Submitted by BMM2017 on 20 April, 2017 - 11:58
’बृहन्महाराष्ट्र मंडळ २०१७’ अधिवेशनातील भोजन-समितीचे सर्व सदस्य आधी एक खवय्ये आहेत. खाणे आणि खिलवणे हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. हे अधिवेशन त्यातल्या भोजन व्यवस्थेमुळे तुमच्या लक्षात राहील, यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.
याचाच एक भाग म्हणून या समितीतील उत्साही सदस्यांनी तुमच्यासाठी काही खास पदार्थ तयार केले आहेत.
आमची भोजन-समिती महाराष्ट्राच्या विविध भागांतील वैविध्यपूर्ण आणि चविष्ट भोजनप्रकार तुमच्यासमोर सादर करायला उत्सुक आहे.
या भोजनाचा स्वाद घेण्याकरता आजच नावनोंदणी करा.
https://www.bmm2017.org
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी तिथे असताना अटेंड केलेला
मी तिथे असताना अटेंड केलेला माझाच नाही अनुभव तर इतर बर्याच लोकांकडून एकलय ( जे नंतर जावून आलेत ) की जेवणाचे नेहमीचेच इस्श्यु असतात
थंड जेवण, संपलेले पदार्थ आणि काही पदार्थ न शिजलेले, बेचव अथवा नासलेले सुद्धा असतात.
बरं अशी तक्रार केली की, हे मोठ्या प्रमाणावर करतो तेव्हा हे होणारच हा सूर असतो. समजून घ्या वगैरे...
किंवा काम करणारे पेड नसतात वगैरे...
असो, नेहमीचाच ( चोथा) झालेला विषय आहे आता...
तुम्ही कुठलं BMM अटेंड केलं
तुम्ही कुठलं BMM अटेंड केलं होतं आणि तिथे असे प्रश्न आले? मी संपलेले पदार्थ समजू शकतो. पण आतापर्यंत २००९ पासून प्रत्येक बीएमएम अटेंड केलंय आणि मला नाही बुवा असे अनुभव आले. आणि आजकाल जेवण वाढायच्या अगोदर ते गरम राहील अशा शेगड्या सर्रास असतात.
गेल्या १० वर्षात खूप बदल झाले आहेत.
याचं मुख्य कारण २००९ पासून कुणातरी मोठ्या केटरर ला हे कंत्राट दिलं जातं ज्याला बीएमएम च्या दहापट मोठ्या प्रमाणात जेवण तयार करण्याचा अनुभव असतो. २०१३, २०१५ मधला केटरर इतका मोठा होता कि त्याच्या जेवण करण्याच्या प्लँट मधे अमेरिकन सरकारचा एक अधिकारी कायमचा क्वालीटी कंट्रोल ला असतो. (मी तो प्लँट आतून बघितला आहे) त्यामुळे "मोठ्या प्रमाणावर करतो तेव्हा हे होणारच हा सूर" योग्य ही नाही आणि ऐकायलाही येत नाही.
जेवण तयार करणारे (वाढणारे नाही ) व्यवस्थीत पेड असतात, त्यामुळे तेही कारण राहिले नाही. दिवसेंदिवस भारतीय जेवणाला/चवीला काय हवे असते आणि काय नको असते हे ही त्यांच्या नीट लक्षात येत गेल्याने ऑथेण्टिक जेवण मिळणे हळूहळू शक्य होत चालले आहे. फक्त् BMM च नाही तर आंतरराष्ट्रीय क्रूझ वरही चांगले भारतीय चवीचे (नशीबवान असाल तर अस्सल मराठी) जेवण मिळते.
(तुम्ही BMM बद्दलच बोलताय हे मी गृहीत धरतोय. बर्याच जणांचा जागतिक मराठी परिषद किंवा विश्व मराठी संमेलन यांचा आणि BMM चा गोंधळ होतो. ती संमेलने मी अटेंड केलेली नाही. त्यामुळे त्याबद्दल सांगता येणार नाही).
२००९ पासून कुणातरी मोठ्या
२००९ पासून कुणातरी मोठ्या केटरर ला हे कंत्राट दिलं जातं ज्याला बीएमएम च्या दहापट मोठ्या प्रमाणात जेवण तयार करण्याचा अनुभव असतो. २०१३, २०१५ मधला केटरर इतका मोठा होता कि त्याच्या जेवण करण्याच्या प्लँट मधे अमेरिकन सरकारचा एक अधिकारी कायमचा क्वालीटी कंट्रोल ला असतो >>>> मस्त माहिती.
व्हिडिओ करण्याचा प्रयोग आवडला
व्हिडिओ करण्याचा प्रयोग आवडला. समितीमधले सदस्यच स्वतः कुशल cook आहेत असं दिसतंय.
@ माने गुरुजी, पोस्ट आवडली,
@ माने गुरुजी, पोस्ट आवडली, छान माहिती कळली.
