दुसरया धाग्यावर निघालेल्या विषयावर तिथे अवांतर पोस्ट नको म्हणून हा स्वतंत्र धागा.
____________________________
फार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नवीन जोडप्याला एकत्र वेळ घालवायला योग्य ते स्थळ काळ मिळायचे नाही. म्हणून मनाने तसेच शरीराने जवळ येण्यासाठी त्यांच्यासाठी मधुचंद्र आयोजित केला जायचा.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पण तरीही एखादी जुनी प्रथा-परंपरा पुढे रेटावी तसेच लग्नानंतर हनीमूनला जायलाच पाहिजे बाबा नाहीतर लोकं हसतील अश्या खुळचट कल्पनांना लोकं उराशी बाळगून आहेत. आधीच लग्नावर लाखो रुपये उधळणारे तेवढ्यातच आणखी लाखभर खर्च करून हनीमूनला जाऊन येतात. त्यात ट्रॅवेल एजंटना जेव्हा समजते की तुम्ही हनीमूनला निघाला आहात तर ते तुम्हाला आणखी कापू लागतात. मला मात्र हा एकूणच खर्च वायफळ वाटतो.
हल्लीच्या काळात जर लव मॅरेज असेल तर ते प्रेमी युगुल आधीच मनाने वा (काही सन्माननीय अपवाद वगळता) शरीरानेही जवळ आलेले असतात. अश्यावेळी त्या मधुचंद्राच्या मूळ हेतूला फारसा अर्थ उरत नाही.
जर तुमचे अरेंज मॅरेज असेल तरी हल्ली एकमेकांना लग्नाआधी भेटून पुरेसे ओळखून घेतले जाते. त्याऊपर एकमेकांना जाणून घ्यायला अगदी मधुचंद्रालाच जायची गरज नाही. एकमेकांच्या सहवासात जाणून घेता येते. हल्ली एकत्र कुटुंब अभावानेच आढळतात. त्यातही आईवडील सोबत असले तरी नवराबायकोंना सेपरेट बेडरूम असते. त्यामुळे मनाने वा शरीराने जवळ येण्यास कुठलीही प्रायव्हसीची अडचण नसते. म्हणजे अश्या जोडप्यांनीही हनीमूनला गेलेच पाहिजे असे गरजेचे नसते.
मुळात मी ईथे नवराबायकोने फिरायला जाण्याच्या विरोधात नाहीते. आर्थिक क्षमता असेल तर वर्ष दोन वर्षातून एकदा फिरायला गेलेच पाहिजे. पण लग्नानंतर लगेचच मधुचण्द्राच्या हट्टाने आपण ईतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करत नुकसान करून घेतो.
जसे की,
1) आर्थिक फटका - वर म्हटल्याप्रमाणे आधीच लग्नाचा खर्च त्यात लगोलग हा खर्च.
2) फिरायला आपण स्थळ काळ वेळ सीजन बघून जातो. पण ईथे लग्न मुहुर्त बघून वा ईतर बांबींनुसार जमेल तसे, जुळेल तसे केलेले असते. आणि मग लग्नानंतर फिरायला जायचेच म्हणून लोकं चुकीच्या सीजनला चुकीच्या जागी जातात.
3) सुट्ट्या - आधीच लग्नासाठी तयारी करण्याच्या वेळेपासून सुट्ट्या घेतल्या गेल्या असतात. त्यावर या आणखीच्या सुट्ट्या. करीअरच्या महत्वाच्या टप्प्यावर जेव्हा नवीन सुरू होणारया संसाराला तुमच्या नोकरीची आणि आर्थिक स्थैर्याची जास्त गरज असते, तेव्हाच ही सुट्ट्यांची लयलूट आणि कामाला कमी महत्व देणे योग्य वाटत नाही.
