शीर्षक वाचून काय काय विचार केले असतील माहित नाही. भरलं वांगं हेच मुळात इतक्या लोकांचं आवडतं आहे आणि थालीपीठही. आजची ही पोस्ट आहे भरल्या वांग्याच्या थालीपीठाची. घरी अजूनही आई कधी कधी शिल्लक राहिलेल्या वांग्यांची, दोडक्याच्या भाजीची कधी आमटीची भाकरी करते. भाकरीच्या पिठात ती राहिलेली थोडीशी भाजी, तिखट, कांदा, कोथिंबीर घालून मोठ्या भाकरी थापते. आम्ही घरी असताना आवडीने अशा भाकरी खायचो त्यावर भरपूर तूप किंवा लोणी घेऊन. इथे माझ्याकडे भाकरीचे पीठ नियमित नसते, जे थोडंफार भारतातून आणते ते संपून जातं. घरून आणलेलं भाजणीचं पीठ मात्र मी फ्रिजर मध्ये ठेवून पुरवून वापरते. आता भाजणीचं पीठ पुरण्यास मुख्य कारण म्हणजे मी प्रत्येक वेळी थालीपीठ करताना भाजणीच्या पिठात थोडी कणिक, तांदळाचं पीठ, बेसन अशी भर घालून मळते त्यामुळे ते थोडे जास्त दिवस पुरतं.
तर एकूण काय की मला अशा मसाल्याच्या भाजीच्या भाकरी करता नाही आल्या तरी थालीपीठ मात्र नक्की करते. कालच वांगी करताना थोडा जास्त रस ठेवला होता. भाजीही आज सकाळी डब्यात न नेता फ्रिज मध्ये ठेवली होती संध्याकाळी थालीपीठ करायची म्हणून. आज ती बनवताना आठवणीने थोडे फोटो काढून घेतलेत. कदाचित अनेक जणी करतही असतील. आजच एका मैत्रिणीशी बोलताना लक्षात आले की ती तव्यावरच थापते. माझ्या सासूबाईही तव्यावरच थापतात. त्यामुळे गरम तवा थोडा थंड करून करेपर्यंत बराच वेळ जातो. इथे मी फोटो इन्वा व्हिडीओ मध्ये आई करते तसे कापडावर थापून तव्यात टाकायची कृती देत आहे. सुरुवातीला थोडे हळू होते पण एकदा हात बसला की एकावेळी दोन तव्यात थालीपीठे पटापट होतात.
साहित्य: शिळी शिल्लक राहिलेली मसाल्याची भाजी,
एक बारीक चिरलेला कांदा , कोथिंबीर चिरून, धणे-जिरे पूड, मीठ, हळद, हिंग, १ चमचा तिखट,४ चमचे तीळ, भाजणीचे पीठ(भाजीत मावेल इतपत, साधारण एक वाटी भाजीमध्ये २ वाट्या पीठ मावते).
भाजी पूर्णपणे चुरून पिठात आधी मिस्क करून घ्यावी.
पीठ कोरडे असतानाच त्यात हळद, तिखट, हिंग, मीठ, तीळ, कांदा, कोथिंबीर, धणे-जिरेपूड सर्व साहित्य कालवून घ्यावे.
एका वाटीत थोडे गरम पाणी घेऊन पिठात लागेल तसे घालून पीठ मळून घ्यावे. (मी सर्व पीठ पातळ करत नाही. सर्व पीठ घट्ट मळून घेते आणि लागेल तसे प्रत्येक गोळा थापताना त्यात पाणी घालते.)
गॅसवर तवा किंवा जाड बुडाचा पॅन ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
एका ताटात एक रुमाल किंवा सुती कापड ओले करून पसरून घ्यावे. ( माझ्याकडे सध्या रुमाल नसल्याने मी जाडजूड टीशू पेपर आहेत बाऊंटी ब्रँड चे ते दुहेरी करून वापरते. ८ थालीपिठांना टिकतात. )
कणकेचा गोळा थोडे पाणी लावून त्या रुमालावर हातानं थापून पसरवावा. चार ठिकाणी भोके पाडून पुन्हा एकदा त्या थापलेल्या थालीपिठावर पाणी मारून रुमाल ओला करून घ्यावा. (याने थालीपीठ रुमालावरून अलगद सुटून येते तव्यात.
रुमाल दोन्ही टोकांना धरून थालीपीठ तव्यात पालथे करावे. थोडा झटका दिल्यावर ते सहजपणे तव्यात उतरते.
एकदा ते तव्यात पडले की मग दोनीही बाजूला तेल लावून खरपूस भाजून घ्यावे.
थोडे शिजण्यासाठी वरून झाकण ठेवले मिनिटभर, तरी चालते. तेलावर परतून गेल्याने जास्त तेल वापरले जात नाही(आई तळूनही करते, ती चांगली लागतात पण तेल खूप खातात . )
दही, शेंगदाण्याची चटणी, थालीपिठावर भरपूर तूप घेऊन खायला मजा येते. सोबत लोणचं असेल आंब्याचं तर उत्तमच.
