Submitted by jpradnya on 8 February, 2015 - 07:11
बरेच लोक ब्रेड ह्या खाद्यप्रकाराला यथेच्छ नावे ठेवत असतात. ़ जगातले निम्में लोक ब्रेड किंवा तत्सम पदार्थ रोज खातात. एक भारत सोडला तर पोळी/भाकरी कुठेही बनत नाहीं. मग कोणत्या आधारा वर आपण असा निष्कर्ष काढतो? (मैद्या चा ठीक आहे...पण wholewheat / multigrain bread पण वाइटच का मानायचा?
़
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरे आहे हाय फ़्रुक्टोस कोर्न
खरे आहे हाय फ़्रुक्टोस कोर्न सीरप बाबत. माझ्या मुलाच्या फुड अॅलर्जिज, आणि एक्झिमामुळे मी No Fructose corn syrup and non GMO bread वापरते. भारतातल्या ब्रॅन्ड्सविषयी काही कल्पना नाही.
हे कँसर वगैरेचं फॅमिली डॉक्टर
हे कँसर वगैरेचं फॅमिली डॉक्टर मधेच वाचलेलं बहुतेक ! आणि सकाळमधे काही परिसंवादांची वगैरे माहिती येते त्यात.
Couldn't resist writing here.
Couldn't resist writing here. Bought Panasonic bread maker 6 months ago. It's excellant. I still need to use Yeast but I can definitely control other ingredients. Zero efforts. I recommend all of you to buy. My bread is usually 2:1 bread flour & Ashirwaad Select atta and dry fruits and seeds
आभा, इंटेरेस्टिंग!
आभा, इंटेरेस्टिंग!
ब्रेड फ्लोअर नक्की काय असते? ते भारतात सहज मिळते का सुपरमार्केट मध्ये? याला इतर पर्याय आहेत का?
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/50965
इथे ब्रेड मेकर बद्दल माझा लेख आहे. यात साधा नेहमीचाच मैदा वापरायचा असतो. इतर पिठेही चालतात.
परदेशी लोकांचे व भारतीय
परदेशी लोकांचे व भारतीय लोकांचे जेनेटिक्स भिन्न आहे.
परदेशी लोक स्थूल असतात , ब्रेड खातात , दारु पितात , म्हणुन भारतीयानाही ते रुचेलच असे नाही.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3860846/
वाचायचा कंटाळा आला आहे... कुणाला ही लिंक वाचून काही रिलेवंट लिहावेसे वाटले तर लिहा
Bread flour paradeshaat nakki
Bread flour paradeshaat nakki milate. Deshatala mahiti nahi pan plain Maida pan chalato. Add flax seed etc
मी सिंगापुर मध्ये रहाते.
मी सिंगापुर मध्ये रहाते. मैत्रीणीसाठी मैद्याचा ब्रेड पण ट्राय केला आहे. लोफ, पावभाजीचे पाव, पिझ्झा बेस, डिनर रोल्स मस्त होतात. दिसायला दिनेशदांच्या ब्रेडमेकर सारखाच आहे
How much time does it take to
How much time does it take to make bread from beginning to actually serving?
Can we use indigenous grains / cereals like jwari, bajri, ragi etc in bread maker?
२ तासांपासुन ५:२० पर्यंत.
२ तासांपासुन ५:२० पर्यंत. कुठला ब्रेड आहे त्याप्रमाणे. आटा ब्रेडला जास्त वेळ लागतो. ५:२० तास.
व्हाईट ब्रेड पण अप्रतीम होतो.
व्हाईट ब्रेड पण अप्रतीम होतो. मऊ लुसलुशीत वगैरे.
Thank you Abha.
Thank you Abha.
If I put bread for baking in the night it should be ready for morning breakfast and tiffin.
Now I should look for which
Now I should look for which brand is good in India
राजसी, मी जनरली ब्रेड फ्लोर,
राजसी, मी जनरली ब्रेड फ्लोर, आटा, ज्वारीचे पीठ, फ्लॅक्स सीड पावडर, नाचणी पीठ असाच मिक्स ब्रेड करते.
येस, सकाळी खमंग वासानीच जाग
येस, सकाळी खमंग वासानीच जाग येते.
Sahi
Sahi
Aata bread maker shodhane aale
Panasonic is the best.
Panasonic is the best. Available asel tar nakki to her ghya. Thoda mahag ahe kenwood peksha, but 100% worth it
OK, nakki
OK, nakki
धन्यवाद आभा आणि दिनेशदा.