एक ताजे उदाहरण म्हणजे आमच्या ऑफिसमधेच दोघांचे आपापसात जुळले आणि दोघांनी अर्थातच एकाच वेळी लग्न आणि हनीमून अशी जोडून महिन्याभराची सुट्टी टाकली. एकाच वेळी एकाच टीममधले दोन ईंजिनीअर सुट्टीला गेल्याने कामाची बोंब झाली. त्यामुळे दुर्दैवाने त्यांचे लग्न आता ऑफिसमध्ये चर्चेचा विषय झालाय.
असो, तर ही मधुचंद्राची प्रथा, परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे तशी पाळायलाच हवी का? की बदलत्या संदर्भानुसार ईतर प्रथा बदलतात तसे यालाही बदलायची वेळ आली आहे.
काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा. अनुभवी लोकांचे मत ऐकून माझे हे मत बदलू शकते.
धन्यवाद, ऋन्मेष
हनिमूनला जाण्यात काय गम्मत
हनिमूनला जाण्यात काय गम्मत असते ते न जाणाऱ्यांना काय कळणार?
>>>>>
पण जाऊन आलेल्यांकडून जाणून तर घेऊ शकतो. >>> ग्रेट आहेस तु
लग्नाचे सुरवातीचे दिवस फार
लग्नाचे सुरवातीचे दिवस फार मौजेचे असतात. सहा महिन्यांपर्यंत पाय परत जमिनीवर टेकतात.
>>>>>>
मग खरे तर ईथे फिरायचा खर्च करायची गरज असते असे नाही वाटत..
सगळ्यांनी वर्गणी काढून
सगळ्यांनी वर्गणी काढून रुन्मेश यांना हनिमून वर पाठवा. त्यांना जर खर्च वायफळ वाटत असेल तर त्यांनी तो आल्यानंतर सदस्यांना पैसे परत करावे. आणि जर खर्च वायफळ वाटत नसेल तर तसे धाग्यावर कबूल करावे.
(तो गेल्यावर काहीदिवस मायबोलीवर धागे निघणार नाही या आशेवर अर्ध्याहून अधिक मायबोलीकर वर्गणी द्यायला एका पायावर तयार होतील)
तू आज रविवार असून कामावर कसा
तू आज रविवार असून कामावर कसा काय ऋ?
>>>>
अवांतराबद्दल आपल्या वतीने क्षमस्व.
मी कामावरून मायबोली येत नाही. जर काम नसलेच तर वा ब्रेकमध्ये मोबाईलवरून असतो. अन्यथा रात्री घरून लॅपटॉप वा ट्रेनमध्ये मोबाईल. त्यातही गंमत म्हणजे माझा टू जी नेट आहे. आताही मी घरी असून लॅप्पटॉप उपलब्ध नसल्याने त्यावरच आहे. किंबहुना हा धागा किंवा गेल्या दोन आठवड्यात काढलेले बाहुबलीचे आणि रोमांटीक गाण्यांचे धागे टू जी मोबाईलवरूनच काढले आहेत. तर मी कामाच्या वेळी माबो करतो हा अपप्रचार नको
मग सर्वेचा काय निष्कर्ष
मग सर्वेचा काय निष्कर्ष निघाला? वायफळ खर्च झाला असे कोणी जाहीर रित्या म्हटले का?
>>>>>>>
हाच तर प्रॉब्लेम आहे. आपण फसलो असे प्रामाणिकपणे कोणी बोलत नाही.
तसेच आपल्या हनीमूनला मजा नाही आली असे म्हणालो तर आपल्या पुरुषार्थावर लोकं शण्का घेतील हा आणखीच एक भितीचा वेगळाच एंगल.
