स्किनलेस चिकन ड्रमस्टिक्स - १२
ग्रीक योगर्ट - २५० ग्रॅम
मीठ - १ छोटा चमचा
१. चिकन अतिशय स्वच्छ धुऊन घ्यावे.
२. सुरीने चार पाच ठिकाणी छेद द्यावे.
३. योगर्ट व मीठ मिसळून चिकनला लावून काचेच्या डब्यात घालून शीतकपाटात मुरवत ठेवावे. ५ डिग्री पेक्षा कमी पण शून्यपेक्षा जास्त तापमानात.
४. हवे तेंव्हा ३ ड्रमस्टिक्स मायक्रोवेव्हवयोग्य प्लेटमध्ये घेउन( ड्रमस्टिक्स मध्ये पुरेसे अंतर ठेवा) ३ मिनिटे मावेमध्ये शिजवावे. मावेची पॉवर कमी असेल तर वेळ वाढवा.
(त्याच प्लेटमध्ये) गरम गरम खावे.
कमीत कमी वेळ, जिन्नस व भांडी खर्चून सकाळी सकाळी ५० ग्रॅम प्रोटीन पोटात ढकलण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
१. लिम्बू, देशी दही, योगर्ट, ग्रीक योगर्ट असे प्रयोग करत शेवटी Emmi Yoqua हे योगर्ट वापरुन मला हवी तशी चव, स्निग्धता व मऊपणा आला. ग्रीक योगर्ट + मीठ ने त्याच्या जवळपास जाता आले.
२. ब्रेस्ट पिसेससाठी मात्र हेच सर्व करूनही बात कुछ जमी नाही.
३. चवीसाठी तिखट, मसाले, गार्लिक पेस्ट, पेस्तो असे सगळे प्रयोग करुन काहीच नकोवर स्थिरावलो.
४. कुपोषित न होता, थकवा ना वाटता, फॅड डाएट न करता वजन कमी करण्याचा हा उत्कृष्ट उपाय आहे असा अनुभव आहे.
मस्तं आहे.
मस्तं आहे.
बेश्ट. उद्या करणार.
बेश्ट.
उद्या करणार.
जबरा
जबरा
(No subject)
फोटो पण काढायला वेळ मिळाला
फोटो पण काढायला वेळ मिळाला नाही इतक्या मिनिमलिस्ट वेळेत संपवलंत?
झटपट चांगलं वाटतय. करून बघेन. तसंही नेहमी मसालेदार चिकन नको वाटतं.
अरे हो, चिकन ऐवजी बाळबटाटे, पनीर किंवा ते सोयाचं कायसंसं चालेल का?
भारी
भारी
भारी
भारी
मला वाटलं पाककृतीत वापरलेल्या चिकननेच मिनिमलिस्ट जीवनशैली ( मिम जीशै) अंगिकारली होती की काय ?
व्वाव ! शाखेशाखेवर मिळायला
व्वाव ! शाखेशाखेवर मिळायला लागलं तर नियमितपणे जायला हरकत नाही ( मांसाहारींना )
काचेच्या डब्यात घालून
काचेच्या डब्यात घालून शीतकपाटात मुरवत ठेवावे. ५ डिग्री पेक्षा कमी तापामनात >>> किती वेळाकरता मुरवले?
मिनिमलिस्ट लाईफस्टाईलला सूट
मिनिमलिस्ट लाईफस्टाईलला सूट होणारी मिनिमलिस्ट जिन्नस, वेळ वापरुन होणारी रेसिपी आहे खरी. पण म्हणून काहीही मसालेही नाहीत हे झेपलं नाही.
फोटोशिवाय पाकृ मला कधीच कळत
फोटोशिवाय पाकृ मला कधीच कळत नाही
पण चिकन मी कच्चेही खाऊ शकत असल्याने आवडेलच याची खात्री आहे.
तरी जमत असल्यास टाका फोटो. ते मुरवत पडलेलं ऊरलसुरलं काहीही चालेन.
ते ४०-५० ग्रॅम प्रोटीन
ते ४०-५० ग्रॅम प्रोटीन बिलकूल मिनिमलिस्ट नाही आहेत.
कारण १२ तंगडी खावूनच इतकं प्रोटीन मिळाणार ना...
इतकं प्रोटीन एका वेळेला खाणं पाहून तुमच्या खाणाच्या गरजा ज्यास्त आहेत हे दिसून येतं.
धन्यवाद !!
धन्यवाद !!
>>> चिकन ऐवजी बाळबटाटे, पनीर किंवा ते सोयाचं कायसंसं चालेल का?
