बनुताईंच्या पार्टीची तयारी

Submitted by एम.कर्णिक on 22 September, 2009 - 13:45

आईऽऽ, माझ्यापण मित्राना कधी ग बोलवायचं?
घरी बोलवुन हळदीकुंकू सगळ्याना द्यायच ?

तुझ्या मैत्रिणी कशा ग येतात हळदीकुंकवाला ?
बोलवायचय ना मलाहि नासिर, ऋषी नि मेरीला

लिली, धनंजय, संजू, अंजुम, फत्ते नि अनिकेत
हे पण माझे बेस्ट्फ्रेंड् तेव्हा बोलवायचे आहेत

नायतर करुया का ग सत्तेनारायण पूजा ?
काकांच्या घरि झाली तेव्हा कित्ती नं मज्जा ?

कशी नं साधू ट्रेडरची शिप समुद्रात बुडली ?
वाइफनि त्याच्या प्रसाद खाल्यावर वरती आली ?

प्रसाद पण किति मस्तच अस्तो नै का ग आई ?
शिरा गुलगुलित गोड मला किति आवडतो बाई !

(पण) खाय्ला मिळाय्ला सगळी स्टोरी लागते ऐकाय्ला…
नै चालणार हंऽऽ! आधीच पायजेत शिरा वडे द्यायला

नकोच नायतर; बोलव माझ्या बर्थेडेच्या दिवशी
सगळे येतिल, प्रेझेंट्स देखिल मिळतिल छानशी

अग पण माझा हॅपी बर्थ्डे कधि येतो ते सांग
कॅलेंडरमधि बघतेस का ? की देउ तुला पंचांग ?

बाबा, वर्षानेच कसा हो येतो माझा बर्थडे ?
एव्हरी मंथ अस्तो नै का हो दोन तारिखचा डे ?

गुलमोहर: 

कोनत्या महिन्याच्या दोन तारखेला ते सांगा म्हणजे आमच्या शुभेच्छा बनुताईंपर्यंत पोहवू आम्ही...

मस्त Happy

वैशू, कविता, अक्षरी, वर्षा, पूनम, नितीन, प्रकाश, स्मिता आणि सर्व मायबोलीकर जे बनुताईंवरच्या कविता वाचतात आणि आनंदित होतात,
तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
-मुकुंद कर्णिक