हनिमून म्हणजे काय याचं आधी
हनिमून म्हणजे काय याचं आधी उत्तर दे रुन्मेष,
>>>>
मला या धायाच्या निमित्तानेच समजले की हे विदेशी फॅड आहे आणि आपण मराठीत त्याचे भाषाण्तरही शब्दशा उचललेय. त्यामुळे मूळ हेतू तर त्या गोरया लोकांनाच विचारले पाहिजे. आपल्याकडे लेखात नमूद केलेले हेतू जपायला लग्नानंतर लवकरात लवकर जोडप्याला फिरायला पिटाळले जायचे त्यालाच हनीमून म्हणतात.
आपण आपली व्याख्या देऊन आपले मत मांडू शकता.
असंपण लग्नानंतर दरदोनवर्षांनी
असंपण लग्नानंतर दरदोनवर्षांनी कुटुंबासह राजस्थान,केरळ,काश्मिर,मप्र,उत्तराखंड,कर्नाटक फिरतातच ना लोक? तेच फक्त दोघांनीच ते का करायचं नाही? मे ,ओक्टोबर,डिसेंबर सोडून स्वत:च गेलो( टुअर नव्हे) तरफार स्वस्तात पर्यटन होते. लोक आपल्या गावी जातात त्याहीपेक्षा कमी पैशात. मी इथेच काहींना व्यनितून माहिती दिलेली आहे. टुअरमधून जाऊ नये प्रायवसी राहात नाही आणि फाजील खर्च होतो. जिथे बराच वेळ घालवावासा वाटतो तिथे अर्धा तास देतात.
आर काय चर्चा... सगळ्यना माहीत
आर काय चर्चा... सगळ्यना माहीत आहे हनुमन जरूरी आहे... एक मुलगी तिचे घर सोडून नावऱ्याकडे राहायला येते, मोठा ट्रेनसिशन आहे... होणेमुन चा ब्रेक हवाच ना..
आणि सिंजी शी सहमत आह... मुळात लग्न करण्याचे मुख्य कारणच सेक्स आहे... हनिमून ला सेक्स आणि रोमान्स होणारच.. निदान चांगल्या सुंदर ठिकाणी जाऊन रोमान्स केला तर नावदाम्पत्य ला चांगले आहे ना.. राथर त्यान आपले घर आणि कॉलनी... एकमेकांना चिकटून बागडाने, खांद्यात हात , हातात हात घालून भटकणे.. जिथं आपण राहतो तिथे सगळ्यांनाच पोसिसबल आहे से नाही... संकोच असतो..
++++११
++++११
मतं बदलून पाहा ऋ.
तुमच्या घराची गच्ची छान असेल तर मात्र हनिमुनचा खर्च वाइफळ.
++++११
++++११
लग्न करणं हीच मुळी एक जुनी
लग्न करणं हीच मुळी एक जुनी प्रथा, परंपरा आहे. लग्न करुन ती तरी का पुढे रेटायची? लग्न टाळल्यास त्या अनुषंगाने येणारे सगळे खर्चही (लग्न, हनिमून, मुलं जन्माला घालून त्यांना वाढवणं, शिक्षण, त्यांचं लग्न इ) टाळता येतील. अगदीच कंपॅनियन हवी/वा असल्यास लिव्ह ईन करावे.
वाय फ ळ्च खर्च आहे.
वाय फ ळ्च खर्च आहे. त्यापेक्षा घरीच एसी बसवून घ्यावे.
ऋन्मेऽऽष , मला पटले बाबा तुझं
ऋन्मेऽऽष , मला पटले बाबा तुझं.
माझ्या अगोदर सायोंनी लिहिले,पण माझंही तेच मत आहे. मुळात खर्चाच्या मूळ कारणावरच घाव घातला पाहिजे.लग्न करायचेच नाही आपापल्या आईवडिलांच्या घरी राहून क्वचित एकमेकांचा सहवास अनुभवावा.म्हणजे खर्चात खूपच कपात होईल.(आईवडिलांचे कपाळ बडवती योग सोडून द्या.) अगदीच पटले नाही तर लिव्ह इन रिलेशन्मधे रहाणे बेस्ट.
