आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!
जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.
या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -
1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.
पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,
2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.
या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !
जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?
बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या
पटलं तर like करा? कुठे आहे
पटलं तर like करा? कुठे आहे like button
मी भारत पाकिस्तान मॅचमध्ये
मी भारत पाकिस्तान मॅचमध्ये फक्त भारतातच सपोर्ट करतो. इतर वेळी पाकिस्तानला. आता भारत बांगलादेशविरुद्ध जिंकला तर भारताला सपोर्ट करेन पण बांगलादेश जिंकले तर बांगलादेशला करेन.
@ऋ (अगोदरच माफी मागून)
जर भारत फायनल जिंकला तर नाना सारखे म्हणाल का
"आ गये मेरे हार (मौत) का तमाशा देखने"
या धाग्याला जिवेत शरदः हजारम
या धाग्याला जिवेत शरदः हजारम. शुभेच्छा
क्रिकेट खेळणार्यांना भारत पाक
क्रिकेट खेळणार्यांना भारत पाक वैराशी देणेघेणे नाही. चित्रपट पाहणाऱ्यांना वैर नाही. वैर आहे ते फक्त सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाला. म्हणून तो हौसेने तिथे जातो. पाकिस्तान तर इतका प्रेमळ की त्यांचा ताब्यात गेलेल्या सैनिकांचे हाल हाल करून मारल्याशिवाय त्याच्या प्रेमाची ग्वाही दिल्यासारखे वाटत नाही त्याला.
भारत पाक वैराचे भारतीय जनतेला काहीही सोयरसुतक नसल्याने सीमेवरील सैन्यपण काढून घ्यावे. तिथे पाकिस्तानने काहीही केले तरी आपल्याला काय त्याचे? आपला एक रविवार मजेत गेला म्हणजे गंगेत घोडे न्हाले.
नाही पटलं, माझ्या
नाही पटलं, माझ्या आजुबाजुला तर सगळेच जण इंग्लंड हरतय म्हणुन नाराज होत, अर्थात मीही!
नाही पटलं, माझ्या आजुबाजुला
नाही पटलं, माझ्या आजुबाजुला तर सगळेच जण इंग्लंड हरतय म्हणुन नाराज होत, अर्थात मीही! > + ११११
पाथफाईंडर +10000000000
पाथफाईंडर +10000000000
नाही पटलं, माझ्या आजुबाजुला
नाही पटलं, माझ्या आजुबाजुला तर सगळेच जण इंग्लंड हरतय म्हणुन नाराज होते, अर्थात मीही!>>>>+ ११११११११११११
मी मॅच पाहिली नाहीये. काय झाल
मी मॅच पाहिली नाहीये. काय झाल ते ही मला माहीत नाहीये पण मी इंग्लंड वि पाकिस्तान मधे पाकलाच सपोर्ट केलं असतं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला भारताने पाकला हरवताना पहाणं आवडतं
माझ्या आजुबाजुला तर सगळेच जण
माझ्या आजुबाजुला तर सगळेच जण इंग्लंड हरतय म्हणुन नाराज होत,
>>>>
शक्य आहे. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात.
मला वाटते एका ठराविक कालखण्डातील लोकांना भारत पाक सामन्याची उत्सुकता जास्त असावी.
अजून एक मुद्दा म्हणजे ईंग्लण्डही काही आपले मित्र राष्ट्र नाही. त्यांनी आपल्यावर दिडशे वर्षे राज्य करताना अनेक अत्याचार आणि जुलूम केले आहेतच.
{भारत पाक वैराचे भारतीय
{भारत पाक वैराचे भारतीय जनतेला काहीही सोयरसुतक नसल्याने सीमेवरील सैन्यपण काढून घ्यावे. }
आताच भारताच्या पंप्रंनी पाकच्या पंप्रंची ख्यालीखुशाली विचारल्याचं वाचलं.
पाकिस्तानला शत्रूराष्ट्र घोषित केलंय का? आपल्या तिथल्या आणि त्यांच्या इथल्या वकिलाती/ दूतावास बंद केले का?
डेव्हीसकपमध्ये भारताने एकदा द.आफ्रिकेशी खेळायला नकार दिला होता. आता भारत फायनलमध्ये पोचला, तर पाकशी खेळू नका , परत या असं सरकार सांगणार आहे का?
