ऍथलेटिक्सच्या मैदानात नुसतेच विक्रम घडत नसतात. नुसत्याच गोष्टी नुसतेच प्रसंग घडत नसतात. त्यात एक संगती असते. एक घटनाक्रम असतो. घटनाक्रमातला एक धागा दुसऱ्या धाग्यात गुंफता आला,मागच्या पुढच्या घटनांची संगती लावता आली की एक आकृतिबंध उभा रहातो.
१९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भाग घेताना आदिल सुमारीवाला, पी टी उषा, सॅबेस्टियन को यांना आणखीन ३७ वर्षांनी आपण एकमेकांना भुवनेश्वरला भेटू याची कल्पनादेखील नसेल.
१९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये तेजतर्रार अमेरिकी ऍथेलितांच्या बहिष्कारामुळे अगोदरच निष्प्रभ झालेल्या तेज शर्यतीत १००मी च्या पहिल्या फेरीतल्या पहिल्या शर्यतीतच ८ जणात ७व्या येणाऱ्या २२ वर्षीय आदिल ने (११.०४ से.) तर १६ व्या वर्षी नव्याच्या नवलाईने प्रथमच ऑलिम्पिकसारख्या महापाटावर धावणाऱ्या पिलूवलकंदी टेकापरंबिल अर्थात भारताच्या लाडक्या पी टी उषाने पहिल्या प्राथमिक फेरीत पाचवी येत (१२.२७ से.) आपापापल्या कामगिऱ्या पार पडल्या होत्या.
त्याच मॉस्को ऑलिम्पिकमध्ये आदिल-उषाने पुरुषांच्या माध्यम पल्ल्याच्या शर्यतीत इंग्लंडच्या सेब को ला त्याच्या आवडत्या शर्यतीत ८०० मी मध्ये हरताना पाहिलं होतं . मित्र स्टीव्ह ओव्हेट कडून हरणाऱ्या सेब को ने मग १५०० मी मध्ये स्टीव्ह ओव्हेटला पाठी टाकून सुवर्ण मिळवलं होतं आणि पराभवाची परतफेड केली होती. सेब को ची ती शेवटची स्प्रिंट,तो लास्ट स्ट्रेच, दोन हात आणि मानेच्या शिरा ताठ झालेल्या अवस्थेत अंतिम रेषा पार करणाऱ्या सेब को चा फोटो, शर्यत कशी जिंकावी?जिगर कशी दाखवावी? याचं चालतं -बोलतं प्रतीक बनून गेला होता जगभरात त्यावेळी!!
सॅबेस्टियन को आज जागतिक महासंघाचे अध्यक्ष म्हणून भुवनेश्वरमध्ये वावरतायत. तर आदिल भारतीय ऍथलेटिक्स महासंघाचा अध्यक्ष म्हणून वावरताहेत. तर उषा स्वतःच्या क्रीडा अकादमीतून नवे एथलीट प्रशिक्षित करून जागतिक स्तरावर भारताला पदक द्यायचा अजूनही प्रयत्न करतेय.
भुवनेश्वरला जिंकले तर लंडनचं तिकीट मिळणारे भाग्यवान ऍथलीट,लंडन च्या अनुभवच गाठोडं पाठीशी बांधून पुढील काळात किमान न्यूनगंडातून बाहेर येऊन,जागतिक पातळी गाठण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतील काय?
पुढील चार दिवसात काय घडत त्यावरून सर्वांना पुढील वाटचालीचा थोडाफार अंदाज येईलच.
------------उदय ठाकूरदेसाई.
हा ही लेख रोचक.
हा ही लेख रोचक.
प्रिय हर्पेन,
प्रिय हर्पेन,
उत्कट प्रतिक्रियेबद्दल आभार.
छान माहिती
छान माहिती
मी माझ्या उठादेसाई.कॉम या
मी माझ्या उठादेसाई.कॉम या वेबसाइट साठी 'ऑन युवर मार्क' हे ब्लॉगलेखन करीत आहे. दर्दी ऍथलेटिक्स प्रेमींना १९८७ पासून मटा, षटकार, आज दिनांक,सांज लोकसत्ता,दिवाळी शब्द,आदी ठिकाणीमी लिहिलेले क्रीडाविषयक लिखाण माझ्या वेबसाइट वर पाहता येईल. तुमच्या प्रतिक्रिया आल्या तर अर्थातच खूप बरे वाटेल!