चिकन 1/2 किलो
बटर 1 चमचा
तेल 1 चमचा
हळद, तिखट, मीठ चवीनुसार
आलं 1/2 इंच
लसूण 10-12 पाकळ्या
बडिशेप 1 चमचा
धणे 1 चमचा
खसखस 1 चमचा
कोथिंबीर 1/2 वाटी
काजू 10
पांढरे व्हिनिगर 2 चमचे
चिकन स्वच्छ धुऊन , हळद, तिखट, मीठ, व्हिनिगर लावुन ठेवावे.
कांदे जाडसार चिरावेत.
चिरलेल्या कांद्यातला १/३ कांदा, लसूण, अालं, बडिशेप, खसखस, कोथिंबीर, धणे, काजू सर्व वाटावे. हे वाटण चिकनला लावावे. किमान १/२ तास चिकन मॅरिनेट करावे.
पसरट भांड्यात ( लगडी किंवा फ्राय पॅन ) बटर आणि तेल तापत ठेवावे. त्यात चिरलेला कांदा टाकावा. कांद्याचा रंग बदलु लागला की त्यात चिकन टाकावे. चांगले परतावे. चिकनचा रंग बदलु लागला की २ वाट्या पाणी घालावे. उकळी आली की झाकण ठेऊन चिकन शिजू द्यावे. साधारण २५ मिनिटांनी तयार होईल चिकन सुहाना !
जितके जासत मॅरिनेट कराल (१/२ तास ते ४ तास) तेव्हढे लवकर शिजेल, अन चवही छान लागेल.
1336888985106.jpg (59.01
1336888985106.jpg (59.01 KB)![1336888985106.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/1336888985106.jpg)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज चिकन संपायच्या आधी चपळाई करून फोटो काढून घेतला
आज माझा फोन मी पूर्णपणे वापरला. सर्व लिखाण अगदी फोटोही फोनवरुनच टाकला
खरंच खमंग वास येतोय, फोटोतून
खरंच खमंग वास येतोय, फोटोतून !
दोघांना पुरावे >>>>> अरे बाप
दोघांना पुरावे >>>>> अरे बाप रे!!!!!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
रेसिपी छान आहे. मी 'पनीर सुहाना' करून बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राची अवल, जोरात सुरु आहेत
प्राची![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अवल, जोरात सुरु आहेत की प्रयोग!
दिनेशदा धन्यवाद प्राची, माझा
दिनेशदा धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तसे माझे नेहमी प्रयोगच असतात स्वयंपाक घरात ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
प्राची, माझा लेकाने माझ्यासाठी काही शिल्लक ठेवल का बघते आता जाऊन
हो गं पनीर मस्त लागेल. माझ्या शाकाहारी नवर्याला फ्लॉवर सुहाना केलय आज
शैलजा
जरा पारंपारिक पदार्थ सांग मला करायला मग कळेल
अवल, मस्तच दिसतय, करायलाही
अवल, मस्तच दिसतय, करायलाही कठीण नाही आहे त्यामुळे नक्कीच करुन बघेन. मी शाकाहारी असल्यामुळे माझ्यासाठी फ्लॉवरच व्हरजन ट्राय करेन. त्यात बटाटा पण जाइल का?
फ्लॅावर आधी उकडला
फ्लॅावर आधी उकडला मीठ,हळद,पाण्यात. हो उकडलेला बटाटापण धावेल की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच! मी पण नवर्यासाठी चिकन
मस्तच!
मी पण नवर्यासाठी चिकन आणि माझ्यासाठी पनीर सुहाना ट्राय करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उद्या फ्लॉवर सुहाना करेन.
