उर्ध्वश्रेणीकरण !!!! मायबोलीचा स्वयंगोल?????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 18 January, 2017 - 05:35

मायबोलीचे ऊर्ध्वश्रेणीकरण होणार हे समजल्यावर मला व्यक्तीशः खूप आनंद झाला.पण हाय रे कर्मा ,नवीन मायबोली तद्दन तकलादू निघाली.सगळी पांढरा समुद्र व मधेच निळ्या लाटा दिसाव्यात तसे धागे दिसायला लागलेत.अपग्रेड करायच्या नादात व मोबाईल फ्रेंडलीच्या सोसामुळे मायबोलीचं रुपड इतकं खराब झालं की बोलता सोय नाही.
एक तर सगळ्या लोकांची नावे प्रतिसाद दिल्यावर खाली दिसत आहेत.त्यामुळे प्रतिसाद वाचताना काहीच कळत नाही की नक्की कुणाचा प्रतिसाद आहे.ज्यालिंक हायपलिंक आहेत त्या आधी निळ्या रंगात होत्या आता त्या काळ्या रंगात आहेत,त्यामुळे नवीन सभासदांना लेखन करणे अवघड वाटू शकते.
खूप आहे बोलण्यासारखं,पण माझं व्यक्तीगत मत असे आहे की उर्ध्वश्रेणीकरण करुन मायबोली ने स्वयंगोल केला आहे.
मला जूनी मायबोली हवी आहे ,आपल्याला हवी असेल तर इथे प्रतिसाद दून प्रशासकांपर्यंत संदेश पोचवावा.धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१

मला पहिल्यांदा वाटले की मोदींच्या नोटा रद्दकरण्याबाबत काही धागा आहे की काय..... Proud

मला आदीम जुन्या माबोमधिल फक्त ट्री व्ह्यू हवा

सिंजी,

गिव्ह देम अ ब्रेक!

मायबोली आपली कितीही लाडकी असली आणि आपण आपला प्रचंड वेळ इथे घालवत असलो तरी, हे सगळं टीप टॉप ठेवणारे ऍडमिन्स त्यांचे फुल टाइम जॉब सांभाळून हे करत असतात. त्यात हे अपग्रेड वगैरे खूप क्लिष्ट आणि वेळ खाऊ असतात. त्यामुळे यामागे ज्यांचे कष्ट आहेत त्यांना थोडा वेळ आणि श्रेय देऊया!
आणि फेसबुक अपग्रेड नंतर देखील लाखो स्टेट्स असतात हे किती वाईट आहे अशा. पण पुढच्या अपग्रेडला लोकांना आधी जे आवडलं नव्हतं तेच प्रिय वाटू लागतं!

ऋन्मेष बघा काय म्हणतो,
माझी एक गर्लफ्रेंड आहे. तिच्यासोबत माझे फार मजेत चालू आहे. अजून काही वर्षे मजेत चालेल. मग आम्हाला काहीतरी वेगळे करावेसे वाटेल. मग आम्ही लग्न करू. आणि अचानक आमचे आयुष्यच बदलून जाईल. अगदी दुसर्‍याच दिवशी, आपले बदललेले रूटीन पचनी न पडल्याने कशाला केले लग्न, त्यापेक्षा आधीसारखेच गफ्रे-बॉफ्रे बनून राहिलो असतो तर बरे झाले असते असे होईल. पण हळूहळू लग्नानंतरच्या गंमतीही समजू लागतील. थोडीशी एडजस्टमेंट करता फायदेही दिसू लागतील. बस्स वेळ द्यायची गरज आहे.
गडबड कदाचित आपले सवयीची मायबोली दिसत नाही एवढ्यानेच उड्त असावी. नवीन जागी लवकर झोप येत नाही ईतका सोपा प्रकार असावा तो. भले मग आधी आपण चाळीत राहत असू आणि आता फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो असू तरी सुरुवातीला आपली चाळच बरी होती असे वाटू शकते. पण तेच काही काळाने फ्लॅटची सवय झाल्यावर कोणीही चाळीत पुन्हा राहायला जायचा विचारही करू शकत नाही.

