कलर्स मराठी वर चाहूल ही नवी मालिका सुरू होणार आहे.
जाहिरात बघून तरी वाटत की रहस्यमय मालिका असेल.
रात्रीस खेळ चाले या मालिकानंतर आता ही नवीन मालिका
प्रेक्षकांना किती पसंत पडेल हे बघण्यासारखे असेल.
े.प्रत्येकाला जाणीवेपलीकडच्या गूढरम्यतेचं आकर्षण असतं आणि त्याविषयी भीतीही असते… याच भयाच्या भावनेला ‘चाहूल’ या मालिकेतून साद घालण्यात येणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेला सर्जेराव भोसले म्हणजेच ‘कमला’ मालिकेतून प्रेक्षकांचा आवडता बनलेला अक्षर कोठारी सुमारे एका दशकानंतर सातारा जिल्ह्यातल्या भवानीपूर या त्याच्या मूळ गावी परततो, तो त्याच्या होणा-या बायकोसह – जेनिफरसह… जेनिफर ही पदरेशी तरुणी सर्जेरावला त्याच्या परदेश – वास्तव्या दरम्यान भेटलेली असते आणि सर्जेरावच्या प्रेमासाठी ती तिचा देश, तिची माणसं सोडून, सर्जेरावशी आणि त्याच्या माणसांशी नातं जोडायला भारतात, भवानीपुरात आली आहे.मात्र सर्जेराव आणि जेनिफर यांच्या प्रेमात, त्यांच्या लग्नात अडथळा येऊ लागतो एका अज्ञात शक्तीमुळे… आणि मग प्रवास सुरू होतो एका गूढाच्या शोधाचा, एका अमानवी रहस्याच्या भेदाचा…ही चाहूल आहे अकल्पिताची, अघटिताची आणि अधु-या राहिलेल्या एका प्रेमकहाणीची… काय आहे हि प्रेमकहाणी? कोणाची आहे हि प्रेमकहाणी ?‘चाहूल’ या मालिकेचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लीझान ही परदेशी युवती या मालिकेत जेनिफरची व्यक्तिरेखा रेखाटत आहे. एका परदेशी युवतीने नायिकेची भूमिका करणं, हे मराठी दैनंदिन मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. याशिवाय या मालिकेत अक्षर कोठारी, शाश्वती पिंपळकर, माधव अभ्यंकर, उमा गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
(अधिक माहिती लोकसत्ता मधील आहे)
"चाहूल"-नवी रहस्यमय मालिका
Submitted by कविता९८ on 16 November, 2016 - 10:33
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्यात काहीही चाललंय, त्या
ह्यात काहीही चाललंय, त्या जेनीला मारलं. भयंकर अघोरी काहीतरी चाललं होतं आणि कॅप्शन जात होती आम्ही अंधश्रध्देला प्रोत्साहन देत नाही अशा आशयाची. बदललं चॅनेल.
जेनीला मारूनच टाकलं आज! तिला
जेनीला मारूनच टाकलं आज! तिला त्या खोलीत, त्याच पलंगावर बसून अनाकलनीय पुस्तकं वाचायचा आणि अधूनमधून किंचाळायचा कंटाळा आला असावा
सर्जाला मिळवायचं असेल तर त्याला मारावं लागेल >>> ओह, असं सांगितलं होतं होय. मला वाटलं कोणाचातरी मृत्यु आवश्यक आहे म्हणाली. घरात डेथ झाली की लग्न पुढे जाईल या हेतूने. म्हणून तर ती प्रताप्याला मारायचं ठरवते ना?
ती प्रताप्याला मारायचं ठरवते
ती प्रताप्याला मारायचं ठरवते ते दोन्ही हेतूने - एक तर लग्न पुढे जावं म्हणून आणि दुसरं तो सर्ज्याच्या जीवावर उठलेला असतो म्हणून. पण जेनी ढगात कशी काय पोचली? जेनी राहिली असती तर निर्मला दोघांना एकत्र करून निघून गेली असती असा शेवट झाला असता. जेनी नाही म्हणजे सर्जा पण मरणार काय शेवटी? अरुंधतीने बरोबर म्हटलं होतं की मग की सर्जाचं लग्न मीनाक्षीशी पण होणार नाही आणि जेनीशी पण नाही.
पण जेनी ढगात कशी काय पोचली? >
पण जेनी ढगात कशी काय पोचली? >>> ,मुख्य नायिकेला च मारुन टाकल? मग नायिकेशिवाय सिरियल चालणार कशी?
नायिका तर निर्मला आहे ना!?
नायिका तर निर्मला आहे ना!?