क्रिकेट खेळणार्यांना भारत पाक
क्रिकेट खेळणार्यांना भारत पाक वैराशी देणेघेणे नाही. चित्रपट पाहणाऱ्यांना वैर नाही. वैर आहे ते फक्त सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाला. म्हणून तो हौसेने तिथे जातो. पाकिस्तान तर इतका प्रेमळ की त्यांचा ताब्यात गेलेल्या सैनिकांचे हाल हाल करून मारल्याशिवाय त्याच्या प्रेमाची ग्वाही दिल्यासारखे वाटत नाही त्याला.
भारत पाक वैराचे भारतीय जनतेला काहीही सोयरसुतक नसल्याने सीमेवरील सैन्यपण काढून घ्यावे. तिथे पाकिस्तानने काहीही केले तरी आपल्याला काय त्याचे? आपला एक रविवार मजेत गेला म्हणजे गंगेत घोडे न्हाले.
>> हे सगळ क्रिकेट मॅचच्या आधी का सुचत ? हॉकी सामने ढीगाने होतात , तेव्हा का नाही ? पंतप्रधान मजा म्हणून भेटायला जातात तेव्हा का नाही ?
क्रिकेट खेळणार्यांना भारत पाक
क्रिकेट खेळणार्यांना भारत पाक वैराशी देणेघेणे नाही. चित्रपट पाहणाऱ्यांना वैर नाही. वैर आहे ते फक्त सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाला. म्हणून तो हौसेने तिथे जातो. पाकिस्तान तर इतका प्रेमळ की त्यांचा ताब्यात गेलेल्या सैनिकांचे हाल हाल करून मारल्याशिवाय त्याच्या प्रेमाची ग्वाही दिल्यासारखे वाटत नाही त्याला.
भारत पाक वैराचे भारतीय जनतेला काहीही सोयरसुतक नसल्याने सीमेवरील सैन्यपण काढून घ्यावे. तिथे पाकिस्तानने काहीही केले तरी आपल्याला काय त्याचे? आपला एक रविवार मजेत गेला म्हणजे गंगेत घोडे न्हाले.-+१११११११
खरेतर पाकिस्तानशी सगळेच सबंध तोड्याला हवेत , युद्ध नसताना जेंव्हा घरातला एखादा शाहिद होतो ना तेंव्हा हे प्रकर्षाने जाणवते , बाकी चालू द्या
पंतप्रधान मजा म्हणून भेटायला
पंतप्रधान मजा म्हणून भेटायला जातात तेव्हा का नाही ? ....
लोकं असाही विचार करू शकतात...आश्चर्य वाटलं...
Ha deshdrohi bb band karayla
Ha deshdrohi bb band karayla hava!
क्रिकेट खेळणार्यांना भारत पाक वैराशी देणेघेणे नाही. चित्रपट पाहणाऱ्यांना वैर नाही. वैर आहे ते फक्त सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाला. म्हणून तो हौसेने तिथे जातो. पाकिस्तान तर इतका प्रेमळ की त्यांचा ताब्यात गेलेल्या सैनिकांचे हाल हाल करून मारल्याशिवाय त्याच्या प्रेमाची ग्वाही दिल्यासारखे वाटत नाही त्याला.
भारत पाक वैराचे भारतीय जनतेला काहीही सोयरसुतक नसल्याने सीमेवरील सैन्यपण काढून घ्यावे. तिथे पाकिस्तानने काहीही केले तरी आपल्याला काय त्याचे? आपला एक रविवार मजेत गेला म्हणजे गंगेत घोडे न्हाले.-+१११११११
खरेतर पाकिस्तानशी सगळेच सबंध तोड्याला हवेत , युद्ध नसताना जेंव्हा घरातला एखादा शाहिद होतो ना तेंव्हा हे प्रकर्षाने जाणवते , बाकी चालू द्या -----+1
रविवारी कोण किती सेंच्युऱ्या
रविवारी कोण किती सेंच्युऱ्या मारेल ते मारेल पण त्याआधी इकडे चार पाँच सेंचुरी क्रॉस करणार बहुतेक हां धागा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Ha deshdrohi bb band karayla
Ha deshdrohi bb band karayla hava!>>>>> सॉरी पण हसायला आलं मला
मी मॅच पाहिली नाहीये. काय झाल ते ही मला माहीत नाहीये पण मी इंग्लंड वि पाकिस्तान मधे पाकलाच सपोर्ट केलं असतं Proud
मला भारताने पाकला हरवताना पहाणं आवडतं>>>>> रीये. लाखो अनुमोदन.
भारत पाक मॅच मधे जीव जास्त अडकलेला असतो तो पाकला हरताना बघायचं असतं म्हणूनच.