धागाकर्त्याने शीर्षकात
धागाकर्त्याने शीर्षकात विचारलेला प्रश्न:-
लग्नानंतरचा मधुचंद्र - एक वायफळ खर्च म्हणू शकतो का?
YFruit.jpg (6.25 KB)
उत्तरः_-सदर प्रक्रियेत मिळणारे फळ हे इंग्रजी 'वाय' आकाराच्या रेखाचित्राद्वारे दर्शविता येते त्यामुळे सदर प्रक्रियेला वायफळ आणि प्रक्रियेवरील खर्चाला वायफळ खर्च म्हणू शकतो.
वेल.... दॅट्स नॉट
मला या धायाच्या निमित्तानेच समजले की हे विदेशी फॅड आहे आणि आपण मराठीत त्याचे भाषाण्तरही शब्दशा उचललेय. त्यामुळे मूळ हेतू तर त्या गोरया लोकांनाच विचारले पाहिजे. आपल्याकडे लेखात नमूद केलेले हेतू जपायला लग्नानंतर लवकरात लवकर जोडप्याला फिरायला पिटाळले जायचे त्यालाच हनीमून म्हणतात.
आपण आपली व्याख्या देऊन आपले मत मांडू शकता.
वेल.... दॅट्स नॉट पर्टिक्युलरली अ फॅड. जस्ट अ मार्केटींग गिमिक टू मेक यु स्पेन्ड मनी ऑन युजलेस थिन्ग्स....
होल्ड ऑन बॉयज... अॅण्ड गर्ल्स ऑफकोर्स.....
हनीमून ही एक सुंदर संकल्पना आहे. अतिशय आवश्यक सुद्धा.... तुमचं लव मॅरेज असो वा अरेन्ज मॅरेज. तुम्ही अगदी जन्मापासून एकमेकांना ओळखू दे की थेट बोहल्यावर हार टाकतांना बघू देत. हनीमून इज मोस्ट इम्पोर्टन्ट पार्ट ऑफ मॅरिड लाइफ. का? व कसा?
ओकेज... लव असो वा अरेन्ज. इट्स नॉट ऑल अबाउट ओन्लि सेक्स. सगळी तुंबलेली मंडळी तिथेच चुकतात. मला त्याचे वैयक्तिक फार वाईट वाटते. ते असो.
आदर्श हनीमून कसा असावा?
लग्न झाल्याच्या दुसर्या दिवशी पासून पतीपत्नीने शिस्तीत एक महिन्याची सुट्टी टाकावी. असे ठिकाण शोधावे जिथे यांना प्रापंचिक बाबतीत जास्त लोड येणार नाही. जसे बॉसचे फोन, कामे, स्वयंपाक, डेली नीड्स... म्हणजे अर्थातच हे एक हॉटेल असू शकते. किंवा एखाद्या समजूतदार नातेवाईकाचे घरही. कोठेही असो पण तुमच्या रोजच्या सवयीच्या जगण्यातून बाहेर पडायचे. अनोळखी ठिकाणी ओळखीचे असे हे दोघेच असल्याने एकमेकांना आधार म्हणून आपसुक मनबंध जुळतात. अॅडजस्टमेंट होतात, स्वभाव कळतात. सेक्स शुड बी लास्ट थिंग ऑन माइन्ड. सेक्स ही फस्ट थिंग असेल तर तुमच्या नात्याचा बट्ट्याबोळ समजा. लग्न झाले आहे दोघांचे. आयुष्य काढायचे आहे सोबत. सेक्स तर करायचाच आहे. पण तो सेक्स समरसून असला पाहिजे. आतुन आला पाहिजे. आता कसं लायसन भेटलं म्हणुन तुटून पडायचे नव्हे. तसे केले तर सेक्सचा खरा आनंद गेला आयुष्यभरासाठी उडत. जसे जेवण हे उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म तसेच हेही. एकमेकांच्या निर्लेप सहवासात उत्तम संभोगसुख मिळू शकते. पण हे मनं जुळल्यावरच.