>>>आंतरराष्ट्रीय क्रूझ वरही चांगले भारतीय चवीचे (नशीबवान असाल तर अस्सल मराठी) जेवण मिळते.>>> अगदी. ह्याचा अनुभव घेतला आहे एकदा. आम्हांला ८-१० दिवस इतर वेगवेगळ्या देशांतील पदार्थ चाखल्यावर साधे मराठी जेवण मिळाले तर हवेच असते.
हे अधिवेशन त्यातल्या भोजन व्यवस्थेमुळे तुमच्या लक्षात राहील, यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.>>> शुभेच्छा !
>> तर आंतरराष्ट्रीय क्रूझ
>> तर आंतरराष्ट्रीय क्रूझ वरही चांगले भारतीय चवीचे (नशीबवान असाल तर अस्सल मराठी) जेवण मिळते.<<
काहि वर्षांपुर्वि कार्निवल ड्रीम वर देसी ठेला (तंदूर?) होता; पंजाबी, गोअन क्विझिनचा. आता मराठी जेवण पण मिळायला लागलं कि काय?..
पुढचं एखादं बीएमेम अधिवेशन क्रुझवर ठेवा - जेवणाचा प्रश्न सहजरीत्या सुटेल...
Raj
Raj
पण क्रूझवर जाऊन मराठी जेवण का
पण क्रूझवर जाऊन मराठी जेवण का मागवायचं? तिथे वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे पदार्थ खाऊन बघायची चांगली संधी असते.
BMM ला शुभेच्छा!
मराठी जेवण का मागवायचं? तिथे
मराठी जेवण का मागवायचं? तिथे वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे पदार्थ खाऊन बघायची चांगली संधी असते >>>>>
असाच विचार आपण बाहेर जेवायला जाताना करतो म्हणून मराठी जेवण मागे पडते ,
गुजराती लोक पहा, मुंबई च्या स्वाती आणी सोम रेस्तोरंत मध्ये जाऊन दुप्पट पैसे देऊन फाडा नु खिचडी आणी दाल ढोकळी खातात,
मग मराठी माणसाला बाहेर जाऊन मटकीची उसळ आणी शिक्रन खायला काय होते?
क्रुझ च्या डेक वर तुम्ही मराठी पदार्थ खात असाल तर ते पाहून अजून काही लोक मराठी पदार्थ मागवतील, असाच आपल्या पदार्थांचा प्रसार केला पाहिजे.
>>>>>
वरील मते माझी नाहीत, पण कोणीतरी नक्की या लाईनवर सुरु होईल
असाच विचार आपण बाहेर जेवायला
असाच विचार आपण बाहेर जेवायला जाताना करतो म्हणून मराठी जेवण मागे पडते ,
गुजराती लोक पहा, मुंबई च्या स्वाती आणी सोम रेस्तोरंत मध्ये जाऊन दुप्पट पैसे देऊन फाडा नु खिचडी आणी दाल ढोकळी खातात,
मग मराठी माणसाला बाहेर जाऊन मटकीची उसळ आणी शिक्रन खायला काय होते?
क्रुझ च्या डेक वर तुम्ही मराठी पदार्थ खात असाल तर ते पाहून अजून काही लोक मराठी पदार्थ मागवतील, असाच आपल्या पदार्थांचा प्रसार केला पाहिजे-----माझी मतं अशी आहेत
"वरील मते माझी नाहीत, पण
"वरील मते माझी नाहीत, पण कोणीतरी नक्की या लाईनवर सुरु होईल" - सिम्बा
माणसानं विविध खाद्यपदार्थ चाखून पहावे असं माझं मत आहे. गुजराथी काय कारतात किंवा आणखी कुणी काय करतं ह्यावरून मी काय करावं ते मी तरी ठरवत नाही. दुसरं म्हणजे मराठी पदार्थ, मराठी सिनेमे / नाटकं चांगले असतील तर टिकतील, पुढे जातील, त्याला दर वेळी 'आपणच आपल्या गोष्टींचा प्रचार केला पाहीजे' वगैरे सहानुभूतीच्या कुबड्यांची गरज असेल, तर ते काळाच्या ओघात टिकणं अवघड आहे.
फिली २००९: उत्तम जेवण, पण
फिली २००९: उत्तम जेवण, पण जेवणाची तिकीटे वेगळी असल्याने तिकीट तपासण्यासाठी एक ते दिड तासाची रांग.
शिकागो २०११: उत्तम जेवण, भरपूर खाणे पिणे, रांगा नाहीत.. उलट बृमम च्या हॉलपासून ५/६ मैलांवर असलेल्या हॉटेलांमधे बृममच्या मराठी न्याहारीची सोय.
र्होड आयलण्ड २०१३: जेवणात गोंधळ, काही जेवण खराब झाले, थंडगार वरण भात , जेवण मधेच संपले
लॉस अॅ २०१५: मी गेलो नव्हतो...