मेथी-मटर-मलई

Submitted by सायो on 29 September, 2009 - 11:57
methi malai matar
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मोठी जुडी मेथी, १ वाटी ताजे/फ्रोजन मटार, १ टे.स्पू. तूप, बारीक चिरलेला कांदा-पाव ते अर्धी वाटी, हळद १ टी स्पू, आलं लसूण पेस्ट- १ टी.पू. प्रत्येकी, गरम मसाला- एक टी स्पू., लाल तिखट चवीप्रमाणे, अर्धी वाटी खवा, फ्रेश क्रिम चवीप्रमाणे(साधारण अर्धी वाटी), चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. अगदी बारीक न चिरता जाडसर चिरावी. कात्रीने कापली तरी चालेल. कांदा अगदी बारीक चिरावा जेणेकरुन भाजीत अजिबात दिसणार नाही.
नॉनस्टीक कढईत १ चमचा तूप गरम करुन त्यात कांदा परतावा. रंग बदलला की त्यात हळद, आलं लसूण पेस्ट,गरम मसाला घालून परतावे. व बारीक गॅसवर शिजू द्यावे. थोड्या वेळाने तूप सुटून बाजूला झालं खवा परतावा. नंतर त्यात मेथी घालावी व मटार घालावेत व झाकण घालून बारीक गॅसवर शिजू द्यावं. त्यात चवीप्रमाणे लाल तिखट घालावं. मेथी शिजल्यासारखी वाटली की त्यावर फ्रेश क्रिम घालावं व झाकण घालून चांगली वाफ काढावी. चवीप्रमाणे मीठ घालावं व गरम गरम खावं.

वाढणी/प्रमाण: 
२,३ जणांकरता
अधिक टिपा: 

मेथीचा कडवटपणा जायला थोडं पनीर घातलं तरी चालेल.
गरम मसाला अगदी नावापुरताच घालावा. ह्या भाजीला फार मसाले चांगले लागत नाहीत.
दिपच्या फ्रोजन मेथी मटर मलईचे जिन्नस बघून त्या चवीच्या जवळ जायचा प्रयत्न केलाय. नाहीतर नेटवर भरपूर रेसिपी मिळतील.

माहितीचा स्रोत: 
बहुतेक दीपच्या फ्रोजन पाकिटावरचे जिन्नस पाहून स्वतःच्या मनाने भर टाकून, गाळागाळी करुन केलीय असं आठवतंय.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हो, ते विसरलेच की मी. Wink
चिनूक्स, थॅन्क्स.
हह, Proud तसं तर गुलाबजामा त हिंदीतला जाम तरी कुठे असतो? Wink

आज लक्षात ठेवून फोटो टाकायला वेळ मिळालाय.

methi matar malai small.jpg

हा दिवसा काढलेला. बित्तू, हा असा रंग आहे.

methi matar malai 001-small 1.jpg

ह्म्म सोप्प वाटयत... मी आत्तापर्यंत रसोई मॅजिकचे मेथी मलई मटर करत होते पण मला सांग खवा कुठुन आणतेस? कि घरी करतेस?? Happy

अलिबाबाच्या गुहेत आल्यासारख वाटल <<<
का बरं ?
पर्याय :
१. तेथे चोर होते ?
२. तुम्ही परवलीचा शब्द बोलून मगच आत जाऊ शकलात ?
३. आतमध्ये फक्त दिवट्या लावल्या होत्या ?
४. आतमध्ये बसलेल्या माणसाचे नाव अलिबाबा आणि दुकानाचे नाव गुहा होते ?

सायो
आता तुझ्या पद्धतीने करून बघेन. मी काल केली होती ती अशीच होती फक्त खवा घातला नव्हता. व्हिपींग क्रीम वापरले होते. तशी यथा तथाच झाली होती. दीपची फ्रोजन मेथी मी पहिल्यांदाच वापरली होती. फार अरबट चोथा वाटली मला ती मेथी आणि त्यामुळे भाजी यथा तथा झाली असे माझे मत :फिदी:.

ती फ्रोजन मेथी मी फक्त ताजी घरात नसेल तेव्हा ठेपल्यांकरता वगैरे वापरते. भाजी कधी करुन पाहिली नाहीये.

अहाहा!! माझी ऑल टाईम फेवरिट भाजी आहे ही.......... मी टोमॅटो सुद्धा घालते. आणि खव्याऐवजी काजू आणि खसखस दुधात भिजवून त्याची स्मूथ पेस्ट करून घालते.

मी पण खवा घालुन नाही केलेय...आता बघेन करुन.
ह्यात लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची बारिक चिरुन टाकावी आणि फोडणीत हळद घातली नाही तर छान पांढरा-हिरवा रंग दिसतो भाजीचा.

सायोची २४ जूनच्या पोस्टनंतर मी अमृताची पोस्ट तारीख न बघता वाचली. मला वाटलं आले परत भावे Proud

मला पण खूप आवडते ही भाजी. आय विल कूक अँड सी Wink

Pages