(काही लोकांचे हनीमूनबद्दलच्या संकल्पना इतक्या अश्लाघ्य असतात की इथे बोलावसं वाटत नाही, नंतर कधीतरी)
---------------------------------
सो, हनीमून केलाच पाहिजे. खिशात दमडा-पैका बी पायजे. दमडा-पैका असला की वायफळ वगैरे काही वाटत नाही. काही गोष्टी आयुष्यात एकदाच होतात, परत परत होतात ती पारायणं..
बाकी, अमुक ठिकाणी जाऊ, तमूक ठिकाणी जाऊ, अमकी मैत्रिण, तमका मित्र, नात्यातलं कोणी सिंगापूरला गेले म्हणून आपण स्पेनला जाऊ असे नको. यु डोन्ट हॅव टू इम्प्रेस समबडी एल्स. दुसर्या कोणाला इम्प्रेस करण्यासाठी सोताच्या खिशातले पैसे खर्च करु नये कधीच.
ठिकाण असं निवडा जिथे शांतता असेल. तुमच्यासारखीच आणखी हजार कपल एकाच सनसेट पॉइन्टला फोटो काढतात, हाव बोअरिंग इज दॅट. वर्जीन जागा पाहिजेत. ती अगदी तुमच्या शहरापासून दोन तासावरही असू शकते. एखादा जंगल ट्रेल, अॅडवेन्चर कॅम्पही असू शकतो. एन्ड ऑफ द डे इट शुड बी फन टुगेदर... इट शुड नॉट बी गोइन्ग समव्हेअर.. हां, म्हणजे स्विझ ला गेले म्हणजेच तुमचा हनिमून सक्सेसफुल झाला, महाबळेश्वरला गेलो म्हणून काय मजा आली नाही असे नसते. इट्स ऑल इन द माइन्ड...
मार्केटच्या भूलथापांना बळी पडू नका. हनीमून हे ट्रुरिझमच अशी कन्सेप्ट बनवण्यात त्यांचा धंदा आहे. जसे हिरा है सदा के लिये म्हणून भावनिक चुना लावला जातोय कित्येक दशकं तसा.... हनीमून इज नॉट ट्रुरिझम ऑफ प्लेसेस, इट्स ट्रुरिझम ऑफ युअर ओन माइन्ड अॅण्ड बॉडिज... भौ, पैसा उधळणे म्हणजे हनिमून नाही.
-------------------------------------------
हनीमूनची ही पाश्चात्त्य संकल्पना आपल्याकडे येण्याआधी (तशीही ती पैशावाल्यांच्या ऐपतीची गोष्ट आहे) भारतात नक्की काय असायचे? सुहागरात घरातच व्हायची, ती सक्सेसफुल करायला सगळा कुटूंबकबिला वगैरे छळायला असायाचा असं चित्रपटांतून दाखवतात.... आमच्याकडे मुलाची बहिण+जावई सेज सजवून देतात, कुठे कुठे मित्रही ह्या सजावटीच्या कामात सामील असतात.
कुठेतरी वाचले-पाहिले की शिवकालिन काळात किंवा त्याआधी लग्न झाल्यावर चाळीस दिवस एकमेकांचा संपूर्ण सहवास असायचा, नवरा-नवरी खोलीतून बाहेर पडायचे नाही. मला नक्की संदर्भ, त्याचा खरेखोटेपणा माहित नाही. पण लग्नानंतर एक संपूर्ण महिना एकत्र घालवावा अशी संकल्पना वेगवेगळ्या रुपात सदैव सर्वकाळात रुढ असावी.