सीमेवरचे सैनिक वैगेरे जिथे तिथे आणायचं लोक कधी बंद करणार?
नाय, लोक वैतागले आता. किती
नाय, लोक वैतागले आता. किती वटवट करायची ती सांगा बरं! हिथ आयड्यांची शंभरी भरायला येते काही बोलले तर. मग धाग्याची शंभरी होवो नायतर हजारी होवो.
वोके. मी तरी इंग्लंडलाच सपोर्ट केला बसल्या जागी. बिचारे एकदा तरी जिंकायला हवे होते. ते कसे का भामटे वगैरे असेनात. इथे पाकडे अतीरेकी आहेत तरी त्यांच्याशी मॅच व्हावी म्हणून देव पाण्यात जातायत, मग इंग्लंड का जिंकायला नको होते? आँ!
साधनाची पोस्ट आवडली बाबा. एकदम पटेश!
ऋ भाऊ धाग्याचे नाव बदला. इथे
ऋ भाऊ धाग्याचे नाव बदला. इथे क्रिकेट कमी बाकी सर्व प्रतिसाद मिळत आहेत. तसाही तुमचा धागा आहे म्हणून 100+ होणारच.
लोकं असाही विचार करू शकतात..
लोकं असाही विचार करू शकतात...आश्चर्य वाटलं..>>> +१
मी मॅच पाहिली नाहीये. काय झाल ते ही मला माहीत नाहीये पण मी इंग्लंड वि पाकिस्तान मधे पाकलाच सपोर्ट केलं असतं Proud
मला भारताने पाकला हरवताना पहाणं आवडतं>>> लाखो अनुमोदन
बाकि शाहरुख, सलमान, आमिर एखादा चित्रपट आल्यावर चित्रपट चालण्यासाठि एखादे विवादात्मक स्टेट्मेंट देतात. मग त्यांना आदर्श माननारे कसे मागे राहतिल असल्या विषयावर धागे उघडुन स्वतःला चर्चेत ठेवायचे हे एक्मेव उद्दिष्ट
बाकि चालु द्या
बिचारे एकदा तरी जिंकायला हवे
बिचारे एकदा तरी जिंकायला हवे होते. ते कसे का भामटे वगैरे असेनात. इथे पाकडे अतीरेकी आहेत तरी त्यांच्याशी मॅच व्हावी म्हणून देव पाण्यात जातायत, मग इंग्लंड का जिंकायला नको होते? आँ! ....
रश्मी, हे पटलं.
सीमेवरचे सैनिक वैगेरे जिथे
सीमेवरचे सैनिक वैगेरे जिथे तिथे आणायचं लोक कधी बंद करणार?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>>
नाही तर काय.
मला सैनिकांबद्दल फार अभिमान आहे, पण म्हणून मी मनोरंजन सोडायचं का? आणि मी मनोरंजन सोडल्याने सैनिकांना काय फायदा होणारेय?
सीमेवर लढायला जायला फार जीगर लागते, आपल्यात नाही बुवा ती.. आम्ही क्रिकेट मधे भारत पाकिस्तानला हरवतो ते बघुन आनंदी होतो.. आम्ही तेवढंच करू शकतो.
भारताने पाकिस्तानला युद्ध्यात हरवलं तर मला त्याहुनी जास्त आनंद होईल. पण म्हणुन मला युद्ध नकोय. युद्धात आपल्या सैनिकांना गमवून जीत बघण्यापेक्षा हे असं पाकिस्तान हरलेलं बघणं केंव्हाही चांगलं
भारताने पाकिस्तानला युद्ध्यात
भारताने पाकिस्तानला युद्ध्यात हरवलं तर मला त्याहुनी जास्त आनंद होईल. पण म्हणुन मला युद्ध नकोय. युद्धात आपल्या सैनिकांना गमवून जीत बघण्यापेक्षा हे असं पाकिस्तान हरलेलं बघणं केंव्हाही चांगलं >>>>> लाखो अनुमोदन
पुढे चर्चा करण्याचि आवश्यकताच नाहि.
वैर आहे ते फक्त सीमेवर उभ्या
वैर आहे ते फक्त सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाला. म्हणून तो हौसेने तिथे जातो. >> हे सूध्दा तितकस खर नाहिय. सैनिक ईद च्य वेळेस पाकिस्तानी सैनिकान्ना मिठाई देवून शूभेच्छा देतात की.