बाकी मी सुद्धा थोडासा बावचळलोच आहे. ज्यांनी बारीक निरीक्षण केले असेल त्यांच्या लक्षात आले असेल की या उर्ध्वपातानंतर मी अजून एकही धागा काढलेला नाही. माझी प्रतिसादांची संख्याही रोडावली आहे. पण वेळ हा आपण स्वतःलाच द्यायला हवा. ज्या कोणी मेहनत घेऊन हे केलेय त्याला मायबोलीची तुमच्या माझ्यापेक्षा जास्त काळजी असणार. त्यामुळे निश्चिंत राहा. तसेच काही गैरसोयीचे वाटले वा काही काळानेही तक्रारी येतच राहिल्या तर योग्य ते बदल घडवले जातीलच. त्यासाठी धागा उघडला आहे तो वापरा Happy

ज्यांनी बारीक निरीक्षण केले असेल त्यांच्या लक्षात आले असेल की या उर्ध्वपातानंतर मी अजून एकही धागा काढलेला नाही. << हो रे, मला वाटल नविन मायबोलीत ईग्नोर बटण अ‍ॅक्टीवेट झाल :प

सिंजी

मागे तुम्ही काढलेल्या विविध धाग्यांवर दिलेले प्रतिसाद तुसडेपणाचे होते. पण इतक्यात काही चांगले विषयही तुम्ही हाताळलेत. त्यामुळे पुन्हा असा विषय का घेतला हे समजत नाही. एव्हढ्याशा गोष्टीसाठी स्वतंत्र धागा कशाला ? ते तर अ‍ॅडमिन टीमच्या धाग्यावरही लिहीता आलं असतंच. तिथे ज्यांना ज्यांना नवीन रूपडं आवडलेलं नाही त्यांनी तसं म्हटलेलं आहे.

मला तरी नवीन रुपाविषयी तक्रार नाही. कारण बदल व्हायला हवेत. पूर्वीचा लुक ऑर्कुटची आठवण करून देणारा होता. पण तरीही फेसबुक लोकप्रिय झालेच. अजूनही ऑर्कुटच्या काळात रमणारे लोक असतात. जग फेसबुककडे वळाल्यानंतर तसेच ऑर्कुटवर बसून राहीलेले लोकही माहीतीत आहेत. पण पुढे ते बंदच पडले. कदाचित मायबोलीने काळाची पावले ओळखली असावीत. वयोमानानुसार आपणही आपल्या लुक्समधे बदल करतोच ना ? कि टीनएजमधे जसे राहत होतो तसेच राहतो ? बदल काळानुसार आणिगरजेनुसार झाले असतील तर सराव होईपर्यंत थांबायला हरकत नाही.

बाकि लुक कुठलाही असो, सदस्याचे नाव पाहून प्रतिसाद वाचायचा कि नाही हे ठरवणारे लोक (बहुमतात ?) आहेत हे कळाले. प्रतिसाद काय आहे हे महत्वाचे असे म्हणणारे (अल्पमतात) आहेत हे ही कळाले. मूकवाचकही बहुसंख्येने आहेत. ते सक्रीय होतील का ? ते कसे सक्रीय होतील ? स्कोअर सेटलमेंट कधी बंद होईल ? असे बदल झालेले (झाले तर) जास्त आश्वासक वाटतील.

