अॅमेझॉनवर तिरंग्याचा अपमान

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2017 - 23:14

कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत.

http://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/tirangyach...

बातमी ऐकताच चीड यावी अशी आहे. सोबत तसेच खरमरीत शब्द वापरून ती तशी पसरवली जाते. पण सुरुवातीचा रागाचा जोर ओसरल्यावर प्रश्न पडतो की हे असे मुद्दाम करतात का? व्यावहारीकदृष्ट्या विचार करता कोण स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणार. मागे आमीरचे एक देशासंबंधित विधान लोकांना आवडले नाही तर भारतीयांनी टाकलेल्या बहिष्काराची दखल घेत स्नॅपडीलने आमीरला हटवले होते. त्यामुळे एमेझॉन जाणूनबुझून असे करेन याची शक्यता त्या दृष्टीने कमी वाटते. तसेच आणखी एक म्हणजे ईतरही काही देशांचे राष्ट्रध्वज तिथे बिनधास्त विक्रीला ठेवले आहेत. आणि कदाचित त्या देशांचा यावर आक्षेपही नसावा. तर त्यामुळे आपल्यालाही गृहीत धरून ही चूक घडली असेल का? की नाही, ही मुद्दामच काढलेली खोड आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं हे उल्ट्या झेंड्याचं आधीही कुठेतरी पाहिलेलं/ऐकलेलं.>>>>>>> पाकिस्तानमधे,चिदंबरम गेले होते त्यावेळी टेबलावर आपला फ्लॅग उलटा ठेवला होता.

सत्य नेहमी कडू असते पण काही संतूलित लोकांवर परिणाम झाल्याने त्यांना ते वाचल्यावर हसू येते.
लवकर बरे व्हा.

भरत, नक्की आबुधाबीचा दौरा होता का ? काही बातमीचा रेफरन्स मिळेल का ? नुसता फोटो टाकून काय उपयोग.

आणि शेजारचा झेंडा यु ए ई चा नाही म्हणून उगीच असत्यतेबद्दल शंका येते.

एक जेन्युअन शंका - जर रस्त्यावरच्या रॅन्डमली शंभर लोकांना भारताच्या ध्वजाबद्दल विचारले तर किती जण खात्रीने रंगांचा योग्य क्रम सांगतील ?

मी स्वतःच बरेचदा कन्फ्यूज होतो.

हो फारेण्ड, मी गोंधळतो. मी बेसिकली एक धांदरट मुलगा आहे. बरेचदा माझा बरेच गोष्टीत गोंधळ उडतो. लिस्ट लिहिली तर स्वतंत्र धागा बनेल. पण ज्या गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवायला जातो त्याबाबतच मग जास्त गोंधळ उडतो. राष्ट्रध्वजाबाबतही त्याचमुळे गोंधळ उडतो.

कधीतरी खरं लिहीत जा कि रे, थापा मारायलाही सुमार असतो. आणि राष्ट्रध्वजाचा रंगाबद्दल खरंच कँफुज असशील तर तुला हा धागा काढायचा हि हक्क नाही.
आता यावरही तू एक अत्यंत useless कारण देशील किंवा तद्दन युक्तिवाद करशील. म्हणून लिहू नये असे वाटले पण आत्यंतिक चीड आली आणि लिहिले

थाप नाही मी खरेच कन्फ्युज होतो. उगाच हवा करायला म्हणत नाहीये. तसेच उगाच "तुम्ही राष्ट्रध्वजाचा रंग माहीत आहे की नाही यावरून देशभक्ती ठरवणार का?" वगैरे सेंटी डायलॉगही मारायचे नाहीत. पण तरीही एक सहज सांगायचे झाल्यास, थिएटरला चित्रपट बघायला जातो तेव्हा राष्ट्रगीत संपल्यावर दहापैकी आठवेळा मी हमखास सवयीने "भारतमाता की" असे मोठ्याने ओरडतोच. पाठोपाठ अर्धे थिएटर "जय" बोलते. पण यातूनही माझी देशभक्ती सिद्ध होते असेही म्हणायचे नाहीये.

खूप सिंपल लॉजिक आहे. विसरणे, गोंधळणे, धांदरटपणा करणे हे माझ्या सातवीला पूजलेले गुण आहेत. मी त्यांना ठरवून मात नाही देऊ शकत. किंबहुना ठरवून करायला जाताच दलदल इफेक्ट सारखा आणखी फसत जातो, आणखी गोंधळ उडतो.

आणि हो, जेव्हा २६ जानेवारी / १५ ऑगस्टला शर्टावर झेंडा लावायची वेळ येते तेव्हा मी कन्फ्यूज असलो तरी राष्ट्रध्वजाबाबतचा प्रोटोकॉल पाळला जावा, त्याचा अपमान होऊ नये म्हणून आधी ईतरांचे बघून चेक करतो आणि मगच योग्य प्रकारे झेंडा लावतो. त्यामुळे मला मला ध्वजाच्या वा देशाच्या मान अपमानाचे काही पडले नाही असे म्हणू शकत नाही, मला हा धागा काढायचा हक्क नाही असेही म्हणू शकत नाही.

Pages