ऍथलीट असावी तर अशी!

Submitted by उदे on 5 July, 2017 - 00:51

यौवनात पदार्पण करणाऱ्या तरुण केनियन ऍथलीट रूथ जिबेट बनायचा ध्यास घेतायत. रूथ जिबेटसारखं व्हायचं आणि आयुष्य जगायचं स्वप्न पाहतायत हे ऐकून कानांना काही वेगळं ऐकतोय असं वाटेल, वाचताना काही वेगळंच वाचतोय असं वाटेल; परंतु त्यात अतिशयोक्ती नाही हे मात्र अगदी खरं!

इतर केनियन ऍथलीटांबरोबर धावण्याचा सराव करताना केनियाच्या रूथ जिबेट ने आयुष्यातले अनेक अडथळे तर पार केलेच परंतु; तारुण्याचा उंबरठा ओलांडताना मायदेश केनिया सोडून दूरच्या आखातातल्या 'बहारीन' देशाला जवळ केलं! वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी बहारीन साठी शर्यती जिंकल्या.जुनियर गटातून सिनियर गटात जाताना येणाऱ्या अडचणींचा सामनाही तिने त्याच ताकदीनिशी केला. आणि जीवनाची लय पकडल्याप्रमाणे,यशाची चटक लागल्याप्रमाणे ती एकापाठोपाठ एक शर्यती जिंकत निघाली.

बहारीन या नव्या मायदेशाला प्रथमच पदक मिळण्याची आणि स्वतः उतरलेल्या प्रत्येक शर्यतीत सुवर्ण आणि सुवर्णाचीच आस बाळगायची सवय नव्या देशवासियांना लावली. अर्थात लवकरच तिला अफाट संपत्ती मिळू लागली. ऑलिम्पिकमधील सुवर्ण जिंकल्यानंतर तर तिच्या मुळच्या केनियन देशवासियांना तिचा दुश्वास वाटू लागला इतकी असूया वाढली. गरीब केनिया सरकार त्यांच्या विश्वविजेत्या आणि जागतिक विक्रम करणाऱ्या ऍथलीटला जितका पैसा देत होतं,त्याच्या ४०, ५० पटीहूनही अधिक संपत्ती रूथ जिबेटच्या वाट्याला आली.

गेल्या अवघ्या ४-५ वर्षात घर,बंगला,गाडी,शेतजमीन,दुभत्या गाई.. असं सगळं केनियन समाजाच्या दृष्टीने सर काही सहजी मिळवणाऱ्या रूथ जिबेट सारखं स्वप्नील वाटण्याजोगं खरंखुरं राजस आयुष्य वाट्याला यावं असं केनियन ऍथलीटना वाटलं तर त्यात चूक ती कोणती?

आज आयुष्यातील अनेक चढउतारांना सामोरी जाणारी रूथ गेल्याच आठवड्यात डायमंड लीग स्पर्धाशर्यतीत धावताना पाण्याच्या अखेरच्या अडथळ्याजवळ उडी मारताना जखमी झाली होती.

रूथ भुवनेश्वर मध्ये धावताना पाहायला मिळते की ती विश्रांती घेऊन एकदम लंडनच्या जागतिक स्पर्धाशर्यतीतच थेट उतरते ते अगदी लवकरच समजेल.

मुख्य म्हंजे ही रूथ जिबेट कोण हे कळलं ना तुम्हाला?
चार वर्षांपूर्वी २०१३ मध्ये पुण्यात भारताच्या सुधासिंगला वयाच्या १६ व्य वर्षी १५ सेकंदांनी पाठी टाकून स्पर्धाविक्रम स्वतःच्या नावावर करणारी बहारीनची ऍथलीट रूथ. रुथची अगदी अलीकडची ओळख सांगायची म्हंजे ज्या रिओ ऑलीम्पिक मधील ३००० स्टीपलचेस शर्यतीत भारताची ललिता बाबर पदक मिळवते का? हे पाहत सारे भारतीय टीव्ही स्क्रीनकडे डोळॆलावून पाहत बसले होते त्याच शर्यतीत रुथने सुवर्ण जिंकलं होतं . तेवढ्यावर स्वस्थ न बसता २ महिन्यात ३००० स्टीपलचेस मधील विश्वविक्रम ९ मिनिटाखाली ८ मि ५२.७८ सेकंड असा स्वतःच्या नावावर करून,रुथने स्वतःच्या नावाचा असा काही दबदबा तयार केलाय की काही विचाराता सोय नाही!!

साऱ्यांच्या तोंडी एकच शब्द आहे.

ऍथलीट असावी तर अशी!

------उदय ठाकूरदेसाई.
uthadesai.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रिय हर्पेन,
माझी शंका खरी ठरली.
रूथ जिबेट येत नाहीये.
लंडन ला जागतिक स्पर्धेत बघू!!
मनापासून धन्यवाद!!