Submitted by नलिनी on 4 April, 2017 - 04:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी भाजलेले व सोललेले शेंगदाणे
लसूण : आवडीप्रमाणे हवा तेवढा
हिरवी मिरची : १०-१२ ( आवडीनुसार कमी अधिक)
मिठ : चवीनुसार
क्रमवार पाककृती:
मिठ, मिरची, लसूण मिक्सरला वाटून घ्यायचे.
ह्यात दाणे घालुन दाणे अर्धेच मोडतील ह्या बेताने मिक्सर चालवायचे.
कढईत २-३ चमचे तेलावर हि चटणी खमंग परतून घ्यायची.
वाढणी/प्रमाण:
हे खाणार्याच्या तिखट खाण्याच्या क्षमतेवर ठरेल.
माहितीचा स्रोत:
आजी, आई, काकू
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अय्या,आम्ही सेम टू सेम अशीच
अय्या,आम्ही सेम टू सेम अशीच करतो...
मस्त लागते...
छान!
छान!
ही खलबत्यात कुठुन करायची मिक्सरपेक्षा! आणि मग परतायची अजून स्वादिष्ट लागते!
मस्तं दिसतेय. करून बघणार!
मस्तं दिसतेय.
करून बघणार!
आजच करणार. मस्तं स्नोपाऊस आहे
आजच करणार. मस्तं स्नोपाऊस आहे इथे. गरम गरम भाकरी आणि ही चटणी.
कोथ्मीबीर + वरतून कच्चे तेल
कोथ्मीबीर + वरतून कच्चे तेल मस्त लागते अश्या चटणि सोबत..
तोम्पासुच
तोम्पासुच
वाह...मस्तच
वाह...मस्तच
पाकृ बद्दल अनेकानेक धन्यवाद.
पाकृ बद्दल अनेकानेक धन्यवाद. यापूर्वी गावांतून तव्यावर परतलेली आणि तिथेच भरडलेली अशी अस्सल गावरान चटणी अनेकदा खाल्लीये पण नक्की कशी करतात माहित नव्हतं. मी खाल्लेल्या चटणीत कधी लसूण नव्हता पण ठीके. दोन्ही प्रकारे आता करून बघेन. मला फार आवडते ...
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
वरदा, तो रगडा (ठेचा) .
तव्यावर चमचाभर तेल टाकून १०-१५ मिरच्या टाकायच्या. अरत परत करत त्या भाजायच्या. तवा खाली उतरवून त्यावर चवीनुसार मिठ टाकायचे आणि तांब्याने / ग्लासने/ फुलपात्र्याने त्या मिरच्या रगडायच्या. हवंतर परत एकदा तवा गॅसवर ठेवून परतायचे.
चुलीवर तापलेले लाल सायीचे दूध व त्यात भाकर चुरून व सोबत तोंडी लावायला हा ठेचा.
ह्यात मिरची आणि लसुण भाजुन
ह्यात मिरची आणि लसुण भाजुन घेत नाहीत का?
अदिती, नाही. नंतर तेलावर
अदिती, नाही. नंतर तेलावर परतायची आहे त्यामुळे भाजून घ्यायची गरज नाही.
मस्तच
मस्तच
मस्त.. मी पहिल्यांदा
मस्त.. मी पहिल्यांदा बाँम्बेव्हायकिंग या मायबोलीकराच्या आईच्या हातची खाल्ली ( त्या जुन्नरच्या ) नंतर मी करतो. पण माझ्या चटणीत शेंगदाणे जास्त आणि मिरच्या कमी असतात
नाही गं, मी खाल्लेल्या चटणीत
नाही गं, मी खाल्लेल्या चटणीत दाणे पण होते भरड वाटलेले… ठेचा माहित आहे तव्यावरचा
वा... मस्त आहे.
वा... मस्त आहे.
वॉव..किती सोप्पी आणी खमंग
वॉव..किती सोप्पी आणी खमंग टेस्टी चटणी कम ठेचा.. सुपर लाईक
धन्यवाद!
धन्यवाद!