मी अनुभवलेलं बीएमएम २०१७- ३

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 July, 2017 - 23:25

प्रमुख पाहुणे श्री मनोहर पर्रिकर विशेष भाषण (किनोट स्पीच) करताना.
IMG_2796_mb.jpg

फोटो समीर सरवटे
20170708_100309_1499522614142_001_mb.jpg

Group content visibility: 
Use group defaults

कि यावेळी सगळे इतके परफेक्शन म्हणून कोणी काही लिहिले नाही ? >> मला असंच वाटलं.
देसाई, प्राणा छान वृतांत. >> अनुमोदन ! धन्यवाद !!
विजया मेहता आल्याच नाहीत कां?

वाचते आहे.
धन्यवाद, पर्देसाई, प्राणा आणि समीर. Happy

विजया मेहता आल्याच नाहीत कां?>> नाही. घरात कोणीतरी हॉस्पीटलमध्ये असल्याने त्या येऊ शकल्या नाहीत. त्यांच्या जागी "सोनाली कुलकर्णी sr." आली होती.

कि यावेळी सगळे इतके परफेक्शन म्हणून कोणी काही लिहिले नाही ? >> असं काही नसावं. जे चांगलं झालं आहे त्याला पण भरभरुन दाद दिली पाहिजे. (मी लवकरच लिहिन Happy ) बहुतेक मायबोलीकर कमी होते यंदा तिथे.

नाटक अग्निदिव्यः एबाबा असताना नाटक चुकवणे शक्य नव्हते. नाटक अतिशय उत्तम झाले. मुळ नाटक प्र.ल. मयेकरांचे तिन अंकी नाटक होते, जे काटून छाटून दोन अंकी करण्यात आले होते. नाटकाच्या मधे एक दोन ठिकाणी एकच पात्र कथा सांगत असताना, नाटक थोडे कंटाळवाणे झाले (माझ्या शेजारी प्रेक्षक झोपले होते)... पण लगेच कुठच्या प्रसंगापासून पुन्हा नाटकाने गती घेतली.

Opening Ceremony: खूप छान होता असे ऐकतो.. माझ्या नाटकाची तालिम तेव्हाच असल्याने शेवटची १५ मिनिटे बघितली. Closing Ceremony म्हणजे महेश काळे यांचे गाणे, त्याबद्दल लिहिले आहेच.

नाना पाटेकरः अतिपरिचयात अवज्ञा असे झाले. फिली सम्मेलनात त्यांची मुलाखत बघितली होती तीच ६ वर्षानी पुन्हा होती असे बर्‍याच लोकांचे म्हणणे पडले. त्यात सोनाली कुलकर्णीला ते बोलू देत नव्हते म्हणे. नाना पाटेकर नेहमीच बृममला असतात, आणि विजय केंकरे मुलाखत चांगली घेऊ शकत नाहीत (माझे मत).

Pages