खव्याचे गुलाबजाम

Submitted by varsha11 on 4 July, 2009 - 05:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

साहित्य - १/२ कि. खवा, २ सपाट वाट्या बरिक रवा, १ चमचा बेकिंग पावडर, पाऊण कि. साखर, दुध, वेलची पावडर, तुप्/रिफांईंड तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती - रवा दुधात कणिकेप्रमाणे मळुन ठेवणे.तासा-दिडतासानंतर रवा आणि खवा फुडप्रोसेसर मधुन फिरवुन घेणे. त्यात बेकिंग पावडर टाकुन चांगले फिरवुन घेणे. (फुडप्रोसेसर नसेल तर पुरणयंत्रातुन काढले तरी चालते.)बाहेर काढुन हाताने पण जरा मळुन घेणे. (जास्त मळलेले चांगले) नंतर गोळे करुन तुपात किंवा रिफाईंड मध्ये तळणे.

पाक - साखर बुडेल एवढे पाणी घालुन कच्चा पाक करावा. त्यात वेलची-जायफळ पुड घालावी.

अधिक टिपा: 

गोळे करताना साखरेचा एक दाणा त्या गोळ्यात घातला की गुलाबजामला रंग छान येतो.

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

...म्हणजे आज आम्हाला गुलाबजाम जमणार वाटत॑...
रेसिपी दिल्याबद्दल आभार...
गुलाबजाम झाल्यावर कळवतो..

खवा मुम्ब्॑इ अथवा ठाने मधे चाअंगला (good) कुठए मिलेल?
>>दादर - पणशीकर...

वा करून बघेन नक्की... धन्यवाद वर्षा आणि तुमच्या आईलाही!

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

पुण्यात चितळेंकडे, मुंबईत पणशीकर, सामंत आणि ठाण्यात खंडेलवाल यांच्याकडे मिळेल खवा. अमेरिकेत काही माहित नाही. Happy

मुंबईत असा वेगवेगळा खवा मिळतो, पण पुण्याला चितळयांकडे तरी एकच प्रकारचा खवा मिळायचा तोच आम्ही आणायचो.

मी मैदा टाकते त्यामुळे जास्तवेळ भिजवायची गरज नाही पडत. या गुलाबजामला बेकींग पावडरची पण गरज नाही खुप छान होतात.:)

किती ती चर्चा गुलाबजामून वर. डोळ्यासमोर तरळत आहेत. करावे लागतील आता. अमेरिकेत नानक चा खवा वापरला का कोणी? कसा आहे?

वर्षा,
मी ह्याच पद्ध्तीने करते गुलाबजाम. फक्त मिल्क मावा पॉवडर(देसी स्टोर मधली) घेते एक वाटी. रवा दूधात भिजवून मग मिक्सीत फिरवून वगैरे सेम.
मस्तच होतात. आतून मोठे खड्डे वगैरे होत नाहीत पण एकजीव खुसखुशीत आतून जाळी पडलेले होतात. एकदा मी फॅटफ्री मिल्क पॉवडर्(सुपरमार्केटातली) वापरूनही केले. तेव्हा त्यात जरासे शुद्ध तूप एक चमचा घातले. दोन्हीने छानच होतात.

मनुस्विनी, मिल्क पावडर खव्याच्या ऐवजी वापरतेस का?
गेल्या आठवड्यातच मी केले होते, पण बेकिंग पावडर थोडी जास्तच झाली, त्यामुळे गुलाबजाम पाकात घातल्यावर टेबल टेनिसच्या बॉल एवढे झाले. Happy

टेबल टेनिसच्या बॉल एवढे म्हणजे श्रिंक झाले का? असे म्हणायचे आहे का?
हो, नुसती मिल्क पॉवडर नाहीतर मिल्क मावा पॉवडर देसी दुकानातली. मी नुसता भिजवून मिसळला होता. मस्त होतात, ट्राय कर.

नाही ग, जरा मोठेच झाले.
ती मिल्क मावा पावडर ईथे मुंबईत मिळते का? मिळत असेल तर नक्की करुन बघेन.

तू मिल्क पॉवडर घे ना कुठलीही फॅट फ्री ,ती सुद्धा चालेल. तूप टाकायचे त्यात.
बरेच वेरीयशन आहेत गं. काही जण ह्या
१. मिल्क पॉवडर मध्ये पनीर्, रवा(मैदा),तूप, अर्धा चमचा बेकींग जरासे दूध.
२. मावा पॉवडर्,दूध्,रवा(नाहीतर मैदा),दही, तूप, बेकींग पॉवडर
३. फॅट फ्री मिल्क पॉवडर+ पॅनकेक मिक्स्(वॅफल मिक्स वा बिस्कविक)+ तूप + जरासे दूध
४. फॅट फ्री पॉवडर + दही+ मैदा + तूप + बेकीं पॉ
५. आताच सीमाने क्रीम टाकून लिहिलेत.

सर्व पद्ध्तीने मी केलेत व छान झालेत,क्रीम घातलेले बाकी आहेत अजून. Happy

गुलाबजामसाठी कच्चा पाक पण चालतो मला माहिती नव्हतं. रुचिरा आणि माझ्या आईची कृती दोन्हीकडे एकतारी पाक लिहिलं आहे. मी केले तेव्हा पाक चुकवला, त्याची पुन्हा साखर झाली. मग काला जामूनसारखे कोरडेच खाल्ले Happy

गुजा तळताना मात्र मंsssssद आचेवर तळावे लागतात तर छान होतात.