इतना सन्नाटा क्यू है भाई?
विलक्षण गाजलेल्या सुपरहिट चित्रपटातला हा 'डायलॉग' समस्त भारतीयांना सुपरिचित आहे. चित्रपटात डायलॉग बोलणाऱ्या अंध व्यक्तीला समोर काय चाललंय ते दिसत नसतं. वादळापूर्वीची शांतता दाखवणारं हे नाट्यमय दृश्य त्यावेळी (म्हणजे ४२ वर्षांपूर्वी) खूप गाजलं होतं.वरील दृश्यातील केवळ वरील संवाद आजच्या भारतीय ऍथलेटिक्स क्षेत्रातील आजच्या उदासीनतेच्या वर्णनासाठी वापरला तर तो आजही सध्याच्या भारतीय ऍथलेटिक्स मधील वातावरणाचं यथार्थ वर्णन करायला अगदी योग्य म्हणावा असा आहे. भारतीय ऍथलेटिक्स में इतना सन्नाटा क्यू है भाई?
अगदी कालपर्यंत,(एखादा अपवाद सोडून), कुठल्याही वृत्तपत्रात २२व्या स्पर्धाशर्यतींबद्दल एकही ओळ छापली गेली नव्हती.ही गोष्ट तर अनाकलनीय आहेच परंतु; त्यामुळे काही खबरबातच नसलेल्या वरील स्पर्धाशर्यतींबद्दल लोकांना काहीच माहिती नसणं,त्याबद्दल उत्कंठा नसणं हे देखील अंगावर येणारं आहे. भारतीय ऍथलेटिक्समधली हि भयावह परिस्थिती पहिली की सर्वसामान्य ऍथलेटिक्सप्रेमीलादेखील म्हणावंसं वाटेल की ,भारतात स्पर्धाशर्यती तर भरवल्या तर आनंद वाटायला हवा. लेकिन भुवनेश्वरमे इतना सन्नाटा क्यू है भाई?
परंतु चाणाक्ष क्रीडारसिकांना चांगलं माहित आहे की आज स्पर्धाशर्यतींच्या उदघाट्नसोहोळ्याचा दिवस आहे. त्यामुळे जल्लोष तर आज होणारच!!त्यात भर म्हणून आज जागतिक ऍथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टियन को हे स्वतः जातीने हजर आहेत.मग स्पर्धाशर्यती गाजतंय कश्या राहणार नाहीत?त्या गाजणारच. द्युतीचंदच्या शरीरात मेल हार्मोन्स असल्याचा दावा नेमका आजच उपटला की नाही?
तीच -ती कामगिरी करणाऱ्या फेकीपटूचा समावेश नेमका आजच ऐनवेळी केल्याची बातमी ऐकायला मिळाली कि नाही?
म्हणजे कालपर्यंत सन्नाटा. आज जल्लोष. पुढे ४ दिवस जागतिक स्पर्धाशर्यतींच्या पार्श्वभूमीवर गाजतंय राहणाऱ्या आशियाई स्पर्धाशर्यती. आणि त्या रणधुमाळीनंतर पुन्हा एकदा सारं कसं शांत..शांत.. असं वातावरण?
निदान यावेळीतरी तसं घडू नये हीच भारतीय ऍथलेटिक्सप्रेमींची इच्छा असेल.
जिगरबाज युवा खेळाडू नीरज चोप्राच्या पॅरिस येथील डायमंडलीग स्पर्धेतल्या जागतिक पातळीवरच्या ५व्य क्रमांकाच्या कामगिरीने जागतिक अथेलेटिक्स क्षेत्राचं दार भारतासाठी किलकिलं झालंय. त्या किलकिल्या झालेल्या दारातून नुकताच पहाटवारा वाहतो आहे. अजून उजाडायचंय. परिस्थिती आशादायी आहे. परंतु आजवरचा सन्नाटा मात्र अंगावर येतोय.
भारतीय ऍथलेटिक्स क्षेत्रात इतना सन्नाटा क्यू है भाई?
-------------उदय ठाकूरदेसाई.
uthadesai.com
क्रिकेट, बॉलिवूड, नि राजकारण
क्रिकेट, बॉलिवूड, नि राजकारण यात असलेल्या व्यक्तींना तसेच त्यांच्याबद्दल लिहिणार्यांना, बोलणार्या, दाखवणार्या सर्वांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. अॅथलेटिक्स मध्ये भाग घेणार्यांना पण फारसे पैसे मिळत नाहीत. फक्त तिथे काही खळबळजनक घडले तर सनसनाटी बातमी म्हणून दाखवल्या जाते, लिहील्या जाते एव्हढेच. कारण सनसानाटी बातमी वाचायला लोकांना हवे असते. कुणि विक्रम केला तरी त्यात कुणाला इंटरेस्ट नसतो.
उदे तुम्ही लिहित रहा मी
उदे तुम्ही लिहित रहा मी वाचतोय.
प्रिय नंद्या आणि हर्पेन ,
प्रिय नंद्या आणि हर्पेन ,
सर्वप्रथम तुमच्या प्रतिक्रियांबद्दल आभार.
नंद्या,तुमचं खरंच खरं आहे.
ज्या खेळात ५ दिवस खेळूनही निकाल लागत नाही तोच खेळ आपण पुन्हा उद्या परत पाहणार! हे तर खरेच.
मला वाटतं जो खेळ १० सेकंदांच्या आत संपतो. जिकडे भारतीयांचं म्हणावं तसं लक्ष्य नाही,तिकडे पहावं .
शेवटी सगळे थोडेच पैशाच्या पाठी असतात!!!
काही हर्पेन आणि माझ्यासारखे पण(?) असतात ना!!
हम्मम.. तुमचे इतर दोन लेख
हम्मम.. तुमचे इतर दोन लेख वाचून झाल्यावर सेबास्टियन को भुबनेश्वरामध्ये काय करतोय हा प्रश्न डोक्यात आलेला... खरेच प्रचंड सन्नाटा आहे....:(
बाकी सन्नाटा क्यू है हा प्रश्न पडूच नये. इथे मायबोलीवरच बघा, तुमच्या या विषयी संबंधित धाग्यांवरचे प्रतिसाद एकत्र केले तरी 2 आकडी मजल गाठली जाणार नाही, तेच टाइम पास साठी निघालेले धागे एका दिवसात शतक गाठतात. लोकांची अभिरुची यावरून कळते. जे घटी तेच सागरी!!! अॅथलेटिक्स मध्ये कोणाला रुची असणार, सध्या मॅरेथॉन धावायचे फॅड आलेय, त्यांनाही माहीत नसावे.