माननीय पंतप्रधान वाकडी वाट
माननीय पंतप्रधान वाकडी वाट करुन नवाझ शरीफना भेटायला जातात तेव्हा सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांचा अपमान वगैरे होत नसेलच. जिथे तिथे सैनिकांचा हवाला देणारे भंपक देशभक्त आहेत.
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. ....
धागा वाढविण्यासाठी टाकलेलं सगळ्यात स्फोटक वाक्य...पण कुणाचंच लक्ष गेलेलं दिसत नाहीये...![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मनोरंजन! मनोरंजन!! मनोरंजन!!!
मनोरंजन! मनोरंजन!! मनोरंजन!!! .......हे आणि हेच महत्वाचे आहे, हे त्या सैनिकांना तर अजिबातच कळत नाही ना हाच प्रॉब्लेम आहे. उगाच मरायला जातात तिकडे!!!
सीमेवरचे सैनिक वैगेरे जिथे तिथे आणायचं लोक कधी बंद करणार?>>>>अगदी बरोबर!!! ज्यांच्यामुळे आपण इकडे मनोरंजनाचा आस्वाद घेतो, त्यांच्या त्यागाची जाणिव ठेवायचीच कश्याला आणि ठेवली तरी त्यांना कुठे कळणार आहे किंवा फरक पडणार आहे. कारण ते तिकडे त्यांच्या ईच्छेने जाऊन मरतात, आपण तर त्यांना तुम्ही जा आणि मरा असे नाही सांगितले बॉ!!!
मनोरंजन तर झालेच पाहिजे......शेजारच्या घरातल्या माणसाने माझ्या घरात घुसून माझ्या घरातल्या एका माणसाला मारले तरी मला काय त्याचे? मी तर बाबा त्यांच्या घरातल्या लोकांशी मॅच खेळणार, असेच ना?
ज्या तळमळीने, त्वेषाने सैनिक
ज्या तळमळीने, त्वेषाने सैनिक डोळ्यात तेल घालून आणि जिवावर उदार होऊन देशाच्या सिमांचे संरक्षण करतात,प्रसंगी मरणही पत्करतात अगदी तेवढ्याच तडफेनं आपले क्रिकेटर्स मैदानावर पाकिस्तान बरोबर क्रिकेट लढतात. (लक्षात घ्या मी लढतात म्हणतोय, खेळतात नव्हे) म्हणून भारत -पाकिस्तान मैच ही मनोरंजन होऊ शकत नाही. न ती तसं व्हायला हवी असं माझं मतेय..बाकी चालूद्या...
शेजारच्या घरातल्या माणसाने
शेजारच्या घरातल्या माणसाने माझ्या घरात घुसून माझ्या घरातल्या एका माणसाला मारले तरी मला काय त्याचे? मी तर बाबा त्यांच्या घरातल्या लोकांशी मॅच खेळणार, असेच ना?
>>>>>>
मी कुठल्या बाजूचे समर्थन वा विरोध करत नाहीये. पण मला या मुद्द्यावर एक शंका आहे. शेजारच्या घरातल्या एकाशी झालेल्या भांडणानंतर आपण त्या घरातल्या सर्वांशीच बोलणे टाकतो असे नेहमीच होते असे नाही. त्या एखाद्याशी संबंध तोडून ईतरांशी जुजबी संबंध आपण बरेचदा ठेवतो.
पण...
तेच जर त्या घरातल्या एखाद्याने आपल्या घरातील एखाद्याचा खून केला वा प्रचण्ड मारहाण केली तर आपण त्या सबंध कुटुंबाबरोबरच संबंध तोडून टाकतो.
या दोन्ही गोष्टीत फरक असा की भांडणाची लेव्हल वाढली असता ईतर कुटुंबियांनी देखील ती जबाबदारी घेणे अपेक्षित असते.
ईथे भारत-पाक वा कुठल्याही दोन देशांमधील शत्रुत्वाबाबत हे लागू होते का ही मला शंका आहे.
जर माझ्य देशाच्या सरकारने वा लष्कराने एका दुसरया देशातील सैनिकांना वा जनतेला मारहाण केली जी माझी स्वताची ईच्छा नव्हती आणि ते थांबवणे हे माझ्या हातातही नव्हते तर पण तरीही त्याची जबाबदारी देशाचा नागरीक असल्याकारणाने मला घ्यावीच लागेल का?
कोणीही उत्तर द्या.. सावकाश द्या.. उत्स्फुर्तपणे भावना टायपायच्या टाळा..
हो
.....
Pages