धन्यवाद आभा आणि दिनेशदा.
आटा ब्रेड म्हणजे होल व्हिट ब्रेडच ना? थोडा मैदा + आटा असे?
असे करता येतंय तर घ्यायला हवा. जवस, तीळ, लसुण वगैरै टाकुन पण मस्त ब्रेड करता येइल.
आभा तुमच्या पॅनासोनिकचे मॉडेल कुठले ते पण सांगाल का? कारण गुगल सर्च अेकदम ₹ ५०- ६० हजार वाले मॉडेल्स दाखवतोय ॲमझॉनवरुन.
मानव, औद्योगिक रित्या मैदा
मानव, औद्योगिक रित्या मैदा करताना आधी गहू भिजवून, ते रोलर मधे प्रेस केले जातात. आतून जो गोळा निघतो, तो कुटून त्याचा मैदा करतात.
वरचे टरफल निघते, त्यापासून कोंडा ( व्हीट ब्रान आणि व्हीट पोलार्ड ) करतात. या मैद्यातच परत थोडा ब्रान मिसळून तो आटा म्हणून विकत असत. नंतर आता चक्की आटा म्हणून वेगळा मिळायला लागला. औद्योगिक रित्या रवाही असाच करतात, म्हणून तो भिजवला कि त्याचा लगदा होतो. लापशीचा रवा ( ब्रोकन व्हीट ) मात्र तसा नसतो आणि म्हणूनच तो शिजायला वेळ लागतो.
पण औद्योगिक वापरासाठी चक्की आटा वापरत असतील, असे मला वाटत नाही. त्यामुळे मैद्यात कोंडा मिसळूनच हे करत असावेत.
मैद्यामधले ग्लुटेन हे पावासाठी आवश्यक असते. त्याशिवाय तो योग्य तर्हेने फुगत आणि आंबत नाही. त्यामधे इतर कुठलेही घटक वा पिठ
मिसळले कि या क्रियांवर परिणाम होतो.
त्यामूळे पावासोबत इतर घटक खाणे योग्य ठरते. नीट चावून खाल्ल्यावर योग्य ते मिश्रणच पोटात जाते.
लसणाची चटणी, अळशी, तीळाची चटणी, खोबर्याची चटणी, इतर भाज्या यांच्यासोबत पाव खाणे चांगले.
अच्छा दिनेशदा!
अच्छा दिनेशदा!
छान माहिती. तुम्ही फंडाच क्लिअर करुन टाकलात.
धन्यवाद.
Panasonic SD-P2001
Panasonic SD-P2001
हे कँसर वगैरेचं फॅमिली डॉक्टर
हे कँसर वगैरेचं फॅमिली डॉक्टर मधेच वाचलेलं बहुतेक ! आणि सकाळमधे काही परिसंवादांची वगैरे माहिती येते त्यात
<<
अच्छा! म्हणजे ते इंजिनियर बालाजी तांबे यांनी विकत घेतलेलं पुरवणीचं चिरकुट होय! मग असलं ज्ञान तिथून येणं बरोबर आहे.
ब्रेड हा माझा अतिशय आवडता
ब्रेड हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे पण गोड ब्रेड अज्जिबात आवडत नाही.
माझ्यासाठी ब्रेड म्हणजे पोळीच्या चवीचा पण स्पॉंजी असा हवा.
इतकाही मऊ नको की खाताना गिळगिळीत होऊन टाळूला चिकटावा- जसा मॅक्डोनाल्डसच्या बर्गरचा चिकटतो.
रत्नागिरीत आठवड्यातून एक दोनदा पाववाला घरी यायचा आणि त्याच्याकडे स्वस्तात वडापावला वापरतात तसे पाव मिळायचे. स्लाईस ब्रेडमध्ये पण दोन तीन प्रकार मिळायचे.
मुंबईत तर विविध ब्रेडसची चंगळच.
पण या गावात आल्यावर ब्रेड चा नॉशिया यायला लागला इतके इथे गोड गोड ब्रेड मिळतात.
मध्ये पाच सहा वर्षे ब्रेड खाणेच सोडले होते.
हल्ली हैद्राबादच्या मॉडर्न बेकरीचे ब्रेड इथे येतात ते ही आठवड्यातून दोनदा. त्यांचे प्लेन ब्रेड्स, सँडविच ब्रेड, मल्टिग्रेन्/रागी ब्रेड आणि ब्राऊन ब्रेडही छान आहेत.