कधी कधी मसाल्याची भाजी दोन वेळा खायचा कंटाळा येतो. अशावेळी त्या भाजीची थोडी चव, भाजणीच्या पिठाचा खमंग वास, कांदा-कोथिंबिरीची चव, दाताखाली येणारे तीळ हे सर्व एकदम जमून येतं आणि जेवण एकदम झकास होतं मग. आधीच भरलं वांगं त्यात त्याचं थालीपीठ, मग काय? आजचा बेतही तसाच झाला. तुम्हीही करून बघा नक्की.
विद्या भुतकर.
छान
छान
तो. पा. सु. मस्त!
तो. पा. सु. मस्त!
छान, रुमालापेक्षा फॉइल वापरून
छान, रुमालापेक्षा फॉइल वापरून करणे सोपे जाते. पिठ सैल असेल तर थेट तव्यातही करता येतात.
फक्त भाजलेले वांगे, कुस्करुन भाकरीच्या पिठात मिसळून, मीठ मिरच्या गालून, भाकर्या करता येतात.
Mast
Mast
छान.
छान.
मस्त. मीही रुमालावर थापून
मस्त. मीही रुमालावर थापून थालीपीठ करते नेहमी. ईथे क्रूती दिली आहे. http://www.maayboli.com/node/54772
पण भरल्या वांग्याच कधी केलं नाही. आता ट्राय करून बघेन.
मस्त
मस्त
मला आपला वरण, काचऱ्या,
मला आपला वरण, काचऱ्या, शिळवडीच थालिपीठ इ. कृति टाकण्याचा बालसुलभ निरागासपणा खूप आवडतो. Oh! How I wish I still had that. Can't wait to read recipes of भाजलेला पापड, तळलेली कुरडई
Thank you all.
Thank you all.
दिनेश, तुमच्या कल्पना आणि रेसिपी खूप्च छान असतात.
फक्त भाजलेले वांगे, कुस्करुन भाकरीच्या पिठात मिसळून, मीठ मिरच्या गालून, भाकर्या करता येतात.>> ही मला आवडली. नक्की करुन बघेन.
राजसी, Thanks 'निरागस' शब्दासाठी. पण मह्त्वाचे म्हणजे सूप आणि काचर्या, थालिपिठ या तीन्च रेसिपिच मी आजपर्यन्त पोस्ट केल्या आहेत आणि तुम्हाला त्या लक्षात राहिल्या हे काय कमी आहे?
बाकी तुम्ही म्हणालात ते पदार्थ मला येत नाहीत. पापड, कुरडई त्यामुळे निश्चिंत असावे.
चला कुणीतरी आहे माझ्यासारखं.
चला कुणीतरी आहे माझ्यासारखं. मी सगळ्या उरलेल्या भाज्यांचे असेच थालीपीठ करते. विद्या भाकरीच पीठ, थालीपीठाची भाजणी , multigrain आटा सगळं मिळत इंडियन ग्रोसरीत. पटेलमध्ये जाऊन बघा
भारी दिसतयं थालीपीठ .
भारी दिसतयं थालीपीठ .
आम्ही प्लॅस्टिकवर थापतो
आम्ही प्लॅस्टिकवर थापतो थालिपीठं. भारतात दुधाची पिशवी वगैरे.
विद्या, मला तुझ्या शांत
विद्या, मला तुझ्या शांत डोक्याचं कौतुक वाटतं.
विद्या, मला तुझ्या शांत
विद्या, मला तुझ्या शांत डोक्याचं कौतुक वाटतं. +१०००
Thank you :).
Thank you :).
इतकी शांत वगैरे नाहीये. उलट जरा तापटच म्हणावे लागेल.
पण रोज घरचं, नोकरी, मुलं, रनिंग आणि लिखाण यातून बाकी काही विचार करायला शक्ती राहात नाही. आणि यात खर्च केली तर मग पुढे लिहिणं होणार नाही. त्यापेक्षा रोज लिहीत राहते. म्हणजे मागच्या विषयावर विचार करायला सुचत नाही.
खूप छान लागतात ही थालीपीठे.
खूप छान लागतात ही थालीपीठे. गावी गेलो की माझ्या आईकडे माझी खास मागणी असते एकदा तरी या थालीपीठासाठी.
याच प्रकारे दोडका आमटी, चाकवताचे गरगटे (आम्ही यात ताक वापरत नाही. चुका व तूरडाळ वापरून चाकवताचे गरगटे खूप छान लागते.) यांची पण छान लागतात थालीपीठे. एकदा ट्राय करुन बघा. सकाळचा अगदी हेल्दी नाश्ता होतो.
पण वांग्याची थालीपीठे ही एक नंबरच. वादच नाही.