उद्या फ्लॉवर सुहाना करेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल तुझी ही रेसीपी आमच्या
अवल तुझी ही रेसीपी आमच्या घरात एकदम हिट झाली आहे. खाण्याच्या बाबतीत जिभेला धार असणार्या माझ्या लेकीनेही "क्या बात, क्या बात, क्या बात" म्हणत मला मुजरा केला. धन्यवाद अवल, इतक्या छान व सोप्प्या रेसीपी बद्द्ल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![2012-06-15 21.00.06.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/2012-06-15%2021.00.06.jpg)
हे माझ "चिकन सुहाना"
बटाट्याचे किंवा वांग्याचे
बटाट्याचे किंवा वांग्याचे केले जाईल
विनार्च धन्यवाद ग. घबाड
विनार्च
धन्यवाद ग.
घबाड व्हेज पण चागले लागते.
घबाड व्हेज म्हणजे काय??
घबाड व्हेज म्हणजे काय??
काल बनवल. मस्त झाल. आवडल.
काल बनवल. मस्त झाल. आवडल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोपी आणि सुटसुटीत
सोपी आणि सुटसुटीत रेसिपी.
रविवारी केल होत.. मस्त चव आली होती.
मस्तच आहे रेसिपी , मजा आली
मस्तच आहे रेसिपी , मजा आली
काल पहिल्यांदाच चिकन केलं
काल पहिल्यांदाच चिकन केलं होतं. अवल, तुझी रेसिपी हिट्ट झाली. सहीच झालेलं चिकन.
चिकन सुहाना मस्त झाल होत.आता
चिकन सुहाना मस्त झाल होत.आता पनीर सुहाना करणार आहे पण पनीरला कमी वेळ लागेल शिजायला तर मग पनीर मसाल्यात टाकून परतायचं कि पाणी टाकून मग उकळी आली कि पनीर टाकायचं?
अरे. धन्यवाद सर्वांना पनीर
अरे. धन्यवाद सर्वांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पनीर रस्सा उकळताना टाका
कांदे किती घ्यायचे?
कांदे किती घ्यायचे?
य वर्ष झाली हो लिहून
य वर्ष झाली हो लिहून
नॉनव्हेज साठी जनरली घेतात तेव्हढे घ्या, बरं ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ईथ कोण रोजचं बनवतयं
ईथ कोण रोजचं बनवतयं
बादवे, दोन कांदे, मोठे पुरेत
बादवे, दोन कांदे, मोठे पुरेत
तुझं नाव पाहून आले बस...
तुझं नाव पाहून आले बस... मस्तच गं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवलतै , काल बनवलचं दूपारी
अवलतै , काल बनवलचं दूपारी.एक्दम भारी वाटलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.
आम्हाला रस्सा भाताबरोबर पण लागतो , त्यामुळे मी कान्दा भरपूर घेतला .
नवरा म्हणाला , तिखट थोडं कमी झालयं .
साबु म्हणाले , आज चिकन एकदम मस्त झालयं . एकदम टडोपा
काल चिकन सुहाना आणि धनिच हिरवं चिकनं ....
स्वस्ति ताट मस्तच दिसतय गं..
स्वस्ति ताट मस्तच दिसतय गं..
नवरा म्हणतोय ते जाऊदे खड्ड्यात पण सासु तारीफ करते हे जास्त महत्वाच आहे.. छानच..
ही पाकृ आधी वाचली नव्हती
ही पाकृ आधी वाचली नव्हती त्यामुळे बघायला आलो तर इकडे आमच्या हिरव्या चिकनचा पण फोटो पाहून अगदी टडोपा मोमेंट झाली
स्वस्ति धन्यवाद
सुहाना पण करून बघायला हवं !
धनि अरे , तिकडे पण टाकणारच
धनि अरे , तिकडे पण टाकणारच होते .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुपारी वेळ नाही मिळाला. नंतर फेरी मारते
टीना , :).
टीना , :).
एरवी , मला साबांच्या पद्धतीने , त्या चवीच बनवता येत नाही , म्हणून कपाळाला आठया पडतात.
म्हणूनच माझ्यासाठी टडोपा मोमेंट होती . ऐकून बरं वाटलं.
पण मी त्यांनी केलेलं कौतुकही फार मनावर घेत नाही.
आज बनवला...एक नंबर झाला होता.
आज बनवला...एक नंबर झाला होता...
Pages