पण तरीही फेसबुक लोकप्रिय झालेच. अजूनही ऑर्कुटच्या काळात रमणारे लोक असतात. जग फेसबुककडे वळाल्यानंतर तसेच ऑर्कुटवर बसून राहीलेले लोकही माहीतीत आहेत. पण पुढे ते बंदच पडले. 
>>>>>>

मी सुद्धा ऑर्कुटवर शेवटच्या श्वासापर्यंत होतो.
कारण ऑर्कुटबर एक फॅसिलिटी होती जी फेसबूकवर नाहीये. ऑर्कुटवर समूह (कम्युनिटीज) होते जिथे धागा (फोरम) काढून चर्चा घडवता यायची. मायबोली, मिसळपाव वगैरे जशी संकेतस्थळे आहेत तसे कित्येक जाती-धर्म-प्रांत-प्रदेशांचे समूह ऑर्कुटवर होते.
प्रॉब्लेम असा झाला की बहुसंख्य लोक सोशलसाईट फोटो शेअरींग आणि कीप स्क्रॅपिंगसाठी वापरतात. तिथे फेसबूक सरस ठरली आणि तो लोंढा तिथे वळला. आमच्यासारखे चर्चाप्रेमी तुलनेत फारच कमी असल्याने निव्वळ आमच्यासाठी ऑर्कुट चालवणे फायदेशीर नव्हते, तसेच हळूहळू ईतरही चर्चांची संकेतस्थळे आकार घेत होती. त्यामुळे चर्चाप्रेमी लोकांनाही पर्याय उपलब्ध झाले होते. ते हळूहळू तिथे वळाले. पण जे काही तिथे राहिलेले त्यांना फेसबूकशी एडजस्ट होता आले नाही असे कारण नसून त्यांना जे हवे होते ते फेसबूकवर नव्हतेच हे कारण आहे.

ता.क. - ऑर्कुट बंद पडायची घोषणा कानावर आली आणि मी नवीन जागेच्या शोधात मायबोलीवर आलो Happy

ऑर्कुटला फेसबूक हा पर्याय आहे असे कधी वाटले नाही. माझ्यासारखे ज्यांना असे वाटले ते फेसबुकवर फिरकुन कलटी मारते झाले.

>>>बाकी मी सुद्धा थोडासा बावचळलोच आहे. ज्यांनी बारीक निरीक्षण केले असेल त्यांच्या लक्षात आले असेल की या उर्ध्वपातानंतर मी अजून एकही धागा काढलेला नाही. माझी प्रतिसादांची संख्याही रोडावली आहे.

याच साठी केला होता अट्टाहास!

हाच मेन हेतु असणार !!

माय बोली चे ऋन्मेषीकरण होऊ नये म्हणून उर्ध्वश्रेणीकरण!
बघा सापडला किनई पॉसिटीव्ह पॉईंट?

ऋ, जोक आहे बरका!

<<
कारण ऑर्कुटबर एक फॅसिलिटी होती जी फेसबूकवर नाहीये. ऑर्कुटवर समूह (कम्युनिटीज) होते जिथे धागा (फोरम) काढून चर्चा घडवता यायची.
>> ? कमाल आहे.

वरचे बरेच आयडि खर्या खोट्ञा आयडिने नव्हते तेव्हापासुन मि मायबोलि बघतेय, २००८ चा बदल झाला तेव्हाही सगळ्यानी असच म्हटल होत की आधिच जास्त आपल होत पण बदल आवश्यक असतातच,
काळानुसार होइल सवय , अहो ! याआधिच व्हर्जन कस होत हे सुधा विसराल. टेक माय वर्ड

ऑर्कुट आवडणाऱ्यानो द्या टाळी. अजूनही ऑर्कुटची सर फेसबुकला नाही. विशेष करून ऑर्कुटवरच्या कम्युनिटीज धमाल होत्या. एखादी कंपनी/संस्था/व्यक्ती लोकप्रिय असूनही यशस्वी होत नाही. झालीच तर जास्त काळ टिकेलच असे नाही. का? हा खूप वेगळा आणि मोठ्ठा विषय आहे. अनेक उदाहरणे आहेत. असो. आणि या धाग्याशी तर पूर्णपणे असंबंधित. त्यामुळे पुन्हा एकदा असो. Happy

अक्षरे इतकी लहान आणि प्रश्नचिह्न दुप्पट आकाराचे? माझा चष्म्याचा नंबर अजुनच वाढणार आता.