सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचोरीचं रॅकेट उघडकीस येत आहे.पुर्वी पेट्रोलमध्ये भेसळ करत होते ,आता तो मार्ग बंद झाल्यावर हा नवीन प्रकार सुरु झाला आहे.
काय आहे प्रकरण???
गाडीत इंधन सोडताना ते मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवलेली असते,ज्यावर आकडे दिसतात त्याच्याआत ही सिस्टीम असते.सध्या या सिस्टीममध्ये गडबड करुन काही मीलीलीटर इंधनाची चोरी करुन रोज लाखात नफा कमावला जात आहे.यात सगळेच पेट्रोलपंपचालक सामील आहेत.लोक सुटं पेट्रोल घ्यायला कॅन घेऊन आल्यास त्यांना मात्र योग्य पेट्रोल दिले जाईल अशी खबरदारी घेऊन हा गोरखधंदा चालू आहे.यात वरपर्यंत पैसा पुरवून प्रकरणं दाबली जात आहेत.
आपण काय करु शकतो?
शक्य असल्यास तक्रार करावी पण त्याचा उपयोग होईल याची गॅरंटी नाही.
या धाग्यावर तुम्हाला शंका असलेल्या अश्या चोरचिलटांचा जाहीर उल्लेख करुन इतरांना सतर्क करता येईल.
शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल घ्यावे,यात बराच कुटाणा असला तरी हे रॅकेट जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत हाच पर्याय आहे.
ग्राहकहीतासाठी सादर.धन्यवाद.
महाराष्ट्रात इंधनचोरीचे रॅकेट ,उपाय काय???
Submitted by सिंथेटिक जिनियस on 28 July, 2017 - 07:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.सध्या या सिस्टीममध्ये गडबड
.सध्या या सिस्टीममध्ये गडबड करुन काही मीलीलीटर इंधनाची चोरी करुन रोज लाखात नफा कमावला जात आहे.या>>>> थोड अजुन स्पष्ट लिहा की ह्यावर.नक्की काय गडबड करतात.अर्धवट माहिती वाटते मग.
शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल
शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल घ्यावे,
>>>>>
असे देतात का सुटे?
<<सध्या या सिस्टीममध्ये गडबड
<<सध्या या सिस्टीममध्ये गडबड करुन काही मीलीलीटर इंधनाची चोरी करुन रोज लाखात नफा कमावला जात आहे.या>>>> थोड अजुन स्पष्ट लिहा की ह्यावर.नक्की काय गडबड करतात.अर्धवट माहिती वाटते मग>>
------- इलेक्रॉनिक चिप मशीनमध्ये बसवली जाते, मग चिपमधे सेट केल्यानुसार काही प्रमाणात पेट्रोल कमी मिळते. अशा पेट्रोल स्टेशनमधुन ग्राहक जेव्हा १ लिटर पेट्रोल घेतो, तेव्हा प्रत्यक्षात त्याला केवळ ९४० मि ली मिळते आणि ६० मि ली कमी दिल्या जाते. या आशी अशा प्रकारची फसवणुक उत्तर भारतात आढळली आहे.
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/lucknow-pet...
http://indianexpress.com/article/india/inter-state-racket-busted-petrol-...
<<<यात वरपर्यंत पैसा पुरवून
<<<यात वरपर्यंत पैसा पुरवून प्रकरणं दाबली जात आहेत.>>>
अशी तुमची शंका आहे, की आपले उगाचच? -
लोक म्हणतात भारतात सगळे पैसे खातात म्हणून आपणहि तेच लावून द्यायचे?!
खात असतील तर हे प्रकरण उघडकीला का आणत नाहीत कुणि जागृत पत्रकार?
(की त्यांनाहि लाच दिलेली असते? सांगता येत नाही. )
अर्ध्या लोकांना दोन वेळा खायची मारामार नि उरलेले अर्धे क्रिकेट नि बॉलिवूडमधे दंग - खाईनात का खणारे. आपणहि खाऊ!
कोणाचा लेख होता मला आठवत नाही
कोणाचा लेख होता मला आठवत नाही , बहुतेक अवचटांचा,
त्यांनी लिहिलेले,
पेट्रोल पंम्प वर काम करणाऱ्या लोकांचे पगार, त्यांचे हे वरचे उत्पन्न गृहीत धरून ठरवलेले असतात.
कम्पनी ची मालकी असणाऱ्या पेट्रोल पम्पवर अशी पॉलिसी नसेल अशी आशा करतो
शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल
शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल घ्यावे,
<<
सुटे पेट्रोल वा डीझेल तुमच्या "सिंथेटिक बुद्रुक" मध्ये मिळत असेल, इतर शहरात नाही.
वाहनात किती पेट्रोल आहे
वाहनात किती पेट्रोल आहे ह्याचे अचूक मोजमाप दाखवता आले तर ह्याला आळा बसू शकेल. जर वाहनातील मीटर अमुक इतके लिटर पेट्रोल दाखवत असेल आणि पंपाचा मीटर वेगळे सांगत असेल तर पुराव्यासकट तक्रार करता येईल. पण अशा प्रकारे काटेकोर मोजमाप दाखवणारे गेज कारमधे बसवता येते का माहित नाही. पण बनवायला हरकत नाही.
ते करायला नि सर्व गाड्यात
ते करायला नि सर्व गाड्यात बसवायला बराच खर्च येईल. मग गाडीची किंमत एव्हढी वाढेल की त्यापेक्षा थोडे पेट्रोल कुणि चोरले तर परवडेल.
कुठलेहि काम इमानदारीने न करणे हाच ज्यांचा बाणा त्या लोकांबद्दल काय बोलणार? दर माणशी एक पोलीस ठेवला तर त्यातलेहि अर्धे पोलीस पैसे खाऊन काम नीट करणार नाहीत.
<< दर माणशी एक पोलीस ठेवला तर
<< दर माणशी एक पोलीस ठेवला तर त्यातलेहि अर्धे पोलीस पैसे खाऊन काम नीट करणार नाहीत.>>
------- दर ३ पोलीसान्च्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी अजुन....
सुट्टे पेट्रोल मिळणार नाही
सुट्टे पेट्रोल मिळणार नाही असा बोर्ड आमच्या इथल्या पंपावर लावून ठेवलाय. आणि सुट्टे पेट्रोल घेतले तर ते गाडीत भरताना 100 ml पडून फुकट जाईल.
भारतोय लोकांच्या ह्या जाऊ तिथे खाऊ खाबूगिरीवर काय उपाय करणार? जे यावर टीका करतात ते त्यांच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या तरी कुठे करताहेत प्रामाणिकपणे? इथल्या लोकांची वृत्तीच अशी आहे. त्यामुळे 60 ml पेट्रोलचा कुठे लोड घेत बसणार? दिवसाला अप्रामाणिकपणाच्या अशा 50 गोष्टी समोर दिसतात. कशाकशाबद्दल लोड घेणार? लोक स्वतःहून हे बंद करतील तो सुदिन. बाकी इतर काही उपाय शोधलेत तर करणारे तुमच्यापेक्षा भारी उपाय शोधतात.