एक्सपायरी डेटनंतर त्यावर लगेच बुरशी चढते म्हणजे प्रिजर्वेटीव कमी असणार(आमच्या गावातले ब्रेड आठवडाभर बाहेर राहिले तरी वाळतात पण बुरशी लागत नाही.)
मानव, हैद्राबादच्या डिलाईज बेकरीतही ताजे आणि चवदार ब्रेड मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे.
आता आभाने लिहिलेले वाचल्यावर पॅनासॉनिकच्या ब्रेड मेकिंग मशीनचे रेट चेक केले २५००० पासून आहेत.
२५००० वाल्यात ४० प्रकार करता येतात म्हणे.
भारतात कुणी ब्रेड मशीन वापरणारे आहेत का माबोकर?
साती, ओके चेक करतो.
साती, ओके चेक करतो.
हो आणि पॅनासोनिक महाग आहे. इतर काही आहेत दहा हजारच्या आत, केनवुड, वंडरशेफ वगैरे पण कसे असतील बघायला पाहिजे.
उत्साहाच्या भरात २५ हजारचे घ्या आणि दहा दिवस वापरुन फुलं वहा असे होईल की काय म्हणुन धजावत नाही.
पॅनासॉनिकमध्ये पीठ भिजवणे,
पॅनासॉनिकमध्ये पीठ भिजवणे, फुलवणे आणि भाजणे असे सगळे होते असे दिसतेय.
तिथेच सहा सात हजाराचे केनस्टर चे दिसतायत पण त्यात बहुतेक पीठ मळवणे होत नसावे केवळ भाजून होत असावे.
साती केनवूडचे म्हणताय का? ते
साती केनवूडचे म्हणताय का? ते पण सहा सात हजाराचे आहे आणि त्यात पीठ मळवणे पण होते. त्यात ११ प्रोग्राम्स आहेत.
हे त्याचे मॅनुअलः
https://data2.manualslib.com/pdf4/89/8871/887067-kenwood/bm230.pdf?4a9bb...
अरे वा!
अरे वा!

मस्तच.
मानव , तुम्ही घेऊन बघा आणि मला सांगा!
मी अजून कोणकोणते त्या रेंज
मी अजून कोणकोणते त्या रेंज मध्ये आहेत आणि त्यात काय काय करता येते याची माहिती काढतो आणि टाकतो (स्वयंपाकघराची उपकरणेवर).
मग आपण टॉस करुया कोणी आधी घ्यायचे आणि वापरुन सांगायचे ते.
अक्का चपात्या-भाकर्या करायचा
अक्का चपात्या-भाकर्या करायचा कंटाळा आलाय का?
ब्रेड मेकरमधे, हवे ते घटक
ब्रेड मेकरमधे, हवे ते घटक वापरून ब्रेड करता येतात पण त्यासाठी खास यीस्ट वापरावी लागते. त्यात नुसते पिठही मळून घेता येते ( चपाती, पराठा वगैरे ) आणि जॅमही करता येतो.
सस्मित, कंटाळा नाही हो, पण
सस्मित, कंटाळा नाही हो, पण ब्रेड आवडतो आणि आमच्या गावात चवदार ब्रेड रेअरली मिळतो.
म्हणून उपद्व्याप.
मानव, चालेल.
मग आपण ब्रेड गटग करू हैद्राबादला नैतर बहामनीत.
पन्नास हजाराचा ब्रेड मेकर..
पन्नास हजाराचा ब्रेड मेकर..
ते एफ्डीला टाकून त्याच्या व्याजात हवे ते ब्रेड येतील
तैमूरजी, नाहीयेणार.
तैमूरजी, नाहीयेणार.

हल्ली एफ डी चं व्याज कित्ती कमी झालंय?
५० हजाराला ८ टक्के जरी व्याज
५० हजाराला ८ टक्के जरी व्याज पकडलं.
वर्षाला ४,०००. त्याच्यावर आयकर २०% काटुन, उरले ३,२००
दिवसाला ८ रुपये ७६ पैशे. कोण देणार एवढ्यात ब्रेड?
ब्रेड बनवतांना डालडा वापरतात
ब्रेड बनवतांना डालडा वापरतात कां? वापरत असतील तर तो मुळीच नको. साजूक तुपात, फिल्टर्ड तेलात बनवून देत असतील पाव, तर चालतील. नेहमी खाणार असाल तर फायबरही भरपूर जायला हवं पोटात...