ते या जिन्नसांचा पर्यावरणावर व जागतिक सेंद्रिय व मिनिमलिस्ट जीवनशैलीवर होणारा परिणाम बघून ठरवावे लागेल. (माझे समाजिक मत)
>>>किती वेळाकरता मुरवले?
साधारण १२ तास.
>>> काहीही मसालेही नाहीत हे झेपलं नाही.
मसाले घालून मसाले कच्चेच रहात होते. मसाले घालतो तेन्व्हा मी थोडे तेल लावून कन्व्हेक्शन ओव्हनमध्ये १५ मिनिटे भाजले तेंव्हा ते चांगले लागले.
>>>तरी जमत असल्यास टाका फोट
हो टाकेन.
>>> १२ तंगडी खावूनच इतकं प्रोटीन मिळाणार ना ?
झंपीतै आपले मार्ग्दर्शन मोलाचे असले तरी गणित चुकीचे आहे.
एक ड्रमस्टिक = १६ ग्रॅम प्रोटिन.
तीन ड्रमस्टिक = ४८ ग्रॅम
शिवाय ८ ग्रॅम मिळते मी वापरतो त्या योगर्टमधून.
म्हणजे एका मुठीत मावणार्या तीन तंगड्यात ५६ ग्रॅम झाले. करायला पाच मिनिटे खायला तीन मिनिटे.
एवढ्याच प्रोटिनसाठी सुमारे दहा अंडी खावी लागतील.
किंवा दीड लिटरहून जास्त दूध प्यावे लागेल.
किंवा १९ पोळ्या खाव्या लागतील.
जे मिनिमलिस्ट नसेल.
एका कोंबडेला जगवायला जे धान्य
एका कोंबडेला जगवायला जे धान्य लागेल ते तुमच्या एक्कोणीस पोळ्या आणि दीड लिटर दुधाहून नक्कीच जास्त असेल.
शिवाय तीन तंगड्या म्हणजे दोन कोंबड्या ना ? एकाला दोनच पाय असतात ना?
बाकी सगळं ठीक पण मायक्रो
बाकी सगळं ठीक पण मायक्रो वेव्ह मध्ये चिकन छान शिजेल/कुक होईल ह्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही
शेअर केल्यबद्दल थान्क्स. एक
शेअर केल्यबद्दल थान्क्स. एक जेन्युईन शंका...
३. योगर्ट व मीठ मिसळून काचेच्या डब्यात घालून शीतकपाटात मुरवत ठेवावे. ५ डिग्री पेक्षा कमी तापामनात.
>>> चिकनला हे योगर्ट व मीठ लावायचे आणि मग ते शीतकपाटात ठेवायचे ना? कि चिकन वेगळे ठेवायचे?
पण मायक्रो वेव्ह मध्ये चिकन
पण मायक्रो वेव्ह मध्ये चिकन छान शिजेल/कुक होईल ह्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही>>>>>> छान शिजते.स्वानुभव आहे,ग्रिल्ल मोडवर ठेवले होते.बरेचवेळा केले,पण मावेला एक वास येत होता,त्यामुळे मी परत कधी शिजवले नाही.
>> छान शिजते.स्वानुभव आहे
>> छान शिजते.स्वानुभव आहे,ग्रिल्ल मोडवर ठेवले होते
इकडच्या (अमेरिकेतल्या) काही मायक्रोवेव्ह मध्ये कन्व्हेक्शन मोड असतो पण त्यासाठी "प्रीहीट" किंवा तत्सम काही रिच्युअल करावे लागते. मग त्यापेक्षा ट्रॅडिशनल बेकींग च बरं असं मला वाटतं. तेव्हा अजूनही मायक्रोवेव्ह मध्ये शिजवणं मला पटत नाहीये*
(*मी मायक्रोवेव्ह ची फॅन नाही त्यामुळे त्याचा वापर न करण्याकडेच माझा ओढा असतो)
अरे वा. ट्राय करणेत येईल.
अरे वा. ट्राय करणेत येईल.
>>> वजन कमी करण्याचा हा उत्कृष्ट उपाय आहे
रेसिपीच्या फोटोपेक्षा याचा पुरावा म्हणून एखादा फोटो टाका.
चार आणे की मुर्गी आणी बारा
चार आणे की मुर्गी आणी बारा आण्याचा मसाला यातला मसाला वगळ्याने बात जमी नई!
नुसत ग्रीक योगर्ट आणि मिठ,
नुसत ग्रीक योगर्ट आणि मिठ, जमणार नाही. कमीत कमी तिखट हवच ह्यात. फोटो टाका. पांढर चिकण कस दिसत बघु...
are wah.. ekdum sut sutit
are wah.. ekdum sut sutit vatatay.. microwave chya aivaji pan/kadhai madhe hoil ka ?