"गर्ल्स हॉस्टेल"

Submitted by कविता९८ on 20 June, 2017 - 22:57

झी वरील राखेचा नंतर कलर्सवर देखील "चाहूल" ही हॉरर मालिका आली..
आणि आता झी युवा वर "गर्ल्स हॉस्टेल" ही नवीन हॉरर मालिका येत आहे..
त्यासाठी हा नवीन धागा

https://youtu.be/zpIwYArUMes या लिंक वर प्रोमो बघायला मिळेल.

Group content visibility: 
Use group defaults

पूर्ण हॉस्टेल रिकामी कस पण ?>> बाकीच्या मैत्रिणी ट्रिपला जातात आणि तिची परीक्षा असते म्हणून ती थांबते एकटीच.

पहिला भाग खूप कंटाळवाणा झाला. यापेक्षा 'चाहूल' चा पहिला भाग बरा होता. हॉस्टेलच्या मुलींचा फुकट दंगा दाखवण्यात सगळा वेळ गेलाय. सहीसही 'खिलाडी' मधल्या कँटीनच्या मारामारीचा आणि मग प्रिन्सीला गंडवण्याचा सीन उचलल्यागत वाटलं. टिव्हीवर त्या मुली मुंपुमुं बघत असताना क्षणभर ही मालिका सोडून तो पिक्चरच पहावा असा मला पण मोह झाला Proud
बाकी अगदी शेवटच्या २ मिनीटांत हॉरर हिंट दिली आहे.
टायट्ल्स मस्त आहेत. मालिकेने त्यांना तरी न्याय द्यावा इतकीच अपेक्षा आहे. मांडलेकर, ऐकताय ना? Proud

rmd, पुर्ण पोस्टशी सहमत.
मुलींचा दंगा म्हणजे लुटुपुटुचाच होता.
ती मुलगी शॉल घ्यायला वर गेली असताना काळा ड्रेस होता. नंतर जो सीन दाखवलाय त्यात वेगळाच होता.
ती रेक्टर बाई 'राखेचा' मधली होती ना?

आजचा भाग जरा बरा होता. अर्थात त्यात हॉरर काहीही नव्हतं. नुसत्याच जंप स्केअर्स चालू आहेत त्या पण एपिसोड्सच्या शेवटी.

कालचा भाग बोअर. ती कोण झंपक होती, ईनस्पेकटरला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारी? ती वेळ होती का हा ऊदयोग करण्याची?
horror show मधे काहीतरी comedy टाकायचा प्रयत्न का?
साराचे आई वडिल किती कोरडे.!! मुलीचा मृत्यु झालाय, खुन झालाय आणि दोघं contribute करतायत अंत्यसंस्काराचा खर्च.

मालिका अजिबात घाबरवणारी वाटत नाही अजून तरी; पहिल्याच भागात एक रहस्यमय मृत्यु दाखवून थरार दाखवायचा प्रयत्न काही जमला नाही. किती ती बालिश भांडणे चालू होती. प्रोमो आणि मालिकेतील होस्टेल ची बिल्डिंग वेगळी दिसतेय.
सध्या तरी मालिकेला माझा पास.

horror show मधे काहीतरी comedy टाकायचा प्रयत्न का? + १११ हो ना.

काल ५ मिनिट बघितली ही मालिका. मोबाईल ला पासवर्ड् नाही ह्यात एवढे Uhoh काय आहे? त्या रेक्टरशी बोलत असतानाचा फालतू विनोदीपणा बघुन टिव्ही बंद केला.

तिकडच्या भूतांना इकडे माबोच्या अमानवीय धाग्यावर विझिट करायला सांगा ट्रेनिंगसाठी Wink

साराच तोंड मरताना अस का होतं???
डोळे वर तोंड उघडं??
तिच्या मैत्रीणी बोलल्या की तिला अस्थमाचा attack आला...attack आला की अस होतं का???
:|

मैत्रींणींना आण पोलिसांना वाटतय की तो अस्थमाचा अ‍ॅटॅक होता. प्रत्यक्षात वेगळं काही असेल. कोणी खुन केला असेल किंवा खरच भुत
असेल.

पोलिसांनी सील केलेली रूम इतक्या आरामात कशी उघडतायत या पोरी? आणि लाडूचा डबा साराच्या कपाटात असणं हे साराच्या भुताबद्दलचं प्रूफ? काहीही!

Pages