दिवसाला ८ रुपये ७६ पैशे. कोण
दिवसाला ८ रुपये ७६ पैशे. कोण देणार एवढ्यात ब्रेड?
<<
इतक्यात अंडाभुर्जीच्या गाडीवरल्या ब्रेडचे किमान ८ बन्स किरकोळ दराने मिळतील. होलसेल भावात डझनभर.
Ghari bread banavane farse
Ghari bread banavane farse kathin nahi. Mami chi whole wheat buns chi recepi try kara lokaho.
ब्रेडचा जरा जास्तीच जाच होतो.
ब्रेडचा जरा जास्तीच जाच होतो. कदाचित आपण तो वरचेवर घरी आणतो म्हणून असेल.
पण फायबर रहित (आणि यीस्टयुक्त) आहे म्हणून त्याबरोबर भाजी किंवा सलाड वगैरे खाल्ले पाहिजे हे जसे खरे आहे, तसेच एकूणच आहारात भाज्या सॅलॅड वाढवले पाहिजे. ब्रेड वर्ज्य करून भरपूर भात खाल्ला वरचेवर पुऱ्या, बाहेरचे नान, पराठे, फ्रोझन नान वगैरे खाल्ले तर ब्रेड इतकेच वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतात.
भारतात राहणारे लोक (विशेषतः ऑफिस मध्ये काम करणारे) ४-५ च्या चहाच्या वेळी भले मोठ्ठे तळलेले सामोसे, ब्रेडपॅटिस (ब्रेड बेसनात बुडवून तळलेला असतो), वडे, साबुदाणा किंवा बटाटा चिवडा असले पदार्थ खातात ते सगळे ब्रेड वर्ज्य केल्याचे फायदे पुसून टाकत असतात.
एकूणच आपण घरात काय खायचे आणि ३ वेळच्या मुख्य जेवणांना काय खायचे यावर खूप विचार करतो आणि मग मधल्या वेळात असे इतर पदार्थ घुसखोरी करून शरीरात पोहोचतात.
मला मात्र ब्रेड खाण्यापेक्षा
मला मात्र ब्रेड खाण्यापेक्षा घरी ब्रेड बनवायला आवडतो. त्यामुळे घराला असा मस्त वास येतो. आणि गरम गरम ब्रेड कापायला पण मजा येते.
सई, purrfect निरिक्षण
सई, purrfect निरिक्षण
साती, मानव, जर ब्रेड आवडत असेल तर ब्रेड मशिन जरूर घ्या. फार महाग आणि खूप वेगवेगळे फंक्शन्स असलेलं नाही घेतलंत तरी काही बिघडत नाही. . मी UK मध्ये सेलमध्ये फक्त £30 ल घेतल होतं. त्यात फक्त ७-८ सेटिंग्स आहेत. आम्ही तो आठवड्यातून एकदा तरी वापरतो -
मुख्यतः पूर्ण मैद्याचा किंवा कधी कधी होलव्हीट. त्यात काळे तिळ, खसखस, ओरिगॅनो / पिझ्झाचं सीझनिंग टाकले की कमी गिल्ट येतो
बाहेरचा ब्रेड जड वाटतो, घरी बनवलेला खरंच हलका वाटतो.
http://www.amazon.in/Kenwood
http://www.amazon.in/Kenwood-BM230-600-Watt-Bread-Maker/dp/B00BKXAYNE/re...
५०,००० रुपये काय ? साधारण साडेसहा हजार रुपयात मिळते हे मशीन, भारतात !
आता वरच्या पोस्ट परत वाचल्या
आता वरच्या पोस्ट परत वाचल्या - २५/५० ग हजाराचे मशिन!!! अजिबात नका घेऊ, सुरुवातीला तरी. माझा £30 चा आहे म्हणजे ३००० रू. चा. आणि खूप चांगलं काम देतोय.
आभा, तुम्ही ज्वारी, नाचणी सुद्धा वापरलीत? मस्त __/\__
मी इतके दिवस शहाण्या बाळासारखी फक्त्स गव्हाचं पीठ वापरत होते. आता दुसरी पिठं नक्की ट्राय करणार.
यीस्ट वापरणं compulsary ahe
यीस्ट वापरणं compulsary ahe ka, यीस्ट ला काही पर्याय try kela ahe ka?
दही
दही
Pages