शाही व्हेज बिर्यानि

Submitted by दिनेश. on 25 August, 2009 - 17:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भातासाठी : दोन कप बासमती तांदूळ, दोन तीन हिरव्या वेलच्या, दोन लवंगा, एक टेबलस्पून तूप,
मीठ, ( सजावटीसाठी भाजलेले काजू, तळलेला कांदा, चिमुटभर केशर, सर्व ऐच्छीक )

ग्रेव्हीसाठी : ५०० ग्रॅम मिक्स्ड फ़्रोझन भाज्या ( यात गाजर, फ़रसबी, मका असते ), एक टिन
पील्ड टोमॅटो ( नसल्यास चार मोठे लालबुंद टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून सोलून व एक
टेबलस्पून टोमॅटो सॉस ), एक टिन इव्हॅपोरेटेड मिल्क ( तो न मिळाल्यास एक कप सायीसकट
दूध आणि अर्धा कप मिल्क पावडर ), तीन कांदे (उभे चिरुन), दोन टेबलस्पून तूप, एक टिस्पून
जिरे, एक लवंग, एक इंच दालचिनी, दोन चार मिरीदाणे, चार लाल मिरच्या, तीन हिरव्या वेलचीचे
दाणे, एका मसाला वेलचीचे दाणे, मीठ, व चवीपुरती साखर (टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी )

क्रमवार पाककृती: 

एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात गेव्हीचे सर्व मसाले परता. त्यावर कांदा घाला, तो जरा
परता.( तो फ़क्त गुलाबी सोनेरी परतायचा आहे )खमंग वास सुटला, कि टोमॅटो घाला. परतून पाणी आटू द्या. गॅसवरुन उतरुन थंड करा
व मिक्सरमधे ब्लेंड करुन घ्या. ( हे आदल्या दिवशी केले तरी चालेल. )
राहिलेले एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात फ़्रोझन भाज्या घाला. जरा परतून त्यात दुध
घाला. भाज्या शिजू द्या. मग त्यात तयार केलेली ग्रेव्ही घाला. मीठ घाला, साखर घाला, व सर्व
आटू द्या, पण पुर्ण कोरडे करु नका.

भातासाठी : तांदूळ धुवून निथळून घ्या. एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात भाताचा मसाला
घाला. त्यावर चार कप गरम पाणी घाला. मीठ घाला.उकळी आली कि तांदूळ वैरा. ढवळत आठ
मिनिटे शिजू द्या. मग आच मंद करुन, दोन मिनिटे झाकण ठेवून भात शिजवा. मग झाकण काढा
( बासमती तांदूळ दुप्पट पाणी व दहा मिनिटे, याने व्यवस्थित शिजतो ) भात मोकळा हवा.
आता भाजीचे भांडे एका तव्यावर ठेवा. त्यावर हलक्या हाताने भात पसरा. वापरत असाल तर केशर
थोड्या दूधात खलुन, त्यावर शिंपडा. घट्ट झाकण ठेवून दहा मिनिटे, मंद आचेवर तवा ठेवा. अगदी
आयत्यावेळी झाकण काढा. हवा तर वर तळलेला कांदा, भाजलेले काजू पसरा.

चार सहा जणांसाठी पुरेल. सोबत एखादे लोणचे घ्या.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, मस्त आहे पाककृती. वाचुनच तोन्डाला पाणी सुटलं. ह्या वीकांताचा मेन्यु ठरला तर.
आमच्याकडे नक्की आवडणार ही बिर्याणी.

दिनेशदा मस्त पाककृती. या बिर्याणी बरोबर कांदा, टॉमॅटो, काकडी ची दही, हिरवी मिरची घालुन केलेली कोशिंबीर मस्त लागेल.... Happy

कालच केली मी ही बिर्याणी. मस्त झाली होती. आम्ही तिघांनी [यात माझा ३ वर्षाचा लेकही आला]
अगदी चाटुन पुसुन साफ केलं पातेल. माझ्या खाण्याच्या बाबतीत अत्यंत नाठाळ असलेल्या मुलाला आवडेल अशी पाककृती दिल्याबद्दल खुप आभार!

दिनेशदा, अगदी मस्त होते ही बिर्यानी. चव तर अप्रतिम !!! नवरा खुष, लेक खुष. त्यांच्याकडुन तुमचे स्पेशल आभार Happy ही बघा मी बनवलेली बिर्यानी. झाकण घट्ट नव्हते म्हणुन मी दम लावला होता. तुमची ही बिर्यानी आणि पालक रायता...
P1020302(1)(1).jpg

रायताचा फोटोच अपलोड होत नाहीये Sad

सुंदर फोटो, या बिर्यानिसाठि मी बहुतेक तयार मिळाणारे घटकच वापरले आहेत. त्यामुळे तसा व्यापही कमीच असतो.

स्वतःची अक्कल अजिबात न चालवता जशीच्या तशी बिर्याणी केली आणि खूप सुंदर झाली. चविष्ट, सौम्य आणि खरोखरच 'सुंदर'. 'पोटा'पासून धन्यवाद. Happy

खरं सांगू, हाताशी असलेले घटक वापरुन केलेला हा एक प्रयोग होता. अस्सा फक्कड जमेल, अशी मलाही कल्पना नव्हती.

दिनेशदा ,
आजच ही बिर्याणी केली. अप्रतिम झाली . तुमचे खूप खूप आभार एवढी छान रेसिपी दिल्याबद्दल. मी ही मेघना प्रमाणेच स्वतःची अक्कल अजिबात न चालवता जशीच्या तशी बिर्याणी केली आणि खूप सुंदर झाली.

भातासाठी : तांदूळ धुवून निथळून घ्या. एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात भाताचा मसाला
घाला. 'भाताचा मसाला' म्हणजे कळल नाही.... plz help

साहित्यात भातासाठी जो मसाला दिलाय तो <<<दोन तीन हिरव्या वेलच्या, दोन लवंगा >>>
ग्रेव्हीसाठी वेगळा मसाला दिलाय.

पुदिना आणि कोथिंबीर एकत्र करून हातानेच चुरडून भाजी आणि भाताच्या थरांमधे पसरावी. बाय द वे, कुठे तरी वाचलेय की वेजी बिर्यानी ला 'तेहरी' म्हणतात..

मी ऑफीसमधल्या हॉलिडे लंच पार्टीला नेली होती ही डिश. मस्त होते अगदी. लेफ्ट ओव्हरसाठी आधीच क्लेम लागले गेले,पण शिल्लक राहीलीच नाही.
इतक्या सुंदर रेसिपीबद्दल धन्यवाद !

मी हि बिर्याणी BBQ पोटलकला करणार आहे. १३ मोठे, २ लहान जण असतील. बाकि BBQ चे बरेच items आहेत,पण राइस हा एकच असणार आहे. वर दिलेल्या प्रमाणात केला तर पुरेल का सगळ्यांना? २ कप म्हणजे राईस कुकरचा कप कि नेहमीचा measuring cup?

मी करुन पाहिलीये ही, मस्त होते, प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता. आता लगेच करुन परत खावु वाटतेय Happy

Pages