काय पोरकटपणा लावलाय....त्या
काय पोरकटपणा लावलाय....त्या निर्मलेला बाकी सगळीकडे लुडबुड करणं जमतंय मग त्या सर्ज्याला पण खुर्च्या टेबलं हलवून दाखवायची ना. तो पण असला माठ आहे....ती प्रेमकविता त्या निर्मलेच्या वडिलांना दाखवून त्यांना विचारतोय की तुम्हाला ह्याचा अर्थ लागतोय का. भिंतीवरच्या मोजल्याच्या खुणा बघून म्हणे ती कसले दिवस मोज्त होती का. इथे मला कळलं हा अमेरिकेतून परत येईपर्यंतचे दिवस ती मोजत होती. आणि हा म्हणतोय मला काही कळत नाहिये. ह्या अस्ल्या नर्मदेच्या गोट्यामागे जायच्या ऐवजी तिने सरळ मुक्तीचा मार्ग धरावा. निदान पुढल्या जन्मी जरा बरा नवरा तरी मिळेल.
तरी नशीब त्या जेनीचं कुठे भूत झालं नाही.
>>नायिका तर निर्मला आहे ना!?
>>नायिका तर निर्मला आहे ना!?
नाही. आता ती कोण शांभवी आलेय तिचं आणि सर्जाचं लग्न होईल शेवटी असं दिसतंय.
स्वप्ना, अगदी अगदी!
स्वप्ना, अगदी अगदी!
ह्यातली शांभवी नांदा सौख्य
ह्यातली शांभवी नांदा सौख्य भरा मधली संपदा आहे. फार लांबवणार ही सिरीयल असं वाटतंय एकदंरीत. संपली की बघेन शेवटचे दोन भाग voot वर.
हायला, निर्मला आणि भानुमती
हायला, निर्मला आणि भानुमती दोघी डोक्यात जायला लागल्यात आता. निर्मलाचं 'शांभवी माझी जागा घेतेय' हे ऐकून तर कान किटले. बाई ग! तुझा तो सर्जा येताना होणारी बायको घेऊन आला होता. ह्याचाच अर्थ त्याचं तुझ्यावर प्रेम नव्हतं. एव्हढं कसं कळत नाहिये तुला. बरं तुला सर्जा हवाय तर घेऊन जा ना त्याला आणि मग लटका दोघं एखाद्या पिंपळाच्या झाडावर आणि ऐकव त्याला तुझ्या मरणाची सुरस कहाणी. इथे आमचा जीव का खाताय? त्रास!!!
लटका दोघं एखाद्या पिंपळाच्या
लटका दोघं एखाद्या पिंपळाच्या झाडावर >>>
निर्मला आणि भानुमती >>> कोण ही भानुमती?
आता तर सिरियलमध्ये लहान मुलीच भूत दाखवणार म्हणे.
स्वप्ना
स्वप्ना
बाकी तो सर्जा एकदम मंद आहे बहुतेक. ते एक कॅलेंडर घेऊन आलाय ते किती दिवस वाचतोय! एव्हानापर्यंत कॅलेंडर मागच्या पानावरच्या गोष्टी, रेसिपीज, मुहूर्त इ.इ. यांच्यासकट वाचून झालं असतं एखाद्याचं
अरूंधती मेली नसावी असं एक उगाच वाटतंय. कारण तिला ते भूत अगदी वेशीच्या जवळ गाठतं. पण ती मरताना नाही दाखवली.
इतर मालिकांपेक्षा ही जरा वेगळी आहे आणि रोज काहीतरी छोटंमोठं घडत राहतं यात म्हणून बरी वाटतेय पाहायला अजून तरी.
शेवट जवळ आला की लिहा, मग बघेन
शेवट जवळ आला की लिहा, मग बघेन तो भाग किंवा शेवटचे दोन भाग.
सिरियलमध्ये लहान मुलीच भूत
सिरियलमध्ये लहान मुलीच भूत दाखवणार म्हणे >>> हे कधी दाखवलं?
यात ती जेनी नाही का भूत होऊन
यात ती जेनी नाही का भूत होऊन आली, मग निर्मला आणि जेनी भूत भूत मारामारी करत बसल्या असत्या आणि सर्जा भूतलावर सुखी झाला असता.
जेनीला लिटरली आटोपली आहे!
जेनीला लिटरली आटोपली आहे!
>>कोण ही भानुमती?
>>कोण ही भानुमती?
बर्याच सिध्दी प्राप्त आहेत तिला. निर्मलेने आपल्या मारेकर्यांचा बदला घेऊन मुक्ती मिळवावी ह्यासाठी तिला मदत करतेय ती.
