहिजे होता असं वाटलं. थोडक्यात जरा अरेरावीच वाटलं ते बोलणं.
Pages