-------------------------------
वर कुणीतरी म्हटले की हातात हात घालून मोकळेपणाने फिरता आले पाहिजे म्हणून अनोळखी ठिकाणी गेलं पाहिजे... तसं असेल तर समाज म्हणून आपण अजून खूप मागास आहोत असे म्हणायला हरकत नाही. लैंगिक-मानसिक संबंध मोकळेपणाने व्यक्त करु शकणे व ते इतरांना सहन होणे इथेच अजून आपली गाडी अडकून पडली आहे. सभ्यता आणि संस्कृती नेमक्या काय असाव्यात यावर चर्चा फक्त होतात, कुणी तसे वागत नाही. असो. तोवर हनीमून अॅटमॉस्फिअर असलेल्या ठिकाणी जाण्यावाचून गत्यंतर नाही. पण परत आल्यावर मुस्कटदाबी असेलच. ते असो.
----------------------------
सो ज्याला जे शक्य आहे त्याने त्या पद्धतीने हनीमून करा. वायफळ खर्च वगैरे विचार करु नका. ऋन्मेषला सिरियसली घेऊ नका.... खा प्या मज्जा करा. फक्त ते तुंबलेलं वगैरे मानसिकता लवकरात लवकर सोडा... लै वाईट आहे ते.
बिपिन चंद्र हर
बिपिन चंद्र हर
वा, छान पोस्ट नानाकळा.
वा, छान पोस्ट नानाकळा.
हनिमून ट्रॅव्हल्स प्रा ली
हनिमून ट्रॅव्हल्स प्रा ली पाहिला नाही का? नसल्यास पाहून घ्या. हनिमून वर गेल्यावर काय काय घडू शकते याबाबतीतल्या संभाव्य शक्यतांचा आढावा त्यात घेतलेला आहे, गफ्रे असणाऱ्यांनी तर अवश्य पाहावा. यू ट्यूबवर 50 रुपयांना मिळतोय बघायला.
नानाकळा छान पोस्ट.
नानाकळा छान पोस्ट.
अनोळखी ठिकाणी ओळखीचे असे हे
अनोळखी ठिकाणी ओळखीचे असे हे दोघेच असल्याने एकमेकांना आधार म्हणून आपसुक मनबंध जुळतात. अॅडजस्टमेंट होतात, स्वभाव कळतात. सेक्स शुड बी लास्ट थिंग ऑन माइन्ड. सेक्स ही फस्ट थिंग असेल तर तुमच्या नात्याचा बट्ट्याबोळ समजा. लग्न झाले आहे दोघांचे. आयुष्य काढायचे आहे सोबत. सेक्स तर करायचाच आहे. पण तो सेक्स समरसून असला पाहिजे. आतुन आला पाहिजे. आता कसं लायसन भेटलं म्हणुन तुटून पडायचे नव्हे. तसे केले तर सेक्सचा खरा आनंद गेला आयुष्यभरासाठी उडत. जसे जेवण हे उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म तसेच हेही. एकमेकांच्या निर्लेप सहवासात उत्तम संभोगसुख मिळू शकते. पण हे मनं जुळल्यावरच.>> +1234567890...........
नानाकळा अतिशय छान पोस्ट.
नानाकळा अतिशय छान पोस्ट.>>>
नानाकळा अतिशय छान पोस्ट.>>> +७८६
नानाकळा छान पोस्ट, ऋन्मेषला
नानाकळा छान पोस्ट, ऋन्मेषला सिरीअसली घेऊ नका म्हणत तुम्ही अर्ध्या गोष्टी तर मला अपेक्षितच लिहिल्या आहेत. सविस्तर नंतर लिहितो.
बाकी हनीमून सेक्ससाठी नसावा. लग्नही सेक्ससाठी नसावे. एकदम मान्य. पण या आदर्श कल्पना मूळात जनमाणसात रुजायला सेक्स हे सध्याच्या तुलनेत सहजतेने उपलब्ध व्हायला नको का असा एक प्रश्न पटकन मनात आला..
बाकी हनीमून सेक्ससाठी नसावा.
बाकी हनीमून सेक्ससाठी नसावा. लग्नही सेक्ससाठी नसावे.