काल शांभवी पुन्हा एकदा 'मला
काल शांभवी पुन्हा एकदा 'मला त्या शक्तीपासून वाडा मुक्त करायचा आहे' का असं काहीतरी म्हणाली. तेव्हा तिची आई म्हणाली 'किती दिवसांपासून मी हे ऐकते आहे'. मी म्हटलं 'आम्ही सुध्दा'.
त्या काकांना कोणीतरी शांभवी पवित्र आत्मा आहे वगैरे सांगितलं होतं. एव्हढं असून तिला अजून निर्मला दिसलेली नाहिये की तिचा आवाज ऐकू आला नाहिये. बाकीची ऐरीगैरी भूतं मात्र हजेरी लावून जाताहेत. आधी त्या सर्जाच्या आईला कोणीतरी पछाडलं होतं आता वाड्यात अकाली मृत्यू झालेली मुलगी आहे म्हणे.
काल प्रोमोमध्ये दाखवलं की प्रताप्याला कपाटात एक मुलगा दिसतो आणि सर्जाला कपाटात एक मुलगी दिसते. 'राखेचा' मधलं हे कपाट प्रकरण अण्णांनी ह्या सेटवर आणलेलं दिसतंय बहुतेक. बाकी कुठल्याच सिरियलमध्ये त्यांना सलग धड रोल नसतोय असं दिसतंय. राखेचा मध्ये त्यांचा मृत्यू झाला, इथे कोमात गेलेत.
असो. कपाटातून लोक बाहेर येतानाची दृश्यं बघून आजकाल मला कपाट उघडायचीच भीती वाटायला लागलेय.
Submitted by स्वप्ना_राज :
Submitted by स्वप्ना_राज :
'वॉशिंग पावडर निरमा' च्या चालीवर पुढील ओळी वाचाव्यात (नेटवर पूर्ण जिंगल शोधूनही सापडत नाहिये....उदा. निरमाने बांधा समा अश्या काहीतरी ओळी होत्या हे नक्की पण नेटवर नाही मिळाल्या)
यशवंत भोसले सर्जा, यशवंत भोसले सर्जा
गावमे उजाला सर्जासे आये
अमरिकी जेनीभी इंडिया चली आये
सबकी पसंद सर्जा
यूएसमे रहकेभी ना मराठी भुले
पर 'भूत नही होते है' ऐसाही बोले
सबकी पसंद सर्जा
थोडासा गुलाल और बवाल ढेर सारा
दुनियाभरके भूतोंको गायब कर डाला
शांभवीकी पसंद सर्जा
माया, मनाली, मीनाक्षी और निर्मला
सबकी पसंद सर्जा
भारीयं हे
भारीयं हे
Submitted by स्वप्ना_राज :
Submitted by स्वप्ना_राज :
माय नेम इज निर्मला गोन्साल्विस
मै दुनियामे अकेली हू
मी गेले वरती सर्जा राहिला खाली
त्याच्या मागे आता लागलीय मुंबैवाली
अगर उसे मेरी याद आये जब चाहे चला आये
भूतगली प्रेतमहल पेड नं ४२०
एक्ष्यूज मी प्लीज..............
चाहूल सीझन २ येतोय! १२
चाहूल सीझन २ येतोय! १२ ऑगस्टपासून सेम वेळेला.
भाग 1 फक्त 3 episodes बघितले
भाग 1 फक्त 3 episodes बघितले मी
Submitted by स्वप्ना_राज :
Submitted by स्वप्ना_राज :
वाड्यातलं भूत पळवायला काकांनी मला हेरलं.
हेरलं ते हेरलं अन लगीन आपुलं ठरलं
लगीन झालं, गोंधळ झाला
आता एक काम हो उरलं
जमाली कमाली, डिसूझा चाळ माहिमवाली
मुकेश मिल्स, कुलधारा नि भानगढला
कुटं कुटं जायचं हनिमूनला सर्जा कुटं कुटं जायचं हनिमूनला
रातभर एकली हिंडू कशी
भुताला बाटलीत पकडू कशी
घरात मीनाक्षी न दारात निर्मला
एकांत मिळेना भेटायला
कुटं कुटं जायचं हनिमूनला
तुळशीची पानं घेऊन कारभारी
खेटून बसेन शेजारी
मीनाक्षी गायब नी आत्याही गायब
भारी गडबडीचा ह्यो मामला
कुटं कुटं जायचं हनिमूनला
भुताच्या हवेलीत गंमतीनं
मजेत राहू या संगतीनं
जाताना दोघं नी येताना तिघं
मुंजाच आणू या दावायला
कुटं कुटं जायचं हनिमूनला
आता बोल की रे ठोंब्या हनिमूनला
Pages