आणि यात खर्च केली तर मग पुढे
आणि यात खर्च केली तर मग पुढे लिहिणं होणार नाही. >>> गुड , कीप इट अप.
भाज्यांमधे वांगे ही प्रचंड
भाज्यांमधे वांगे ही प्रचंड आवडती भाजी...
नक्की करणार..
दिदा..भाजलेल्या वांग्याची आयडीया मस्तच...पण समोर भरतासाठी भाजलेले वांगे असताना ते कुस्करुन पिठात मळवण्यासाठी मनाला काडीमोड देणे म्हणजे फारच कठिण काम होउन जाणार ..
.पण समोर भरतासाठी भाजलेले
.पण समोर भरतासाठी भाजलेले वांगे असताना ते कुस्करुन पिठात मळवण्यासाठी मनाला काडीमोड देणे म्हणजे फारच कठिण काम होउन जाणार ..>>
हे बरोबर वांगी भाजली म्हणजे भरीतच हवे! हां उरलेच भरीत तर थालीपिठाचा विचार करता येईल!
पण वांग्याचे थालीपीठ भारीच लागेल! छान !!
मी पण काही काही वेळा
मी पण काही काही वेळा उरलेल्या कालच्या भाजीत ( मिक्सर मधून गरगट्ट करायची ) कणिक +.तांदुळाची पिठी घालून तिखट- मीठ -कोथिंबीर -धन्या जिर्याची पूड आणखीन जे जे काही जास्तीच लागेल ते घालून मळून चक्क पराठे लाटते . भाजी पोळी दोन्हीएकाच वेळी पोटात जात
उत्तम !!!!
उत्तम !!!!
मी ते रुमाल, फॉइल, प्लास्टिक
मी ते रुमाल, फॉइल, प्लास्टिक काहीच नाही वापरत. माझ्याकडे तो मोठा दोन बर्नर्स वर बसेल असा तवा आहे. मी त्यातला एक बर्नर लो वर पेटवते आणि दुसरा जरा हाय वर. मग असेम्ब्ली लाइन सारखी सटासट थालेपिठे करते लो बर्नर च्या साइड ला डायरेक्ट तव्यावर थापायचं , थापून झालं की पलिकडे सरकवायचं हाय साइड ला. फार लवकर काम होतं!
शेवटचे छयाचित्र कातिल आहे
शेवटचे छयाचित्र कातिल आहे
मी ते रुमाल, फॉइल, प्लास्टिक काहीच नाही वापरत. माझ्याकडे तो मोठा दोन बर्नर्स वर बसेल असा तवा आहे. मी त्यातला एक बर्नर लो वर पेटवते आणि दुसरा जरा हाय वर. मग असेम्ब्ली लाइन सारखी सटासट थालेपिठे करते Happy लो बर्नर च्या साइड ला डायरेक्ट तव्यावर थापायचं , थापून झालं की पलिकडे सरकवायचं हाय साइड ला. फार लवकर काम होतं!>>> मी सुद्धा थोड्या फरकाने असेच करते. लो बर्नर च्या तव्यावर थापते व ते तव्यावरुन सुटायला लागले की लगेच दुसर्या मोठ्या बर्नरच्या तव्यात सरकवते. लवकर होतात.
Thank you all for your
Thank you all for your comments and inputs.
मग असेम्ब्ली लाइन सारखी सटासट
मग असेम्ब्ली लाइन सारखी सटासट थालेपिठे करते Happy लो बर्नर च्या साइड ला डायरेक्ट तव्यावर थापायचं , थापून झालं की पलिकडे सरकवायचं हाय साइड ला. फार लवकर काम होतं!>>>>>>> ______/\______
मैत्रेयी आयडिया मस्त आहे दोन
मैत्रेयी आयडिया मस्त आहे दोन तवे हाय-लो वर ठेवायची!
मै, तुझ्याकडे ग्रिडल आहे का?
मै, तुझ्याकडे ग्रिडल आहे का?
हो. मी जास्त लोकांना थालिपिठे
हो. मी जास्त लोकांना थालिपिठे, पराठे , डोसे असले करायचे असेल तर ते वापरतेच, अर्ध्या वेळात काम होतं खरंच.
अच्छा. मला डायरेक्ट तव्यावर
अच्छा. मला डायरेक्ट तव्यावर करायला भीती वाटते. आधीच अनेक ठिकाणी हात भाजण्याच्या शक्यता आहेत तिथे होतेच त्यात हे आणि नको.
ओव्हन, टोस्टर, सँन्ड्विच मेकर सर्व ठिकाणी कधी ना कधी भाजले आहे. पोळ्याची वाफ अस्तेच आणि.
'अरे संसार संसार........' हाहा
टिना +११
टिना +११
बाकी ईतर भाज्यांसाठी ठिक आहे पन भरीत? नेव्हर
Pages