ा
२२ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती.
भुवनेश्वर-२०१७.
दुर्मिळ असलेल्या परंतु नष्ट होत चाललेल्या ओरिसातील ऑलिव्ह रिडली कासवांचंच 'योद्धा-ऑलि' असं समर्पक आणि सूचक बोधचिन्ह वापरून कलिंग स्टेडिअमवरील नव्या सिंथेटिक ट्रॅकवर २२ व्या खुल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती पार पडणार आहेत.
सर्वाधिक ४५ देशांचा सहभाग, सर्वाधिक ऍथलिटचा(एकूण ७०० पुरुष आणि ४०० महिला) सहभाग,आजवरच्या सर्वाधिक मोठ्या अशा भारतीय चमूचा (एकूण १६८ ऍथलिट) चा सहभाग अशा एकापेक्षाएक सुरस हकीकतींनी गाजत्या राहू शकणाऱ्या या स्पर्धाशर्यतींवर पावसाचं जोरदार सावट आहे.
या स्पर्धाशर्यती खरं तर रांची ला होणार होत्या! परंतु ऐनवेळी झारखंड अथेलेटिकस संघटनेने स्पर्धाशर्यती भरवण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यावर केवळ ३ महिन्यांपूर्वी 'भुवनेश्वर' ची निवड पक्की होऊन स्पर्धाशर्यती यशस्वीरीत्या पार पाडण्याचं पक्क झालं.
गेल्या २१ स्पर्धाशर्यतींत आजवर ३४ देशांनीं एकूण २५८२ पदकं लुटली.(तक्ता पहा) परंतु यातली १५५८ म्हंजे जवळपास ६०% च्या आसपासची पदकं हि केवळ पहिल्या ४ देशांनीच लुटली आहेत. आणि त्यातही निम्मा वाटा चीन चा!. ८० च्या दशकात चीन प्रथम अथेलेटिकसमध्ये प्रथम उतरलं हे लक्षात घेतलं तर त्याच वर्चस्व अगदी नजरेत भरतं!
मध्यंतरी श्रीलंकन ऍथलिटनी मुसंडी मारायचा प्रयत्न केला खरा; अगदी अलीकडे अरब ऍथलिटनी जागतिक दर्जाच्या कामगिऱ्या करून हा प्रकाशझोत आपल्याकडे कसा राहील ते पाहत आहेत असे दिसते! त्यामुळे या सर्व पार्श्व्भूमीवर भारतीय ऍथलिट काय कामगिरी करतात हे पहाणं महत्वाचं ठरावं! गेल्या २१ स्पर्धाशर्यतींत आजवर केवळ ३ भारतीय ऍथलिट आपलं नांव आशियाई विक्रमाच्या यादीत कसेबसे ठेवून आहेत.(तक्ता पहा) त्यामुळेदेखील भारतीय ऍथलिटसच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
५ ते ९ जुलै रोजी भुवनेश्वरला रंगणाऱ्या आशियाई स्पर्धाशर्यती,१५ जुलै ला गुंटूर येथे होणाऱ्या आंतरराज्य अथेलेटिकस स्पर्धाशर्यती आणि लगेचच ५ ते १३ ऑगस्ट रोजी लंडन येथे होणाऱ्या जागतिक अथेलेटिकस स्पर्धाशर्यती, असा अथेलेटिक्सप्रेमींसाठी रंगारंग कार्यक्रम उत्तरोत्तर रंगात जाणार आहे.
तेंव्हा... गेट,सेट,रेडी... ऑन युवर मार्क....
तक्ता १.
चीन - ३००-१९७-१०९=६०६
जपान - १५१-१८६-२०३=५४०
भारत - ०७४-०९६-११२=२८२
कतार - ०६१-०३२-०३७=१३०
---------------------------------
एकूण- ------------------१५५८
---------------------------------
इतर ३३ देशांच्या वाट्याला
आली केवळ १०२४ एकूण पदके.
तक्ता -२.
गोळाफेक-इंदरजीत २०.४१ मी -वुहान,२०१५
स्टीपलचेस -ललिता बाबर -९:३४.१३-वुहान,२०१५
४*४०० रिले-महिला संघ-३:३०९३-इंचेन,कोरिया
--------उदय ठाकूरदेसाई
uthadesai.com
टीप: अगोदरच्या स्पर्धाशर्यतींचा तपशील क्रीडाप्रेमींनी उठादेसाई.कॉम वेबसाईट वर पहावा.
सुरुवात इथून झाली तर !
सुरुवात इथून झाली तर !
हे पहायचं राहूनच गेलं होतं
सुंदर लेख माला होईल या सर्व लेखांची
मी माझ्या उठादेसाई.कॉम या
मी माझ्या उठादेसाई.कॉम या वेबसाइट साठी 'ऑन युवर मार्क' हे ब्लॉगलेखन करीत आहे. दर्दी ऍथलेटिक्स प्रेमींना १९८७ पासून मटा, षटकार, आज दिनांक,सांज लोकसत्ता,दिवाळी शब्द,आदी ठिकाणीमी लिहिलेले क्रीडाविषयक लिखाण माझ्या वेबसाइट वर पाहता येईल. तुमच्या प्रतिक्रिया आल्या तर अर्थातच खूप बरे वाटेल!