>>> मै ऐसा नही बोल्या रे ...
डोंचू पुट वर्डस इन मा मौथ ...
"हनीमून फक्त सेक्ससाठी नसावा. लग्नही फक्त सेक्ससाठी नसावे."
माकड पकडण्याची एक पद्धत असते
माकड पकडण्याची एक पद्धत असते म्हणे.
जमीनीत एक मडकं गाडतात, ज्याचे तोंड एवढे असते की माकडाचा हात आत जाउ शकतो आणि बाहेरही येउ शकतो.
पण त्या गाडलेल्या मडक्यात एक फळ ठेवल्या जाते.
हे फळ हातात पकडले तर माकडाला मडक्यातून फळासकट हात बाहेर काढता येत नाही
नको ते फळ मी आपला जातो कसा, असे ते म्हणु शकत नाही. कारण काय कुणास ठाउक पण
फळाचा मोह ते सोडु शकत नाही.
लग्नही फक्त सेक्ससाठी नसावे."
लग्नही फक्त सेक्ससाठी नसावे."
नवीन Submitted by नानाकळा on 14 May, 2017 - 13:32>>>>>>>९५% भारतीय सेक्ससाठीच लग्न करतात.उगाच ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं?
माझ्याच एका मित्राला लवकर लग्न का केलं असं विचारलं तेव्हा त्याने अत्यंत स्पष्टपणे "सेक्सची सोय म्हणून" असे उत्तर दिले होते.
आय होप तुमच्या मित्राने हेच
आय होप तुमच्या मित्राने हेच कारण आपल्या बायकोलाही इतक्याच स्पष्टपणे सांगितले असावे... ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे...? नै का?
माझे अनेक मित्र जे सर्व
माझे अनेक मित्र जे सर्व सामजिक ,आर्थिक स्तरातले आहेत ते लग्नाआधी पेड सेक्स करुन आले होते.त्यांना तुमचा वरचा प्रतिसाद वाचायला दिला तर पोट धरुन हसतील.
तसेच सिंजी, १००% टक्के भारतीय
तसेच सिंजी, १००% टक्के भारतीय लग्न हे दोन मनांचे मिलन, दोन जीवांचे अमुक टमुक लिहित असतात विवाहपत्रिकांवर.. ते सोडून पूर्वीसारखं शरिरसंबंध योजले आहेत वगैरे लिहायला पाहिजे.. तुमचे काय मत?
मानव पृथ्वीकर, माकडाजागी
मानव पृथ्वीकर, माकडाजागी माणूस असतो तेव्हा हातात चाकू घेऊन त्या फळाचे आतल्या आत तुकडे करतो आणि ते तुकडे एकेक करत खाऊन पसार होतो.
नानाकळा, अर्थातच फक्त सेक्ससाठी नाहीच केले जात लग्न. पण तुम्हाला काय वाटते सेक्सचा वाटा किती असावा? म्हणजे माझे सेक्शुअल ओरिएंटेशन स्ट्रेट असेल, मला मुलांपेक्षा जास्त मुलींमध्ये ईण्टरेस्ट असेल. तर मी एका मुलाशी, माझ्या एका चांगल्या मित्राशी लग्न करण्याचे चान्सेस किती असावेत?
अच्छा, मग ते ' फ्री सेक्स'
अच्छा, मग ते ' फ्री सेक्स' म्हणून बायकोकडे पाहतात का तुमचे मित्र?
"काही नाही गं, लग्न होत नव्हते तोवर पैसे देऊन सेक्स करायचो, आता तुला आणलं आहे फुकट सेक्स करायला" असं त्यांच्या बायकांना हसत हसत सांगत असावेत तुमच्यासमोर............ हो ना?
मी जे अश्लाघ्य विचार सांगत होतो तेच तुम्ही इथे मांडत आहात, धन्यवाद.
Pages